गट्टे के चावल : खास मारवाडी पेशकश
अस्मादिकांचे सासर मारवाड प्रांत राजस्थान येथे असून जातिवंत खवय्ये लोकांचा हा भाग आम्हाला साहजिकच एकदम आवडतो, त्यात जावईबुआ (स्थानिक भाषेत पावणेसा) म्हणजे आम्ही जरा जास्त स्पेशल असतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर नाश्त्याला प्याज कचौरी अन काजूकतली असले मजबूत आयटम ते डिनरला खास मारवाडी गट्टे के चावल अन कढी हे प्रकार व्हाया लंच मध्ये तुपात पोहणारी दलाबाटी-चुरमा, बिकानेरी भुजिया सब्जी, पापड सब्जी असे सगळे असते. मारवाडी + जैन संस्कृती त्यातही १२ महिने कांदा लसूण न खाणारे बहुसंख्य लोक आजूबाजूला असणे ह्यामुळे मारवाडी जेवणात कांदा लसूण अजिबातच नसतो किंवा फार कमी असतो. त्याचा अनुशेष भरून काढायला दुधदुभते भरपूर वापरणे होते. दिवसभरातले हेवी खाणे जिभेला आवडत असले तरी जिभेला आवडणारे अन पोटाला सुद्धा मस्त वाटणारे एक प्रकरण आज आपणासमोर मांडतो आहे. अर्थात लेखक फक्त मी आहे बल्लवकर्म कार्यसिद्धी पूर्णत्वास नेणारी सौ.बापूसाहेब उर्फ आमची मारवाडीण होय (आहे मराठीच ती, पण मारवाड मे पली हुई. इतके सगळे लिहावे लागते, मागं कमरेवर हात ठेऊन उभी आहे मुकादमासारखी ती)
प्रथम एका ताटलीत बेसन घेऊन त्यात अर्धा चमचा तिखट, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ एकत्र करून , त्यात दोन चमचे दही आणि एक चमचा तेलाचे मोहन घालावे. हे सगळे एकत्र मळून त्यात गरजेनुसार पाणी घालून ते बेसन घट्ट मळून घ्यावे. मळून घेतल्यावर त्याच्या लांब लांब वळ्या करून (साधारण अंगठ्या इतक्या जाड) ठेवाव्यात.
आता एका पातेल्यात पाणी गरम करून (अंदाजे लोटाभर) त्याला उकळी फुटल्यावर त्यात तयार गट्टा सुरळी अलगद सोडाव्यात. गट्टा सुरळी आधी पाण्यात बुडतात. त्या पाण्यावर तरंगायला लागल्या की त्या शिजल्या असे समजावे. मग त्या पाण्यातून काढून थोड्या थंड करून त्यांचे बोटाच्या पेरा इतके तुकडे करावेत. हे झाले आपले गट्टे तयार.
आता एका कुकर मध्ये २ चमचे (टेबल स्पुन) तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, तमालपत्र, मसाल्याची वेलची, दालचिनी घालून थोडे परतावे. आता त्यात कापून ठेवलेले गट्टे घालून ते अंदाजे दीड दोन मिनिटे परतावेत. परतणे झाल्यावर त्यात भिजवून ठेवलेले तांदूळ घालावेत. त्यावर हळद, तिखट अन चवीनुसार मीठ घालून नीट परतावे तांदूळ (अंदाजे २ मिनिटे). ते परतून झाल्यावर त्यात गट्टे उकळलेले गरम पाणी दोन वाट्या घालावे. हे महत्वाचे आहे कारण ह्याने एकतर ते पाणी वाया जात नाही अन गट्टे अंगच्या चवीत शिजतात. आपण पाणी गरम घालणार आहोत त्यामुळे कुकरचे झाकण लावून फक्त २ शिट्या घ्याव्यात. जास्त घेतल्यास भात मऊ होऊन पुलाव खराब होऊ शकतो. एक शिटी घेतल्यावर एलपीजी थोडा कमी करावा. अन दुसरी शिटी थोड्या वेळाने घ्यावी.
