(गेल्या काही दिवसांपासून कमरेचे जुणे दुखणे वाढल्यामुळे, टंकन करणे संभव होत नव्हते, पण आज सकाळी राहवले नाही, एवढे सर्व समोर घडत असताना डोक्यात सुपीक विचार येणारच).
सध्या सौ. बाहेर गावी अर्थात महाराष्ट्रात सॉरी विदर्भात गेलेली आहे. डोक्यावरचे केस पांढरे झाले असले तरीही या वयात मजबूरी में पुन्हा एकदा लाईनीत उभे राहण्याची वेळ आली. शांतपणे बँकेच्या लाईनीत उभा झालो. बँकेच्या लाईनीत उभे असलेले अनेक तरुण जीव अधीर आणि तणावग्रस्त दिसले. बहुतेक त्यांची रांगेत उभे राहण्याची पहलीच वेळ असेल. बालपणाचे राशनच्या लाईनीतले किस्से सांगून त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करू लागलो. त्या काळी वडिलांचा पगार बहुतेक २०० रुपयांचा जवळपास होता. दुकानात राशन नसले तरी राशन येण्याची वाट पाहत दोन-दोन, तीन-तीन दिवस लाईनीत आपली जागा रोखून उभे राहावे लागायचे. अर्थातच आम्ही सर्व भावंडे आळीपाळीने लाईनीत उभे रहायचो. राशन आल्यावर नेहमीच भांडणे इत्यादी व्हायचची. शेवटी महाभारताचे युद्ध जिंकून निकृष्ट दर्जेचा भरपूर कचरा असलेला गहू किंवा मिलो मिळायचा. पण काहीही म्हणा पोटाची खळगी मात्र भरायची. हे वेगळे नवी पिढीच्या लोकांना हे किस्से कपोल कल्पना वाटत असतील. तरीही त्यांचे भरपूर मनोरंजन तर झालेच असेल आणि लाईनीत उभे राहण्याचा काही तणाव काही अंशी कमी झाला असेल.
अखेर काही तासांनी २००० रुपयांची नवी कोरी नोट घेऊन गल्लीतल्या वाण्याच्या दुकानात गेलो. तिथे चक्की फ्रेश आटा होता, मिलचा आटा होता, विदेशी आटा होता, पांढरा शुभ्र आटा होता, भुरे रंग का स्वदेशी आटा होता, विटामिन वाला आटा होता, नौ अनाज वाला बाबाजींचा पोष्टिक आटा हि होता. नव्हते फक्त सुट्टे. अखेर आटा न घेता रिकाम्या हाताने घरी परतलो.
घरी येऊन कधी नव्या कोर्या २००० हजारच्या नोट कडे बघितल तर कधी बँकेच्या पासबुक कडे. कधी नव्हे ते, महिन्या अखेर खात्यात भरपूर रक्कम दिसत होती. श्रीमंत होण्याची जाणीव झाली. आजीने सांगितलेली एक कहाणी आठवली. एकदा एका दरिद्री माणसाने नदी काठावर लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्यासाठी तपस्या सुरु केली. अखेर लक्ष्मीदेवी प्रसन्न झाली. ज्या वस्तूला तो स्पर्श करेल ती सोन्याची होईल, असा वर त्याला दिला. त्या माणसाने डोळे उघडून एका दगडाला स्पर्श केला. तो दगड तत्क्षणी सोन्याचा झाला. युरेका युरेका म्हणत तो आनंदाने उड्या मारत घरी पोहचला आणि बायकोला समोर पाहताच जवळ जवळ ओरडलाच अग ये, लक्ष्मी देवी प्रसन्न झाली आपण श्रीमंत झालो आणि आनंदाने बायकोला मिठी मारली. दुसर्याच क्षणी त्याला कळले मिठीत बायको नाही, अपितु तिची सोन्याची मूर्ती आहे. वेड्या सारखा तो सर्वत्र हात लावत सुटला. त्याचे जग सोन्याचे झाले होते. एक भयाण सत्य समोर आले. अन्न पाण्याविना तो तडफडत मरणार होता. असो.
रात्री फ्रीज उघडून थंडगार पाणी प्यालो. बेडरूम मध्ये जाऊन AC सुरु केला. मखमली बिछान्यावर झोपण्याचा प्रयत्न करत गुणगुणू लागलो:
स्वामी तिन्ही जगाचा
आट्या बिना उपाशी.
टीप: घरी मेक इन महाराष्ट्र आटा चक्की आहे. तरीही कधी कधी बाजारातून आटा आणावेच लागतो. पुरोगाम्यानो प्रसन्न होऊ नका, अस्मादिक पक्के देशभक्त आहोत. गोष्ट वाचल्यावर भारत माता कि जय आणि वंदे मातरम अवश्य म्हणावे.
वाचने
4224
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
तिथे सुपरमार्केट नाहीत जी
आणि जर त्या दुकानदाराकडे
In reply to तिथे सुपरमार्केट नाहीत जी by टवाळ कार्टा
हा दुकानदार पुण्याचा आहे का हो ?
In reply to आणि जर त्या दुकानदाराकडे by टवाळ कार्टा
अरे!
माफ करा पण या धाग्याचा एकमेव
+१११११
In reply to माफ करा पण या धाग्याचा एकमेव by मृत्युन्जय
बहुतेक तरुणांची पहिलीच वेळ
कहानीमे कुछ दम दिख्या नही.
तुम्ही राहात असलेल्या
दिल्लीसारख्या शहरात राहून,
सहमत आहे!
In reply to दिल्लीसारख्या शहरात राहून, by राजेश घासकडवी
गुरुजी जाउद्या. अधिकांश
In reply to दिल्लीसारख्या शहरात राहून, by राजेश घासकडवी
स्वामी तिन्ही जगाचा
स्वामी तिन्ही जगाचा आट्या बिना उपाशी.असं म्हणून... पटाईतकाकांनी त्यांची नेहमीची मोदींची बाजू सोडून, विनोदासाठी का होईना, रु२००च्या नोटेने त्यांची झालेली अडचण सांगून, एक प्रकारे मोदीविरोधकांची बाजू घेतली आहे. तरीही, केवळ काकांचा मुद्दा आहे म्हणून डिमॉनेटायझेशनचे विरोधक त्यांना विरोध करताना पाहून मजा वाटली ! अरेरे, असे असतात काय, "माणूस न बघता, केवळ मुद्दे बघून मारलेले गुद्दे ?!" ;) :) =)) =)) =)) (हे खरे असले तरीही, मुळात हा धागा विनोदी आहे तेव्हा सर्वांनीच हघ्या ;) )पटाईत काका, तुमची गोष्ट खरी
आता नाहीच मिळत आटा तर जाऊ
विवेक पटाईतांचा आटा बिना उपाशी
नोटा रद्द करण्याची नमो युक्ती
In reply to विवेक पटाईतांचा आटा बिना उपाशी by लीना कनाटा
पटाईत काका,
In reply to नोटा रद्द करण्याची नमो युक्ती by विवेकपटाईत
पटाईत काका
दिल्लीत पण भर डिसेंबर मध्ये