मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुतळा हटाव

जानु · · काथ्याकूट
आज सकाळी बातमी वाचली ती पुण्यातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडने पाडुन टाकला. फार पूर्वी वाचलेले बाळकराम आठवले. त्या काळातील वाचलेले खुसखुशीत लेखन, नाटके, लेख आठवले. पु. ल., चि. वि. यांचे लेखन वाचुन त्यात वाटणारा आनंद किती निर्मळ आणि प्रांजळ होता याची आठवण पुन्हा एकदा झाली. त्या काळात ठकीच लग्न किती आनंददायी वाटलं? खरच गडकरी फेकुन द्यावेत का? कोणाकोणाला फेकायचे याची यादी एकदा बनवायच म्हणा. आपण इतके स्वार्थी झालोत का? की असहाय आहोत? खूप विचार आहेत एकत्रित सुसंबद्ध पणे लिहता येत नाहीत पण व्यक्त तरी करावे म्हणून लिहतो. एवढीच हिंमत आणि समाधान. जिथे मला कोणी ओळखत नाही आणि यावर कोणी सत्ताधारी किंवा त्याचा भाऊ, दादा हाच तो आपल्याला विरोध करणारा असे म्हणणार नाही.

वाचने 35459 वाचनखूण प्रतिक्रिया 175

In reply to by प्रकाश घाटपांडे

याला जातीय रंग च्ढवायची काय जरूरी आहे? हे कृत्य जतियवादीच अहे. नहीतर पुतळे हटवण्यासाठी दुसरे कोणते सयुक्तिक कारण सापडते आहे? २०१० साली घदलेल्या या घटनेची पुनरवृत्ती झली झाली आहे. हे वाचा click here

In reply to by प्रकाश घाटपांडे

अद्द्या 03/01/2017 - 12:19
मी हि तेच म्हणतोय . त्या संघटनेने काही केलं कि ते जातीय रंग बघूनच केलेलं असतं .. असो . सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान म्हणून तरी पोलीस काही कारवाई करतील हीच आशा

In reply to by अद्द्या

सूड 03/01/2017 - 17:04
त्यांना हळूच कुणीतरी सांगा, त्यांच्या ष्टाईलने "त्ये गडकरी कै बामन न्हवतं गड्या!!" दुसर्‍या दिवशी पुतळा आहे त्या अवस्थेत परत येईल. =))

In reply to by नावातकायआहे

विशुमित 03/01/2017 - 16:18
नाटक वाचले- नाटकाचे पहिले आणि शेवटची २-३ पाने हेच मूळ असावे पुतळा हटाव मोहिमेचे (ज्याला दरोडा म्हणायचे आहे त्यांनी म्हणावे ) पण नाटक संपूर्ण नाही आहे त्यामुळे ज्या वेळी नाटक लिहायला घेतले होते त्यावेळेस ज्ञात असलेला संभाजी महाराजांबद्दलचा इतिहास काय होता हे जाणून घेतले पाहिजे. लिहणारे गडकरी होते म्हंटल्यावर आणखी स्फोटक वाटणारच "पुतळा हटाव" वाल्याना. बाकी निवडणूक आली आहे आणि चिखलफेक ही होणार. त्यात संभाजी ब्रिगेड प्रथमच निवडणूक लढवणार आहे आणि त्यांनी असे काही ठोस काम ही पुण्यामध्ये केले नाही त्यामुळे कमी वेळा मध्ये जास्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते असली स्टंटबाजी करणारच. म्हणून सृजन नागरिकांनी त्याला जास्त हवा न देता कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या खात्याच्या कोर्टामध्ये चेंडू ढकलून द्यावा. कृपया शांतता राखावी आणि आपले मत मतपेटीतून द्यावे. महाराष्ट्र पुरोगामी राहिला नाही असली वाक्य फेकून विचारवंतांनी गळे सुद्धा काढू नयेत ही विनंती. त्यामुळे खळ खट्याक करणाऱ्यांना आणखी स्फुरण चढते. (तसे आता अवॉर्ड वापसी सुद्धा कोणी करणार नाहीत, हा भाग अलविदा)

In reply to by विशुमित

विशुमित 03/01/2017 - 16:46
पुण्यामधील सर्वच नेत्यांनी पुतळा हटावचा निषेद केला आहे. निलेश राणे नी मात्र बाजू घेतली आहे पण संभाजी ब्रिगेड नव्हती असे म्हणतात. पोलीस शोध लावतीलच. http://www.loksatta.com/pune-news/pune-mayor-and-other-leaders-reaction-on-removal-of-ram-ganesh-gadkari-statue-1375878/ "राम गणेश गडकरी यांचे लेखन आक्षेपार्ह वाटत असेल तर त्याचा प्रतिवाद व्याख्यान, लेखन, विचाराच्या मार्गाने करा, पुतळे फोडून नाही असे माजी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सांगितले." यांच्या वाक्यामध्ये "इतिहास संशोधन' हा एक शब्द हवा होता.

In reply to by विशुमित

संभाजीच्या चारित्र्य हननाची सुरुवात करणारी बखर मूळातच ताराराणीने लिहून घेतली होती कारण संभाजीचा मुलगा शाहु हा सातारला दुसरी राजगादी स्थापायच्या प्रयत्नात होता. वस्तुतः संभाजीच्या दासी आणि दासिकन्या यांचा तपशीलवार उल्लेख डॉ. सदाशिव शिवदे यांच्या ज्वलज्वलनतेजस या महाराणी येसूबाई यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात डिट्टेलवार आला आहे. दासीकन्या किती व औरंगजेबाने त्यांचे निकाह कोण कोणत्या मुसलमान सरदारपुत्राबरोबर लावून दिले. दासीपुत्र किती व त्यांना बाटवून त्यांची नावे काय काय ठेवण्यात आली. सगळे सगळे सापडेल. आता त्या काळात दास्या ठेवायची पद्धत होती म्हणून कोण याचे समर्थन करू पाहील तर बामणाच्या पेशवाईला का नावे ठेवायची ते ही कळूद्य. आता जा बरं जा त्या ताराराणीचा पुतळा हटवा कावळा नाक्यावरून. आहे का दम पाहुया **मधे!

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पेशवे साहेब, संभाजीने किती दास्या ठेवल्या यावरुन त्याचे कर्तॄत्व मोजू नये असे वाटते. ठेवल्याही असतील. तो राजा होता. त्याने त्याची कर्तबगारी कमी होत नाही. संभाजी मुघलांना काही काळा पुरता जाऊन मिळाला होता हे त्याच्या कर्तबगारीला जास्त बट्टा लावणारे वाटते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

देवेन भोसले 05/01/2017 - 14:12
संभाजीच्या चारित्र्य हननाची सुरुवात करणारी बखर मूळातच ताराराणीने लिहून घेतली होती याचा पुरावा मिलेल का

In reply to by देवेन भोसले

जरुर मिलेल. बहुधा शिवाजी अँड हिज टाइम्स मधे. डिट्टेल वार पेशवे सांगतीलच. सुद्द भाषेत.

In reply to by नावातकायआहे

amit१२३ 03/01/2017 - 17:12
ऐतिहासिक नाटक आहे कि सेक्स कथा ..काय ते शब्द आणि काय ती रचना ..हि संस्कृती होती काय आपली . हा गडकरी असल्या प्रणय कथा सांगतो आणि आम्ही मुकाट्याने वाचतो

In reply to by amit१२३

काय ते शब्द आणि काय ती रचना ..हि संस्कृती होती काय आपली आपली संस्कॄती काय होती. जरा विस्कटून सांगा की.

In reply to by amit१२३

सूड 03/01/2017 - 20:09
हा गडकरी असल्या प्रणय कथा सांगतो आणि आम्ही मुकाट्याने वाचतो
आणि काय हो? राजाला प्रणय करायचा अधिकार नाही का?

In reply to by सूड

विशुमित 04/01/2017 - 10:34
प्रणय करण्याचा अधिकार सगळ्या प्रौढांना आहे. पण राजाला स्वतःच्या सरदारांच्या बायको बरोबर नसावा. काय म्हणता? ऐतिहासिक पुरावे सुद्धा पाहिजेत त्यासाठी कारण ह्या नाटकातील पात्रे काल्पनिक नाहीत. cinematic लिबर्टी एक वेळ मान्य करू पण एवढी अतिरंजित की राजे शेवटी स्वतःला रंडी बाज वगैरे दूषणे लावून घेतात. आक्षेप हा असावा. हे नाटक गडकरींव्यतरिक कोणीही लिहले असते तरी ते आक्षेपार्यच आहे.

In reply to by विशुमित

विशुमित 04/01/2017 - 17:28
इसकाळ वरील प्रतिक्रियेतून साभार.. """ amit maruti लोक एखाद्या घटनेचा कसा विचार करतील किंवा मीडिया त्यांना कसा विचार करायला भाग पाडेल याचे उत्तम उदाहरण आज दिसले. लोकांना सत्य काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्यामागे कोण असेल , हेतू काय असेल आताच का ? याचा संशय घेण्यात जास्त इंटरेस्ट आहे. असो राम गणेश गडकरी एक उत्तम नाटककार पण त्यांच्या राजसंन्यास नाटकाबद्दलच शंका का आहेत .. १) या नाटकाचे ५ भाग आहेत पण यातील २ आणि ४ भाग लिहिलेच नाहीत त्याआधीच त्यांचे निधन झाले असा गडकरी समर्थकांचा दावा आहे. म्हणजे गडकरींनी पहिल्या भागानंतर तिसरा आणि डायरेक्ट पाचवा भाग लिहिला ..ग्रेट कोई मिल गया नंतर क्रिश २ २) हे नाटक ऐतिहासिक आहे कि काल्पनिक ..कारण नावे ऐतिहासिक आहेत पण पात्रांच्या तोंडी शब्द सगळे प्रणय कथेचे आहेत. आता त्यांच्या एकाच प्याला , प्रेमसंन्यास या नाटकांमुळे ते अजरामर झाले पण म्हणून त्यांनी केलेली हि चूक माफ करता येईल का ? हे म्हणजे आसाराम ने दिलेल्या प्रवचनामुळे त्यांना सोडून द्या असे म्हटल्यासारखे होईल. राजसंन्यास या नाटकाच्या पहिल्या भागात सुद्धा काही गोष्टी नाटकाला रंजक बनवण्यासाठी घुसडण्यात आल्या आहेत जसे आजकाल चित्रपटात लव्ह सिन असेल तर सेक्स करताना किंवा किस करताना दाखवले जाते. ऐतिहासिक नाटकात या गोष्टी चालतात का ? बाजीराव मस्तानी मध्ये बाजीराव आणि काशीबाई नाचली तर चालत नाही पण महाराजांच्या नावावर पात्राने चुंबन आणि अश्लील बोललेलं चालतं ..""""

In reply to by विशुमित

तुम्ही हा प्रतिसाद तिकडून इकडे डकवाला आहे म्हणजे तुम्ही त्याच्याशी सहमत आहेत असे गृहीत धरून (नसाल तर तसे सांगा आणि ह्या प्रतिसादाला फाट्यावर मारा)... हे नाटक १०० वर्षांपूर्वी लिहिलेलं आहे आणि त्यावर चर्चा गेल्या काही वर्षांपूर्वी सुरु झालीय, आणि पुतळा काल फोडला गेलाय. त्यामुळे "टाईमिंग"वर आणि हेतूवर विचार करण्यात का इंटरेस्ट नसावा? त्यांच्या मधल्या खंडांची जर माहितीच उपलब्ध नसेल तर तसे सांगणे म्हणजे क्रिश २? काहींच्या काही! त्यांनी चूक केलीय कि नाही हे ठरवण्याचा निकष काय असावा ह्याला काही अर्थ आहे कि नाही? आणि माफ न करता काय करायचे तर पुतळा गुपचूपणे फोडून आपला राग व्यक्त करायचा? तुम्ही खाली घाशीराम कोतवालचा उल्लेख केला आहे, तुमचे त्याबद्दल काय मत आहे? ते नाटक तशा पद्धतीने मांडणे योग्य होते कि अयोग्य? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ते नाटक अयोग्य असेल तर त्या नाटकावर बंदी आणण्याचा विचार करायचा कि त्या नाटककाराची पद्धतशीर "इज्जत" काढायची? तुम्हाला काय वाटते त्यावर? मुळात तुम्ही वैयक्तिक ते नाटक वाचलं आहे का? मी वाचले नाही, त्यामुळे त्यातल्या संदर्भांवर प्रतिक्रिया देऊ शकत नाही.

