बाहेर करायच्या उठाठेवी
नमस्कार मिपाकर्स आणि पाककृतीतले मान्यवर लेखक/लेखिका! __/\__
घरात किचनमध्ये करायच्या लुडबुडी सोडून जेव्हा बाहेर कॅम्पिंग वगैरे ठिकाणी जेवण बनवायची वेळ येते तेव्हा खूपच लिमिटेड पर्याय उपलब्ध असतात किंवा मांसाहारी पदार्थ सोडल्यास पर्याय सामान्य असतात असे माझे मत आहे. तेव्हा बाहेर करता येण्यासारख्या खास चविष्ट पाककृती (दोन्ही शाकाहारी/मांसाहारी) जर इथे प्रतिसादातून देता आल्या तर मी तुमचे उपकार आजन्म विसरणार नाही, नव्हे, बाहेर स्वयंपाक करून खाताना एक घास तुमच्या नावे बाजूला काढून ठेवेन.
लक्षात घ्या, बाहेर करायच्या उठाठेवी म्हटलं की त्या पाककृती कमीत कमी साधन आणि साहित्य वापरून करता येण्याजोग्या असाव्यात!
इथे मी गेल्या दोन शनिवारी आमच्या सोसायटीच्या बाहेर मोकळ्या जागेत मी केलेल्या उठाठेवी थोडक्यात लिहीत आहे.
तर दि. २६/११/२०१६ रोजी केलेली ही सक्सेसफुल्ल आणि चवदार उठाठेव नंबर १!
भाजलेले मासे!
साहित्य :
१) ३-१/२ कि. मासे (आम्ही बांगडा आणलेला) (२० लोकांसाठी)
२) १ पाकीट एव्हरेस्ट लाल तिखट
३) मीठ चवीनुसार
४) मासे मावतील इतक्या नारळांच्या(शहाळ) करवंट्या (इथे ९ लागलेल्या)
५) आगीसाठी लाकडे व इतर लागणारे साहित्य (अंदाजे १० कि.)
कृती:
१)मासे स्वच्छ करून त्यात मीठ मिसळलेले लाल तिखट आत कोंबावे व माशांना बाहेरून चिरा पडून त्यातही कोंबावे.
२) ते सर्व मासे करवंट्यात कोंबावे.
३) त्या सर्व करवंट्या साधारण अर्धा ते पाऊण तास आगीत सोडून द्याव्यात.
४) नंतर ते सर्व मासे खूप आटापिटा करून करवंट्यातून काढून खाऊन फस्त करावेत!
५) झालं की! :)
मंडळी तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, मासे हाताळण्याचा शून्य अनुभव असताना मासे भाजण्याची जबाबदारी आमच्या सोसायटीच्या मंडळींनी माझ्यावर सोपवली होती. अर्थात, याआधी माझ्या हातचं खाऊन माहीत असल्यामुळेच! आणि ती मी यशस्वीपणे पार पाडली याचा मला अभिमान आहे! :)
या पाककृतीचे काही फोटोज! (अतिसामान्य फोटोज गोड मानून घ्यावेत ही नम्र विनंती)
************************************************************************************
दि. ३/१२/२०१६ रोजी केलेली ही सक्सेसफुल्ल आणि खरपूस उठाठेव नंबर 2!
बटाट्याची हंडी(हे खेड/राजगुरूनगर भागातील प्रचलित नाव आहे या पदार्थासाठी)
साहित्य :
१) १५ कि. ताजे/नवे (कंपल्सरी) बटाटे (२५-३० लोकांसाठी)
२) १-१/२ पाकीट एव्हरेस्ट लाल तिखट
३) मीठ चवीनुसार
४) दोन मोठ्या आकाराचे माठ
५) आगीसाठी लाकडे व इतर लागणारे साहित्य (अंदाजे १५ कि. व २० गोवऱ्या)
कृती:
१)बटाटे स्वच्छ करून त्यात रस्त्यात पेरू विकणारे विक्रेते जसे मीठ व मसाला भारतात तसा मसाला मीठ मिसळून भुरभुरावा.
२) ते सर्व बटाटे माठात भरून माठाच्या तोंडाशी हरबऱ्याची डहाळी लावावी जेणेकरून बटाटे माठ उलटा केल्यावर सांडणार नाहीत.
३) माठ १/४ जाईल इतका खडडा करून त्यात माठ उलटा करून ठेवावा.
४) बाजूने गोवऱ्या व लाकडे रचून आग लावावी व एक तासाने अथवा माठ लालेलाल झाला की लाकडे-गोवऱ्या बाजूला करून माठ बाजूला काढावा.
५) झालं की! आता लागा खरपूस भाजलेले बटाटे खायला!
या पाककृतीचे काही फोटोज! (अतिसामान्य फोटोज गोड मानून घ्यावेत ही नम्र विनंती)
आशा आहे मिपाकरांकडूनही या अशा चवदार/खरपूस उठाठेवींमध्ये भर पडेल!
वाट पाहत आहे!
- संदीप चांदणे

वाचने
20639
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
_/"\_
In reply to _/"\_ by जव्हेरगंज
__/"\__
तोंपासु!
ओ... काय हे..? नारळातले मासे
In reply to ओ... काय हे..? नारळातले मासे by मोदक
नाही तर काय??????? अरे जीव
अर्रर्रर्र
In reply to अर्रर्रर्र by वरुण मोहिते
धन्यवाद
पनीरही वापरून पाहा
In reply to पनीरही वापरून पाहा by सुधांशुनूलकर
___/\___
पोपटी
In reply to पोपटी by कपिलमुनी
ये पोपटी क्या है?
In reply to ये पोपटी क्या है? by चांदणे संदीप
पोपटी
In reply to पोपटी by vcdatrange
भांबुर्ड्याच्या पाल्याचा
In reply to भांबुर्ड्याच्या पाल्याचा by आनंदी गोपाळ
हे पहा
In reply to हे पहा by रुस्तम
हं.
In reply to भांबुर्ड्याच्या पाल्याचा by आनंदी गोपाळ
वालांच्या पोपटीसाठी
In reply to वालांच्या पोपटीसाठी by डॉ सुहास म्हात्रे
सहमत
In reply to सहमत by रुस्तम
+१०००
In reply to +१००० by अजया
:(
In reply to पोपटी by vcdatrange
+१
In reply to पोपटी by vcdatrange
पोपटीच्या दाण्यांबरोबर खायला
In reply to पोपटी by vcdatrange
पोपटी साठी धन्यवाद!!
न राहवून दिलेला प्रतिसाद.
आमचे असे खुल्यावरचे
In reply to आमचे असे खुल्यावरचे by कैलासवासी सोन्याबापु
बापूसाहेब!
असे जीवघेणे पदार्थ मिपाकट्टा
In reply to असे जीवघेणे पदार्थ मिपाकट्टा by डॉ सुहास म्हात्रे
एक्काकाका...
अरेरे,
मस्त....
अजून
In reply to अजून by चांदणे संदीप
हॉटेलात जाऊन खाणे ही सर्वात
In reply to हॉटेलात जाऊन खाणे ही सर्वात by रातराणी
वाईट्ट!
तोंपासु
अवांतर : भांबुर्डीचा पाला
In reply to अवांतर : भांबुर्डीचा पाला by गामा पैलवान
लहानपणी
ऑल टाइम हिट : दुवा
In reply to ऑल टाइम हिट : दुवा by राही
फुफाटी-पोपटी
In reply to फुफाटी-पोपटी by राही
धन्यवाद!