दुसऱ्या शिटी नंतर कुकर गार होऊन झाकण पडेस्तोवर ठेवावा मग गट्टे के चावल गरमागरम सर्व करावेत.
गट्टे के चावल पारंपारिकरित्या आंबूस अन घट्ट कसुरी मेथी घातलेल्या मारवाडी कढी सोबत खातात. पण वेळ नसल्यास आपण कुठलेही एक रायते, किंवा ताजे फेटलेले घट्ट दही थोडे तिखट मीठ अन जिरेपूड घालून सोबत खायला घेऊ शकता. आम्ही बुंदी चे रायते ठेवले होते.
तर साहित्य खालील प्रमाणे.
१. बासमती तांदूळ – १ वाटी २. बेसन – १ वाटी ३. तेल – ४ टेबलस्पुन ४. दही – २ टेबलस्पुन ५. हळद – १/२ टी-स्पुन ६. तिखट – २ टी-स्पुन ७. जिरे – १ टी-स्पुन फोडणी करता ८. लवंग – ३-४ ९. काळीमिरी- ३-४ १०. दालचिनी- अर्ध्या बोटा इतका एक तुकडा (आमच्याकडे नव्हता) ११. तमालपत्र- १ १२. मसाल्याची वेलची – १ (काळी वेलची) १३. मीठ – चवीनुसार.
प्रथम एका ताटलीत बेसन घेऊन त्यात अर्धा चमचा तिखट, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ एकत्र करून , त्यात दोन चमचे दही आणि एक चमचा तेलाचे मोहन घालावे. हे सगळे एकत्र मळून त्यात गरजेनुसार पाणी घालून ते बेसन घट्ट मळून घ्यावे. मळून घेतल्यावर त्याच्या लांब लांब वळ्या करून (साधारण अंगठ्या इतक्या जाड) ठेवाव्यात.
आता एका पातेल्यात पाणी गरम करून (अंदाजे लोटाभर) त्याला उकळी फुटल्यावर त्यात तयार गट्टा सुरळी अलगद सोडाव्यात. गट्टा सुरळी आधी पाण्यात बुडतात. त्या पाण्यावर तरंगायला लागल्या की त्या शिजल्या असे समजावे. मग त्या पाण्यातून काढून थोड्या थंड करून त्यांचे बोटाच्या पेरा इतके तुकडे करावेत. हे झाले आपले गट्टे तयार.
आता एका कुकर मध्ये २ चमचे (टेबल स्पुन) तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, तमालपत्र, मसाल्याची वेलची, दालचिनी घालून थोडे परतावे. आता त्यात कापून ठेवलेले गट्टे घालून ते अंदाजे दीड दोन मिनिटे परतावेत. परतणे झाल्यावर त्यात भिजवून ठेवलेले तांदूळ घालावेत. त्यावर हळद, तिखट अन चवीनुसार मीठ घालून नीट परतावे तांदूळ (अंदाजे २ मिनिटे). ते परतून झाल्यावर त्यात गट्टे उकळलेले गरम पाणी दोन वाट्या घालावे. हे महत्वाचे आहे कारण ह्याने एकतर ते पाणी वाया जात नाही अन गट्टे अंगच्या चवीत शिजतात. आपण पाणी गरम घालणार आहोत त्यामुळे कुकरचे झाकण लावून फक्त २ शिट्या घ्याव्यात. जास्त घेतल्यास भात मऊ होऊन पुलाव खराब होऊ शकतो. एक शिटी घेतल्यावर एलपीजी थोडा कमी करावा. अन दुसरी शिटी थोड्या वेळाने घ्यावी.
दुसऱ्या शिटी नंतर कुकर गार होऊन झाकण पडेस्तोवर ठेवावा मग गट्टे के चावल गरमागरम सर्व करावेत.
गट्टे के चावल पारंपारिकरित्या आंबूस अन घट्ट कसुरी मेथी घातलेल्या मारवाडी कढी सोबत खातात. पण वेळ नसल्यास आपण कुठलेही एक रायते, किंवा ताजे फेटलेले घट्ट दही थोडे तिखट मीठ अन जिरेपूड घालून सोबत खायला घेऊ शकता. आम्ही बुंदी चे रायते ठेवले होते.
