ब्रम्हचार्याचा संसार. भाग १
दुपारचे जेवण करून पुस्तक वाचायला घेतले. वाचता वाचता डोळा लागला ,इतक्यात लँडलाईनचा फोन खणाणला. घरातील सगळे गाढ झोपले होते, मी फोन उचलला.मीXXX कंपनीकडून मनाली बोलतेय, आमच्या कंपनीने एक सर्वे केला त्यात तुमच्या फोनचा लकी ड्रॉमध्ये नंबर लागलाय. मी श्री. XXXX गोडसेंशी बोलू शकते का? समोरून बोलणार्या मुलीचा आवाज इतका मंजूळ होता , की क्षणभर वाटलं खोटं बोलून संभाषण तसंच चालू ठेवावं , परंतु मी तसं करू शकलो नाही. आजोबा झोपले आहेत, थोड्या वेळाने फोन कराल का ? असं मी म्हटल्यावर घाईघाईने तिने, तसं काही नाही तुमाच्याशी बोलू शकते, असं म्हणून तिने विचारले तुम्ही सध्या काय करता? काही नाही मस्तपैकी झोपलो होतो . हे ऐकून लहान बाळाला गुदगुल्या केल्यावर ते जसं हसतं तसं ती जोरजोरात हसू लागली. ऐकायला फार गोड वाटत होतं ते हसणं.
ती : तसं नाही हो , काम काय करता? -
एक छोटासा व्यवसाय आहे माझा. मी सरळ ठोकून दिले.
ती : ओके. शनिवार आणि रविवारी संध्याकाळी ५ वाजता ठाणे पू. हॉटेल XX येथे आमच्या कंपनीने सेमिनार आयोजित केले आहे, ह्यात तुम्हाला आमच्या कंपनीत फायदेशीर गुंतवणुकीची संधी मिळेल , ही गुंतवणूक ऐच्छिक असेल . तुम्ही गुंतवणूक केली नाही तरी कंपनीतर्फे तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट मिळेल. गिफ्ट काय आहे हे मी विचारले असता, ते सरप्राईज गिफ्ट आहे असं म्हणून ती पुन्हा खळखळून हसली. आणि हो, तुम्ही विवाहित आहात का ?
नाही, मी खरं बोलून गेलो.
ती : मग तुमच्या आई बाबांना जमेल का?
मी : ते बाहेरगावी आहेत, परंतू माझा साखरपुढा झाला आहे दोन महिन्यानी लग्न आहे.(सावधपणे खोटंबोललो)
ती : छानच की, मग तुम्ही तुमच्या भावी पत्नीला घेऊन येऊ शकाल का ?
मी: हो, नक्कीच जमेल.
ती: मग कधी जमेल तुम्हाला ?
मी: उद्या सांगितले तर चालेला का?
हरकत नाही, xxxxxxx या नंबरवर कळवा आणि माझे नाव सांगा. जेव्हा सेमिनारला याल तेव्हा काऊंटरवरही माझे नाव सांगा असे सांगून तीने फोन कट केला.
दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यावर ग्रुपमधील मैत्रीणीना हे सर्व सांगितले , कोण तयार आहे माझ्याबरोबर यायला हे विचारले, तिघीजणी चटकन तयार झाल्या. शेवटी त्यांनीच एकीला सिलेक्ट केले. शनिवारचा दिवस ठरला.
शनिवारी बरोबर ५ वाजता आम्ही त्या हॉटेलच्या हॉलमध्ये शिरलो. काउंटरवर त्या मुलीचे नाव सांगितले. काउंटरवर मुलीने आम्हाला समोरच्या रिकाम्या टेबलाकडे बसायला सांगितले.
गोलाकार टेबल एका पांढर्या कपड्याने खालपर्यंत झाकले होते. तीन खुर्च्या समान अंतरावर ठेवल्या होत्या. आम्ही बसलो, थोड्याच वेळाने एका भडक मेक अप व राखाडी रंगाचा जॅकेट व स्कर्ट घातलेली पांढऱ्या रुंगाची मुलगी हसत हसत आमच्या समोर येऊन बसली. हॉल सापडायला काही त्रास तर झाला नाही ना ? तीने विचारणा केली.
नाही , तुम्ही मनाली का ? मी थेट विचारले.
नाही, ती आज रजेवर आहे, मी अर्चना.
कॉफी घेणार की चहा ? तीने विचारले .
आम्ही दोघांनीही एकसुरात कॉफी सांगितले. तिने ३ कॉफी मागवल्या. त्या थंडगार एसी हॉलमध्ये गरमा गरम कॉफी पिता पिता ती आमची चौकशी करत होती व त्याच बरोबर आपल्या कंपनीची माहितीही देत होती. देशातील सगळ्या प्रसिद्ध पर्यटन स्थळी आमचे रिझॉर्ट आहेत. आमची कंपनी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी देशात विविध ठिकाणी अशी सेमिनार आयोजित करते. लोकांना पर्यटन करताना कोणकोणत्या अडचणी येतात,त्या दूर करण्यासाठी कंपनी कशी मदत करते इ.इ.. ती सांगत होती. तुम्हालाही फिरायला आवडत असेल ना? तीने विचाराले. मी हो म्हटले.