In reply to by विशुमित

आदूबाळ 04/01/2017 - 18:48
या नाटकाचे ५ भाग आहेत पण यातील २ आणि ४ भाग लिहिलेच नाहीत त्याआधीच त्यांचे निधन झाले असा गडकरी समर्थकांचा दावा आहे.
यात काहीही नवल नाही. कादंबरी / नाटक यासारखी मोठी कलाकृती लिनियरली लिहिली गेली आहे असं क्वचितच घडतं. उदा० J K Rowling wrote the final chapter of the last Harry Potter book seven years before the release of the first book.
आजकाल चित्रपटात लव्ह सिन असेल तर सेक्स करताना किंवा किस करताना दाखवले जाते. ऐतिहासिक नाटकात या गोष्टी चालतात का ?
का चालू नयेत यामागचं लॉजिक कळलं नाही.

In reply to by आदूबाळ

सूड 04/01/2017 - 19:02
का चालू नयेत यामागचं लॉजिक कळलं नाही.
कसं चालेल? ऐतिहासिक कथानकं म्हणजे चितळे यांच्या साजूक तुपात बुडवून काढल्याइतकी सात्त्विक असावीत असा अलिखित नियम नाही का? 'पेरनास्थाण' म्हणजे सात्विकच असायला पाहिजे, त्याला त्याचं वैयक्तिक आयुष्य असून कसं चालेल?

In reply to by विशुमित

असे कितीतरी नाटकांबद्दल आहे. वानगीदाखल 'साष्टांग नमस्कार' हे नाटकसुद्धा अत्रे यांनी असेच नॉन लिनिअरली लिहिले आहे. 'कर्‍हेचे पाणी' या आत्मचरित्रात मधे याचा उल्लेख सापडू शकेल. कित्य्के चित्रपटांचे शूटिंगसुद्धा असेच नॉन लिनिअरली होते. ऐतिहासिक पात्रे आणि काल्पनिक कथा हे तर अगदी कॉमन आहे. 'रायगडाला जेंव्हा जाग येते', 'इथे ओशाळला मॄत्यू', 'सीमेवरुन परत जा' अशी कितीतरी नाटके इतिहासाला १०० % धरुन नाहीत. उगाच इतरांच्या प्रतिक्रिया इथे डकवण्यापेक्षा तुम्हाला 'संभाजी ब्रिगेड'चे क्रूत्य पटले आहे असे का म्हणत नाही.

In reply to by नावातकायआहे

दिलेल्या लिंक मध्ये कुठेच दुसरा खंड नाहीये आक्षेप दुसऱ्या खंडावर आहे संजय सोनवणी यांच्या ब्लॉग मध्ये दुसऱ्या खंडातील उतारे दिलेत. पण दुसरा खंड आहे का???? वर दिलेल्या लिंक मध्ये पहिला तिसरा आणि पाचवा खंड आहे ?????

आदूबाळ 03/01/2017 - 14:19
जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती गावात सज्जनांच्या आता तणाव नाही ...या कवीच्या कवितांतही पुढेमागे जाळल्या जायचं पोटेन्शियल आहे. त्यामुळे नाव लिहीत नाही.

In reply to by आदूबाळ

खेदजनक पण शक्य आहे! याच कवीच्या ह्या ओळीत याचं सार आहे - "दूर नाही राहिलेली राजसत्तेची लढाई एरवी, होतास बाबा तू कुणाला प्यार पांडू?"

In reply to by आदूबाळ

चतुरंग 04/01/2017 - 19:53
बसुनी गळेकापूंसवे मी काल मैफल जिंकली कटला जरी होता गळा उठलो अचानक गात मी आणि मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते असे म्हणणारे भटसाहेब त्यांची अख्खी हयात जळाले आहेत, त्यांना या शेळपटांची काय भीती! त्यांच्या कविता लोकांच्या मनात आणि हृदयात आहेत!

ए ए वाघमारे 03/01/2017 - 14:31
हे कळल्यावर पहिला विचार मनात आला तो हाच की महाराष्ट्र आता राहायाचा लायक राहिला नाही. पुरोगामी महाराष्ट्र, सांस्कृतिक राजधानी असे शब्द ऐकले की आता हसू येते. जातीयवाद, प्रतीकांचे राजकारण या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. खरी चिंता ही की आपल्याला आपल्या वैचारिक लीगसीचं, आयकॉन्सचं काहीही पडलं नाही.

कलंत्री 03/01/2017 - 17:03
१० / १२ लोकांनी असा पुतळा रात्री बेरात्री भिरकावून देणे हे निश्चितच आक्षेर्पाह आहे. त्या नाटकातील फोलपणा काढणे आणि संभाजी महाराजांची उज्ज्वल बाजू मांडणे हे निश्चितच शक्य आहे. छत्रपती म्हणून ९ वर्ष लढा देणारे आणि केवल लोकापवादांनी बदनाम होणारे अशा एखाद्या लेखाने / नाटकाने अथवा पुस्तकाने कसे बरे बदनाम होतील? त्याचबरोबर गडकर्‍यांचे मोठेपणही कसे बरे अमान्य करता येईल ? पुण्यात अशा घटना पुढे होऊ नये हीच अपेक्षा.

In reply to by कलंत्री

सूड 03/01/2017 - 17:10
संभाजी महाराजांची उज्ज्वल बाजू मांडणे हे निश्चितच शक्य आहे.
कशाला उज्ज्वलच बाजू हवी आहे ? नेता मानता ना त्यांना? मग आहे तस स्वीकारा की!! त्यांची कोणतीही बाजू मांडली तरी त्यांनी केलेलं कार्य फिकं पडणार आहे का? कसंय ना, एखाद्या व्यक्तीला देवत्व द्यायच्या नादात ती व्यक्ती माणूस होती आणि त्यामुळे असलेल्या गुण-अवगुणांमुळे त्या व्यक्तीचं महत्त्व कमी होत नाही याची समज यायला तितकी वैचारिक पोच असणं गरजेचं आहे आणि या लोकांकडून त्याची अपेक्षा करणं चूक आहे.

In reply to by सूड

उपेक्षित 03/01/2017 - 17:46
100 वेळा सहमत सूडराव तुमच्याशी अगदी मनातले बोललात. आपल्याकडे व्यक्तीपुजेचे इतके स्तोम आहे न कि बास, या निमित्ताने मागे एकदा नेपोलिअन वरचे मराठी अनुवादित पुस्तक वाचले होते त्यात त्याचा पराक्रमाबरोबरच त्याच्या रंगेलपणाबद्दल तसेच त्याच्या इतर निगेटिव गोष्टींबद्दल हि बैजवार लिहिले गेले होते अगदी तठस्थपणे.

In reply to by उपेक्षित

विशुमित 04/01/2017 - 10:39
मग "घाशीराम कोतवाल" ला त्यावेळेस एवढा विरोध का बरं झाला असावा ? साहेबा हा भारत आहे, त्यात महाराष्ट्र आहे आणि त्यावरून कडी हे पुणे आहे त्यामुळे नेपोलिअनचे तुणतुणे इथे वाजून काही उपयोग नाही.

In reply to by सूड

व्यक्तीपूजेचे स्तोम माजले आहे,अगदी कोणीही व्यक्तीपूजक त्यातून सुटला नाही,कोणीतरी कोणालातरी असं ना तसं पूजतच असतो.

In reply to by निष्पक्ष सदस्य

विशुमित 04/01/2017 - 10:42
हो बरोबर आहे कोणाचा संभाजी तर कोणाचा गडकरी. चालायचं. लोकांना इग्नोर मारा म्हंटलं तर लागले सगळेच गळे काढायला.

In reply to by विशुमित

बाळ सप्रे 04/01/2017 - 10:47
बोलणे इग्नोअर करावे.. झुंडशाही इग्नोअर होता नये. पुतळेच काय कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करणार्‍यांना ताळ्यावर आणायलाच हवं.

'एखादेच फुटके नशीब म्हणुनी प्रेतास शॄंगारिते' या गडकर्‍यांच्याच ओळी आठवल्या. भाई, दादा, आबांचे पोस्टर शहरात गावोगाव मिरवत असताना यांच्याच पुतळ्याच्या नशीबी नदीत फेकले जाणे यावे ही एक केविलवाणी गंमतच. संभाजी ब्रिगेड ही संघटना अस्तित्वात असणे ही संभाजी राजांची सगळ्यात मोठी बदनामी आहे.

गामा पैलवान 03/01/2017 - 18:02
लोकहो, महाराष्ट्राचे शत्रू कोण हे या प्रसंगातनं व्यवस्थित कळतं. मात्र हा हल्ला कोणावर झालाय याचा उहापोह व्हायला हवा. हा हल्ला मराठी भाषेवर आहे. गडकरी कादंबरीकार होते. त्यांना शंभूराजांचा अपमान करायचं काही कारण नव्हतं. तसा हेतूही नव्हता. मग दंभाजी ब्रिगेडला यांत खुसपट काढायचंय कशाला मुळातून? कारण की दंभाजी ब्रिगेडास मराठी भाषेचं खच्चीकरण करायचंय. राम गणेश गडकरी यांनी अलंकारांद्वारे मराठी भाषेस वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. याचा दंभाजी ब्रिगेडास प्रचंड राग येतो. मध्यंतरी काही वर्षांपूर्वी याच ब्रिगेडी लोकांनी अशुद्ध मराठी लिहिण्याचा घाट घातला होता. उदा. : शिवाजी हा शब्द षिवाजी असा लिहिणे. यावरून दंभाजी ब्रिगेड ही मराठीची मारेकरी आहे हे नि:संशयपणे सिद्ध होतं. गडकऱ्यांचा पुतळा मोडण्याचा हा गलिच्छ प्रकार राज्य सरकार मराठी संवर्धन पंधरवडा साजरा करत असतांना मुद्दामून केला गेला आहे. तस्मात, महाराष्ट्राचे शत्रू मराठीचेही शत्रू आहेत हे स्पष्ट व्हावे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मध्यंतरी काही वर्षांपूर्वी याच ब्रिगेडी लोकांनी अशुद्ध मराठी लिहिण्याचा घाट घातला होता. उदा. : शिवाजी हा शब्द षिवाजी असा लिहिणे.
खेदजनक आहे.
दंभाजी ब्रिगेड
मग हा शुद्धलेखनाचा कोणता प्रकार आहे बरे?

In reply to by निष्पक्ष सदस्य

गामा पैलवान 04/01/2017 - 00:13
निष्पक्ष सदस्य, दंभाजी ब्रिगेड हा शुद्धलेखनाचा प्रकार नाही. यास मोडतोड म्हणतात. पुतळ्याची केली ना अगदी तश्शीच मोडतोड. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माननीय,गा. पै
दंभाजी ब्रिगेड हा शुद्धलेखनाचा प्रकार नाही. यास मोडतोड म्हणतात. पुतळ्याची केली ना अगदी तश्शीच मोडतोड.
मग तुमच्यात आणि ब्रिगेडी मंडळीत काही फरक नसावा. आ.न नि.स

In reply to by निष्पक्ष सदस्य

गामा पैलवान 07/01/2017 - 15:31
निष्पक्ष सदस्य, एकदम बरोबर बोललात पहा. माझ्यात आणि दंभाजी ब्रिगेड्यांत काहीच फरक नाही. धटासी असावे धट, उद्धटासी उद्धट । खटनटाचे नटखट, अगत्य करी ॥ -इति रामदास स्वामी (ब्राह्मण संत) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

लक्षणें ऐकोन मानी वीट | मत्सरे करी खटपट | नीतीन्याय उद्धट तो येक पढतमूर्ख || भरी भरे आला क्रोध नावरे | क्रिया शब्दांस अंतरे | तो येक पढतमूर्ख || || इति श्री रामदास || ( सांगायची गरज नसावी) आ.न नि.स

In reply to by निष्पक्ष सदस्य

गामा पैलवान 08/01/2017 - 13:38
निष्पक्ष सदस्य, अचूक श्लोकाबद्दल तुमचं कौतुक आहे. दंभाजी ब्रिगेड पढतमूर्ख आहे हे किती समर्पक शब्दांत सांगितलंत तुम्ही! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अगदी अगदी!! ब्रिगेडी पिलावळ पढतमूर्ख आहेच,वादच नाही. बाकि, आपला एक वरचाच प्रतिसाद खालील प्रमाणे↓ एकदम बरोबर बोललात पहा. माझ्यात आणि दंभाजी ब्रिगेड्यांत काहीच फरक नाही.

In reply to by निष्पक्ष सदस्य

गामा पैलवान 09/01/2017 - 01:18
निष्पक्ष सदस्य, अहो, ती तर तुमच्या बालबुद्धीने मारलेल्या आकलनाच्या प्रदीर्घ मजलेस दिलेली प्रोत्साहनपर कौतुकाची दाद होती. तुम्ही ती फार गांभीर्याने घेतलीत. एकंदरीत बालबुद्धी सार्थ केलीत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आदूबाळ 03/01/2017 - 20:34
शिवाजी हा शब्द षिवाजी असा लिहिणे
हे थोर आहे! म्हणजे 'त्यांचं' प्रमाणलेखन आम्ही मानणार नाही वगैरे लॉजिक ठीक आहे, पण "षिवाजी" असाच का लिहायचा म्हणे?

