भरले बांगडे
बांगडा या माशाला स्वत;ची अशी वेगळी चव आहे.ताजे बांगडे तर नुसते तेल,कोकम मिर्चीपुड,मीठावर टाकले तरी झकास लागतत.नवरात्र सुरु झाले कि बांगड्यांचा मोसम चालू होतो तो मेपर्यंत टिकत असला तरी पावसात थंडीच्या दिवसात,सकाळी तांदूळाची गरम पेज आणि तोंडक खरपूस भाजलेला सुका बांगडा हा अजूनही मालवणी पट्ट्यातल्या लोकांचा नष्ट असतो. सुक्या बांगड्याची किस्मोर म्हणजे कोशिंबीर अगदी kiss moreच असते.ओल्या बांगड्यांचे कालवण भंडारी,मालवणी पद्धतीने झकास तर होतेच पण तिखले,हळदीच्या पानातले मोठाले हेही ढिन्च्याक असतात.साधे तुकडे तळण्यापेक्षा आमच्याकडे भरले बांगडे प्रिय.हे भरले बांगडेपण दोन तीन प्रकाराने करतात येतात.नेहमीचा लोकप्रिय प्रकार इथे देत आहे.
साहित्य:-
१.कोळीण मावशीकडून साफ करून पोटाच्या बाजूला चीर देऊन आणलेले दोन बांगडे.
२,अर्धी वाटी ओले खोबरे
३.अर्धी वाती चिरलेली कोथिंबीर
४. ५/६ लसूण पाकळ्या
५.अर्धा पेर आले,
६.सात /आठ मिरच्या
७ अर्ध्या लिंबाचा रस
८. मीठ चवीनुसार.
९ .दोन चमचे तेल.
१० अर्धी वाटी तान्दूळाचे पीठ
११.अर्धा चहाचमचा मिरचीपूड
१२,अर्धा चहाचा चमचा हळदपूड
कृती:-
१.बांगड्यांना थोडा लिम्बुरस आणि मीठ चोळून ठेवावे.
२,अनुक्रमांक दोन ते आठचे जिन्नस पाणी न घालता वाटावेत,
३. हे मिश्रण बांगड्याच्या पोटात दाबून भरावे. १५ मिनिटे तसेच राहू द्यावेत,
४.तांदळाच्या पिठात मिरचीपूड आणि हळदपूड मिसळून एकत्र करावे.त्यात बांगडे घोळवून घ्यावेत.
५.तवा चांगला तापवून त्यवर तेल पसरून घालावे.आणि बांगडे दोन्ही बाजूनी खरपूस तळून काढावेत.
भाकरी,पोळी कशासोबतही खायला तयार आहेत.
वाचने
11179
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त पाकृ... फोटू पन मस्त...
सुंदर!
शाकाहारी असल्याने हा प्रश्न
पण तो डोळा पण खातात का?
In reply to शाकाहारी असल्याने हा प्रश्न by तेजस आठवले
भारतामधे सुद्धा माश्याचा डोळा
In reply to पण तो डोळा पण खातात का? by Nitin Palkar
वाहवा.. माशाल्ला.. सॉरी..
माहीत नाही
In reply to वाहवा.. माशाल्ला.. सॉरी.. by गवि
पाकृ आवडली. आजकाल मी माश्याला
=))
In reply to पाकृ आवडली. आजकाल मी माश्याला by रेवती
जरुर मारशील. तिथे तर
In reply to पाकृ आवडली. आजकाल मी माश्याला by रेवती
जरुर मारशील हे जरुर करु शकशील
In reply to जरुर मारशील. तिथे तर by यशोधरा
मस्त!
टेस्टी
शाकाहारी असल्याने पाकृला पास
शाकाहारी असल्याने पाकृला पास
ईशा
वाखूसा....