नोटबंदी - कायमची बंदी
नोटबंदी चे काय होणार , त्याचे परिणाम वगैरे सर्व चर्चांचा आता अतिरेक होऊ लागला आहे. मुळात काळा पैसा फारसा रोख स्वरुपात नाहीच. तो अगोदरच सोन्यात, जमिनित कन्व्हर्ट झालाय असेही बर्याच लोकांचं म्हणणे आहे. मात्र जादुगार आपल्या पोतडीतून वेगवेगळ्या वस्तू काढून समोरच्याला आश्चर्यचकित करतो तसे आपण देखील रोज कुठुन कुठुन आज अमुक करोड पकडले तर काल तमुक लाख पकडले अशा रोज बातम्या ऐकून आश्चर्यचकित होत आहोत.
सरकार जेव्हा काळ्या पैशाचा हिशोब देईल तेव्हा देईल मात्र रोज बातम्यांमधून मिळणार्या माहितीवरुन साधारण आज किती बेहिशोबी पैसा जमा झाला याचा अंदाज बांधायला काय हरकत आहे ?
कालपर्यंत ठाण्यात एक कोटी पकडले म्हणून माझी छाती ५६" ची झाली मात्र आज पुण्यात बँक लॉकरमधून १० करोडची बेहिशोबी रक्कम मिळताच माझा छातीचा फुगा फुटला. खरेच पुण्याचा नाद नाय करायचा बॉ !
अर्थात नोटबंदीच्या विषयावर वाचून आणि लिहून तुमचा दम आतापर्यंत नाकात आलाच असेल म्हणा ! फिर भी बचेंगे तो और भी बचेंगे !
तर चला बरं रोकडजप्तीच्या तुम्हाला माहित असलेल्या बातम्या इथे चिकटवा चटाचटा.
:) :)
प्रतिक्रिया
सद्या मोठ्या प्रमाणात
नोटाबंदीचं यश प्रेझेंट करायला
+१
बरोबर
धागा काढा राव याच्यावर, तो
काय करणार
सामान्य लोकांना २००० ची नोट
बँक कर्मचार्यांबरोबर
असं होत आहे हे मी सुरुवातीलाच
कीतीही नियम केले तरी त्यातून
अवांतर - कॅशलेस हे एक
सहमत आहे.
आवो