सायकोपॅथीला मराठीत काय म्हणतात मला माहित नाही.सायकोपॅथी हे एक उत्क्रांत झालेलं स्वभाववैशिष्ठ्य आहे.काय आहे सायकोपॅथी? आपला त्याच्याशी काय संबंध आहे?
सायकोपॅथ हा अश्या लोकांचा समूह आहे ज्यांना आपल्यासारखा conscience नसतो,conscience म्हणजे moral sense of right and wrong.नैतिकदृष्ट्या काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे ठरवण्याची सामान्य माणसामध्ये क्षमता असते ,ती क्षमता सायकोपॅथीक व्यक्तीकडे नसते.असे लोक प्रामुख्याने गुन्हेगारी वृत्तीचे असतात.एका अंदाजानुसार यांची एकुण टक्केवारी लोकसंख्येच्या ४% एवढी आहे.४% हा आकडा जरी कमी वाटत असला तरी यांचे जे बर्डन समाजावर पडलेले आहे ते फार मोठे आहे.बहुतांश गुन्हेगार हे सायकोपॅथ असतात,७५% टक्के इतके.पण हे एवढ्यावरच थांबत नाही.सायकोपॅथ इतरही अनेक क्षेत्रात आघाडीवर असतात.जगभरातले हुकुमशहा,अनेक मोठ्या कॉर्पोरेशन्सचे CEO ,मिलीटरी पर्सनल्स ,पोलिस दलातील व्यक्ती ,इतकेच काय काही वैज्ञानिकही सायकोपॅथ या प्रकारात मोडतात .भीतीची कमतरता हे सायकोपॅथ लोकांचे मुळ लक्षण आहे.fear conditioning, म्हणजेच एखाद्या नकारात्मक घटनेचा संबंध भीतीशी जोडणे व त्यानुसार व्यवहार करणे ही सामान्य माणसाची उपजत क्षमता सायकोपॅथ्समध्ये नसते.त्यामुळे सायकोपॅथ्सना कशाचेही बंधन वाटत नाही.ते बर्याचदा त्यांना उत्तेजित करतील असे व्यवहार करत असतात.lower arousal हा सायकोपॅथीक व्यक्तीचा आणखी एक गुणविशेष.
सायकोपॅथी चा अभ्यास अनेक वर्ष चालू आहे.पैकी रॉबर्ट हेअर हे त्यातील तज्ञ समजले जातात.तीन दशकाहूनही अधिक काळ त्यांनी या स्वभावाच्या लोकांचा अभ्यास करुन एक प्रश्नावली तयार केली आहे. Hare psychopathy checklist revised ही ती प्रश्नवली आहे.
https://www.wikipedia.org/wiki/Psychopathy_Checklist
त्यांचे without conscience हे पुस्तक या क्षेत्रातले उत्तम पुस्तक व अभ्यासग्रंथ म्हणून ओळखले जाते.
सायकोपॅथ आणि सामन्य व्यक्ती यांच्या मेंदूत मुलतः फरक असतो हे अभ्यासांती सिद्ध झाले आहे.आपल्याला नियंत्रणात ठेवणारा,विचारशक्ती देणारा मेंदूचा अग्रभाग( prefrontal cortex) ,हा भाग सायकोपॅथीक व्यक्तीमध्ये फार कमी उत्तेजीत असतो,सामान्य माणसांमध्ये मात्र हा भाग बर्यापैकि उत्तेजीत अवस्थेत असतो.जास्त उत्तेजना म्हणजे या भागाचा जास्त वापर असे गणीत आहे.
(आंतरजालावरुन साभार)
सायकोपॅथ हे मुळातच या बाबतीत कमी उत्तेजीत असतात.मेंदूतील मुलभुत फरकामुळे त्यांची अनेक स्वभाववैशिष्ठ्ये असतात .ती कोणती ते बघूयात.
१. भीतीचा अभाव- सायकोपॅथ हे अत्यंत धाडसी असतात.त्यांच्यात भीतीचा खूप अभाव असतो.त्यामुळे असामाजिक आणि बेकायदेशीर व्यवहार करताना त्यांना कसलीच भीती वाटत नाही.
२. आपल्या वागण्या बोलण्यातून एखादे सावज टिपणे .स्वतःच्या फायद्यासाठी त्याच्याशी चांगले वागण्याचे नाटक करणे.असे नाटक करण्यात सायकोपॅथ तरबेज असतात.इंग्रजीत याला superficial charm असे म्हणतात.
३.स्वतः विषयी असलेल्या अवास्तव कल्पना हे यांचे महत्वाचे लक्षण आहे.,सायकोपॅथीक व्यक्ती स्वतःच्या गरजा पुर्ण करण्याला महत्व देते.स्वतःचा वाढवलेला मोठेपणा ,फक्त स्वतःच्याच गरजा महत्वाच्या समजणे हे गूण आढळतात.
