साहित्यः
पहिल्या दिवसाचा चीक दोन वाट्या, साखर दोन वाट्या, वेलची पावडर, दूध दोन वाट्या, केशर, बदामाचे काप.
कृती:
पहिल्या दिवसाचा चीक नुसताच शिट्टी न लावता १५ मिनिटे कुकरला वाफवून घ्यावा. गार झाला की भांड्यातून काढून किसावा. मी अर्धा चीक मिक्सरला फिरवून घेतला. जेवढा चीक असेल तेवढी साखर, चीक आणि दूध कढईत एकत्र करावे.

मध्यम आचेवर मिश्रण ढवळत रहावे. एकजीव झाले की वेलची पावडर आणि केशर मिसळावे.

ताटाला तूप लावावे. मिश्रणाचा गोळा होत आला की ताटात थापावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. हवे असल्यास बदामाचे काप सजावटीसाठी लावावे.

गोडीला कमी हवे असेल तर साखरेचे प्रमाण कमी घ्यावे.
पूर्वी मुंबईकर मंडळींना लगेच चिकाचे दूध पाठवता येत नाही, म्हणून अशा वड्या करून खरवस पोहोचवला जायचा.
प्रतिक्रिया
बरीच कठीण य बै रेसिपी.इथे
चीक नसला तरी दुधात मिल्क
In reply to बरीच कठीण य बै रेसिपी.इथे by त्रिवेणी
हा खरवस नाही
In reply to चीक नसला तरी दुधात मिल्क by विचित्रा
मस्त
जबराट!
काय सुरेख दिसताहेत वड्या !!
पिं चिं मध्ये खरवसाचे दुध कोठे मिळेल ?
In reply to काय सुरेख दिसताहेत वड्या !! by मितान
खरवसाला गूळ दुधात थोडा पुढे हवा
मस्त दिसतायत वड्या
अप्रतिम
चवीबाबत १००% खात्री
In reply to अप्रतिम by दिपक.कुवेत
मस्तच.
वरुन तिसर्या चित्रातला किस
पाकात आहे
In reply to वरुन तिसर्या चित्रातला किस by सूड
सही दिसताहेत :)
तोंपासु.चिक कुठून मिळवायचा
पत्ता देगं
In reply to तोंपासु.चिक कुठून मिळवायचा by अजया
कातिल दिसतायत वड्या.. माझी
तोंपासु.चिक कुठून मिळवायचा
चायनाग्रास बनवून बघा. अगदी
In reply to तोंपासु.चिक कुठून मिळवायचा by सही रे सई
खल्लास!!
जेंव्हा सहजगत्या चीक मिळायचा
खरवस आणि या वड्या
मस्त दिसताहेत वड्या !
नाही गं !
In reply to मस्त दिसताहेत वड्या ! by सस्नेह
वा!
मस्त प्रकार ! अजुन तरी हा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरे गीतों कि में दिवानी...ओ दिलबर जानी.तुने कही और मैंने मानी...ओ दिलबर जानी. :- Prem Geetअजुन काही पर्याय
म्हणून मी सगळा चीक फिरवला नाही.
मस्तच १ न॑बर
वड्या छान दिसतायत
ग्रेट रेसिपी. जेंव्हा चीक