Skip to main content

जलदुर्गराज नामे सिंधुदूर्ग

कर्रोफर नमुरा यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
मराठ्यांच्या इतिहासात मराठा आरमाराचे स्थानही अतिशय महत्वाचे आहे. यादव साम्राज्य लयाला गेल्यावर पुढे तीनशेहून अधिक वर्षे भारतात पूर्णवेळ कार्यरत असलेले समुद्री आरमार नव्हते. आशियातील बलाढ्य सत्ता असलेल्या मुघल साम्राज्याने देखील दक्खन आणि दक्षिण भारताचा ध्यास घेतल्यानंतरही आरमार उभारण्याचा काही फारसा विचार केलेला दिसत नाही. मुघलांच्या थोडयाफार ज्या काही आरमारी मोहिमा झाल्या त्या हंगामी होत्या. अरबांनी व्यापारी जहाजे भाडेपट्टीने घेऊन त्यावर हत्यारबंद अरब व मुघल सैनिक चढवून काठाकाठाने काही मोहीमा झाल्या, त्या खोल समुद्रपासून लांबच राहिल्या. छत्रपती शिवरायांनी मध्ययुगीन भारतात समुद्राचे महत्व ओळखून आरमार उभारणी केली. त्यांच्या मदतीला व समुद्रकिनारा सुरक्षित करण्यासाठी जलदुर्गांची निर्मिती केली. त्यात अव्वल जलदुर्ग ठरला तो सिंधुदुर्ग. राजपुरकर इंग्रज व गोवेकर पोर्तुगीज यांच्या समुद्री कारवायांना त्यामुळे अंकुश बसून, तळकोकणचा किनारा सुरक्षित झाला. महाराजांनी मालवण जवळील कुरटे बेटावरील या जलदुर्गाचे नाव सिंधुदुर्ग का बरे ठेवले असावे? त्याला कारणही तसेच आहे. सध्याच्या भारत पाकिस्तानातून ही सिंधू नदी वाहते. ही सिंधूनदी पश्चिम वहिनी असून, गुजरातच्या उत्तरेकडील कराची जवळ समुद्राला जाऊन मिळते. सिंधूसंस्कृती ही फारच समृद्ध आणि जगातील प्रगतशील संस्कृती होती, याला आजचे विज्ञानही प्रमाण देते. ही नदी सागराला जाऊन मिळते म्हणून त्या समुद्रास प्राचीन काळापासून सिंधूसागर असे संबोधतात. अरब या ठिकाणी समुद्री मार्गाचा वापर करून व्यापार करीत असत. त्याच मार्गाने इंग्रज व इतर युरोपीय सत्ता भारतात आल्या. अरबांच्या मार्गावरून आल्यामुळे ते याला अरबी समुद्र म्हणू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांना या गोष्टीची जाण होती. आपली प्राचीन समृद्ध संस्कृती ही आपल्या राष्ट्राची अस्मिता असून ही सिंधू नदी तिचे पश्चात्यांना प्रतिनिधित्व करते, याचे भान शिवरायांना होते. छत्रपती शिवरायांनी कधी सिंधू नदी पहिली नाही, पण रुमशान पर्यंतची राजकीय माहिती असणाऱ्या छत्रपतींना सिंधू नदी व तिचे महत्व माहित होते या बद्दल शंका असण्याचे कारण नाही. या सिंधू नदीमुळे समुद्राला सिंधूसागर हे प्राचीन नाव असून, त्यामुळे राष्ट्राच्या मानसिकतेला फार परिणामकारक आणि उत्तजेना देणारे आहे, हे तो जाणता राजा जाणून होता. एखाद्याचा राष्ट्राचे मानसिक खच्चीकरण आणि ह्रास करावयाचा तर त्यांची संस्कृती आणि अस्मितेच्या खून नष्ट करणे हा पूर्वापार चालत आलेला राजकीय डाव आहे. त्यात पाश्चात्य अग्रेसर असून, समुद्रावर आपली फक्त आरमारी नव्हे तर बौद्धिक सत्ताही असणे हे गरजेचे होते. अशी नावे आणि खुणा या राष्ट्राला प्रेरित करून, त्याबद्दल आपुलकीची आणि कर्तव्याची जाणीव जागृत करतात. त्यामुळेच, खोल समुद्रात विहार करणारे निव्वळ आरमार उभारले नाही, तर त्याला साजेसे जलदूर्गही बांधले. कुरटे बेटावरील या मोक्याच्या जलदुर्गाला शिवरायांनी नाव ठेवले, सिंधुदूर्ग. सिंधुसागरावर अधिराज्य करणारा दूर्ग या नात्याने हे सिंधूसागर आमचे आहे, हा महत्वाचा संदेश त्यांनी शत्रूंना व स्वकीयांना दिला. एखाद्या राष्ट्राच्या अस्मितेला उभारी कशी देता येईल, व मेलेले स्वत्व जसे जागे करता येईल हि महत्वाची शिकवण आपल्याला शिवचरित्रातून मिळते. गरज आहे तर ते चरित्र सजग मनाने वाचण्याची व आत्मसात करण्याची. © कर्रोफर नमुरा | sahebefutuhatiujjam@gmail.com
Ranapratap

वरील लेख वाचून खूप समाधान वाटले. यामुळेच जनता राजा हे शिवरायांचे नाव यथार्त वाटते.
12/01/2017 - 18:49 Permalink
सतिश गावडे

सिंधू पुराण खरे आहे का? काही अस्सल पुरावा आहे का? समुद्राला संस्कृतमध्ये सिंधू म्हणतात. त्यामुळे समुद्रातील किल्ला असे असावे असे वाटते. शिवरायांचा काळ मध्ययुगात येत नाही.
13/01/2017 - 17:58 Permalink
कर्रोफर नमुरा

In reply to by सतिश गावडे

मुळात लिहिली गेलेली पुराणे प्राचीन लिपीत होती. सध्या उपलब्ध असलेली पुराणे ही ४थ्या शतकातील पुनरावृत्ती आहेत. त्यामुळे मूळ पुराणे व सध्या उपलब्ध पुराणे याबद्दल अनेक तफावती आहेत, समाज, गैरसमज, प्रत्यारोप आहेत. द्वारका सिंधुसागरात होती, तेव्हा पासून सिंधू म्हणजे सागर हे समीकरण नावारूपास आले.
13/01/2017 - 23:20 Permalink