नेहमी प्रमाणे लालूंनी भारतीय रेल्वेला फायदा करुन दिला आहे. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर मेल एक्स्प्रेसच्या प्रवास भाड्यात २ % कपात केली आहे . लोकलचे भाडे १ रु स्वस्त होणार आहे. ही एक आनंदाची गोष्ट. लालूंचे त्यासाठी अभिनंदन !!
सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे लालूंनी मुंबई- जबलपूर गरिबरथ अलाहाबाद पर्यंत एक्स्टेंड करण्याची घोषणा केली त्यावेळी लक्षत आले की मागच्या वर्षीच्या बजेट मध्ये घोषीत केलेली मुंबई- जबलपूर ही गाडी अजून सुरुच झालेली नाही ! धन्य ते आपले लाडके लालू !!
मुंबई- गोरखपूर आणि मुंबई - वाराणसी रोजची गाडी चालू करुन मुंबईवरचा युपी , बिहारी टक्का कमी होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली आहे. बाकी रेल्वेला सगळ्यात जास्त महसूल देणार्या मुंबईच्या तोंडाला पाने पुसण्यास लालू परत एकदा यशस्वी झाले आहेत.
ठाणे- पनवेल लोकलच्या नियमीत फेर्या, पनवेल - कर्जत नवीन मार्गवर नियमीत वाहतुक, हार्बर लाईन वर १२ डब्यांच्या गाड्या, बोरीवली -विरार करांसाठी नवीन गाड्या या प्रवाशांच्या मागण्याबाबत लालूंनी फारसा विचार केलेला दिसत नाही.
मात्र भारतीय रेल्वे फायद्यात आणण्यात परत एकदा लालूजी यशस्वी झाले आहेत.
यापुढे सरकार कुणाचे ही आले तरी रेल्वे मंत्री लालू प्रसाद व्हावेत या त्यांना शुभेच्छा !!!
(लोकल प्रवासी ) अमोल
वाचने
2903
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
आरं
ह्म्म्म्म!
परत एकदा
In reply to ह्म्म्म्म! by ब्रिटिश टिंग्या
परत एकदा भैय्यांच्या सोईसाठी +५५५५
In reply to परत एकदा by अमोल केळकर
हो...
In reply to ह्म्म्म्म! by ब्रिटिश टिंग्या
?
In reply to हो... by झेल्या
लोणावळा -
In reply to ? by ब्रिटिश टिंग्या
ह्म्म्म्म!
In reply to लोणावळा - by अमोल केळकर
घाटात लोकल?
In reply to लोणावळा - by अमोल केळकर
ठाणे-
पनवेल -
In reply to ठाणे- by घाशीराम कोतवाल १.२
लालू बजेट
आमी बी पाहिले
In reply to लालू बजेट by शशिधर केळकर