नोटबंदी चे काय होणार , त्याचे परिणाम वगैरे सर्व चर्चांचा आता अतिरेक होऊ लागला आहे. पण या निमित्ताने मात्र अनेक चर्चांमधून , नेत्यांकडून अथवा पक्षांनी मांडलेल्या भूमिकेतून, मीडिया मधून बाहेर आलेली व जाणवलेली ही मजेशीर विरोधाभासी विधाने. काही विधाने वेगवेगळ्या वेळेस केली गेली ती सलग वाचता यावीत म्हणून त्याचे भाग पाडले आहेत . ( अ , ब वगैरे ) तर . एन्जॉय ..
१. ज्यांच्या पैसा पांढरा आहे तेच रांगेत उभे आहेत . काळ्या पैशेवाले मजेत घरात बसून आहेत . पैसे बदलायला बँकेत नाही आले . :))))
२. घरात अडीअडचणी साठी साठवून ठेवलेल्या नोटा बदलण्यासाठी गरीब लोक रांगेत उभे आहेत . आता उद्यापासून काय खायचे हा त्यांच्यापुढील प्रश्न आहे .
( म्हणजे आत्तापर्यंत नोटा न वापरता घरात अडीअडचणी साठी साठवून ठेवल्या होत्या तर सर्व सुरळीत चालू होते आणि आता त्याच नोटा स्वतः च्याच बॅंक खात्यात भरल्यावर खायचा प्रश्न उभा राहिला )
३. अ ) मोदी मनमानी निर्णय घेत आहेत . कुणालाही विश्वासात घेत नाहीत . मंत्रिमंडळास देखील अंधारात ठेवले आ) भाजपीयांना हे सर्व आधीपासूनच माहीत होते .त्यांनी आधीच पैसे पांढरे केले. ई) इन्कम टॅक्स च्या धाडीत भाजपेयी च जास्त सापडत आहेत :)))))
४. अ) सर्व राष्ट्रीय बँका बुडवायचे सरकार चे धोरण आहे . ब ) मल्ल्या चे कर्ज बँकांनी माफ करून टाकले आणि आता बॅंका बुडू नयेत म्हणून पाचशे हजार च्या नोटा आपल्याकडूनच गोळा करत आहेत ( म्हणजे आत्तापर्यंत फक्त मल्ल्या च्या कर्जवसुलीवरच बँक चालू आणि फायद्यात होत्या ) :)))
५. मल्ल्या ला आणखी कर्ज पाहिजे. बँका ते द्यायला तयार आहेत फक्त बँकेत पैसे नाहीत. :)) ( म्हणजे मल्ल्या च्या संपत्तीवर जप्ती वगैरे खोटे आहे तर )
६. अ) अनेक दुकानदार धंदा तोट्यात आहे असे दाखवून टेक्स बुडवतात. सरकार अशा लोकांना किती रोखणार . हेच ते छोटे मासे वगैरे. आ) दुकानदार वगैरे लोकांना कार्ड कटकटीचे ठरत आहे. सोयीचे असेल तेथे मी पण नोटाच प्रेफर करेन.
७. सरकार ला काळ्या पैशाबाबत काहीच करायचे नाही. त्यांना फक्त स्वतः चा टैक्स वाढवायचा आहे (म्हणजे काय ??)
८. अ) लोक बैंक मॅनेजरशी वगैरे आपापसात सेटिंग लावून पैसे पांढरे करत आहेत . आ)लोक काहीही करून आपले पैसे पांढरे करतच आहेत म्हणायचे इ)लोकांचे असले हे आपापसातील व्यवहार हेच सरकारचे व या योजनेचे अपयश आहे. ( बहुदा प्रत्येक बँक मॅनेजर च्या पाठीमागे एक गुप्त हेर लावला असता तर असे झाले नसते व योजना यशस्वी ठरली असती किंवा नोटबंदी नंतर एका रात्रीत सर्व लोक प्रामाणिक वागू लागतील हा या योजनेचा उद्देश होता असे कोणी समजले कि काय ?)
९. सैनिक शाहिद होत असताना आपण काही वेळ रांगेत रांगेत उभे नाही राहू शकत ? ( सैनिक व आपलेच पैसे रांगेत भरण्यासाठी थांबलेल्या लोकांचा तसा संबंध नाही . कदाचित लोकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी असे म्हणत असतील )
१०. अ )रांगेतील लोकांबाबत सरकार जागरूक नाही . लोकांशी त्यांना काहीच देणेघेणे नाही ब) नोटबंदी संदर्भात सरकार वेळोवेळी वेगवेगळे निर्णय घेत व बदलत आहे ( म्हणजे वेळोवेळी घेतलेले निर्णय लोकांचा त्रास कमी व्हावा म्हणून घेतले का कसे?)
