Skip to main content

मराठा मोर्चा भाग 2

लेखक वाल्मिक यांनी सोमवार, 26/09/2016 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
मागील धागा मूळ उद्देशातून भटकला म्हणून परत काही प्रश्न 1) खरंच सध्याचा मोर्चा उत्स्फूर्त आहे का ? कोणत्याही नेतृत्वाशिवाय एवढे लोक जमणे शक्य आहे का ? 2) अदृश्य हात असेल तर कोणाचा ? 3) झेंडे ,फलके ह्यावर कोणी खर्च केला ? 4) जर नेतृत्व नाहीये तर अमुक तमुक ठिकाणी भेटायचे हे कसे ठरले ? 5) कसाब ला फाशी नेमक्याच वेळी झाली तसे उरण मध्ये ह्याचवेळी अतिरेकी आले हे शक्यता असू शकत का ? मुख्य 6) अमेरिकेचे प्रगती आरक्षण नसल्यामुळे झाली का ? जगात किती देशांमध्ये आरक्षण आहे ? https://goo.gl/YXEbrt

वाचने 100562
प्रतिक्रिया 363

प्रतिक्रिया

In reply to by शाम भागवत

ती मुलाखत काही दिवसांपूर्वीच एका वाहिनीवर पाहिलेली आहे. मराठ्यांना सध्याच्या कायद्यानुसार राखीव जागा देता येणार नाहीत व मराठे हे मागासवर्गीय आहेत हे सिद्ध करता येणार नाही हे न्यायमूर्ती सावंतांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

In reply to by शाम भागवत

त्यापेक्षा याच धाग्यावर पान २वर झालेली माझी आणि श्रीगुरुजींची चर्चा वाचा. मराठा शिक्षणसंस्थांना पुर्ण खाजगीकरणाचा पर्याय उपलब्ध आहे. त्यांचा वापर त्यांनी करावा.

In reply to by एमी

त्यापेक्षा याच धाग्यावर पान २वर झालेली माझी आणि श्रीगुरुजींची चर्चा वाचा. मराठा शिक्षणसंस्थांना पुर्ण खाजगीकरणाचा पर्याय उपलब्ध आहे. त्यांचा वापर त्यांनी करावा.
पुणे शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचा विचार केला तर खालील प्रमाणे प्राधान्यक्रम दिसतो. १) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय २) एम आय टी (पौड रस्ता) ३) पी आय सी टी ४) व्हि आय टी व व्हि आय आय टी ५) पुणे विद्यार्थी गृह ६) सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालये (वडगाव, कोंढवा) ७) ए आय एस एस एम एस, भारती विद्यापीठ, जयवंतराव सावंत ८) डी वाय पाटील सर्व महाविद्यालयात सीईटीच्या गुणांनुसारच प्रवेश मिळतो. सर्व महाविद्यालयात जातींवर आधारीत ५२% जागा राखीव आहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय वगळता उर्वरीत सर्व महाविद्यालयात २०% जागा व्यवस्थापन कोट्यातून भरल्या जातात व उर्वरीत ८०% जागा सीईटीतील गुण व जातवार आरक्षण यानुसार भरल्या जातात. सर्व महाविद्यालयातील ३०% जागा मुलींसाठी राखीव आहेत (या जागातही ५२% जागा जातीवर आरक्षित आहेत). समजा यातील मराठा शिक्षणसंस्थांनी (सिंहगड, भारती, जयवंतराव सावंत, डी वाय पाटील) संपूर्ण खाजगीकरणाचा पर्याय स्वीकारला तर ५२% राखीव जागा सोडून उर्वरीत २८% जागा फक्त मराठा जातीतूनच भरता येतील (२०% व्यवस्थापन कोटा अबाधित राहील). परंतु अशा महाविद्यालयात कॅम्पस् प्लेसमेंट साठी कंपन्या येतीलच अशी खात्री नाही कारण अनारक्षित जागेवरील विद्यार्थी हे जात बघूनच घेतले गेले असतील. तसेच अशा जातीवर आधारीत महाविद्यालयांना मिळालेली सरकारी परवानगी अबाधित राहील का याची खात्री नाही.

In reply to by श्रीगुरुजी

फक्त पुणे शहरातील टॉप अभियांत्रिकी महाविद्यालयांचा विचार का करताय? माझ्याकडे जुनं DTE आहे त्यावरुन महाराष्ट्रात एकुण १५०च्या आसपास इंकॉ आहेत. कॉलेजच्या किंवा संस्थेच्या नावावरुन साधारण अंदाज केला तर जैन आणि मराठा डॉमीनन्स जाणवला. नेमके किती ते त्या क्षेत्रातल्या महत्वाच्या व्यक्ती/सनदी अधिकारी/राजकारण्यांकडून मिळू शकेल. === बादवे ५२% जागा राखीव नाहीत. राखीव ५०% च आहेत. पहिल्या राउंडमधे त्यातल्या काही रिकाम्या राहिल्या तर त्या रिकाम्या जागांपैकी २% जागा SBC जातीतल्यांना मिळतील. बाकीच्या रिकाम्या जागा दुसर्या फेरीत क्यारी फॉरवर्ड होतील. === परंतु अशा महाविद्यालयात कॅम्पस् प्लेसमेंट साठी कंपन्या येतीलच अशी खात्री नाही कारण अनारक्षित जागेवरील विद्यार्थी हे जात बघूनच घेतले गेले असतील. >> फक्त जात नाही; जात+गुणवत्ता. कॉलेजनी क्वालिटी मेंटेन केली तर कंपन्यांना काही तक्रार नसेल असे वाटते. === तसेच अशा जातीवर आधारीत महाविद्यालयांना मिळालेली सरकारी परवानगी अबाधित राहील का याची खात्री नाही. >> सरकारी परवानगीची गरजच नाही. किंवा राखीव जागा ठेवायची कंडीशन ट्रेड करता येइल अक्रेडेशनच्या बदल्यात.

In reply to by श्रीगुरुजी

हा हा :-D २३०+ पैकी १५- प्रतिसाद माझे आहेत. === आमची एक बिहारी मैत्रिण म्हणायची "आमच्या गावात असं म्हणतात की एक साप आणि एक भूमिहार दिसला तर आधी भूमिहारला मारायचं". ती कायस्थ होती. आता हे दोघेही काय जात/वर्ण माहीत नाही. पण एकंदर मराठा-ब्राह्मणचं नातंपण साधारण तसंच दिसतंय ;-). बघा ना अँटीभाजप/हिंदुत्व/भांडवलशाही लोकंपण मराठ्यांबद्दल बोलताना त्यांच्या नेहमीच्या प्रोकाँग्रेस, निधर्मांध, डाव्या विचारांच्या अगदी विरोधी स्टँड घ्यायला लागली. त्यांचा जिव्हाळ्याचा 'अल्पभूधारक शेतकरी'पण त्यांना दिसेना. मज्जाय एकुणच :-D बादवे इट वॉज मच बेटर टू इंटरएक्ट विथ यू द्यान विथ देम :-)

म्हणजे मराठ्यांच्या राखीव जागा मागणीच्या विरूद्ध बोलणे, आपण (सुद्धा) मागासलेले आहोत हा त्यांचा दावा खोडणे, आपण (सुद्धा) गरीब आहोत या त्यांच्या दाव्याला विरोध करणे म्हणजे अँटी भाजप/हिंदुत्व/भांडवलशाही मंडळींनी आपल्या नेहमीच्या प्रोकाँग्रेस, निधर्मांध, डाव्या विचारांच्या अगदी विरोधी स्टँड घेणे.

In reply to by श्रीगुरुजी

मराठ्यांच्या राखीव जागा मागणीच्या विरूद्ध बोलणे, आपण (सुद्धा) मागासलेले आहोत हा त्यांचा दावा खोडणे, आपण (सुद्धा) गरीब आहोत या त्यांच्या दाव्याला विरोध करणे >> तो धागा वाचा हो आधी. वरीलपैकी एकही गोष्ट तिथे झाली नाहीय. याच्यामागे पवार आहेत आणि ब्राह्मण कसे चानचान, मराठा कसे मागासलेले हेच बोलतायत ते तिथे.

In reply to by एमी

मराठ्यांच्या राखीव जागा मागणीच्या विरूद्ध बोलणे, आपण (सुद्धा) मागासलेले आहोत हा त्यांचा दावा खोडणे, आपण (सुद्धा) गरीब आहोत या त्यांच्या दाव्याला विरोध करणे >> तो धागा वाचा हो आधी. वरीलपैकी एकही गोष्ट तिथे झाली नाहीय. याच्यामागे पवार आहेत आणि ब्राह्मण कसे चानचान, मराठा कसे मागासलेले हेच बोलतायत ते तिथे.
तिथे २००+ प्रतिसाद आहेत. याच्यामागे पवार आहेत आणि ब्राह्मण कसे चानचान, मराठा कसे मागासलेले असं फारच थोड्या प्रतिसादात असावं. अनेक प्रतिसाद मोर्चे शांतपणे सुरू आहेत याचे कौतुक करताना दिसले. मोर्चामागे नक्की कोण असावं, मोर्चामागचे नक्की उद्देश काय असावेत, मोर्चातील मागण्या खरोखर पूर्ण होण्याची शक्यता कितपत आहे याच प्रमुख मुद्द्यांवर प्रतिसादकांनी स्वतःची वेगवेगळी मते मांडलेली आहेत. सर्व २००+ प्रतिसादात फक्त ठराविक मुद्द्यांवरच लिहिले गेले नसून अनेक वेगवेगळे मुद्दे प्रतिसादातून आले आहेत.