तुम्ही वर्षातून कितीवेळा पर्यटन करता व कुठे कुठे जाता? - ती
वर्षातून एकदा दोनदा व तेही फक्त गोव्याला - मी
आमचे गोव्यालाही रिझॉर्ट आहेत. - ती
तुम्ही गोव्याला कोणत्या हॉटेलमध्ये उतरता ? - ती
आम्ही ओळखीच्या लोकांकडे राहतो.- मी
हे ऐकून ती जरा हिरमुसली, परंतु तिने मला गोव्याच्या बाहेर काढायचा प्रयत्न चालूच ठेवला. कुलू मनाली, नैनीताल ही सुद्धा सुंदर पर्यटन स्थळ आहेत. मी माझ्या आई , बाबांना पाठवले होते हिमालय दर्शनाला. त्यांनी बर्फात खेळण्याचा भरपूर आनंद घेतला.तिकडे ते याकवर बसले. आता ती आम्हाला पकवायला लागली होती. माझ्या आईचा याकवर बसलेला फोटो बघून माझे बाबा म्हणाले , ह्यातील याक कोणता व तुझी आई कोणती हे ओळखता येत नाही , असं म्हणून ती एकटी खोखो हसू लागली. मी म्हटले तुमच्या आईच्या अंगावर एवढे केस आहेत? नाही हो , फारच विनोदी आहात तुम्ही असे म्हणून पुन्हा खोटं खोटं हसायला सुरुवात केली. अचानक बाजूने आरतीच्या घंटी सारखा आवाज आला व समोरची मुलगी,आजूबाजूच्या टेबलावरचे मुले व मुली उभ्या राहिल्या , आम्हालाही उभं राहायला सांगितले. एक भारदस्त व्यक्तिमत्व असलेला तरुण एका वयस्कर जोडप्याच्या बाजूला येऊन उभा राहिला आणि त्याने जोडप्याचे नाव घेऊन आपल्या कंपनीत १ लाखाची गुंतवणूक केल्याची घोषणा केली व त्या जोडप्याचे अभिनंदन केले. सगळ्यांना टाळ्या वाजवून त्या जोडप्याचे अभिनंदन करायला सांगितले. ते जोडपे ह्या स्टँडिंग ओवेशनने भारावून गेले होते.
आम्ही खाली बसल्यावर तिने आपल्या हातातला अल्बम आमच्या समोर ठेवला. ज्यात कंपनीच्या रिझॉर्टचे फोटो होते. ती एक एक पान पालटत होती, आजूबाजूला एखादी घंटी वाजली जायची, पुन्हा तेच,उभे राहून टाळ्या वाजवल्या जायच्या , आमचा उठाबशांचा व्यायाम चालू होता . आता तिने थेट कंपनीचा प्लानच समोर ठेवला. १ लाख गुंतवा , वर्षातून तीन वेळा एक आठवडा फुकट राहा. नसेल राहायचे तर तुम्हाला त्या जागेचे भाडे कंपनी देईल. जितकी जास्त गुंतवणूक तितकी अधिक सुविधा व भाडे मिळेल. त्या रिझोर्टची देखभाल व उपलब्धतेबद्दल विचारले असता त्या स्कीमचे खरं रूप समोर आले. ह्यात देखभालीचा खर्च आपल्याकडून वसूल केला जातो. आयत्यावेळी रिझोर्ट मिळत नाहीत आणि सीझनमध्ये हवे असल्यास ३-४ महिने अगोदर बुक करावे लागते. ब्रेकफस्ट व जेवण कंपल्सरी त्यांच्याकडचेच घ्यावे लागते, जे भयानक महाग असते. मी स्पष्ट नकार दिला व थेट सरप्राईज गिफ्ट काय आहे ते विचारले. तिने रागाने समोर काउंटरवरून घेऊन जा असं सांगितले, व पसार झाली.
काउंटरवरील मुलीने हातात एक काचेचा मोठा बाऊल ठेवला. तेथून बाहेर आल्यावर मैत्रीण म्हणाली, बस आता स्टेशनबाहेर आणि त्या वाडग्यात बोहणी म्हणून १ रुपया टाकला. ह्या वाडग्यात पोह्यांचा काला कालवून खाण्याचे स्वप्न रंगवत मी स्टेशनच्या दिशेने चालत होतो.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग , आजीने फोन उचलला , अरे ती बाई काहीतरी विचारते आहे , तूच बोल.
ओके . एक मिनीट लिहून घेतो. हं, बोला.. दादर पू. हॉटेल xxxxx . शनिवारी नक्की.
आजी ह्यापुढे असे फोन आले आणि मी घरी नसेल तर त्यांना नंतर फोन करायला सांग.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लय फसवतात हे लोकं...जोरजोरात
अच्छा अस घडलय तर .!
हा घ्या आमचा शेम टू शेम अनुभव
असला एक्ष्पेरीन्चे घ्यावा
मला 'कंट्री क्लब' कडून ६ कप
बाकी गोडसेंना बायकोचा टेंपररी
:))
"टेंपररी बायको" काय मस्त
अर्रे
भारी अनुभव :-)
माझाही अनुभव
या अनुभवातून बरेच लोक्स गेले असतील
ब्रह्मचाऱ्याच्या संसाराची पुढची एडीशन केंव्हा ?
डझ् एनिबडी वॉन्ट द 'फर्स्ट
ऑफकोर्स
फर्स्ट हॅन्ड ;) येउद्या
लिवा की..वाट बघतो..
नक्कीच लिहा.
आंग आसं जरा त्ये मोदी बिदी
@मी म्हटले तुमच्या आईच्या
=))
नाशिक ला बजाज अलियांजला खूप
अशाच अनुभवांवर इथेच दोन ते