Skip to main content

मित्रों ...अगेन

लेखक झपाटलेला फिलॉसॉफर यांनी शनिवार, 31/12/2016 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनान्क ३१/१२/२०१६ रोजी सन्ध्याकाळी ७:३० वाजता माननीय पन्तप्रधान श्री नरेन्द्रजी मोदी आकाशवाणी आणि दूरदर्शन वरुन राष्ट्राला सम्बोधित करणार आहेत. आज ते काय बोलणार यावर प्रसारमाध्यमात उलटसुलट चर्चा सुरु आहेत आणि सोशल मीडियात जोक्स फिरत आहेत... ०८ नोव्हेम्बर ला केलेल्या नोटाबन्दीच्या घोषणेच्या धक्क्यातून देश अजूनही पुरता सावरलेला नाहीये ... गेले २ महिने फक्त आणि फक्त नोटा हाच विषय भारतीय् जनमनसात अन प्रसारमाध्यमात आहे ... त्यामुळे "मित्रों".... "मेरे भाईयों और बेहनों".....किंवा "मेरे प्यारे देशवासियो" ..... असे शब्द ऐकले की जनतेच्या ह्रुदयाची धडधड वाढू लागतेय ................ तर अशा परिस्थितीत आज नववर्षाच्या पूर्वसन्ध्येलाअ मोदीजी काय घोषणा करतील ? थर्टिफर्स्ट च्या नशेत डुम्बू पाहणार्‍या तळीरामांची नशा उतरवतील? की जनतेला दिलासा देणार्‍या काही घोषणा करतील ? याची उत्सुकता सर्वानाच आहे .... आपणास काय वाटते?

वाचने 1384
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया