मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सिर्फ पचास कमेंट्स चाहिये!!

बाजीप्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
NRI वेल्फेअर कमेटी, आहार आणि आरोग्य विभाग, ब्रँच पटाया (थायलंड). बैठक ठिकाण :- हॉटेल दुसितथानी, नॉर्थ पटाया, चोनबुरी प्रोव्हिन्स. दिनांक :- ०४ सप्टेंबर २०१६ (रविवार) वेळ :- सायंकाळी ७ वाजता. अटेंडी :- १) मिस्टर वेंकटेश गोपालन (VP, मेसर्स. पॅक्सीस ग्लोबल) २) मिस्टर नंदकुमार एम. (रिजनल हेड, मेसर्स क्लार्क्स शूज कंपनी) ३) मिस्टर बाजीप्रभू (IT मॅनेजर, मेसर्स. पॅक्सीस ग्लोबल) ४) मिस्टर देवादास रामाकृष्णन (मॅनेजर कस्टमर सर्व्हिस, मेसर्स. पॅक्सीस ग्लोबल) ५) मिस्टर वेणू गोपालन (QC मॅनेजर, मेसर्स फोर्ड ऑटोमोबाईल) ६) ४ मोठे गजरे आणि ५ लहान वेण्या. (आयमीन लुंगीवाल्यांच्या बायका-पोरं) विषय :- "कडिपत्ता संवर्धन आणि मशागती बाबत" प्रस्तावना:- पटायास्थीत भारतीय वंशाच्या कुटुंबांच्या स्वयंपाक गृहात चांगले चांगले पदार्थ बनत असतांना देखील चवीमधे "कुछ तो है मिसिंग" हि ओरड आणि त्या अनुषंगाने बऱ्याच चर्चा होतं असत. अश्याच एका चर्चेत लुंग्या वर करत, बाह्या फोल्ड करत आणि "एन्ना रास्कला" म्हणत या प्रकरणाचा एकदाचा सोक्ष मोक्ष लावण्यावर एकमत झालं होत. स्वयंपाक गृहात चवीसाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या गृहिणींनी "कुछ तो है मिसिंग" याला जवाबदार थायलंड देशात "कडिपत्याचा" अभाव हे असल्याचे कारण ऍज ए इनपुट म्हणून ऑलरेडी दिले होते. ऑगस्ट महिन्याच्या आसपास झालेल्या एका गुप्त बैठकीतल्या खलबतांनुसार, "मिस्टर देवादास रामाकृष्णन" यांनी यशस्वी “स्मगलिंग” करत केरळमधून "कडिपत्ता" झाडाचं जिवंत "कलम" थायलंडमधे आणण्यात नुकतंच यश मिळवलं होतं. ठरवलेल्या माईलस्टोन्स नुसार "प्रोजेक्ट कडिपत्ता" आकार घेत असतांनाच एका (अंध)श्रद्धेची मुख्य अडचण उदभवली ती म्हणजे, "ज्यांच्या घरात एखादा मुलगा आहे त्यांनी स्वतःच्या घरात कडिपत्त्याचं झाड लावू नये, संततीसाठी ते चांगलं नसतं" मिस्टर देवादास यांनी आपल्या घरातल्या बागेत कडिपत्त्याचं झाड लावल्याच्या एक-दोन दिवसांतच त्यांना हि माहिती मिळाली आणि कडिपत्त्याचं काय करायचं हा प्रश्न अचानक ऐरणीवर आला. एकच मुलगी असलेला आणि देवाला वाहिलेला मिस्टर बाजीप्रभू सोडून बाकी सगळेच केरळी आणि प्रत्येकाच्या घरी एक मुलगा असल्याने "कडिपत्त्याच्या" झाडाला बाजीप्रभूने "दत्तक घ्यावे किंवा कसे" यावर साधक-बाधक चर्चा करण्यासाठी वरील ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती. भरपूर खादाडी झालेल्या या गोलमेज परिषदेत "प्रोजेक्ट कडीपत्ता" साठी घेतलेले निर्णय पुढील प्रमाणे, NRI वेल्फेअर कमेटी निर्णय :- १) श्री बाजीप्रभू हे अपार्टमेंटमधे रहात असल्या कारणाने त्यांनी सुचवलेला "कंपनीच्या बागे" चा पर्याय एकमताने मंजूर करण्यात आला. २) कडिपत्ता झाडासाठी लागणारी कुंडी, माती आणि खत यांचा आर्थिक भार "पाला" सदस्यांमधे समान वाटून घ्यावा. ३) वरील खर्चामधून श्री. बाजीप्रभू यांना "विशेष बाब" म्हणून वगळण्यात यावे. ४) झाडाची निगराणी, पाणी आणि औषध फवारणी इत्यादी जवाबदारी श्री. बाजीप्रभू यांच्याकडे निश्चित करण्यात आली. ५) सुट्टी काळात कंपनीचा ड्रायव्हर झाडाची काळजी घेईल याची हमी श्री बाजीप्रभू यांनी दिली. ६) "कडिपत्ता" झाड तीन फुटांचं झाल्यानंतरच "पाला" तोडण्यास अनुमती यावर सगळ्या सदस्यांचं एकमत. ७) श्री. बाजीप्रभू यांनी झाडाची वाढ, येणाऱ्या अडचणी याबाबत वेळोवेळी "श्वेत पत्रिका" रिलीज करावी. ८) कडिपत्ता झाडाचा पाला तोडणी आणि "डिस्ट्रिब्युशन लॉजिस्टिक" याचा फ्लो चार्ट बनवण्याची जवाबदारी श्री. वेंकटेश आणि श्री. नंदकुमार यांच्यावर निश्चित करण्यात आली. ९) झाडाच्या उत्तम मशागतीसाठी "आभार" म्हणून श्री. बाजीप्रभू यांना "शेती तज्ञ" हा पुरस्कार आणि पाला सदस्यांकडे वार लावून जेवणाची सुविधा हा प्रस्ताव पुढल्या बैठकीपर्यंत "शिताफीने" टाळण्यात आला. वरील निर्णय/आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. आपला, वेंकटेश गोपालन सचिव (NRI वेल्फेअर कमेटी) ताजा कलम, श्री. बाजीप्रभू यांनी कडिपत्ता झाडाची निगुतीने काळजी घेत "प्रोजेक्ट कडिपत्ता" यशस्वी करून दाखवला आहे. "कुछ तो है मिसिंग" हि समस्या जवळपास नाहीशी झालेली आहे. गृहिणी आनंदात आहेत. श्री. बाजीप्रभू यांना "शेती तज्ञ" हा पुरस्कार मिळवण्यासाठी कमीत कमी ५० +ve कमेंट्स मिळवण्याचा नवा नियम पारित करण्यात आलेला आहे. तेव्हा सगळ्या "मिपा"करांनी जास्तीतजास्त +ve कमेंट्स करून हाफ सेंचुरी मारण्यास मदत करावी हि विनंती. __/\__ -  -

