मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्हेज गोल्ड कॉइन / सेंसमी टोस्ट

केडी · · पाककृती
VegGoldCoin1 साहित्य १० ब्रेड स्लाईस २ मध्यम आकाराचे बटाटे, उकडून, किसून २ बारीक चिरलेल्या शिमला मिरच्या ४ ते ५ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून १/२ इंच आलं, बारीक चिरून ८ ते १० लसूण पाकळ्या, बारीक चिरून १ बारीक चिरलेला कांदा २ मोठे चमचे सोया सौंस १ चमचा मिरपूड (असल्यास सफेद) मीठ चवीनुसार १/२ कप कॉर्नफ्लॉर ३ ते ४ चमचे पांढरे तीळ तळणीसाठी तेल कृती ब्रेडच्या कडा काढून वाटीने गोलाकार कापून घ्या. बटाट्यांपासून ते मीठा पर्येंत सर्व जिन्नस एका बाऊल मध्ये मिक्स करून घ्या. हे मिश्रण आता ब्रेडच्या कॉइन वर दाबून बसवा. एका ताटलीत तीळ पसरवून, ब्रेड चे मिश्रण लावलेले कॉइन तिळाच्या ताटलीत दाबून घ्या. सगळ्या ब्रेड च्या कॉईन्स ना मिश्रण आणि तीळ लावून झाले कि ते फ्रिज मध्ये साधारण २० ते २५ मिनिटे ठेऊन द्या. कॉर्नफ्लॉर मध्ये पाणी घालून त्याची पातळीशी पेस्ट बनवून घ्या. कढईत तेल गरम करून, कॉईन्स कॉर्नफ्लॉर च्या पेस्ट मध्ये घोळवून, मंद आचेवर हे कॉईन्स तळून घ्या. गरम गरम व्हेज गोल्ड कॉईन्स शेजवान सौंस बरोबर खायला घ्या! ह्यात चिकन चे शिजवलेले तुकडे घालून, चिकन गोल्ड कॉईन्स बनवू शकता. बऱ्याच हॉटेल मध्ये एक चायनीज स्टार्टर म्हणून हा पदार्थ सेंसमी टोस्ट नावाखाली मिळतो. भाज्यांमध्ये स्वीट कॉर्न चे दाणे पण वापरून बघू शकता, कांद्या ऐवजी, कांदेपात वापरून बघा. VegGoldCoin2

वाचने 10568 वाचनखूण प्रतिक्रिया 23

कैवल्यसिंह Tue, 01/03/2017 - 18:40
वा वा काय दिसतेय पाककृती... एकदम झक्कास.... जाम भारी... मोबाईलच्या स्क्रिनमधे हात घालता आला आसता.. तर सगळे मीच संपवले आसते सगळे गोल्ड कॉईन... :-) :-)

सविता००१ Wed, 01/04/2017 - 12:24
यात मी मका, गाजर आणि खूप बारीक चिरून फ्रेन्च बीन्स पण घातल्या. भन्नाट मस्त झाली कॉईन्स. धन्यवाद

In reply to by सविता००१

केडी Sat, 01/07/2017 - 17:11
सविता००१ हिने केलेल्या ह्या पाककृती चा फोटो इथे देत आहे. तिला सध्या मिपा वर फोटो टाकणे जमत नाहीये म्हणून... मस्त आलाय फोटो, आणि मांडणी झकास केली आहे! savita01

In reply to by सविता००१

सविता००१ Sat, 01/07/2017 - 19:54
चुकून तीनदा झाला प्रतिसाद. कसा काय ते नाही कळालं. केडी: मोठ्ठ काम केलस माझ तू. धन्स रे