Skip to main content

नोटबंदी'च्या चाव्या (IT डिपार्टमेंट) चोरांच्या हातात...!!

लेखक विशुमित यांनी गुरुवार, 08/12/2016 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या कारणासाठी नोटबंदी आणली ती सर्व कारणे आता तरी फोल होताना दिसत आहेत. १) काळा पैसा- अजून तरी मोठे मासे निवांतच दिसत आहेत. किरकोळ १-२ कोटींची रोकड जप्त होत आहे. एवढ्याच काही कारवाया. उलट ५००-१००० च्या नोटा बदलून देण्यासाठी बऱ्याच जणांनी काळा बाजार केला/करत आहेत. ज्यांच्याकडे सुटते पैसे जमा होत आहेत ते सुद्दा बँकेत भरणा करत नाहीयेत. सुटते पैशाचा चलन साठेबाजी चालू झाली आहे. (३१ डिसेंबर पर्यंत काही सुधारणा होऊ शकते या साठी वाव आहे ) जो बाहेरच्या देश्यांमध्ये काळा पैसा पडून आहे त्याचे काय? २) भ्रष्टाचार- सरकारी कार्यालय, पोलीस खात्यात अजून ही जोरात चालू आहे. ३) खोट्या नोटा- आकडेवारी नुसार फक्त ४०० कोटी च्या आसपास. ४) दहशतवाद-- काहीच फायदा दिसत नाही. उलट हल्ले वाढलेले आहेत. अतिरेक्यांकडेच रु.२००० च्या नोटा सापडल्या आहेत. ५) अर्थव्यवस्था- नंतर सुधारेल अशी आशा दाखवत आहेत पण कालच्या पत धोरणात व्याजदर जैसे थे च आहे. शेतकरी, छोटे व्यावसायिक यांचा रोजचा संबंध येत आहे, खूप फटका बसत आहे असे बोलत आहेत. ६) रिअल इस्टेट- बिल्डर एक रुपया प्रति square फीट पण कमी करत नाहीयेत. ७) कॅश लेस- ptm चा च जास्त फायदा होतोय की काय अशी भीती आहे. असे सर्व असताना एक वेळ मानू काळा पैसे वाले आणि बेहिशोबी मालमत्ता असणारे जरी प्राप्तिकर विभागाच्या जाळ्यात अडकले तरी या विभागाचा पूर्व इतिहास पहिला तर -- या जाळ्यातील सगळ्याच माश्यांची चौकशी होणार का? का आपला तो बाब्या असे काही? -- प्राप्तिकर खाते खरंच सरसकट सगळ्यांवर सारखीच कारवाई करेल का? -- न्यायालयात किती वर्षे खटले चालणार? -- काळा पैशा आणि बेहिशोबी मालमत्ते संबंधित गुन्हा सिद्ध झाला तर किती वर्ष शिक्षा असेल? -- तुरुंग वास झालाच तर सर्वाना सारखीच वागणूक मिळेल का ?(दिवंगत अम्माना करमत नव्हते म्हणून त्यांचे काही नेते जेल समोर झोपत होते, असे काही. छगन बाप्पाना घरचे जेवण येते म्हणे, संजू बाबाना सगळ्यांना डावलून पेरोल मिळत होता ) -- २.५ लाख पेक्षा जास्त रक्कम कोणी आता बँकेमध्ये जमा केली असेल तर त्याला त्याचे विवरण देण्यासाठी पुढच्या वर्षी नोटिसा जाणार. अशांचा आकडा खूप जास्त असणार यात वाद नाही. यांची चौकशी करण्यासाठी या विभागाकडे तेवढे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध आहे का? -- या मध्ये जे दोषी आढळतील त्यांची रवानगी करण्यासाठी आवश्यक कारागृहे आहेत का? -- सेटलमेंट करण्यासाठी पुढच्या वर्षी पुन्हा प्राप्तिकर विभागाच्या कार्यालय समोर रांगा दिसतील का ? -- प्राप्तिकर खात्यातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना चिरीमिरी देऊन प्रकरण लांबवता येईल शकते का? सर्वात महत्वाचं " डोंगर पोखरून उंदीर तर बाहेर येणार नाहीत ना " " हे सर्व असंच होणार यात तीळमात्र संशय नाही कारण मुळांवर घाव घालायचे सोडून फांद्या तोडण्यातच हे सरकार मुशगुल आहे." (डिकलमेर : जसे सगळेच राजकारणी चोर आणि भ्रष्टाचारी असतात तसेच प्राप्तिकर विभागावर सुद्दा मला काडीचा ही विश्वास नाही, भले काही इमानदार असतील तरी)