वाचने 5638 वाचनखूण प्रतिक्रिया 21

खेडूत Tue, 12/27/2016 - 21:09
अभिनंदन. आणि शुभेच्छा! दरमहा अजून एक काडी लावून जास्त क्षेत्र लागवडीखाली आणा. इतक्या लोकांनी वापरल्यास बिचार्‍या झाडाचं काय होईल?

सिरुसेरि Wed, 12/28/2016 - 17:48
मस्त लेखन . छान खिंड लढवलीत . थायलंडमधल्या या यशोगाथेवर कबाली - २ निघाला पाहिजे .

श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 12/29/2016 - 09:27
मी पण लावलय कढिपत्त्याच रोप पण ३ फुटाच झाल तरीही सरळ वाढतय पाल्याच प्रमाण पानगाळ झालेल्या झाडासारखे आहे काय करावे बरे.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

यशोधरा गुरुवार, 12/29/2016 - 15:20
त्याला ताक घाला. चहा करुन झाल्यावर चहापत्ती आणि त्याचं पाणी घाला. त्यावर पांढरी बुरशी धरलीये का? पाण्याचं प्रमाण किती आहे झाडासाठी? माती बरी आहे का?

कायरा गुरुवार, 12/29/2016 - 10:06
कढीपत्ता चिरून मग तो फोडणी करताना टाकावा म्हणजे व्यवस्थित खाल्ला जातो. नाहीतर सगळे खाताना तो बाजूला काढतात . एक चांगली वनस्पती आपण खाण्याऐवजी फेकून देतो व केवळ वासापुरता त्याचा उपयोग करतो.

In reply to by कायरा

पिशी अबोली गुरुवार, 12/29/2016 - 10:25
कढीपत्ता नीट धुवून, एक दिवस नीट वाळवून त्याची पूड करून ती पूड वापरावी. मस्त वास लागतो आणि पोटात पण जातो.