In reply to by आदूबाळ

विशुमित 04/01/2017 - 10:47
शिवाजी हा शब्द षिवाजी असा लिहिणे>>> हा हा हा... नववर्षाला एका मित्राला नवर्षाभिनंदन केलं तर म्हणतो कसा मी गुडीपाडव्याला नव वर्ष साजरी करतो. म्हणलं बस बोंबलत.

Ranapratap 03/01/2017 - 19:14
गडकऱ्यांचं लिखाण हे फार वर्षापासून चे आहे. याना आता कशी आठवण आली. हा प्रकार जातीय आहे कि राजकीय हे शोधून याना पाठिंबा देणार्यांना शिक्षा झाली पाहिजे.

रेवती 03/01/2017 - 21:41
आज हा पुतळा काढला, मागे एकदा दादोजींचा काढ होता की काहीतरी असेच, उद्या आणखी काही........................एक प्रश्न पडतोय. इतका वेळ यांना मिळतो कसा? नै म्हणजे, आजकाल सगळेजण बिझी असतात असं ऐकलय. पुतळ्याकडे पाहून त्या मनुष्याचे विचार आठवणे, स्फुर्ती घेणे राहू द्यात.............कोणत्या चौकात कोणता पुतळा आहे याकडे लक्ष तरी कसं राहतं? आपल्या घराच्या कोनाड्यात असलेलं गांधीलमाशीचं घर पाडायला जमत नाही, हे उद्योग बरे सुचतात? बरं, राजकीय रंग दिला तरी सगळ्यांना गठ्ठ्याने पैसे मिळत असतात असेही नाही. त्यापेक्षा कष्टाची भाकरी तरी खावी. भाकरीतही व्हरायटी आहे, भाजीत आहे. ही हेव्यादाव्याची कामे करून तब्येतीचे, वेळाचे नुकसान कोण करून घेणार?

ज्या गडकर्यां मुळे साहित्यीकांच्या पिढ्या घडल्या , त्यांचा असा अपमान तो ही "पुण्या सारख्या" शहरात अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आज आचार्य अत्रे असते तर त्यांनी नवयुगाच्या अग्रलेखातून असल्या करंट्यांना कुत्र्यासारखा झोडपून काढला असता (श्वानमित्रांनी माफ करावे, आणि माझा पुतळा कुठेही नाही)

In reply to by इल्यूमिनाटस

गणामास्तर 04/01/2017 - 09:01
नवयुगातूनचं का म्हणून बरे? दैनिक 'मराठा' मधून का नाही ? आणि तुमच्या "पुण्यासारख्या" शहरात अपमान होणे हे कधीपासून लाजिरवाणे समजले जाऊ लागले ?

In reply to by गणामास्तर

अपमान दोन प्रकारचे असतात 1. शाब्दिक अपमान 2. विकृत अपमान "पुण्यासारखे" शहर हे शाब्दिक /वैचारिक अपमानांसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याचे प्रत्युत्तर देखील तसेच दिले जाते आणि जेव्हा ते जमत नसेल तेव्हा असले घान्येर्डे प्रकार घडतात. त्यामुळे असल्या घटनांना पुण्याच्या संस्कृतीशी जोडण्याचे काहीच कारण नाही राहता राहिला प्रश्न नवयुग कि मराठा कुटं बी छापा कि राव

सुबोध खरे 03/01/2017 - 23:25
संभाजी राजांचा अपमान झाल्या सारखे वाटले म्हणून राम गणेश गडकरींचा पुतळा फोडला!! महाराजांशी गद्दारी केली म्हणून खंडूजी खोपडेच्या वंशजांचा निप्पात करणार काय? जावळीतले सगळे मोरे संपवून टाकणार काय? औरंगजेबाची कबर नेस्तनाबूत करणार काय? महाराजांना दगा केला म्हणून अफजल खानाची कबर तोडणार काय? मिर्झाराजे जयसिंगची समाधी फोडणार काय? एवढी खुमखुमी असेल तर सीमेवर जाऊन लढत का नाही? महाराजांकडून थोडे शिकत का नाहीत देशाचे खरे शत्रू कोण हे सुद्धा यांना कळत नाही!! खरेतर शिवाजी यांचा आदर्श नाही की संभाजीचे यांना कौतुक नाही!! स्वार्थ आणि गलिच्छ राजकारण यांनी बरबटलेली डोकी स्वतःचे सोडा पण कुणाचेच भले करू शकत नाहीत!! जाती द्वेषाच्या दारुनी धुंद झालेली डोकी घेऊन घर जाळायला निघालेले हे शहाणे, कायदा यांना काहीच कसे करीत नाही?? कि कायदाच षंढ झाला आहे आणि जातीयवादाला विकला गेला आहे? सर्व जाती धर्माच्या मराठी समाजा कडून याचा तीव्र निषेध व्हॉटस अॕप वरुन साभार

In reply to by सुबोध खरे

विशुमित 04/01/2017 - 11:25
पुतळा हटवण्या पेक्षा ब्रिगेडीनी कायदेशीर मार्गानी गडकरींचे लेखन खोडून काढले असते तर बरं झाले असते. मी काही संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता नाही पण या व्हाट्सअप पोस्टला काही प्रतिप्रश्न विचारू इच्छितो, जाणकारांनी मार्गदर्शन करावं. महाराजांशी गद्दारी केली म्हणून खंडूजी खोपडेच्या वंशजांचा निप्पात करणार काय? जावळीतले सगळे मोरे संपवून टाकणार काय? औरंगजेबाची कबर नेस्तनाबूत करणार काय? मिर्झाराजे जयसिंगची समाधी फोडणार काय?>>>> -- शत्रू मेला म्हणजे शत्रुत्व मेले, अशी आपली संस्कृती सांगते बहुतेक. वरील दिलेल्याच्या वंशजांना शिक्षा देणे कितपत योग्य आहे ? महाराजांना दगा केला म्हणून अफजल खानाची कबर तोडणार काय?>>> -- ती स्वतः शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या सांगण्यावरून बांधून घेतली होती म्हणे ? महाराजांचा अवमान होईल ना ? (तसे ही ते करताच म्हणा) एवढी खुमखुमी असेल तर सीमेवर जाऊन लढत का नाही?>> -- सैन्यात न जाता सीमेवर लढण्याची परवानगी असते का ? खरेतर शिवाजी यांचा आदर्श नाही की संभाजीचे यांना कौतुक नाही!!>> -- कोणाची कशी आणि किती भक्ती आहे हे कसे मोजणार? स्वार्थ आणि गलिच्छ राजकारण यांनी बरबटलेली डोकी स्वतःचे सोडा पण कुणाचेच भले करू शकत नाहीत!!>> -- प्रचंड सहमत जाती द्वेषाच्या दारुनी धुंद झालेली डोकी घेऊन घर जाळायला निघालेले हे शहाणे, कायदा यांना काहीच कसे करीत नाही??>> -- माझ्या माहिती प्रमाणे पुतळा हटवला आहे घरे नाही जाळली कोणाची. तसे २ सैनेनी एस टी आणि बसेस च्या काचा किती तरी वेळा फोडल्या अजून पण त्यांचे सुप्रीमो आत गेले नाहीत. पण आताचे महाराष्ट्राचे गृहमंत्री योग्य कारवाई करतील याची आशा बाळगणे वावगे आहे का? कि कायदाच षंढ झाला आहे आणि जातीयवादाला विकला गेला आहे?>>> -- कायदा षंड असतो की जातीयवादी ? सर्व जाती धर्माच्या मराठी समाजा कडून याचा तीव्र निषेध>> -- निषेद निषेद निषेद ...!!

In reply to by विशुमित

सूड 04/01/2017 - 15:06
शत्रू मेला म्हणजे शत्रुत्व मेले, अशी आपली संस्कृती सांगते बहुतेक.
म्हणजे पुतळा काढून गडकरीं कार्य संपवलं असं वाटतंय का? उलट गडकरींबद्दल शष्प माहित नसणारे लोक पण त्यांचं साहित्य शोधायला लागतील. जातींवर बोलू नये, पण विशिष्ट जातीच्या लोकांना विशिष्ट नेत्यांच्या नावावरुन कोणीही सहज चिथवू शकतो आणि सत्यासत्य न पडताळता हेही जातात घरचं कार्य असल्यासारखे!!

In reply to by सूड

विशुमित 04/01/2017 - 15:34
म्हणजे पुतळा काढून गडकरीं कार्य संपवलं असं वाटतंय का?>>> -- असे कोठे म्हंटले मी हे कृपया कोणी दाखवेल का? उलट गडकरींबद्दल शष्प माहित नसणारे लोक पण त्यांचं साहित्य शोधायला लागतील.>>> -- चांगलं आहे की त्यामुळे गडकरी नक्की कोण आणि त्यांची योग्यता काय होती हे प्रत्येकाला समजेल. जातींवर बोलू नये, पण विशिष्ट जातीच्या लोकांना विशिष्ट नेत्यांच्या नावावरुन कोणीही सहज चिथवू शकतो आणि सत्यासत्य न पडताळता हेही जातात घरचं कार्य असल्यासारखे!!>>> -- जातीवर बोलू नये म्हणणारे मग कशासाठी बोलत असतील असे घरच कार्य असल्यासारखे?

हकु 04/01/2017 - 10:45
एका बिडीच्या ब्रँड चं नाव 'संभाजी' असल्याचा अभिमान वाटतो बहुतेक ह्यांना !!

हा हा हा मला अजिबात आश्चर्य वाटले नाही हे प्रकरण ऐकून ! मी 2 3 वर्षांपूर्वीच म्हणालो होतो की शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आगरकर सावरकर कर्वे ह्यांच्या कार्याना काडी ची किंमत राहिली नाहीये. गडकरी बिचारे ब्राह्मण सदृश नाव असल्याने भरडले गेले . मी पैज लावून सांगतो आता ह्या नंतर कोणाकोणाचा नंबर आहे ते शाहू महाराजांशी मतभेद म्हणून टिळकांचा फुलेंशी मतभेद होते म्हणून चिपळूणकारांचा आंबेडकरांशी मतभेद होते म्हणून इरावती कर्वेंचा , मग सहज म्हणून इतर कर्वेंचा गडकरी तो बस झाकी है बालगंधर्व अभी बाकी है राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा =)))) हा हा हा हा हा हा बघूया आता मातीत डोकं खुपसून बसलेले शहामृग कधी डोकं बाहेर काढतात ते :D

In reply to by प्रसाद गोडबोले

गडकरी तो बस झाकी है बालगंधर्व अभी बाकी है >>>> पुण्याचा मानबिंदू असलेले 'बालगंधर्व' पाडणार? http://www.esakal.com/pune/marathi-news-balgandharva-rangmandir-pune-101326 एका वर्षातच आमची भविष्यवाणी खरी ठरत आहे ! ! - अस्सल जातिवंत ज्योतिषी मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस

In reply to by प्रसाद गोडबोले

बिटाकाका 08/03/2018 - 11:47
तुमच्या वरच्या वाक्याचा अर्थ "गडकरी आडनावामुळे/जातीमुळे पुतळा पडला गेला तसेच एके दिवशी बालगंधर्वांचे होणार" असा प्रतीत होत होता, बरे झाले क्लिअर केलेत. ================== बालगंधर्व पाडण्याचा वगैरे कुठलाही प्रस्ताव नसल्याचे पालिकेने सांगितल्याचे वाचले कुठेतरी. दुरुस्तीसाठी राखीव १० कोटींचा खर्च पुनर्विकसन या सदरात टाकल्याने हा गोंधळ झाला असण्याची (किंवा जाणीवपूर्वक आवई उठवली असण्याची) शक्यता नाकारता येत नाही. ================== पण, समजा पुनर्विकसनासाठी पाडली इमारत आणि नवीन बालगंधर्व इमारत बांधली तर चुकीचं काय त्यात? सध्य इमारतीतील मूत्र विसर्जन गृहात गेलो तर वाटते या इमारतीला बालगंधर्वांचे नाव देऊन बालगंधर्वांचा अपमान तर होत नाही ना?

मला तर सुरवातीला हे आर्य मदिरा मंडळाच्या सदस्यांचे काम वाटले होते. एकच प्याला च्या निषेधार्ध त्यांनी हे कृत्य केले असावे असे वाटले.

अजया 04/01/2017 - 16:18
निवडणुका तोंडावर आल्याने केलेल्या मूर्ख कृत्याला फक्त राजकिय रंग आहे! बाकी ब्रिगेडी लोकांचे वैचारिक तारे अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या फेबु वाॅलवर वाचून मनोरंजन झाले आहे ! तिकडे अभिमानाने या मर्द मराठ्यांनी पुतळा फोडला असे लिहून त्यांचे फोटो दिले आहेत. त्या पोरांना गडकरी कोण, त्यांचे कसले नाटक वगैरे माहित असण्याची शक्यता शून्य दिसते आहे. जरा हात साफ करुन घेतला वाटतं पोरांकडून. चार वडापाव वर काम झाले असावे!