नोट : वरील लिखाण हे केवळ आत्तापर्यंत अनेक विधानांमध्ये विरोधाभास जाणवला म्हणून केले आहे. आणि केवळ एक गंमत म्हणून लिहिले आहे मणिपूर मधील एका छोट्याशा गावातील मजुरापासून ते मुंबई मधील मोठ्या दुकानदारांपर्यंत सर्वाना या नोटबंदीची कमीअधिक प्रमाणात झळ पोचली आहे आणि हे सर्वाना मान्य आहे . आम्ही त्यांच्या भावनांशी प्रामाणिक आहोत. वरील लिखाणामध्ये अशा सर्व लोकांची थट्टा करण्याचा कोणताही हेतू नाही. कृपया परत चालू होऊ नका.
तर येउद्या अजून काही.. :)
वाचने
8733
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरं झालं तुम्ही हा धागा काढला
यातला क्र. १ अक्षरशः
In reply to बरं झालं तुम्ही हा धागा काढला by संदीप डांगे
घर मे शादी है, पर नोट नही है!
• कांग्रेस के नेता कांग्रेस
(पण आतापर्यंत तर भाजप
In reply to • कांग्रेस के नेता कांग्रेस by संदीप डांगे
हे तर मत झालं हो. वैयक्तिक
In reply to (पण आतापर्यंत तर भाजप by प्रचेतस
डांगेंना प्रणाम
In reply to हे तर मत झालं हो. वैयक्तिक by संदीप डांगे
कांग्रेस के नेता कांग्रेस के
In reply to डांगेंना प्रणाम by सुज्ञ
मोदी सरकार एकही गोष्ट बरोबर
In reply to (पण आतापर्यंत तर भाजप by प्रचेतस
अगदी =))
In reply to मोदी सरकार एकही गोष्ट बरोबर by डॉ सुहास म्हात्रे
>>कांग्रेस के नेता कांग्रेस
७० वर्षे तळघरात साठवल्यामुळे
In reply to >>कांग्रेस के नेता कांग्रेस by नितिन थत्ते
=)) =)) =))
बहुदा प्रत्येक बँक मॅनेजर च्या पाठीमागे एक गुप्त हेर लावला असता तर असे झाले नसते व योजना यशस्वी ठरली असतीहे तर लै भारी !ओवेसीने मुस्लिम भागातले एटीएम
कोणते न्युज चॅनेल्स हो?
In reply to ओवेसीने मुस्लिम भागातले एटीएम by संदीप डांगे
खिक्क
In reply to कोणते न्युज चॅनेल्स हो? by हतोळकरांचा प्रसाद
प्रश्न बरोबर असो की चुकीचा
In reply to खिक्क by रामपुरी
=)) =))
In reply to प्रश्न बरोबर असो की चुकीचा by धर्मराजमुटके
=))
In reply to =)) =)) by संदीप डांगे
ह ह पु वा
In reply to =)) =)) by संदीप डांगे
इथे त्या विषयावरचा
In reply to कोणते न्युज चॅनेल्स हो? by हतोळकरांचा प्रसाद
अजून एक विधान - "जरा खेड्यात
"विधाने वेगवेगळ्या वेळी केलीत
मागच्या ३६ दिवसातले सगळे
In reply to "विधाने वेगवेगळ्या वेळी केलीत by संदीप डांगे
माननीय मेगा अथवा गिगाबायटी प्रतिसादकर
..
रोख व्यवहार
क्रांतीवांतीचे प्रणेते अनिल बोकील यांचेच ब्यांकेत खाते नाही. ते आपल्या पेन्शनर आईकडून महिन्याला ३५०० रु रोख घेतात आणि रोखीनेच खर्च करतात. (ही माहिती त्यांनी स्वत: सांगितली).धक्कादायक आहे मग हे ..!!
In reply to रोख व्यवहार by नितिन थत्ते
waa, chhan. bokilkakancha
In reply to रोख व्यवहार by नितिन थत्ते
माहिती कुठे सांगितली..? लिंक
In reply to रोख व्यवहार by नितिन थत्ते
३३.१४ च्या पुढे बघा...
In reply to माहिती कुठे सांगितली..? लिंक by मोदक
धन्यवाद.
In reply to ३३.१४ च्या पुढे बघा... by संदीप डांगे
बरं झालं बोकिल स्वतःच बोलले..