In reply to by एमी

अॅमी, अमेय तिरोडकरांचा लेख वाचला. हे विधान महत्त्वाचं वाटलं :
आणि मराठा कुणबी नेत्यांनी आपली घराणेशाही काँग्रेसी परंपरेमध्येच उभी केल्यामुळे त्याला आव्हान देणारा गरीब मराठयांचा वर्ग कसा आपसूकच हिंदुत्ववादी शक्तींच्या हातात गेला, हे सगळं या मोर्चांमध्ये उठलेल्या लाखो मराठा तरुण-तरुणींना समजावून सांगण्याची गरज आहे.
लेखक हिंदुत्वविरोधी आहे हे स्पष्ट आहे. आता आपल्या विरोधी मतांचा व्यवस्थित अभ्यास करायला हवा ना? तो त्यांनी केलेला नाही. हे विधानच पहा :
देशात उग्र हिंदुत्वाची दुसरी लाट आलीय. रोजच्या रोज नवनवे धार्मिक मुद्दे उकरून काढून ती जिवंत ठेवली जातेय.
हिंदुत्वाच्या लाटेचं हेच जर आकलन असेल तर लेखकाने लेखात उल्लेखलेला चष्मा त्याच्या स्वत:च्याच डोळ्यावरचा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by एमी

मराठा मोर्चा परत सुरू होणारेत का? का नोटाबंदीमुळे सगळंच थंडावलं? मुंबई व दिल्लीतील प्रस्तावित मराठा मोर्चे बारगळले दिसताहेत. मराठा मोर्चाचा राजकीय पक्षांवर फारसा परीणाम झालेला दिसत नाही. शिवसेनेचे कार्टुन प्रकरण पेटविण्याचा प्रयत्न होऊनसुद्धा सेनेच्या जागा २०११ च्या तुलनेत वाढलेल्याच आहेत. भाजप सत्ताधारी असूनही भाजप तर सर्वात मोठा पक्ष ठरलाय. मराठा मोर्चांना जोरदार पाठिंबा देऊनही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा २०११ च्या तुलनेत घटलेल्या आहेत.

उगाच आठवले ...(सत्यतेबाबत काहीच खात्री नाही.) पेशवाईत राघोबादादा उत्तरेच्या मोहिमेस निघाले. वाटेत रकमेची कमतरता जाणवायला लागली. ईंदोर जवळ होते. अहिल्याबाई काय बाईमाणुस लगेच पैसा मिळणार. राघोबादादांनी ईंदोर जवळ छावणी लावली आणि रकमेसाठी निरोप पाठवला. पण बाई खमक्या आणि हुशार निघाल्या. त्यांनी तयारी धरली आणि निरोप पाठवला. दादा आपली किर्ती आणि शक्ती मोठी. मी पडले बाईमाणुस, आपणाकडुन हरले तरी माझा सन्मान. पण जरका काही उणे अधिक झाले आणि बाजी उलटली, तर मग काय? हा निरोप लागताच राघोबादादा काय ते समजले आणि छावणी उठवली. असे काहीसे मराठा समाजाचे झाले तर? पुढील २०-२५ वर्षे यांना एकही मागणी करणे आणि ती मान्य होणे अशक्य होणार. या निकालात याचे काहीच पडसाद उमटले नसतील तर मग पुढे याचा प्रभाव किती राहणार? मुळात महत्वाचे हे की यांच्या मागण्या व्यवहारिक पातळीवर मान्य होण्याची शक्यता किती? याविषयी मला तर शंकाच आहे. त्यातच मागण्या मान्यतेसाठी मोर्च्याच्या पुढील पायरी बोलणी असेल. त्यात कोण पुढे येते हे पाहणे उत्सुकतेचे असेल. कारण ते एक पर्यायी नेत्रुत्व म्हणुन जागा घेउ शकते. आजच न्या. सावंत या समितीतुन बाहेर पडले आहेत. मुळात या मागण्या सगळ्यांना मान्य होणार्‍या नाहीत. याच्या विपरीत जर ओबीसी, दलित यांनी भाजपाला मतदान केले तर मराठ्यांची अवस्था राघोबादादांसारखी होणार. संभाजी ब्रिगेड आता निवडणुका लढवणार म्हणजे आगीत तेल. यात सगळ्यात मोठे नुकसान मराठा समाजातील आर्थिकद्रुष्ट्या मागासांचे होणार. आज ज्यांनी हे भुत उभारले आहे त्यांची पुढील किमान तीन पिढ्यांची सोय अगोदरच आहे. ते मजेत जगतील. यामुळे भाजपाला पुढची विधानसभा मिळणार असेल तर ते खुशीने ब्रिगेडचा निवडणुक खर्च सहन करतील.