In reply to by अजया

विशुमित 04/01/2017 - 16:28
पुष्कर तर म्हंटला सन्मानाने पुतळा परत नाही बसवला तर पुण्यात नाटकाचा खेळ करणारच नाही. (या वडापाव खाऊ करंट्यामुळे बिचाऱ्याच्या पोटावर पाय आला. निवडणूक होई पर्यंत पुतळा बसला तर ठीक नाहीतर अवघड आहे त्याचे)

संदीप डांगे 04/01/2017 - 18:12
विशुमित, तुमचा पवित्रा चुकीचा वाटतो आहे. तपासून बघा ही विनंती. गडकर्‍यांनी हे नाटक केव्हा लिहिले, त्यावेळी उपलब्ध साधने (कागदपत्रे इत्यादी) त्यांनी तपासून लिहिलंय की तेव्हा अपुर्‍या संशोधनामुळे उपलब्ध असलेली वाईट रंगवलेली संभाजीराजांची प्रतिमा ही खरेतर मूळाशी आहे हे बघितलं पाहिजे. शंभर वर्षांआधी कुणीतरी काहीतरी लिहून ठेवलंय म्हणून आज त्यांचा पुतळा उखडणे योग्य ठरवायचे असेल तर आजची ही पिलावळही शंभर वर्षांआधीच्याच काळात राहते हेही मान्य करावे लागेल. गडकर्‍यांना जो सन्मान आज दिला जातो तो राजांना बदनामीकारक प्रस्तुत केले म्हणून नाही दिला जात एवढे जरी दगडांच्या डोक्यांना कळले तरी पुरे. कारण तसे असते तरच पुतळा उखडणे सुसंगत वाटले असते. संभाजीराजांबद्दल बदनामीकारक मजकूर परवायला कोणी सुरुवात केली हे जरा इतिहासात डोकावून बघायची गरज होती. तसे बघितले असते तर आपलीच घरे फोडायची वेळ आली असती व ते अडचणीचे ठरले असते मग... कोणतीही कारणे दिली तरी एका कलाकाराचा असा अपमान होणे कोणत्याही दृष्टीने योग्य नाही. गडकर्‍यांच्या संभाजीला उखडायचे असेल तर गडकर्‍यांपेक्षा मोठे होऊन दाखवावे, त्यात मर्दानगी दिसली असती, रात्रीच्या अंधारात जाऊन निर्जीव दगडी पुतळ्यांवर मर्दानगी दाखवणार्‍यांच्या मनगटात नेमकं कोणाचं रक्त वाहतंय याची खात्री करुन घ्या म्हणावं....

In reply to by संदीप डांगे

विशुमित 05/01/2017 - 10:28
विशुमित, तुमचा पवित्रा चुकीचा वाटतो आहे. तपासून बघा ही विनंती.>>> -- तुम्ही माझे प्रतिसाद काळजी पूर्वक वाचता आहात यासाठी पुन्हा एकदा शतशः आभार..!! पवित्रा कोठे चुकीचा वाटतो हे उतघृत केले तर मोठे उपकार होतील. एकच सांगणे -- "कराल ते हित सत्य करा". गडकर्‍यांनी हे नाटक केव्हा लिहिले, त्यावेळी उपलब्ध साधने (कागदपत्रे इत्यादी) त्यांनी तपासून लिहिलंय की तेव्हा अपुर्‍या संशोधनामुळे उपलब्ध असलेली वाईट रंगवलेली संभाजीराजांची प्रतिमा ही खरेतर मूळाशी आहे हे बघितलं पाहिजे.>>> -- ते मी माझ्या पहिल्याच प्रतिसादात नमूद केले आहे. शंभर वर्षांआधी कुणीतरी काहीतरी लिहून ठेवलंय म्हणून आज त्यांचा पुतळा उखडणे योग्य ठरवायचे असेल तर आजची ही पिलावळही शंभर वर्षांआधीच्याच काळात राहते हेही मान्य करावे लागेल.>>> -- मला हे मान्यच आहे. पुतळा हटवण्याचा मी निषेधच केला आहे. (अवांतर : "मंदिर यही बनायेंगे" म्हणणारी आणखी एक पिलावळी तर मागे 5००-6०० वर्ष मागच्या जगांत जगत आहे. माझ्या माहितीतले, जे पुतळा हटवण्याचा विरोध करत आहेत त्यातले बरेच जण बाबरी तोडल्याचे भारी समर्थन करत होते/आहेत. नरसिह राव वर पुष्प वर्षाव करत होते /आहेत. हा डबल स्टॅंडर्ड चालतो वाटतो) कारण तसे असते तरच पुतळा उखडणे सुसंगत वाटले असते.>>> -- कारणं काहीही असोत अश्या प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कदापि समर्थनीय नाही. तसे बघितले असते तर आपलीच घरे फोडायची वेळ आली असती व ते अडचणीचे ठरले असते मग...>>>> -- "आपलीच घरे" नाही समजले. कृपया विस्कटून सांगता का ? कोणतीही कारणे दिली तरी एका कलाकाराचा असा अपमान होणे कोणत्याही दृष्टीने योग्य नाही.>>> -- कोणा ही जीवाचा न घडो मत्सर.. गडकर्‍यांच्या संभाजीला उखडायचे असेल तर गडकर्‍यांपेक्षा मोठे होऊन दाखवावे, त्यात मर्दानगी दिसली असती>>> -- बापुड्यांच्या ४ पिढयांना ते शक्य नाही, ते अंग मेह्नितेचेच काम करणार. मनगटात नेमकं कोणाचं रक्त वाहतंय याची खात्री करुन घ्या म्हणावं....>>> -- DNA टेस्ट म्हणत असाल तर ती कशासाठी? उगाच ऐतिहासिक वाटावं म्हणून हे वाक्य टाकले असेल तर सिनेमॅटिक लिबर्टीला पास.

In reply to by विशुमित

संदीप डांगे 05/01/2017 - 10:58
तुमच्या प्रतिसादांचा आशय पुतळा तोडणार्‍यांच्या बाजूने जातोय असं वाटले, तसे नसेल तर ओके!
"मंदिर यही बनायेंगे" म्हणणारी आणखी एक पिलावळी तर मागे 5००-6०० वर्ष मागच्या जगांत जगत आहे. माझ्या माहितीतले, जे पुतळा हटवण्याचा विरोध करत आहेत त्यातले बरेच जण बाबरी तोडल्याचे भारी समर्थन करत होते/आहेत. नरसिह राव वर पुष्प वर्षाव करत होते /आहेत. हा डबल स्टॅंडर्ड चालतो वाटतो
>> मला तर नाही चालत बॉ, अन्य कोणाला चालत असेल तर ठवूक नै, ;-) तरीही बाबरी आणि गडकरी तुलना चुकते आहे. संभाजी राजांचा पुतळा काढून तिथे गडकरींचा नव्हता बसवलेला, तोडफोडीचाच निषेध करायचा तर केवळ तोडफोड बघायची नसते. तोडफोडीचं कारण बघायचे असते. आमच्या नाशकात मागच्या महिन्यात अनेक धर्मस्थले शासकिय यंत्रणेने तोडली. त्यामागे वेगळे कारण होते. बाबरी पाडणे तद्दन राजकिय कृती होती, पुतळा उखडणे ही देखील राजकिय कृती आहे. कार्यकारणभाव महत्त्वाचा. बाकी सगळे धुळीचे ढग!

In reply to by संदीप डांगे

विशुमित 05/01/2017 - 11:42
तुमच्या प्रतिसादांचा आशय पुतळा तोडणार्यांच्या बाजूने जातोय असं वाटले, तसे नसेल तर ओके!>>> -- म्हणजे पुतळा तोडणाऱ्याची बाजू घेतली तर चुकीचा पवित्रा, गडकरींची बाजू घेतली तर बरोबर पवित्रा? म्हणजे कोणाची बाजू घेतली आहे त्यावर आशय बरोबर का चूक ठरणार तर? >> मला तर नाही चालत बॉ, अन्य कोणाला चालत असेल तर ठवूक नै, ;-)>>> -- ज्यांना चालते त्यांच्यासाठीच अवांतर होते तरीही बाबरी आणि गडकरी तुलना चुकते आहे.>>> -- बाबरी काय अन गडकरी काय किंवा संभाजी काय, प्रत्येकाने मनाचा राम करून घायचा म्हंटल्यावर तोडफोड ही होणारच. आमच्या नाशकात मागच्या महिन्यात अनेक धर्मस्थले शासकिय यंत्रणेने तोडली. त्यामागे वेगळे कारण होते.>>> -- शासकीय यंत्रणेने अधिकृतपणे तोडली असणार ती, त्याचा कसा विरोध करू शकतो. कार्यकारणभाव महत्त्वाचा.>> -- "गडकरी तो बस झाकी है बालगंधर्व अभी बाकी है" ही विचारसरणी पसरवणाऱ्या प्रवृत्तीचा पण कार्यकारणभाव कोणी तपसेल ही अपेक्षा ठेवतो.

In reply to by संदीप डांगे

गडकर्‍यांनी हे नाटक केव्हा लिहिले, त्यावेळी उपलब्ध साधने (कागदपत्रे इत्यादी) त्यांनी तपासून लिहिलंय की तेव्हा अपुर्‍या संशोधनामुळे उपलब्ध असलेली वाईट रंगवलेली संभाजीराजांची प्रतिमा ही खरेतर मूळाशी आहे हे बघितलं पाहिजे गडकरी यांनी तत्कालीन उपलब्ध साधनांवरुनच लिहिले आहे. पण मुद्दा तो नाहीच. कागद तपासून पाहणे हे नाटककाराचे काम नाही. नाटककाराला कल्पना विलास करण्याचा अधिकार आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

संदीप डांगे 05/01/2017 - 13:00
आप्पा, हे मत कंसिस्टंट असेल तर आदरास पात्र आहे, बाकी, ह्या अधिकाराबाबत हुसैन आणि गडकरी यांना वेगळा न्याय लावणारे काही महाभाग आहेत.

In reply to by संदीप डांगे

हुसैन, गडकरी, विजय तेंडुलकर, बाजीराव मस्तानीचा लेखक, चार्ली हेब्दो, बाबरी मशीद, जेम्स लेनचे पुस्तक किंवा इतर कोणाच्याही बाबतीत झुंडशाहीचा निषेध आहे. पण युक्तिवाद करण्यासारखे काही नाही म्हणून 'पुतळा हटाव' धाग्यावर 'बाबरी मशीद'चा संदर्भ ओढून ताणून आणणे हा एक विशिष्ट अजेंडा राबवण्याचा भाग आहे.

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे 05/01/2017 - 13:46
गैरसमज नको म्हणून प्रतिसादात सुधारणा: ते तर आहेच. त्या अजेंड्याविरुद्ध बोलणे आवश्यक आहेच. त्याबद्दल आपल्याला समर्थन!

In reply to by संदीप डांगे

विशुमित 05/01/2017 - 14:49
बाकी, ह्या अधिकाराबाबत हुसैन आणि गडकरी यांना वेगळा न्याय लावणारे काही महाभाग आहेत.>>> -- माझा विरोध फक्त अश्याच महाभागांना आणि व्हिक्टिमकार्ड खेळणाऱ्याना आहे म्हणून एवढा लेखन प्रपंच. हुसैन, गडकरी, विजय तेंडुलकर, बाजीराव मस्तानीचा लेखक, चार्ली हेब्दो, बाबरी मशीद, जेम्स लेनचे पुस्तक किंवा इतर कोणाच्याही बाबतीत झुंडशाहीचा निषेध आहे.>>>> -- अप्पांना कचकटून समर्थन त्या अजेंड्याविरुद्ध बोलणे आवश्यक आहेच>>> -- विचार मांडण्याला अजेंडा म्हणतात हे या चर्चेतून समजलं. ग्वाही देतो मिपाचा फुकट वापर करून कोणाचाही अजेंडा इथे मी राबवत नाही. चर्चेतून जेवढे सकारात्मक विचार घेता येतील याचा प्रयत्न असतो. जर कोणाला मी पुतळा हटाव आणि संभाजी ब्रिगेड यांचे समर्थन करतोय असे वाटत आहे त्यांना सांगू इच्छतो की ती पोरं वाट चुकलेली आहेत. जाणतेपणी म्हणा किंवा अजाणतेपणाने. त्यांच्या अकलेची दिवाळखोरी सिद्ध करण्यापेक्षा सकारात्मक विचारांनी त्यांना योग्य वाटेवर जाण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. बाबरीचे उदाहरण मी जाणूनबुजून दिले आहे. एक काळ असा होता की मी "मंदिर यही बनायेंगे' प्रचंड समर्थक होतो. आता वाटते मंदिरापेक्षा तेथे भव्य हॉस्पिटल व्हावे.