४. आक्रमकपणा(impulsivity)- सायकोपॅथ हे अत्यंत आक्रमक असतात.थोड्याश्या provocation मुळेही ते मारामारिपासून ते खूनापर्यंत कोणतीही गोष्ट लिलया करु शकतात.poor self control असणे ,आपल्या कृत्यातून होणार्या परिणामांची पर्वा न करणे .
५.उत्तेजना देणारे व्यवहार करणे- सायकोपॅथीक व्यक्ती त्यांना उत्तेजना देईल असे वर्तन करतात.सामान्य माणसाला जोखमीच्या ,risky वाटतील अश्या गोष्टी ते सहजतेने करत असतात. वेगात वाहन चालवणे,सार्वजनिक ठीकाणी असभ्य व बेकायदेशीर व्यवहार करणे ,स्त्रीयांचि छेड काढणे इत्यादी प्रकार ते लिलया करत असतात.
६.खोटं बोलणे- स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलणे इतरांना फसवणे .
७.दयेचा आणि अपराधीपणाचा अभाव(lack of remorse and guilt)- सायकोपॅथ्सना कुणाविषयी कसलीही दयाभावना नसते,सामान्य व्यक्तीला असलेले दया ,करुणा हे भावबंध त्यांच्यात नसतात.
दुसर्या व्यक्तीला दिलेल्या त्रासाचा त्यांना कसलाही गिल्ट नसतो.
८.स्वतःच्या फायद्यासाठी दुसर्यावर अवलंबून राहणे हे सायकोपॅथ्सचे आणखी एक लक्षण,इंग्रजीत ज्याला parasitic living म्हणतात,असे आयुष्य जगणे .स्वतःच्या भविष्याविषयी कोणतेही प्लॅनिंग नसणे.
९.अनेक लैंगिक जोडीदार असणे .promiscuous sexual behavior.काही तज्ञांच्यामते सायकोपॅथी ही उत्क्रांतीतून जन्माला आलेली reproductive strategy आहे.अनेक जोडीदारांशी बळजबरीने संबंध ठेवणे व आपला वंश वाढवणे यासाठी उत्क्रातीत या स्वभाववैशिष्ठ्याचा फायदा झाला असावा.व हा स्वभावविशेष बळावला असावा.त्यामुळेच बहुतांश बलात्कारी सायकोपॅथ म्हणून सहज क्वालीफाय होतात.
१०.विस्तृत गुन्हेगारीकरण- सायकोपॅथ अनेक प्रकारच्या गुन्हांमध्ये गुंतलेले असू शकतात.दरोडा,बलात्कार ,खून यासारखे ब्लू कॉलर गुन्हे ते करतच असतात.त्याच बरोबर फ्रॉड,आर्थिक गुन्हे असे व्हाइट कॉलर गुन्हे ही करत असतात.
मला सायकोपॅथी विषयी जी माहीती आहे ती इथे सोप्या शब्दात मांडली आहे.माझ्या व्यक्तीगत आयुष्यतही मी अनेक सायकोपॅथना जवळूण बघितले आहे.त्याविषयीही लेखात लिहिले आहे.आंतरजालावरुनही बरीच माहीती घेतली आहे.चित्र आंतरजालावरुन घेतले आहे.धन्यवाद.

याद्या
5451
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लेख. असं काही लिहित जा.
आपल्या सर्वांनाच एक प्रसिद्ध
लेख चांगला आहे टफि
ऊलट यांना इतरांन्पेक्षा
In reply to लेख चांगला आहे टफि by बोका-ए-आझम
मला बरोबर वाटते.. पकडले
In reply to लेख चांगला आहे टफि by बोका-ए-आझम
चंबळखोय्रातले ठग कोणत्या
सिरीयल किलर
स्पार्टा,जॅक द रिपर एक स्त्री
In reply to सिरीयल किलर by स्पार्टाकस
आहेत की.
In reply to स्पार्टा,जॅक द रिपर एक स्त्री by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
मुलांचे मॄतदेह पिशवीत घालून
In reply to आहेत की. by बोका-ए-आझम
जॅक द रिपर
In reply to स्पार्टा,जॅक द रिपर एक स्त्री by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
एक गहन प्रश्न
सायकोपॅथना विपरित परिणामांची
कथालेखक,सायकोपॅथना भीती वाटतच
In reply to सायकोपॅथना विपरित परिणामांची by मराठी कथालेखक
टफी बदल गया है।180 अंशात
टफि सुधारले तसा मीही ....
In reply to टफी बदल गया है।180 अंशात by Ram ram
"सायको" = "विक्षिप्त"
अचानक राग अनावर होणे अन त्या
In reply to "सायको" = "विक्षिप्त" by डायवर
छान लेख! निठारी हत्याकांडातील
नितीमत्तेचा मृत्यू