घरी इतर मेंबर्सकडे स्मार्टफोन आहेत, मी स्वत:तरी टचस्क्रीन नको म्हणून आत्तापर्यंत अभिमानाने २जीच वापरत आलो. मोदी साहेबांच्या कॅशलेस लेसकॅश पॉलीसीने मोबाईल बँकींग आवश्यक केल्यामुळे नवा स्मार्टफोन घेण्याचा मानस आहे. -मुख्यत्वे नॅशनलाइज्ड बँकांच्या अॅप्स वापराव्यात असा मानस आहे. अगदीच अडल्यास पेटीएम वापरता आले पाहिजे. कृपया मला स्मार्ट फोन सुचवून हवा आहे.
१) मोबाईल बँकींगसाठी -हॅकींग आणि व्हायरस टाळण्याच्या दृष्टीने सुरक्षीत असावा.
२) २ सिम वापरता आल्यास बरे
३) सर्वप्रकारच्या स्पॅम कंट्रोलसाठी -नको असलेली छायाचित्रे आणि व्हीडिओ टाळण्यास- सुलभ असल्यास बरे
४) प्रॉडक्ट डेमोच्या देण्याच्या दृष्टीने फोटो आणि युट्यूब स्टोअर करून दाखवणे सुलभ असल्यास बरे
सोबतच गूगल डॉक्सचे आणि जमल्यास मासॉचे पॉवरपाँइटही वापरता आल्यास बरे
५) जुन्या गाण्यांचे २-४ युट्यूब स्टोअर करणे पुरेसे मनोरंजन आणि गाणी या उद्देशाचा वापर फारसा नाही.
६) फोन नंबर्स सेव्ह करण्याची सुविधा चांगली आणि भरपूर हवी.
७) मी गुगल डॉक्स /गूगल ड्राईव्ह बर्यापैकी वापरतो
८) सोशल नेटवर्कींग मध्ये व्हॉट्स अप व्यावसायिक उद्देशाने वापरेन, इतर सोशल नेटवर्कींग मोबाईल वरून वापरले जाण्याची
शक्यता कमी
९) मराठी वाचन आणि युनिकोड टंकन (मुख्यत्वे मिपा आणि मराठी विकिपीडिया) नीट जमावयास हवे.
१०) फाँट साईज वाढवता आल्यास बरे
११) २ जी मोबाईलात असते तसे सायलेंट /मिटींग इत्यादी प्रोफाईल निवडता आल्यास किंवा अॅडजस्ट करता आल्यास बरे कारण घरी सध्या असलेल्या स्मार्ट फोनात ती सुविधा दिसत नाहीए.
१२) छायाचित्र रिझोल्यूशन खूप महत्वाचे नाही पण बरे असल्यास बरे
१३) डाटा वापर जास्त वेळ पण टेक्स्ट अधिक, तेव्हा टेक्स्ट शिवाय इतर डाऊनलोड बंद करुन ठेवण्याची सुविधा असल्यास बरे- ३जी मुळे डाटा युसेज कमी रहात असेल आणि सेव्हींग होत असेल तर ३जी पण चालेल.
१४) आवश्यक नाही पण पेन ड्राईव्ह लावता आल्यास बरे
१५) बजेट प्रिफरेबली रु ८००० /- च्या आत १०,००० /- पेक्षा अधिक नको
१६) कुठून विकत घ्यावा ऑनलाईन की दुकानातून तसेच मेंटेनन्स-वॉरंटीसाठी कोणता फोन चांगला इत्यादी माहिती सुद्धा मिळाळ्यास बरे.
सुचवण्यांसाठी धन्यवाद
वर्गीकरण
याद्या
8052
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
७)मी गुगल डॉक्स /गूगल
हे घ्या. यातला कुठलाही निवडा.
redmi note 3
एक नंबर !
In reply to redmi note 3 by लालगरूड
मला रेड मी - ३ एस वाटला !
In reply to एक नंबर ! by संजय क्षीरसागर
तुम्ही पण घेतला की काय ?
In reply to मला रेड मी - ३ एस वाटला ! by संजय क्षीरसागर
येस. कामासाठी लँडलाईन सारखा वापरतो!
In reply to तुम्ही पण घेतला की काय ? by कुंदन
विंडोज फोन घ्या. कळकट मळकट
*लुमिआ ५३०* - गोरिला ग्रास
आता अभ्यास आरंभतो, Quora वर
विंडोज इज द वे.
अँड्रॉईड फोन्स सिक्युरिटीला
होय।
:(
In reply to होय। by कंजूस
दावा करत नाही, पण विंडोज नाही
In reply to :( by पैसा
पहिल्यांदा "इति सत्या नाडलेला
In reply to होय। by कंजूस
लुमिया मराठी सपोर्ट करत का?
असावा
In reply to लुमिया मराठी सपोर्ट करत का? by लालगरूड
विंडोजचाच देवनागरी कीबोर्ड
In reply to लुमिया मराठी सपोर्ट करत का? by लालगरूड
विंडोज फोन मुळीच घेऊ नका.
खरं सांगायचं तर लुमियात नेटिव
भारतात कुठेही फिरलात तर स्टेट
रूट केलेल्या मोबाईल मध्ये बँकिंग अँप्स वापराने सुरक्षित आहे का?
कुठलेही बँकिंग अॅप अ
In reply to रूट केलेल्या मोबाईल मध्ये बँकिंग अँप्स वापराने सुरक्षित आहे का? by Ranjeet Pal
म्हणजे android अॅप देणारे
In reply to कुठलेही बँकिंग अॅप अ by नितिन थत्ते
रूट केलेल्या मोबाईल मध्ये बँकिंग अँप्स वापराने सुरक्षित आहे का?
सिक्युअर्ड अॅन्ड्रॉइड
- ब्लॅकबेरी प्रिव्ह
- डिटेक ५०
- डिटेक ६०
मी गेल्या अनेक वर्षांपासून ब्लॅकबेरी १० फोन वापरत आहे. प्रसिद्ध अॅप्सची अनुपलब्धता असली तरी डेटा सिक्युरिटीबाबत नेहमीच आश्वस्त वाटले आहे. बादवे ब्लॅकबेरी १० च्या अॅपवर्ल्डमध्ये पेटिएम अॅप उपलब्ध आहे.कोणताही android फोन सुरक्षित नसतो
redmi note 3, moto e3 power
इतके सगळे मुद्दे घेतले आहेत
मंजिल अजून दूर आहे तर .. :(
In reply to इतके सगळे मुद्दे घेतले आहेत by कंजूस
Redmi 3s Prime घ्या...
Redmi 3s Prime घ्या...
Redmi 3s Prime घ्या...
720 p snapdragon 430 .10000
In reply to Redmi 3s Prime घ्या... by DeepakMali
रेडमी नोट३, ३एस प्राइम यात
In reply to 720 p snapdragon 430 .10000 by लालगरूड
सवलतीच्या दरात मिळेल.
हम्म कदाचित ! बायोमेट्रीक +
In reply to सवलतीच्या दरात मिळेल. by कलंत्री
oneplus 3 कसा आहे ?
कुठलाही फोन घ्या, Wifi वापरुन
Coolpad फोन्सचा कुणाला अनुभव आहे का ?