In reply to by विशुमित

महासंग्राम 05/01/2017 - 15:03
ती पोरं वाट चुकलेली आहेत. जाणतेपणी म्हणा किंवा अजाणतेपणाने.
विशुमितजी एवढंच सांगू इच्छितो. ती पोरं अजाणतेपणाने वाट चुकली नाहीत, त्यांच्या फेसबुक वॉलवर जाऊन पहाल तर लगेच लक्षात येईल तुमच्या.

In reply to by महासंग्राम

विशुमित 05/01/2017 - 16:04
बरोबर आहे तुमचे पण ती पोरं २२-ते २६ वयोगटातील आहेत, समर्ग विचारशक्ती असेल त्यांची ? त्यातील २ जण खासगी कंपनीमध्ये कामाला होती. पुढचं आयुष्य किती बरबाद होईल याची जाणीव नक्कीच नसावी. फेसबुक वरील दोन्ही बाजूंची चिखलफेक महाभयंकर आहे.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी 05/01/2017 - 21:06
बरोबर आहे तुमचे पण ती पोरं २२-ते २६ वयोगटातील आहेत, समर्ग विचारशक्ती असेल त्यांची ? त्यातील २ जण खासगी कंपनीमध्ये कामाला होती. पुढचं आयुष्य किती बरबाद होईल याची जाणीव नक्कीच नसावी.
समजून उमजून केलेला गुन्हा आहे हा. २२ ते २६ या वयोगटात आपण काय करीत आहोत याची विचारशक्ति नसते का? मग या संशयाचा फायदा कसाबला सुद्धा द्यायला हवा. तो तर २२ पेक्षा कमी वयाचा होता. आपण काय करीत आहोत याची त्यांना पूर्ण कल्पना होती. पुतळा उखडून नदीत फेकल्यानंतर अत्यंत अभिमानाने स्वतःची चित्रफीत काढून त्यांनी प्रसिद्ध केली. आपल्या कृत्याबद्दल त्यांना जरादेखील खंत वाटलेली दिसत नाही, उलट अभिमानच दिसतो. उद्या त्यांच्या जामिनावर निर्णय आहे. त्यांना उद्या जामीन मिळेलच. त्यांनी जामीन मिळाल्यानंतर एखाद्या जगज्जेत्याच्या थाटात त्यांचे स्वागत होईल. पुढचं आयुष्य बरबाद वगैरे अजिबात होणार नाही. उलट पुढे त्यांची भरभराटच होईल. पूर्वीच्या राजेराजवाड्यांच्या काळात एखाद्या सरदाराने किंवा सैनिकाने पराक्रम गाजविला की राजे, सम्राट त्यांना हातातले सोन्याचे कडे द्यायचे किंवा सुवर्णमुद्रा द्यायचे किंवा एखादे गाव वतन, जहागिर म्हणून द्यायचे. या ४ योद्ध्यांनी रात्रीच्या अंधारात कोणाला सुगावा लागू न देता पुतळा पाडण्याचे काम यशस्वीपणे पार पाडून संभाजीराजांच्या अपमानाचा बदला घेतला आहे (थोरल्या महाराजांनी रात्रीच्या अंधारातच गुपचूप लालमहालावर हल्ला चढवून शाहिस्तेखानाची बोटे तोडली होती. तसेच रात्रीच्या अंधारातच त्यांनी पन्हाळ्यावरून सिद्दि मसूदला गुंगारा देऊन विशाळगडावर प्रयाण केले होते.). या महान कृत्यानिमित्त आधुनिक सम्राट श्रीमंत नितेशराजे (धाकटी पाती) किंवा श्रीमंत युवराज प्रवीणराजे हे नक्कीच बक्षिशी म्हणून त्यांच्या चरितार्थाची आजन्म सोय करतील याविषयी निश्चिंत असा. जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ!!! मनुवाद्यांचे खाली डोके वर पाय!!!!

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 10/01/2017 - 23:34
जामिनावर सुटल्यानंतर या टग्यांचा सत्कार झालेला दिसतोय. http://www.loksatta.com/pune-news/4-accuse-in-ram-ganesh-gadkari-vandalized-case-get-bail-1380956/ जय जिजाऊ जय शिवराय, मनुवाद्यांचं खाली डोकं वर पाय!

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 17/01/2017 - 15:31
त्यांचे बर्‍याच ठिकाणी सत्कार होताहेत असं वाचनात येतंय. काल नितेश राणेने त्यांचा जाहीर सत्कार करून प्रत्येकी ५ लाख रूपयांचे धनादेश दिले असेही "सकाळ"मध्ये वाचले. एकंदरीत पुतळा तोडल्याने त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली आहेच आणि त्याबरोबर आर्थिक भरभराटही होताना दिसतेय. या चौघांनी खरं तर राम गणेश गडकरींचे आभार मानायला हवेत. त्यांनी "राजसंन्यास" नाटक लिहिलेच नसते तर यांनी प्रसिद्धी आणि भरभक्कम आर्थिक लाभ झालाच नसता.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 17/01/2017 - 15:36
इस्लामच्या नावाखाली फतवे काढणारे आणि त्यांना इनाम देणारे कट्टरतावादी अरब देशांमध्ये पहायला मिळतात. पण तीच परंपरा आता स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातही पडताना दिसतेय. कारण पुण्यातल्या संभाजी बागेतील राम गणेश गडकरींचा पुतळा तोडणाऱ्या चार गुंडांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांनी पाच लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे नितेश राणे हे स्वत:ही काँग्रेसचे आमदार आहेत. काही दिवसांपुर्वी राम गणेश गडकरींनी ‘राजसंन्यास’ नाटकातून छत्रपती संभाजी राजेंची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत पुण्यातील संभाजी उद्यानातून त्यांचा पुतळा फोडून, मुठा नदीत फेकला होता. त्याच गुंडांना नितेश राणेंनी काळ तुळापुरात पाच लाख रूपायांचा चेक देऊन त्यांचा सत्कारही केला. गेल्या वर्षी नितेश राणेंनी तुळापूरमध्ये केलेल्या भाषणातच संभाजी बागेतील गडकरींचा पुतळा जो तोडेल त्याला पाच लाख रूपयांचं बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली होती. ती घोषणा आपण पूर्ण करत असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय. http://www.ibnlokmat.tv/archives/245145

In reply to by अप्पा जोगळेकर

विशुमित 09/01/2017 - 15:33
कागद तपासून पाहणे हे नाटककाराचे काम नाही. नाटककाराला कल्पना विलास करण्याचा अधिकार आहे.>>> -- खरंय का हे ?

बबन ताम्बे 04/01/2017 - 19:13
नाटक, कादंब-या म्हणजे काही इतिहास नाही हे या लोकांना कधी समजणार ? उद्या हे लोक १००-२०० वर्षांतील कथा कादंब-या चाळतील आणि कुठल्या तरी प्रकरणातील काहीतरी काढून आमुक तमुक व्यक्तीची बद्नामी झाली म्हणून राडे करतील. कायद्याने आता वेळीच असल्या गोष्टींवर धाक बसवायला हवा. मला वाटते आता महाराष्ट्रातील काही समंजस समाजधुरीणांनी पुढे येऊन समजावणे आवश्यक आहे. नाहीतर येणारी तरुण पिढी अशीच वाया जाईल. गडकरींचा पुतळा फोडणारे पंच्विशीच्या आतले तरुण आहेत. तरुणांची दिशाभूल करणा-या आणि जाती जातीत तेढ निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेणा-या राजकीय पुढा-यांकडून काहीच अपेक्षा करण्यात अर्थ नाही. जेम्स लेन प्रकरणाच्या वेळी बाबा आढावांनी सकाळ मधे छान लेख लिहीला होता. आत्ता देखील त्यांच्या सारख्या किंवा अण्णा हजारेंसारख्या आदरणीय व्यक्तींनी पुढे येऊन भरकटलेल्या तरुणांना दिशा दाखवली तर असे तरूण अशी क्रुत्ये करण्या धजावणार नाहीत असे माझे मत आहे.

In reply to by बबन ताम्बे

पैसा 05/01/2017 - 11:20
ज्यांना अक्कल येण्याची तीव्र गरज आहे ते असले शहाणपणाचे काही वाचत किंवा ऐकत नाहीत. त्यांना भडकावणारे फक्त स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी त्यांचा वापर करतात. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राला सुसंस्कृत बनवायचा शंभर दीडशे वर्षापूर्वी प्रयत्न करणार्‍या लोकांचे कार्य नाकारण्याचा जो प्रयोग सुरू आहे तो बघता महाराष्ट्रात खरे महनीय काही शिल्लक राहील का अशीच शंका वाटते. इतिहास पुसला जात नाही असे आपण वारंवार म्हणतो. पण तेही खरे नाही. एकच गोष्ट आडमुठ्या किंवा अजाण लोकांच्या झुंडीला जोरात सांगत राहिले तर काही वर्षांनी त्यांना तेच खरे वाटू लागते. उदाहरण हवे असेल तर गोव्यात मराठेशाहीचा इतिहास पोर्तुगीजांनी कसा पुसला ते येऊन बघा. महाराष्ट्रात इतिहासाचे खरे नीट संशोधन विसाव्या शतकाच्या पहिल्या भागात सुरू झाले. ते प्रकाशात येऊन त्याला मान्यता मिळेपर्यंत बखर वाङ्मय हेच काय ते लोकांना इतिहास वाटत होते. संभाजी राजांची बदनामी करणार्‍या बखरी कोणी कोणी आणि का लिहिल्या याच्या मुळापर्यंत गेले तर आता पुतळे फोडणार्‍या दगडांना ते कुपथ्य होईल. संभाजी राजे गेले. बखरकार गेले. नाटकाचे फक्त काही प्रवेश लिहिणारे गडकरीही गेले. संपूर्ण नाटक कसे आकाराला आले असते हे आपण आता सांगू शकत नाही. त्यांना जाऊनही १०० वर्षे होत आली. आपला पुतळा उभा राहील म्हणून त्यांनी काही लेखन केले नव्हते आणि पुतळा फोडला म्हणूनही त्यांना कळणार नाहीये. "शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याच्या तलवारीचा तुकडा पडला तेव्हा तुम्ही काय करत होता" अशी काही वक्तव्ये पाहिली. यावर हसावे की रडावे ते कळत नाही. जर कोणा समाजकंटकानी ते कृत्य केले असेल तर त्यांनाही शिक्षा झाल्याच पाहिजेत. नसेल तर एका अपघाताचे निमित्त करून हे कंटक समाजात तेढ निर्माण करत आहेत. का गडकरींच्या जातीच्या लोकांनी तो तलवारीचा तुकडा मोडला असे यांचे म्हणणे आहे? शिवाजी महाराजांसाठी आणि संभाजी राजांसाठी सर्वोच्च त्याग करणार्‍या कोरडे बंधू आणि चिटणीसांची जात कोणती होती तेही जाऊन तपासा की मूर्खांनो.

In reply to by बबन ताम्बे

महासंग्राम 05/01/2017 - 15:11
अण्णा हजारेंसारख्या आदरणीय व्यक्तींनी पुढे येऊन भरकटलेल्या तरुणांना दिशा दाखवली तर असे तरूण अशी क्रुत्ये करण्या धजावणार नाहीत असे माझे मत आहे
. तुम्हाला खरंच अशी आशा वाटते कि लेख लिहिल्याने आजकालची टाळकी सरकलेली तरुण पिढी( यात मी पण येतो ) अशी कृत्ये करणार नाही. सोशल मीडियाचा जमान्यात मुळात किती जण असे लेख वाचतील. बाकी बाबा आढाव अत्यंत सोयीस्कर राजकारणी कमी समाजसेवक आहेत हे मत नोंदवतो. जिथे पुण्यात त्यांच्या रिक्षा पंचायतचे रिक्षाचालकच त्यांच ऐकत नाही तर मग तरुणांची बातच सोडून द्या.