वाचने 24452
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्हाला सामान्य व्यक्तीच्या प्रतिक्रिया ग्राउंड लेवलला बघायच्या असतील तर मी देतो लिंक्स, फक्त निष्पक्षपणे बघू शकत असाल तर सांगा! फक्त रोष व्यक्त करणारे सामान्य लोक असं एक नवीन समीकरण येऊ घातलाय कि काय?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

भारतातला सामान्य माणूस इतकाही पिचलेल्या कण्याचा नाही. ते जाबाली यांनी जे लिहिले आहे ते त्यांना स्वतःला लागू असू शकेल. इथे सामान्य माणसे आनंदात आहेत. बाकी काय ते २०१९ मधे कळेलच.

In reply to by जाबाली

एक राहिलंच. सार्वजनीक शौचालयात पाण्याऐवजी कागद वापरायची सोय करायला हवी होती सरकारने. नोटबंदीपेक्षा हे काम जास्त महत्वाचं होतं.

बाकी नोटबंदी चा कोणाला काही फायदा झाला का? हे जरूर कळवावे ह्याच धाग्यावर खूप दिवस आहेत अजून . पण ज्यांना त्रास झाला ते काही बोले तर लोक अंगावर का येतात कळत नाही . स्वतःच म्हणायचं अजून परिणाम कळले नाहीत आणि कोण विरोधी बोल कि अजून नसलेले खात्री झालेले आकडे फेकायचे . बाकी अजूनही काही बिचारी सामान्य माणसं आहेत त्रास होऊनही देशभक्ती इंजेकशन मुळे गप्प आहेत. अजून देशभक्तीचे बरेच डोस आहेत माननीय प्रधानमंत्रांकडे . त्यामुळे जय जय . बाकी भाजप काँग्रेस भ्रष्टाचाराच्या बाबतीत सारखी ह्यांना कमी वेळ मिळालाय त्यांना जास्त मिळालेला . पद्धती पण वेगळ्या आहेत दोन्ही पक्षांच्या .

In reply to by वरुण मोहिते

बाकी भाजप काँग्रेस भ्रष्टाचाराच्या बाबतीत सारखी ह्यांना कमी वेळ मिळालाय त्यांना जास्त मिळालेला . पद्धती पण वेगळ्या आहेत दोन्ही पक्षांच्या .
असे रागां पण म्हणत होते,कि नोटबंदी हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, पण वास्तवतः हे विधान अतिशय चुकीचे आहे, विरोधाला विरोध म्हणून काहीही निष्कर्ष काढणे गैर आहे. नोटबंदी आणि त्यानंतर उद्भवलेल्या समस्या हा अल्पअभ्यासाचा परिणाम आहे,सामान्यजणांना त्रास होतोय,आम्हालाही खूप मनस्ताप झाला,अजूनही राग येतो,पण त्यास भ्रष्टाचार असे म्हणता येणार नाही.

सोबतीला अमित शहांसारखे ठग पण आहेत . त्यामुळे भाजप भ्रष्टाचार करत नाही ,कोणाला त्रास झाला नाही , सुरळीत आहे असे पुढील १० वर्ष पण ऐकू . नो प्रॉब्लेम . इतकी जाणती लोक ऐकवत आहेत म्हटल्यावर ऐकलं पाहिजे . बाकी नोटबंदी चा वैयक्तिक फायदा आणि जनधन खात्यात परत एकदा लोकप्रिय घोषणेमुळे काही हजार टाकले तर त्याचा अर्थव्यवस्थेवर होणार दूरगामी परिणाम कोणीतरी सांगा . मोदी बरोबर आहेत ह्यासाठी किती ती कारण..दंगल सिनेमा काय काँग्रेस भ्रष्टाचार काय प्रश्न फक्त आताच्या निर्णयाशी आहे .

In reply to by वरुण मोहिते

जंगल में मोर नाचा, किसने देखा किसने देखा! इथे कोणी त्रास झाला किंवा नाही झाला, फायदा झाला नाही झाला असे सांगितले तर ते कन्फर्म करण्याचा सोर्स काय आहे?

In reply to by वरुण मोहिते

तुम्ही कोणत्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत आहात ? जसे २ङ, व्यापम इत्यादी स्पेसिफिक नाव सांगितले तर बरे होईल. शिवाय नोटाबंदीत सरकार पातळीवरच्या भ्रष्टाचाराबद्दल काही पुरावे समोर आले आहेत का ?

