गेले काही महिने मिपावर जास्त येणे झाले नाही त्यामुळे खूप काही मिसले आहे वाचायला. आता वाखु नजरेखालुन काढत असताना निनाद यांचा स्टार्ट अप्स - व्यवसाय कल्पना मंथन धागा वाचत होते आणि मग अचानक लक्षात आले कि ज्यामुळे मी एवढे दिवस चिंतीत आहे त्यांचे सोलुशन मिपाबंधु नक्की देऊ शकतील आणि आपली एक जाहिरात हि होऊन जाईल. तर मिपाकर हो स्वतःचा काही तरी एक व्यवसाय असावा बस हे एक इवलेसे स्वप्न किती वर्ष झाले स्वस्थ बसु देत नव्हते, करूया करूया याला मुहूर्त येत नव्हता. पण या वर्षीच्या मे महिन्यात खूप उलाढाली करून स्वतःचे एक छोटेखानी चार पायी हातगाडीवर चाइनीसच्या गाडीचा श्री गणेशा माझ्या गिरगावच्या घरच्या गल्लीच्या नाक्यावर सुरु केला आहे. बी एम सी, स्थानिक नगरसेवक यांच्याशी नडुन टिकुन गेले ८ महिने टुकुर टुकुर आमचा खाद्य उद्योग सुरु आहे. माऊथ पब्लिसिटी मुळे कासव गती ने का होईना पण आमचे पाऊल पुढे जात आहे. पण मला सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे वीज. माझ्या दुकानावर पुरेशी लाईट उपलब्ध नसल्याने दुकान प्रथमदर्शी दिसून येत नाही. तश्या चार्जिंग वाल्या लाईट आणल्या आहेत पण त्या जास्तीत जास्त अर्धा तासा पेक्षा जास्त जिवंत राहत नाही पूर्ण दिवस चार्जे करून सुद्धा. तर मला असे काही हवे आहे जे माझ्या दुकानाला पुरेसा उजेड आणि थोडीसी सजावट जसे लाईटीची माळ वैगेरे जेणेकरून दुरूनही लोकांना अंदाज येईल. तर स्वस्त आणि टिकाऊ असा काही तोडगा असेल तर मिपाबंधु आणि भगिनींनी द्यावा ... त्यांना इ मिसळचा नैवद्य देईन. तसेच अजून एक व्यवसाय कल्पना डोक्यात पिंगा घालत आहे पण त्या साठी भांडवल अपेक्षित आहे, सरकारच्या लोन मुद्रा या योजने बद्दल काही ठाऊक असल्यास मार्गदर्शन करावे.
याद्या
4478
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा! स्वतंत्र व्यवसायासाठी
भावना, मनापासून अभिनंदन! खूप
अभिनंदन भावना!
माझ्या दुकानावर पुरेशी लाईट
स्वतंत्र व्यवसाय सुरु
कारच्या बॅटरी ऐवजी इन्व्हर्टर
माझी गाडी जिथे लागते तिथे
In reply to कारच्या बॅटरी ऐवजी इन्व्हर्टर by अमर विश्वास
गेल्या उन्हाळ्यात मी
In reply to माझी गाडी जिथे लागते तिथे by भावना कल्लोळ
बॅटरी तर चांगला पर्याय आहेच.
कार बॅटरी हा पर्याय डोक्यात
व्यवसायासाठी उत्तमोत्तम
मी माझ्या गच्चीवर night-club
साहना तुमच्या
In reply to मी माझ्या गच्चीवर night-club by साहना
धाडसाचे ,मिपावर लिहिण्याचे
हे असे लॅम्प कुठे मिळतील ?
In reply to धाडसाचे ,मिपावर लिहिण्याचे by कंजूस
लोहार चाळ मध्ये सहज मिळतील.
In reply to हे असे लॅम्प कुठे मिळतील ? by भावना कल्लोळ
रस्त्यावर मोबाइल कवर
In reply to हे असे लॅम्प कुठे मिळतील ? by भावना कल्लोळ
अभिनंदन आणि शुभेच्छा!
खरंच करायला हवा कट्टा.
सहर्ष स्वागत ... पण नॉनव्हेज
In reply to खरंच करायला हवा कट्टा. by अजया
खरंच करायला हवा कट्टा.
सर्वं मिपाकरांचे आभार ..
मदत हवी आहे
हेरंब चाइनीस कॉर्नर
In reply to मदत हवी आहे by स्नेह_म
कधी आलो मुंबईला तर नक्कीच भेट
In reply to हेरंब चाइनीस कॉर्नर by भावना कल्लोळ
भावना