In reply to by महासंग्राम

श्रीगुरुजी 05/01/2017 - 15:59
जेम्स लेन प्रकरणाच्या वेळी बाबा आढावांनी सकाळ मधे छान लेख लिहीला होता. आत्ता देखील त्यांच्या सारख्या किंवा अण्णा हजारेंसारख्या आदरणीय व्यक्तींनी पुढे येऊन भरकटलेल्या तरुणांना दिशा दाखवली तर असे तरूण अशी क्रुत्ये करण्या धजावणार नाहीत असे माझे मत आहे.
आढाव थोरल्या साहेबांसारखे सूचक बोलतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी "सकाळ"मध्ये लिहिलेल्या एका लेखात असे लिहिले होते की "पुण्यात अनेक प्रश्न आहेत. शनिवारवाडा महोत्सव भरवून किंवा विश्रामबाग वाड्यात कारंजी थुईथुई नाचवून पुण्यातील प्रश्न सुटणार नाहीत."शनिवारवाडा महोत्सव भरवून किंवा विश्रामबाग वाड्यात कारंजी थुईथुई नाचवून पुण्यातील प्रश्न सुटणार नाहीत हे बरोबर आहे. परंतु फुले वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करून किंवा फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारक एकमेकांना जोडून किंवा विद्यापीठाचे नाव बदलून तरी पुण्यातील प्रश्न सुटणार आहेत का? परंतु याचा उल्लेख न करता फक्त शनिवारवाडा व विश्रामबाग वाडा या नेमक्या दोनच ठिकाणांचा उल्लेख करण्यामागचा हेतू अगदी स्पष्ट आहे.
बाकी बाबा आढाव अत्यंत सोयीस्कर राजकारणी कमी समाजसेवक आहेत हे मत नोंदवतो.
माझ्या ओळखीचे ब्राह्मण असलेले काही रिक्षाचालक आहेत. त्यांच्याकडून अशीच माहिती मिळते.

In reply to by महासंग्राम

बबन ताम्बे 05/01/2017 - 16:08
अशी कृती, जी लोकांचे विचारपरिवर्तन करील. जसे, गांधीजींनी नोखालीत पदयात्रा काढून दंगे शांत केले. जसे, बाबा आमट्यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकले . सोशल मेडियावरील लेख तर वाचतील ना ? परवाच व्हॉट्स अ‍ॅप वर शिवाजी महारा़जांचा खून कोणी केला यावर कुणातरी प्रकांड (?) पंडीताने ज्ञान पाजळले होते. कशासाठी चाललेय हे? कशासाठी ब्राम्हण - ब्राम्हणेतर अशी फुट पाडून महाराष्ट्राला मागे खेचताय ? हे असले जर लेख वाचले जातात तर समंजस लिखाण का नाही वाचले जाणार ?

In reply to by सूड

बबन ताम्बे 05/01/2017 - 15:57
जे पेटवताहेत , त्यांची पोटे भरलेली आहेत. ज्यांना उद्युक्त केले जातेय, त्यांना काम धंदा नाहीये. अण्णा हजारेंनी दिल्लीत लोकपाल साठी उपोषण केले तेंव्हा तरुणाई त्यांच्या पाठीशी होती. अगदी पुण्यात देखील तरुणांचे मोर्चे निघाले होते त्यांना पाठींबा देण्यासाठी. कुणीच पुढाकार घेतला नाही तर इथून पुढे कठीण आहे. तरूणाईला असेच भरकटवले जाईल. परवाच टीव्ही चॅनेलवर पुतळा हटावचे समर्थन करणा-यांचे अमुल्य विचार ऐकले. धन्य आहे.

In reply to by सूड

विशुमित 05/01/2017 - 16:36
१०० पैकी १० सुधारतील? बाकी राहिलेले ९० टप्या टप्याने ("मेरी आवाज सुनो" ने ) बरोबर सुधारतील. (3० वर्ष पूर्वी गावात ९० % पेताड होती. एकदा एका आळंदीच्या बाबांचे कीर्तन होते. पेताडांतील २ जण पहिल्याच कीर्तनात सुधारले. गेलेली प्रतिष्ठा परत मिळायला लागली. त्यांना मिळत असणारी प्रतिष्ठा पाहून बरेचजण सन्मार्गाला लागले आहेत. १-२ % चुकार मकार राहिले आहेत. पुढची ९९.९९ % तरुणपिढी निर्व्यसनी आहे.)

आबा 05/01/2017 - 11:47
बाजीराव-मस्तानी चित्रपटाच्या वेळी विकृती विकृती वगैरे काव-काव करणारे आज... साधन शुचीतेच्या गप्पा मारत आहेत हे ऊदाहरणार्थ थोर आहे... येडे ब्रिगेडी आणि येडे संघोटे :)

In reply to by आबा

पैसा 05/01/2017 - 12:07
याचीच वाट बघत होते. हो, मी बाजीराव सिनेमात विकृती आहे म्हटले होते. कारण मराठी लावणीसुद्धा त्यात धड दाखवली नव्हती. की त्यातल्या लोकांचे कपडे ऐतिहासिक किंवा नीट मराठी पद्धतीचे नव्हते. एक साधी गोष्ट कळत असेल तर बघा. भन्साळीने जे केले ते चूक. पण तो जिवंत आहे. त्याला चूक सुधारायची संधी आहे. गडकरींनी केले ते चूक. पण त्याना मरून शंभर वर्षे झाली. ती चूक सुधारणे शक्य नाही. भन्साळीच्या पुढ्यात सिद्ध झालेला इतिहास असताना त्याने मुद्दाम वाह्यातपणा केला. गडकरींच्या काळात त्यांनी जे लिहिले तेच तेव्हाच्या राज्यकर्त्यांच्या कृपेने इतिहास समजले जात होते. दोन परिस्थितीतला फरक तुम्हाला समजेल अशी अपेक्षा नाहीच. पण समजावायचे माझे काम मी केले. तुमच्या माहितीसाठी, मी संभाजी ब्रिगेडमधेही नाही किंवा संघातही नाही. जायचे म्हटले तरी मला संघात प्रवेश मिळणार नाही. मात्र संघिष्ट हा सभ्य शब्द वापरायची संधी असताना संघोटे म्हणलेत त्यावरून तुमची संघटना कोणती त्याचा अंदाज आला. काय पाहिजे ते लिहा.

In reply to by आबा

पैसा 08/01/2017 - 12:58
यावर लिहिण्यासारखे बरेच आहे. पण मी जे स्पष्ट दिसते ते बोलते. तुमच्यासारखा काही अजेंडा घेऊन इतक्या नीच पातळीवर कोणावर आरोप करणे मला या जन्मात तरी जमणार नाही. तेव्हा तुमच्यासारखे कोणीतरी शोधून त्यांच्यासोबत चिखलात कुस्ती खेळा. माझा लांबून रामराम. वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि असे निनावी राहून पिंका टाकण्यापेक्षा काही विधायक लिहीत चला हा फुकटचा सल्ला.

In reply to by पैसा

आबा 09/01/2017 - 23:43
नीचपणा करण्याची सवय नसलेल्यांच्या मानाने तुमचे नीचपणाचे कौशल्य चांगले आहे :) आता इथलेच उदाहरण पहा... मला संघटणेमध्ये घुसवण्याची घाई तुम्हीच केलीत, असो... भन्साळी बद्दलची भक्तांची भूमीका आणि गोविंदाग्रजांबद्दलची भूमीका यातला स्पष्ट विरोधाभास लक्षात येत नसेल तर मी तरी काय सांगणार तुम्हाला ?!

In reply to by पैसा

भन्साळीने जे केले ते चूक. पण तो जिवंत आहे. त्याला चूक सुधारायची संधी आहे. गडकरींनी केले ते चूक. पण त्याना मरून शंभर वर्षे झाली. ती चूक सुधारणे शक्य नाही.
हे लाॅजिक गंडत आहे.आता ते कसं गंडत आहे ते तूम्हीच बघा. मी वरच टाईपले आहे,कि कोणीतरी कोणालातरी असं ना तसं पूजतच असतो,तेव्हा इतिहासाची मोडतोड किंवा खरा-खोटा इतिहास हा मुद्दा बाजूला राहू दे,पण तुमचा स्टँड बायस असतो हे मान्य करा.(तुम्ही मान्य करणार नाही)

In reply to by निष्पक्ष सदस्य

पैसा 08/01/2017 - 17:08
सांगा ब्वा. खाली जयंत कुलकर्णी १०० वर्षांपूर्वी माहित असलेल्या इतिहासावरून आता मोडतोड करणे कसे चूक आहे हे सांगत आहेत तेही तुमच्या मते चुकीचे बोलत आहेत तर! मिपा वय एक महिन्याचे असताना कोणाला "बायस्ड आहात आणि ते तुम्ही मान्य करणार नाही" वगैरे बोलायची मला तरी हिम्मत झाली नसती. निव्वळ चिखलफेक करण्यासाठी काही id अजेंडे घेऊन जन्माला येतात त्यातलाच तुमचा id जन्म दिसतो आहे.

In reply to by पैसा

मिपावरचे वय आणि आयडीचा जन्म विशिष्ठ अजेंड्यासाठी होणे हे मुद्देच गैरलागू आहेत. इथे तटस्थता आणि निष्पक्षता अपेक्षित आहे,किमान अभ्यासू आयडींकडून तरी!!

देवेन भोसले 05/01/2017 - 14:03
नेमका काय विरोध कारायचा आहे हे न समजल्याने -- बुद्धिजिवि लोकचा प्रोब्लेम झाला आहे गडकरीं चुक हे कलातय तरिपन विरोध केला पहिजे कारान ब्रिगेड ने केलय म्हानल्यावर गप्प बसल तर अपान हुशार कसे हे कधि धखवयच माग ब्रिगेड दिखावु पना कराताय हे महित अहे सगाल्यन तारिपान अपन हुशार हे दखवलेच पहिजे असा झलाय लोकाच

गामा पैलवान 05/01/2017 - 15:11
संदीप डांगे,
बाकी, ह्या अधिकाराबाबत हुसैन आणि गडकरी यांना वेगळा न्याय लावणारे काही महाभाग आहेत.
वेगळा न्याय लावलाच पाहिजे ! हुसेन यांच्यावर न्यायालयात खटले प्रलंबित होते. याला कायदेशीर प्रक्रिया राबवणे म्हणतात. गडकरींच्या पुतळ्याच्या बाबतीत कायद्यास फाट्यावर मारण्यात आलं आहे. त्यामुळे कायद्याचा आदर राखण्यासाठी हुसेन आणि गडकरी यांना वेगवेगळे न्याय लावणे अपरिहार्य आहे. आ.न., -गा.पै.

श्रीगुरुजी 05/01/2017 - 15:52
२००४ - भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था २०१० - जिजामाता बागेतील दादोजी कोंडदेवांचा पुतळा २०१२ - रायगडावरील वाघ्याचा पुतळा २०१७ - राम गणेश गडकरींचा पुतळा ब्रेव्हो! ही नासधूस करणार्‍या व पुतळ्यांची तोडफोड करणार्‍या या शूर मर्द मावळ्यांचा अभिमान वाटतो. गडकरींचा पुतळा तोडून नदीत फेकून दिल्याची बातमी वाचल्यावर उर अभिमानाने भरून आला व कंठ दाटून आला. ही बातमी स्वर्गापर्यत पोहोचली असेलच आणि ती ऐकल्यावर थोरल्या महाराजांची व संभाजी महाराजांची छाती अभिमानाने फुलली असेल. ब्रिगेडींनी आता इथेच थांबू नये. पुण्यात अजून लोकमान्य टिळक, सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, न. चिं केळकर, सार्वजनिक काका जोशी, विठ्ठलराव गाडगीळ असे अनेक पुतळे शिल्लक आहेत. 'पु ल देशपांडे उद्यान'नावाचे उद्यानही आहे. क्रमाक्रमाने या सर्व गोष्टींची नासधूस करावी. काही नतद्रष्ट विचारतील की संभाजी महाराजांबद्दल एवढा अभिमान असेल तर अफजुल्याची कबर का तोडत नाही, औरंग्याची कबर का तोडत नाही व त्या शहराला औरंग्याच्या सम्नानार्थ दिलेले नाव का बदलत नाही. अशा नतद्रष्टांकडे सरळ दुर्लक्ष करावे. आपल्या मुख्य लक्ष्यापासून कधीही विचलीत होऊ नये. आपले मुख्य लक्ष्य औरंग्या, अफजुल्या इ. नसून जोशी, कुलकर्णी, देशपांडे असली आडनावे लावणारे नतद्रष्ट आहेत हे कायम ध्यानात राहू देत. जय भवानी! जय शिवाजी!! मनुवाद्यांचे खाली डोके वर पाय!!!

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित 05/01/2017 - 16:18
तुमच्या विचारांचा पूर्ण आदर राखून... अशी प्रतिक्रिया देऊन तुम्ही नक्की काय साध्य करताय ? मला तरी यातून फक्त एकाच जातीचे व्हिक्टिमकार्ड खेळ्यालच प्रतीत होतंय. नेमके हेच विचार ही भरकटलेली तरुणाई आपल्या आपल्या जातीची बाजू घेऊन उचलून धरत आहेत. ज्याला कोणाला यातून फायदा उठवून घायचा आहे त्याचा हेतू साध्य होताना दिसतो आहे.