तर नक्की लक्षात येईल . अजून भ्रष्टाचार पुढे आला नाही अहो काँग्रेस चा हि पहिल्या २-४ वर्षात नव्हता आला कधी त्यामुळे अशी स्टेटमेंट जाऊदे .नोटबंदीचे कायदे तोटे कळायला अजून वेळ आहे असे भाजपचं सरकार म्हणताय त्यामुळे ते हि राहूदे . बाकी नोटबंदीच्या समर्थनार्थ आपण भारतीय इतक्या पिचल्या कण्याचे नाही ह्या वाक्यामुळे एक्दम खुश झालोय मी काका .

नोटाबंदीचा तोटा झाला तरी देश विकायला काढावा लागला इतका तो नक्कीच झालेला नाही. काय आहे आपल्या देशाला काही किंमत द्यायची संवयच ७० वर्षांच्या स्वातंत्र्याने दिलेली नाही. १९६२ १९६५ व १९७१ व कारगील या युद्धात देखील आपण फार काही किंमत मोजली आहे असे नाही.मी तर म्हणतो ५० दिवसांची उधारी देणे किंवा घेणे इतकी पत ही माझी नसेल तर मी काय कमावले माझ्या आयुष्यात याच विचार होणे ही गरजेचे आहे.नाशवंत वस्तूंच्या कोणत्याही किमती फारशा खाली आलेल्या नाहीत असे जर आपण म्हणालो म्हणून नोटाबम्दी फसली आहे असे कसे ? भाव वाढलेले तरी नाहीत व याचे कारण सरळ आहे पाऊस समाधानकारक झाला आहे. आपल्या प्रत्येकाला आयुष्यात काही ना काहीतरी निर्णय जोखीम घेऊन घ्यावाच लागतो. ७० टक्के व्यवहार जरी कार्डाने होऊ लागले तरी हा निर्णय सफलच झाला असे म्हणावेच लागेल.ज्या अर्थी देशात उठाव झालेला नाही ज्या अर्थी सिनेमे, उत्सव, जत्रा, दानपेट्या, ३१ डिसेम्बर सारे मस्त चालू आहे. नोटांचा पुरवठा या ना त्या कारणाचे कमीच करायचे धोरण सरकार ठेवील. कारण सर्वच माणसे स्वत: कर चुकवीत नसली तरी ज्याला आपण रोख पैसे देतो तो कर भरतोच याची आपण खात्री कधीच करू शकत नाही.पर्यायाने त्याला रोख देऊन आपण त्याच्या करबुडवे पणात आपला वाटा उचलतच असतो.

In reply to by चौकटराजा

कारण सर्वच माणसे स्वत: कर चुकवीत नसली तरी ज्याला आपण रोख पैसे देतो तो कर भरतोच याची आपण खात्री कधीच करू शकत नाही.पर्यायाने त्याला रोख देऊन आपण त्याच्या करबुडवे पणात आपला वाटा उचलतच असतो. +१०० सामाजिक जाणीव म्हणजे आकाशातून पडलेले सोन्याने मढवलेले उत्तुंग असे काहीतरी नसते तर अश्याच छोट्या छोट्या गोष्टींची जाण असणे असते, हे तथाकथित, शिक्षित, समजदार आणि/किंवा विचारवंतांना समजणे कठीण का जाते, हे समजणे कठीण आहे ! :(

In reply to by चौकटराजा

पर्यायाने त्याला रोख देऊन आपण त्याच्या करबुडवे पणात आपला वाटा उचलतच असतो. रितसर खरेदीची पावती घेतल्यास कर बुडवणे टाळता येते.

किती फायदे झाले म्हणे ? १. नोटाबंदीच्या काळात नव्या नोटा सापडल्याची कितीतरी प्रकरणे झाली. सामान्य माणसाला ४००० चे लिमिट असताना इतक्या थप्प्या ह्यांच्याकडे कशा आल्या ? ह्याचे उत्तर मिळाले नाही. २. सरकार अजून पैसेच मोजत आहे म्हणे. ३. काळे किती सापडले ? ४. अतिरेकी हल्ले थांबले का ? ५. कॅशलेस किती प्रमाणात वाढले ?

