Skip to main content

वारी - सज्जनगड

लेखक स्पा यांनी बुधवार, 17/08/2011 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसांपासून सज्जनगड ला जायचे मनात होते, पण योग जुळून येत नव्हता,योगिराणाकागदावर उतरल्यापासून तर हि इच्छा प्रबळ झाली, आता काही झाले तरी जायचेच, एकट जाव लागल तरी बेहत्तर. अशाच एका संध्याकाळी सूड शी याबद्दल बोललो, त्यानेही चक्क एका फटक्यात येण्याची तयारी दाखवली, धाग्यावर किसानाही येतो असे म्हणाला होता, त्याला फोन केला, तो हि यायला तयार झाला, मग फटाफट बाकी मिपाकर ट्रेकरमित्रांना बोलावण धाडल, पण नेमके सगळे कुठल्या न कुठल्या कामात अडकलेले होते, शेवटी आम्ही तिघच निघालो. ठाण्याहून सातारा पर्यंत बस च आरक्षण केल्या गेल होतंच :) रात्री १२ ची बस होती, (नशीब युयुत्सुंची अशुभ पोर्णिमा १२ लाच संपत होती, म्हणजे नंतरचा प्रवास निर्धास्त होणार होता ;) ), ती यायला जवळ जवळ एक तास उशीर झाला. असो पण सकाळी सातार्याला ६ पर्यंत पोचलो. मस्त गारेगार वातावरण होत, नुकताच चिंब पाऊस पडून गेला होता. १) सज्जन गड ला जाणारी पहिली बस ७ ची होती. म्हणजे अजून बराच अवकाश होता, बाहेर आलो, मस्त गरम गरम चहा ढोसला. जरा तरतरी आली . २) मग बस ची वाट पाहू लागलो. बस चा पत्ताच नव्हता, शेवटी ७.३० ला पहिली बस आली, २० -२५ मीन सज्जनगडावर पोचलो, मधेच दिसणारा हा अजिंक्यतारा . वातावरण भन्नाट होत , ३) नागमोडी रस्ता ४) गडाकडे जाणारी वाट ५) ६) ७) ८) ९) गडावर पोचल्यावर सर्वात मोठी चिंता होती ती भक्त निवासात राहायला जागा मिळेल कि नाही, कारण एकतर शनिवार रविवार जोडून सुट्टी , आणि सोमवारी १५ ऑगस्ट ची सुट्टी. आमचा गडावर राहायचा बेत होता. पण नशिबाने आम्हाला मस्त रूम मिळाली १०) गॅलरीतून दिसणारं बाहेरच विहंगम दृश्य ११) बाहेरच दृश्य , फ्रेम मध्ये कैद केल्यासारखं वाटत होत १२) गडावरचे पिण्याच्या पाण्याचे तळे १३) जाऊन समान टाकल, अंघोळी उरकल्या आणि सर्वात आधी समर्थांच्या शेज घरात गेलो. तिथे अजूनही कल्याण स्वामींचे हंडे, समर्थांना शिवरायांनी दिलेला लाकडाचा मोठा पलंग, हनुमानाने हिमालयात समर्थांना दिलेली वस्त्र, समर्थांची गुप्ती, कुबडी आणि त्यात लपवलेली तलवार, इत्यादी सर्व गोष्टी व्यवस्थित जपलेल्या आहेत, ४०० वर्षांपूर्वीच्या त्या वस्तू पाहताना अंगावर काटा येतो :) तिथून बाहेर राम मंदिरात गेलो. गडावरील इतर इमारती . १४) १५) १६) राम मंदिर १७) त्याच त्या मूर्ती , खरतर पंचायतन अस नाव आहे, राम ,लक्ष्मण, सीता, मारुती आणि बहुतेक गरुड असावा. या मुर्त्या "आंधळ्या कारागिराने" घडवलेल्या होत्या. हे वाचून तर प्रचंड धक्का बसला. इतक्या सुरेख मुर्त्या मी क्वचितच पाहिलेल्या आहेत. तिथून परत प्रवेशद्वारावर आलो. भूक लागलेली होती. बाहेर ३.४ हाटेल आहेत, त्यातलाच एका हाटेलात मस्त मिसळीवर ताव मारला. परत एकदा चहा पिऊन गड भटकायला निघालो. १८) . अर्थात मी आधी जाऊन आल्याने वाटाड्या चा रोल माझाच होता :). १९) वेण्णा बाईंची समाधी २०) तिथून मागे एक पायवाट जाते, जी जास्त कोणाला माहित आहे असे वाटत नाही. तिथून आम्ही कड्यावर आलो. समोरच दृश्य बघून भानच हरपलं. भरून आलेल आभाळ, भन्नाट वारा, गवताळ पठार, समोर उरमोडीच प्रचंड पात्र, आभाळ आणि पाणी यातला फरकच कळत नव्हता , बराच वेळ तिथे बसलो, फोटो वेग्रे काढले. २१) २२) पेठेचा मारुती २३) २४) क.... क .... किसन.... :D २५) उरमोडी आणि काठावरची गाव २६) २७) २८) २९) उरमोडीवरच धरण ३०) सूड इन राजे पोज ३१) ३२) मागे फिरलो. गडावरच तळ बघितल, समोरची धर्मशाळा, तिथून पुढे अंगाई देवीच मंदिर ., या देवीची स्थापना समर्थांनी गडाच्या सुरक्षितते साठी केली होती. इथे बर्याच वेळा शिव समर्थ भेटीही होत असत. ३३) ३४) ३५) ३६) तिघांचा एकाच फोटोत यायचा प्रयत्न :) ३७) ३८) ३९) ४०) याचवेळी, अचानक धुक पसरायला लागला, आणि आसपासचा अवघा परिसर धुक्यात लपेटला गेला. मग आम्ही परत भक्त निवासात परतलो, तो पर्यंत जेवणाची वेळ झालेली होती. मस्त गरमागरम आमटी भात आणि भाजी आणि गावाची खीर . भूक सडकून लागलेली होती . जेवणाआधी वाढेपर्यंत नामस्मरण. तिकडचा इतका शिस्तीचा कारभार पाहून खूप बर वाटल. जेवून परत खोलीवर आलो. जरावेळ झोपलो. संध्याकाळी मागे धाब्याच्या मारुतीपाशी गेलो, ४१) ४२) ४३) ठोसेघर कडे जाणारा रस्ता ४४) ४५) धाब्याचा मारुती ४६) ४७) या पठारावर बर्यापैकी गर्दी होती, म्हणून इतकी मजा आली नाही. मग मी सूड आणि किसनला सांगितल कि रात्री याच पठारावर परत यायचं. अंधारात .... :) संध्याकाळी गडावर ६ ते ७ सामुदाईक उपासना असते. त्यात रामनाम, जोहार, इतर स्तोत्र , श्लोक, रामरक्षा, आणि मारुती स्तोत्र वेग्रे म्हटली जातात. आम्हीहि त्याला हजेरी लावली . तो १ तास खरच अविस्मरणीय होता, बाहेर पडणारा पाऊस , गारठवणारी थंडी. तिन्ही सांजेची वेळ , एकाच पट्टीत , खणखणीत आवाजात होणार स्तोत्रपठन . डोक एकदम शांत झाल :) बाहेर येई पर्यंत रात्रीच्या जेवणाची वेळ झाली. आता थंडी कायच्या काय वाढलेली होती, आणि आम्हाला जेवण उरकून पठारावर परत जायचं होत :) रात्री सुद्धा मस्त जेवलो, रूम वर आलो, थंडीचा जमेल तसा बंदोबस्त केला आणि आणि ब्याटर्या घेऊन परत निघालो, बाहेर दासबोध वाचन सुरु होत, बाहेर चालायला सुरुवात केली, आणि अंधारच साम्राज्य सुरु झाल.. कसे बसे वाट काढून चालत होतो. खाली काही गावातले लुकलुकणारे दिवे, बस या व्यतिरिक्त उजेड नव्हता... आणि जी शांतता होती, ती केवळ अविस्मरणीय! अपवाद बेडकांच्या ओरडण्याचा, आणि बेडूक तरी केवढे, लहान दगडा एवढे मोठे :) मग पावसाचा जोर कायच्या काय वाढला, आणि आम्ही परतीची वाट पकडली. रूम वर आल्यावर परत गप्पांना रंग चढला. सकाळी ५ ला उठलो. अंघोळी उरकून परत रामरायाच दर्शन घेतल आणि निघालो. पहिली बस ७.३० ची होती, पण ती गडावर आलीच नाही, खालच्या खाली निघून गेली, ४८) मग खाली फाट्यापर्यंत चालत आलो, थोड्यावेळाने तिकडे एक जीपड मिळाल, तिथून सातारा बस स्थानकापर्यंत आलो. तिथून स्वारगेट, स्वारगेट हून पनवेल, पनवेल हून डोंबिवली, आणि डोम्बिव्लीहून ठाकुर्ली, असा वाकडा तिकडा प्रवास करत संध्याकाळी ६ ला स्वारी घरी पोचली. मनात इच्छा असेल तर काहीही संकट येत नाही, हे परत जाणवले. सज्जनगडाची वारी फर्मास झाली .निसर्गाच्या कुशीत २ दिवस कसे गेले समजलंच नाही. असाच ट्रेक परत होईलच, तूर्तास रजा घेतो जय जय रघुवीर समर्थ
लेखनविषय:

वाचने 23301
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

भारीच यार तब्बल 5 वर्षांपूर्वीचा लेख वृत्तांत! तिघेही कसले लहान दिसत आहात !! ह्या लेखनाच्या निमित्ताने गडाच्या आठवणी जाग्या झाल्या , आता गडावर जायला कधी मिळणार आहे ते देव जाणे !! जय जय रघुवीर समर्थ अवांतर : काहीही म्हणा पण तब्बल 5 वर्षांपूर्वीचा लेख वाचूनही भारी वाटले , असे वाटले की आपणही आपल्या प्रत्येक ट्रिप चा वृत्तांत लिहून काढायला पाहिले , त्या निमित्ताने आठवणी ताज्या राहातील :)

इथे एक श्रीधर स्वामींचे कुटीर आहे. त्याचे फोटो आहेत का तुमच्याकडे ?

In reply to by लाडू

इथे एक श्रीधर स्वामींचे कुटीर आहे. त्याचे फोटो आहेत का तुमच्याकडे ?
प्रचि क्रं १५ मध्ये जी वास्तु दिसत आहे तीच श्रीधर कुटी आहे, तिथे आत मध्ये श्रीधर स्वामींची मुर्ती , एक सुंदर तसबीर आणि पादुका आहेत :) ( बाकी फोटो पहाताना लक्षात आले , प्रचि २० बहुतेक गंडला आहे , ती वेण्णास्वामींची समाधी नसावी बहुधा)

जय जय रघुवीर समर्थ! व्वाह....फार सुन्दर फोटो आणि वृत्तान्त! अगदी नॉस्टॅलजिक व्हायला झाल! ४ वर्षापुर्वी गेले होते.