नमस्कार मिपाकरहो!
आज एका वेगळ्या विषयावर लिहितोय, तुमच्या सहकार्याची अपेक्षा करूनच.
हि गोष्ट आहे एका शाळेची, तिचे नाव आहे प्रकट विघ्नेश माध्यमिक विद्यालय. ही शाळा १५ जून २००६ पासून कार्यरत आहे पालघर या आदिवासी जिल्यातील वाडा तालुक्यातील कोंढले गावाजवळील रावतेपाडा या छोट्याश्या पाड्यात. पाचवी ते दहावी या वर्गांमध्ये मिळून एकूण २२६ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. सगळेच्या सगळे आदिवासी पाड्यांमधून पायी येणारे. १० शिक्षक यांना शिकवण्याचे काम करत आहेत तेही कोणतेही वेतन अथवा मानधन न घेता. तसेच ३ शिक्षकेतर कर्मचारीही इथे कुठल्याही मानधनाव्यातिरिक्त काम करत आहेत. शाळेची इमारत म्हणजे केवळ ३ खोल्या आहेत, बाकीचे वर्ग हे इमारतीसमोरील प्रकट विघ्नेश मंदिराच्या दालनांमध्ये भरतात.
हा सगळा प्रपंच इथे मांडण्याचे कारण असेकी हि शाळा विना अनुदानित असून सर्व खर्च प्रकट विघ्नेश मंदिराला मिळणाऱ्या तुटपुंज्या देणग्यान्मधून केला जातो. जो अत्यंत अपुरा आहे.
या शाळेला अनेक भौतिक सुविधांची गरज आहे. जर आपल्यापैकी कोणाची इच्छा असल्यास या सामाजिक उपक्रमाला मदत केल्यास या २२६ मुलांच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडू शकतो.
या दिवाळीमध्ये मी आणि काही मित्रांनी मिळून या शाळेतील मुलांना वह्या, पेन आणि पेन्सिल वाटप केले होते तेव्हा आम्हाला या शाळेच्या गरजा किती प्राथमिक आहेत हे लक्षात आले. हि संस्था आजही मदतीसाठी हाक देत आहे परंतु मदतीचा ओघ हवा तसा येत नाहीये. मी स्वतः या शाळेत असणाऱ्या एकुलत्या एक संगणकाच्या मेंटेनन्सची जबाबदारी उचलणार आहे(अर्थात मी आयटी वाला आहे आणि हि शाळा माझ्या घरापासून ७-८ किमी वर आहे त्यामुळे मला हे सहज शक्य आहे).
तरी, आपणापैकी कोणाची मदत करण्याची इच्छा असल्यास मला ९२२५८४९०३२ या क्रमांकावर किंवा संस्थेतील शिक्षक श्री. अविनाश पवार(९६८९४६६६७४) अथवा संतोष आमले(९१६८७७३१०२) वर संपर्क साधावा (हे तीनही क्रमांक WhatsApp वर कार्यरत आहेत). आपणास आपण केलेल्या मदतीबद्दल रीतसर पावती प्रत्यक्ष अथवा पोस्टाने दिली जाईल याची मी स्वतः ग्वाही देतो.
आपल्या मदतीने या आदिवासी मुलांच्या आयुष्यात एक नवा प्रकाश पडेल एवढे नक्की.
वाचने
9244
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
काश्याप्रकारची मदत अपेक्षित
धन्यवाद!
In reply to काश्याप्रकारची मदत अपेक्षित by सुखी
माझ्याकडे एक संगणक (D-core),
In reply to धन्यवाद! by इरसाल कार्टं
aapan पुणेकर असाल तर
In reply to माझ्याकडे एक संगणक (D-core), by निओ१
नक्कीच. कशा प्रकारची मदत
अरे हां. हा प्रतिसाद बघितलाच
In reply to नक्कीच. कशा प्रकारची मदत by एस
धन्यवाद,
डिस्क्लेमर
In reply to धन्यवाद, by इरसाल कार्टं
तुम्हाला आज उद्याकडे संपर्क
व्यनी बघा प्लीज.
पुणेकरांसाठी...
ह्या २२६ मुलांकडे दप्तर
२२६ मिपाकरांनी फक्त १०० रुपये गोळा केले तर
In reply to ह्या २२६ मुलांकडे दप्तर by संदीप डांगे
काहींकडे आहेत
नेमका आकडा सांगा किती लागतील.
In reply to काहींकडे आहेत by इरसाल कार्टं
दप्तरांऐवजी
कोणती पुस्तके लागतील? साहित्य
In reply to दप्तरांऐवजी by इरसाल कार्टं
अवश्य!
उत्तम उपक्रम ..
संध्याकाळी ७ पर्यंत
यादीची वाट पाहतोय.
धागाकर्त्यांशी बोलो आहे
यादी(लांबलचक)
वरील यादीतल्या वस्तूंच्या
हे मात्र मलाही माहित नाही.
In reply to वरील यादीतल्या वस्तूंच्या by संदीप डांगे
इंडिया मार्ट..?
मिळतायत का विक्रेते?
प्रयोगशाळा साहित्य मिळाले का?
In reply to मिळतायत का विक्रेते? by इरसाल कार्टं
प्रयोगशाळा साहित्य मिळालेले नाही.
लोकांच्या नजरेसमोर राहावा
धन्यवाद!
In reply to लोकांच्या नजरेसमोर राहावा by सुबोध खरे
सर नका म्हणूं हो..!