In reply to by विशुमित

सूड 05/01/2017 - 18:03
अशी प्रतिक्रिया देऊन तुम्ही नक्की काय साध्य करताय ?
वर "नुसत्या पिंग्यावर त्रिशतकी धागा झाला होता" असं म्हणून तुम्ही जे साध्य केलंत तेच!! :)

आदूबाळ 05/01/2017 - 16:45
संभाजी ब्रिगेड आणि निवडणुका - गूगल ट्रेंड्स क्या मेरी आंखे धोका खा रही हय?

गामा पैलवान 06/01/2017 - 23:02
लोकहो, या प्रसंगात भिकारड्या मेकॉलेछाप शिक्षणाचाही सहभाग आहे. आज जर गडकरी कोण आहेत हे नितेश राणे यांना माहीत असतं तर असं आततायी पाऊल उचललं नसतं. आ.न., -गा.पै.

सुधीरन 08/01/2017 - 14:02
मला वाटतं इतिहासाचार्य वा. सी. बेंद्रे व डॉ. गोखले ही व्यक्तिमत्व मान्यता पावलेली आहेत,त्यांच्या मांडणीला निश्चित सुयोग्य आधार आहे. या इतिहासकारांनी संभाजी महाराजांवर संशोधन करून मांडणी केलेली आहे. त्यामुळे गडकरींनी ललित्याच्या नावावर काहीही खपवण्याची गरज नाही. मुळात जो मुख्यमंत्री नरेंद्र महाराजांच्या आश्रमात जाऊन धर्म शक्तीने राज्यशक्तीला नियंत्रणात ठेवावे म्हणतो त्याला संभाजी महाराजांबद्दल बोलण्याची अशी कोणती नैतिकता राहत नाही कारण शिवाजी महाराज असो किंवा संभाजी महाराज, कोणत्याही अत्यंत बिकट परिस्थितीत रयतेला दैव भरवश्यावर, वाऱ्यावर सोडले नाही किंबहुना स्वतःच्या प्राणापलिकडे जपले त्यामुळे हा मुख्यमंत्री पुतळ्यात रमला काय किंवा आणि कुणात, फरक पडत नाही. संभाजी ब्रिगेडच्या कृत्याची लोकशाही राज्याच्या चौकटीत चिकित्सा होऊ शकते आणि ती करायला देखील हवी.

सुधीरन 08/01/2017 - 14:04
डॉ. कमल गोखले आणि वा. सी. बेंद्रे यांनी संभाजी महाराजांचा खरा इतिहास पुढे आणण्याआधी संभाजी महाराजांची जी काही प्रतिमा होती तिला अनुसरून गडकरींनी राजसंन्यास मधील संभाजी उभा केला. तसाच तो सावरकरांनी तसाच तो नाथमाधवांनी मांडला. पुढेही मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा इ. चित्रपटांमधून संभाजी महाराजांची बदनामी केली गेलीच! गडकरींनी त्यासाठी तुळसा उभी केली. पोर्तुगीजांकडून महाराज मदिरा आणि मदिराक्षिची मागणी करतात असे दाखवले, मराठी राज्याची शान जरीपटका, तो फाडून स्वतःचा घाम तुळसा पुसते, त्याच्याच कापडाची चोळी करून घालते इ. अनेक प्रसंग रंगवले!

In reply to by सुधीरन

यात एक विरोधाभास भरलेला आहे. एकीकडे तुम्ही मान्य करता //संभाजी महाराजांची जी काही प्रतिमा होती तिला अनुसरून गडकरींनी राजसंन्यास मधील संभाजी उभा केला// तसे असेल तर "बदनामी'' या शब्दाच्या अर्थानुसार ती बदनामी कशी होते ते कळले नाही. बदनामी म्हणजे एखाद्याबद्दल खोटेनाटे लिहून त्याचे चारित्र्यहनन करणे. पण येथे तर जशी प्रतिमा होती त्या अनुसुरुनच नाटक (इतिहास नव्हे) लिहिले गेले होते. मग बदनामी कशी. अशा उदाहरणानुसार जर या काळात वावरायचे असेल तर सगळ्यांचीच टाळकी फुटायला हवीत. अर्थात या शूरमर्द मावळ्यांचे मी कौतुकच करतो. त्यांचे १०० वर्षापूर्वी लिहिलेले वाचून रक्त तरी उसळले. आणि यापुढे त्यांचे व त्यांच्या पुढार्‍यांचे रक्त असेच उसळलेले राहुदेत अशी शिवप्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो. दिल्लीमधील औरंगजेब रोडचे नाव बदलायला एका पाकिस्तानी नागरिकाला पुढाकार घ्यावा लागला आणि येथे अजून औंरंगजेबाच्या नावाने कायकाय आहे काय माहीत. पण एक वास्तू मला माहीत आहे. ज्याने संभाजी महाराजांचे अवयव एका मागून तोडले, जीभ खेचून बाहेर काढली, ज्यांचे शीर तलवारीच्या टोकावर नाचविले त्या औरंगजेबाची कबर आजही यांच्या छाताडावर पाय रोवून दिमाखात उभी आहे आणि त्याला बोटही लावायची संभाजी ब्रिगेडची हिंमत होणार नाही. या कबरीकडे पाहताना यांचे रक्त सळसळत नाही. कारण माहीत नाही. गडकर्‍यांचा पुतळा व औरंगजेबाची कबर याच्यात मला वाटते शूर (ना) मर्द मावळ्यांना गडकर्‍यांची जास्त भिती वाटत असावी.... :-) आज संब्रि आणि त्यांची पिल्लावळ ज्यांच्या ताटात बिर्याणी चिवडत आहेत ते पाहून काही दिवसांनी काय होईल याचा अंदाज येऊ शकतो. यांना येथेच आत्ता मतांनी ठेचले पाहिजे.

In reply to by जयंत कुलकर्णी

सहमत आहे. औरंगजेबाची कबर मोडायची ब्रिगेंडीची हिम्मत नाहीये.कारण ब्रिगेड्यांनी मुळातच आपले तथाकथित वक्ते, लेखक आणि स्वयंघोषित इतिहाससंशोधकांची फौज उभी करून मराठा सैन्यात मुसलमान वगैरे कसे भरपूर होते तसेच कवी कलशाने संभाजीला दगा दिला,मनुस्मृतीप्रमाणे त्यांची हत्या केली इ.अक्कल पाजळवली आहे.शिवाय औरंगजेब कसा चांगला होता आणि शिवरायांचे खरे शत्रू ब्राह्मण होते वगैरे तारे तोडले आहेत. पण चिंता नसावी,अशा संघटनेला कोणी मत देईल असे वाटत नाही.

सुधीरन 08/01/2017 - 15:37
हो, तोच इतिहास गडकरींनी अनुसरला जो तोवर मुद्दामपणे प्रचलित केला गेला होता! त्यांनी स्वतःहून काहीच संशोधन नव्हते केले! शिवाय त्यात तुळसेचे पात्र टाकून आणखीच फोडणी दिली. कलमदानेच्या तोंडून शिवाजी महाराजांपेक्षा रामदास श्रेष्ठ हे वदवले, संभाजींच्या तोंडून त्यांची स्वतःचीच बदनामी करवली, शाहू बाळराजेंच्या तोंडी संभाजीची जीभ छाटण्याचा तसेच त्यांना हद्दपार करण्याचा संवाद टाकला असे अनेक मुद्दे आहेत!

In reply to by सुधीरन

तुम्हाला मी काय लिहिले आहे की नाही ? बहुदा नाही. अहो ज्याने हे सगळे केले त्त्याची समाधी आज निडरपणे उभे आहे त्याबद्दल काय म्हणणे आहे आपले ? /// कलमदानेच्या तोंडून शिवाजी महाराजांपेक्षा रामदास श्रेष्ठ हे वदवले, संभाजींच्या तोंडून त्यांची स्वतःचीच बदनामी करवली,// ब्रिगेडी.... जरा सवीस्तर माहिती टाका म्हणजे मुद्दे खोडून काढता येतील. अर्थात माझ्या पहिल्या मुद्यातच सगळे मुद्दे खोडून निघतात पण अजून समजावून सांगता येईल हे सगळे मुद्देच नाहीत. हा सगळा नीचपणा आहे.

सुधीरन 08/01/2017 - 15:52
औरंगजेब हा उघड शत्रू होता. त्याच्याकडून काय अपेक्षा असणार? गडकरी असतील, सावरकर असतील वा नाथमाधव यांनी थोडाफार प्रामाणिकपणा दाखवावा ही अपेक्षा असते! नाटक हा इतिहास नव्हे. मात्र ऐतिहासिक नाटक लिहिताना तारतम्य ठेवावे लागते. संभाजी ब्रिगेडच का इतर अनेक लोकांनी याआधीही अशा गोष्टींवर आक्षेप घेतलेला होता/आहे. ज्या संभाजी महाराजांची गडकरींनी यथेच्छ बदनामी केली, त्यांच्याच नावाच्या उद्यानात गडकरींचा पुतळा बसवणे कितपत योग्य? खरा इतिहास मांडून अनेक वर्षे होऊन गेलेली असतानासुद्धा आपला खोटा इतिहास गाजावाजा करीत विकणारे लोक आपण पाहताच. चुकीचा इतिहास प्रसृत करणे लोक थांबवित नाहीत त्याला विरोध नाही करत आपण त्याविरुद्ध कोणी बोलले लिहिले कि मात्र त्यावर तुटून पडता!

वरुण मोहिते 08/01/2017 - 16:00
राजसंन्यास ..ज्यांनी ४२ दिवस हाल अपेष्टा काढल्या मरताना त्यांच्यावर असं नाटक योग्य नव्हे . पुतळा फोडणं अजून योग्य नव्हे . बाकी प्रतापगडावरची कबर हि महाराष्ट्राची शान आहे कारण औदार्य दाखवलं महाराष्ट्राने . अवांतर -जाने भी दो यारो असाही महाभारतावर ब्लॅक कॉमेडी होतं असं एक पिक्चर आलेला आज आला असता तर काय झालं असतं?? पण सांस्कृतिक दहशत वाद केव्हाही धोक्याचा ..त्यामुळे असो . पण तरी नाटक असो व काहीही महाराजांवर लिहिणारे लोक किंबहुना चुकीचं काही कि लोक वैतागणार . हे सत्य आहे .आणि त्याला मुद्दाम खतपाणी घालणारे कमी नाहीत . त्यामुळे त्या तरुणांनीच योग्य विचार करावा . पुतळा फोडून संभाजी महाराज ग्रेट असं नाही आहे ते नेहमीच ग्रेट आहेत .

सुधीरन 08/01/2017 - 16:05
घ्या सविस्तर: पहिल्या अंकाच्या चौथ्या प्रवेशाच्या सुरुवातीस जिवाजी कलमदाने आणि कलुशा कबजी संभाजी महाराजांना मदिरा मदिराक्षित गुंतवून ठेवण्याचा कट करीत असताना दिसतात. त्यावेळी सोयराबाईंना भिंतीत चिणून मारण्यास व राजारामांस नाजरकैद करण्यास आपणच प्रवृत्त केल्याचे जिवाजी सांगतो. तेथे संभाजी तुळशीसह हाती मद्याचा प्याला घेऊन प्रवेश करतात. तुळशी जनरीतीची भीती वाटत असल्याचे त्यांस सांगते त्यावर संभाजी तिला त्याची पर्वा न करण्याबद्दल समजावता. जिवाजी आणि कबजी संभाजींकडे साबाजीची चुगली करत असता तिथे साबाजी बाळराजांसह (शाहू) प्रवेशतात. जिवाजी आणि कबजी जातात. साबाजी संभाजींस समजावत असता त्यांच्यावर संभाजी चिडतात. साबाजी संभाजींस शिवाजींची थोरवी सांगत असता संभाजी तो केवळ नशिबाचा भाग असल्याचे सांगून त्यास विरोध करतात. (" दैवी संपत्ती आबासाहेबांनी मिळवली म्हणता, म्हणजे त्यांनी केलं काय? राजगडावर अनायासे सोन्याच्या मोहरांचा वर्षाव झाला, यालाच दैवी संपत्ती मानावयाची काय?") त्यांस कैद करण्याची धमकी देतात. बाळराजे आपल्या वडलांस विरोध करून ("...राजमुखातील दारू पिणारी जीभ मला छाटावी लागेल.." -शाहू संभाजींना) साबाजीस सोबत घेऊन जातात. संभाजी स्वतःशीच चरफडतात.