In reply to by babubobade

याबाबत मिपावर खूप चर्चा झालीय परंतु त्यावेळी (ज्यावेळी चर्चा चालली होती त्यावेळी ) झालेल्या निर्णयाचे परिणाम पाहायला मिळाले नव्हते, आज ते पाहायला मिळतात, आणि दुर्दैवाने अत्यंत वाईट परिणाम दिसतायत.
१. नोटाबंदीच्या काळात नव्या नोटा सापडल्याची कितीतरी प्रकरणे झाली. सामान्य माणसाला ४००० चे लिमिट असताना इतक्या थप्प्या ह्यांच्याकडे कशा आल्या ? ह्याचे उत्तर मिळाले नाही. ३. काळे किती सापडले ?
जेवढ्या घोषणा केलेल्या जेवढी अपेक्षा ठेवलेली तेवढा काळा पैसा बाहेर आला नाही, डोंगर पोखरून मोदींनी उंदीर बाहेर काडला. जालावर याबाबत विविध अर्थतज्ज्ञांनी लिहलेले लेख वाचा, नोटबंदीचा शेती व्यवसाय, construction, इन्फॉर्मल सेक्टर यावरती भयंकर परिणाम झालाय, देशात २०१७ च्या पहिल्या चार महिन्यात १५ लाख जॉब गेलेत यावर नोटबंदीचा प्रभाव आहेच. मागील वर्षी पाऊस चांगला पडून सुद्धा शेतकरी कर्जमाफी मागू लागलेत याच कारण नोटबंदी मुळे पडलेले शेतमालाचे भाव (संदर्भ : लोकसत्ता आणि कुटुंबाचा अनुभव ). म्हणजे मोदी नि हा तडाखा राज्यांचा अर्थव्यवस्थेला दिलाय. अर्थात मोदी नि हा निर्णय घेताना अर्थतज्ज्ञानं फाट्यावर (अगदी अर्थमंत्रालयालाही) मारून हा निर्णय घेतल्याने, आज जे अर्थतज्ञ् यवरती लेख लिहतायत त्यांना मोदी आणि त्यांचे समर्थक काडीची हि किंमत देणार नाहीत हे स्पष्ट आहे.
२. सरकार अजून पैसेच मोजत आहे म्हणे.
ते मोजतंच राहणार अनंत काळापर्यंत
४. अतिरेकी हल्ले थांबले का ?
अजिबात नाही, काश्मीर मध्ये अतिरेकी बँका लुटाय लागले. मुळात किरेन रज्जू यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार भारतात खोट्या नोटांचे प्रमाण ०. १% हि नव्हते. नाहीतर सरकारने आकडा जाहीर करावा किती खोट्या नोटा सापडल्या
५. कॅशलेस किती प्रमाणात वाढले ?
कॅशलेस च वाढलेलं प्रमाण अगदी कमी आहे. तरीही कॅशलेस प्रमाण वाढावे म्हणू हा निर्णय घ्यायची गरज नव्हती. म्हणजे हे असे झाले कि मासे पकडायचे आहेत म्हणून तळ्यातील पाणी आठवायचे. जगात कोणत्याही देशाने काळा पैसा बाहेर यावा म्हणून किंवा डिजिटल transactions वाढावेत म्हणून असे तुघलकी निर्णय घेतले नाहीत. आता आपल्याला प्रश्न पडेल कि जगात इतर देश जे करतात ते पाहून आपण का करायचे, याच कारण ते देश विकसित आहेत मुक्त अर्थव्यवस्थेची पुढची पायरी त्यांनी गाठलेली आहे. त्यांच्याकडे विविध निर्णय अमलात आणायची आणि त्याचे परिणाम मोजायची यंत्रणा आहे, विविध तज्ञ् आहेत. आपल्याकडे यातील काहीच नसताना हा निर्णय घेण्यात आला आज देश त्याची फळे भोगतोय. नोटबंदीचे आज दोन प्रकारचेच समर्थक उरलेत १. जे पहिल्यांदा दिलेलं समर्थन लाजेखातर मागे घेऊ शकत नाहीत ते २. भाजपचे राजकीय समर्थक. या दोन कॅटॅगोरीतील लोक सोडल्यास नोटबंदीचे कोणीही समर्थक नाहीत. मुळात माझा स्वतःचा प्रवास खालील रित्या झाला नोटबंदी चांगला निर्णय >>>>हेतू चांगला पण अमलबजावणी चुकली >>>निर्णय च चुकीचा. (fullstop) सरकारने स्वतः गोलपोस्ट बदल्या, काळा पैसा बाहेर येणार >>>खोट्या नोटा बाद (हिंसक कारवाया बंद )>>>डिजिटल इकॉनॉमी. आता सरकार मौनात गेलय.