In reply to by सुधीरन

यात एक विरोधाभास भरलेला आहे. एकीकडे तुम्ही मान्य करता //संभाजी महाराजांची जी काही प्रतिमा होती तिला अनुसरून गडकरींनी राजसंन्यास मधील संभाजी उभा केला// तसे असेल तर "बदनामी'' या शब्दाच्या अर्थानुसार ती बदनामी कशी होते ते कळले नाही. बदनामी म्हणजे एखाद्याबद्दल खोटेनाटे लिहून त्याचे चारित्र्यहनन करणे. पण येथे तर जशी प्रतिमा होती त्या अनुसुरुनच नाटक (इतिहास नव्हे) लिहिले गेले होते. मग बदनामी कशी. अशा उदाहरणानुसार जर या काळात वावरायचे असेल तर सगळ्यांचीच टाळकी फुटायला हवीत. हे तुम्हाला कळतय की नाही ? त्या काळात संभाजीमहाराजांची प्रतिमा तशीच होती त्याला कोण काय करणार? तुमच्या लाडक्या औरंगजेबाच्या कामगिरीबद्दल लिहिल्या गेलेल्या फतूहत-ई-आलमगिरी मधे संभाजीमहाराजांच्या वर्तणूकीबद्दल वर्णन आले आहे. आता जाऊन दिल्ली फोडणार का ? त्यातील पान क्र. २६७ वर त्यांच्या वर्तणूकीबद्दल वर्णन आले आहे. ते खोटे आहे असे मी म्हणतो पण त्या काळात त्यांच्याबद्दल असे बोलले जात होते ही वस्तुस्थिती आहे. मासिर-ई-आलमगिरी या ग्रंथाचा उल्लेख करुन त्यात ही माहीती दिली आहे. फतहुत-ई-आलमगिरी हा ग्रंथ एका इश्र्वरदास नागर नावाच्या माणसाने लिहिला. त्याचे नंतर इंग्रजीमधे भाषांतर केले एका तस्मिन अहमद नावाच्या माणसाने. या भाषांतराला युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननचे त्या काळातील अध्यक्ष श्री सतीशचंद्र यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्या युजीसीची इमारत अजूनही दिल्लीमधे दिमाखात उभी आहे. ती फोडायची हिंमत आहे का? ती अगोदर फोडा, कबर फोडा आणि मग यांनी शौर्याच्या गप्पा हाणाव्यात. एका बागेतील एका मास्तरांचा पुतळा फोडण्यास कसलिही मर्दुमकी लागत नाही. खुद्द नेहरुंनी शिवाजी महाराजांना लुटारु म्हटले होते त्यांच्या एकाही पुतळ्याला हात लावायची आजवर संब्रिच्या एकाही शूरवीर मावळ्याची हिंमत झालेली नाहे... हे आपले उदाहरणादाखल... ही तर अगदी अलिकडील गोष्ट...

In reply to by जयंत कुलकर्णी

सुधीरन 08/01/2017 - 16:52
मी कुठे म्हटलंय पुतळे फोडा म्हणून? कुठल्याही असंवैधानीक मार्गास आपण विरोधच केला पाहिजे. मात्र चुकीच्या गोष्टी किती दिवस चालवून घ्यावयाच्या याचा तरी विचार करायलाच हवा! निदान आपलं चुकलं हे मान्य तरी करावं माणसाने? उदाहरणार्थ दादोजी, रामदास यांना अजूनही शिवाजींचे गुरु म्हटले जात असेल तर काय करायचे? इतकाही लाजमोडेपणा बरा नव्हे!

In reply to by सुधीरन

नेहरुंनी शिवाजीमहाराजांना लुटारु म्हटले म्हणजे त्यांचे पुतळे फोडायला पाहिजेत का ? नाही. तर ते नव्हते हे सिद्ध करायला पाहिजे आणि महाराष्ट्रातील अनेक इतिहासकारांनी यदुनाथ सरकारांना ते वेळोवेळी सिद्ध करुन दाखविलेही आहे.

In reply to by जयंत कुलकर्णी

//उदाहरणार्थ दादोजी, रामदास यांना अजूनही शिवाजींचे गुरु म्हटले जात असेल तर काय करायच///// ज्यांना म्हणायचे आहे त्यांना म्हणू द्या. काय फरक पडतो...

In reply to by सुधीरन

/// कुठल्याही असंवैधानीक मार्गास आपण विरोधच केला पाहिजे// फक्त त्यात वैधानिक मार्गाने हे वाक्य घातलेत तर बरें.

In reply to by जयंत कुलकर्णी

सुधीरन 08/01/2017 - 17:22
ते केलंय सिद्ध. आणि आता कोण म्हणत नाही तसं. पण वारंवार सिद्ध करून देखील पुरंदरे टाइप लोक परत परत तेच तेच बोलत, लिहित आणि दाखवत राहतात!

In reply to by सुधीरन

श्रीगुरुजी 08/01/2017 - 19:44
उदाहरणार्थ दादोजी, रामदास यांना अजूनही शिवाजींचे गुरु म्हटले जात असेल तर काय करायचे? इतकाही लाजमोडेपणा बरा नव्हे!
अजूनही म्हणजे? ते दोघेही होतेच शिवाजी महाराजांचे गुरू! गुरूंना गुरू नाही म्हणायचं तर मग काय शिष्य म्हणायचं का? इतकाही कृतघ्नपणा बरा नव्हे!

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे 08/01/2017 - 20:08
इतकाही कृतघ्नपणा बरा नव्हे!
कृतघ्न म्हणजे अहसानफरामोश. म्हणजे उपकारांची जाण न ठेवणारा. दादोजी, रामदास यांनी कोणावर उपकार केलेत ते कळेल काय गुरुजी?

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 08/01/2017 - 20:16
गुरूंचे योगदान नाकारणे हा कृतघ्नपणा नव्हे काय? रमाकांत आचरेकर हे सचिन तेंडुलकरचे क्रिकेटमधील गुरू होते. त्यांनीच त्याला घडविले. त्यांचे योगदान नाकारणे याला कृतघ्नपणा म्हणता येणार नाही का? हीरा कितीही मौल्यवान असला तरी त्याला पैलू पाडल्याशिवाय त्याला चकाकी येत नाही हे माहित असेल अशी आशा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे 08/01/2017 - 20:20
ओ माय माय! हिरा काय पैलु काय चकाकी काय... असे प्रतिसाद पाहिले की ब्रिगेडी का चिडतात याची कारणे समजतात.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 08/01/2017 - 20:34
माझ्या प्रतिसादात चिडण्यासारखे काय आहे? एखाद्याला हीरा म्हणणे यात चिडण्यासारखे काय आह आहे? कोणीही स्वयंभू म्हणून जन्माला येत नाही. प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षेत्रात गुरूची गरज असतेच. विद्या असो, क्रीडा असो, कला असो, एखाद्या क्षेत्रातील कौशल्य असो . . . गुरू हा लागतोच.

In reply to by श्रीगुरुजी

थोडा चहा घेता काय?
ते दोघेही होतेच शिवाजी महाराजांचे गुरू! गुरूंना गुरू नाही म्हणायचं तर मग काय शिष्य म्हणायचं का?
कुरूंदकर आणि मेहंदळे काय म्हणतात ते अभ्यासले आहे काय? ही दोन नावे तर निरपेक्ष इतिहास संशोधकांची आहेत,निदान त्यांच्यावर तरी विश्वास ठेवायलाच हवा. मिपावरचाच एक जुना धागा आहे सविस्तर वाचा, http://www.misalpav.com/node/20660 आणि ही एका अभ्यासू निरपेक्ष अन् तटस्थ आयडीची प्रतिक्रिया http://www.misalpav.com/comment/372960#comment-372960 आता तुम्ही त्यांना शिवाजीचे गुरू मानत असाल तर माझा काहीही प्राॅब्लेम नाहीये.

In reply to by निष्पक्ष सदस्य

श्रीगुरुजी 08/01/2017 - 20:29
घेऊ की चहा. त्यात नाही म्हणण्यासारखं काय आहे? पांडुरंग बलकवडे, निनाद बेडेकर यांच्यासारखे अनेक निरपेक्ष इतिहास संशोधक आहेत. त्यांच्यावर अविश्वास ठेवायचा का?
आता तुम्ही त्यांना शिवाजीचे गुरू मानत असाल तर माझा काहीही प्राॅब्लेम नाहीये.
गुड! म्हणजे दोन्ही बाजूने काहीही प्रॉब्लेम नाही.

In reply to by श्रीगुरुजी

हान् कि बडिव!!!!!! शुभ कार्यास विलंब नको, साळगावकरांच्या पंचांगात मुहूर्त बघून लवकरात लवकर पहिली लाथ घाला, आम्ही आहोतच तुमच्या मागे.

१ मुद्दा औरंगजेबाकडून काय अपेक्षा करणार हा नाही. मुद्दा त्याने जे केले त्यामुळे त्याच्या कबरीला काय शिक्षा द्यायची आहे हा आहे. २ इतिहासाचा अभ्यास करताना अनेक नवीन बाबी प्रकाशात येत असतात. १०० वर्षापूर्वी जो इतिहास माहीत होत्या त्यावर विसंबून पुतळे फोडणे याला साहेब बिनडोकपणा म्हणतात. ३ आक्षेप घेणे ठीक आहे. पुतळे फोडणे हा नालायकपणा आहे. आणि ते सुद्धा झुंडशाहीचा आधार घेऊन. ४ आपण ताराबाईंनी लिहून घेतलेली बखर वाचलीच असेल. वर कोणी तरी त्याचा उल्लेख केलेला आहे. आता जिंजीला जाऊन तो किल्ला फोडावा असे तुमचे म्हणणे आहे की काय ? ५ गडकरींचा पुतळा संभाजीपार्कमधे बसविला याचे एकमेव कारण तेथे मुबलक जागा होती हा आहे. शिवाय शेजारीच बालगंधर्व हे त्या काळातील उत्तम नाट्यगृह आहे. गडकरींचे त्या क्षेत्रातील योगदान आपल्याला माहीत नसेल पण इतरांना माहीत आहे. ६ ब्रिगेंडीनी खरा इतिहास मांडला आहे असे आपले म्हणणे असेल तर या चर्चेला पुढे कसलाच अर्थ नाही. ब्रिगेडींच्या इतिहासातील प्रत्येक गोष्टी आजवर अनेकांनी खोडून काढलेल्या आहेत. मीच येथे कित्येक गोष्टी खोडून काढलेल्या आहेत. शेवटी दगडावर डोके आपटण्यात अर्थ नाही म्हणून ते काम कंटाळून बंद केले. त्यांना धडा त्यांचेच बांधव शिकवतील याबाबतीत माझ्या मनात तसूभरही शंका नाही. कोणीही काहीही लिहावे व कोणीही ते म्हणणे खोडून काढावे पुराव्यानिशी. त्यात काहीही वावगे नाही. अगदीच फार झाले तर संब्रिला न्यायालयात जाण्यापासून कोणीही रोखलेले नाही. त्यांनी ब.मोंवर खटला दाखल करावा ज्यात त्यांच्या (संब्रिची) अकलेची लक्तरे निदान न्यायालयासमोर टांगली तरी जातील...पण झुंडशाहीला आमचा कायमच विरोध राहील. अगदी बाबरीभंजनालाही मी विरोध केला होता.

सुधीरन 08/01/2017 - 16:32
मी ब्रिगेडी आहे असा तुमचा गैरसमज झालाय! बेंद्रे, गोखले, केळुस्कर, कुरुंदकर, शरद पाटील, आ. ह. इ. यांची पुस्तके वाचून जे काही समजलं त्यावर बोलतोय. औरंगजेबाची कबर आहे, अफजल खानाची आहे, परशुरामाची, वामनाची मंदिरे आहेत! पुरंदरेंवर केस चालू आहेच! मी वर जे काही लिहिलेय त्यात कुठेही पुतळ्याच्या तोडाफोडीला समर्थन दिलेले नाही! खोटा इतिहास कुरवाळत बसणाऱ्या आणि एतद्देशीय महापुरुषांची बदनामी करणाऱ्या व ती चवीने वाचणाऱ्यांवरच टीका केली आहे! आचार्य अत्रेंनी पुतळा बसवतेवेळी केलेले भाषण मिळाले तर वाचा.

In reply to by सुधीरन

तसा स्मज आपले लेखन वाचल्यावर होणे स्वाभाविक आहे. मीही सगळी पुस्तके वाचली आहेत. नवनवीन पुराव्यानुसार इतिहासाची सतत तोडमोड व्हावी लागते हे मला मान्यच आहे. म्हणून पूर्वी लिहिलेल्या इतिहासासाठी इतिहासकारांची घरेदारे जाळण्याचा अधिकार कोणालाच घटनेने दिलेला नाही. हे महत्वाचे आहे. कबर आहे, परशूरामाची आहे, वामनाची आहेत तसाच हाही पुतळा असू द्यावा होता असे माझे म्हणणे आहे. तोडफोडीला आपले समर्थन नाहे असे आपण लिहिलेले वाचून वाटत नाही. मला तरी. मी सगळी भाषणे वाचली आहेत. त्यातून काय अर्थ काढायचा हा ज्याच्या त्याच्या वकुबाचा प्रश्र्न आहे.