वाचने
29983
वाचनखूण
प्रतिक्रिया
66
फोटो कुणी अपलोड केले आहेत..?
In reply to फोटो कुणी अपलोड केले आहेत..? by मोदक
फ्लिकर खाते काढताना याहू वर
बाप्पू तोंडाले पानी सुटलं ना
In reply to बाप्पू तोंडाले पानी सुटलं ना by महासंग्राम
कवा बी या न देवा. तुमचेच आहे
In reply to कवा बी या न देवा. तुमचेच आहे by कैलासवासी सोन्याबापु
उत्तेरची मोहीम हाती घेतली कि
एकदा उदयपूरला गट्टेची चवदार
In reply to एकदा उदयपूरला गट्टेची चवदार by अप्पा जोगळेकर
गट्टे भाजीला तरी सायास पडतात
भारीच!!
अगं आय गं!
In reply to अगं आय गं! by आदूबाळ
वाह!!!! :)
In reply to वाह!!!! :) by कैलासवासी सोन्याबापु
वाह वाह!
भारी दिसतोय हा प्रकार
In reply to भारी दिसतोय हा प्रकार by नाखु
किती तिखट करायचा ते आपल्यावर
In reply to भारी दिसतोय हा प्रकार by नाखु
घोसाळ्याला गिलक म्हणतो आम्ही
In reply to भारी दिसतोय हा प्रकार by नाखु
काका गट्टे नाव असलेली एक
तोंपासु पाकृ.. फोटो लाजवाब
मस्तं पाकृ !
मस्तं!
छान पाककृती!!! गट्टेकी सब्जी
बापुसाहेबांकडे यायला हवं आता.
बापू,ठरवा बरं कट्टा!
छान पाकृ.
क्या बात क्या बात बापुसाब!!!!
भारी
तोंडाला पाणि सुटले ....
काँपी पेस्ट वाटते हे लिखाण
In reply to काँपी पेस्ट वाटते हे लिखाण by Ram ram
हाहाहा आलात(च) परत?? शोधा
ते कोनतरी बापूनी सेम असंच
ते कोनतरी बापूनी सेम असंच
Hamka mafi dev thakur (bapu)
लै भारी!
स्थानिक गरज
In reply to स्थानिक गरज by रमेश आठवले
केंगरी नव्हे आठवले सर ती
In reply to केंगरी नव्हे आठवले सर ती by कैलासवासी सोन्याबापु
केरच्या बिया या पौष्टिक
In reply to केरच्या बिया या पौष्टिक by रेवती
कल्पना नाही ताय!
धन्यवाद बापूसाहेब
वाह बापू खुप छान रेसिपी आहे.
वा.. मस्त. फोटो छान आलेत.
In reply to वा.. मस्त. फोटो छान आलेत. by रुपी
:)
In reply to :) by रेवती
ताईची रेसिपी वाचली, जिभेला
वाह!
मस्तच बापूसाहेब!
वा वा, कधी खाउन पाहीले नाही
सुरेख प्रेझेन्टेशन ! भाताचे
In reply to सुरेख प्रेझेन्टेशन ! भाताचे by सस्नेह
पुढे मागे टाकू ती रेसिपी
पावणेसा..
क्लास..
मस्तच , कढी गट्टे भरपुर
बाप्पू कधी बोलवतोय मग
In reply to बाप्पू कधी बोलवतोय मग by पिंगू
तू म्हणशील तेव्हा रे भावा!
काल रात्री गट्टे के चावल करून
In reply to काल रात्री गट्टे के चावल करून by गणामास्तर
कांदा घालायची हिंमत आमची झाली
तोंड को पाणी सुट्या
करुन बघितलाच पाहिजे. भात आणि
आयते मिळाले
आहा !
In reply to आहा ! by अनिंद्य
क्या बढ़िया चीज़ याद दिलाई आप
आहा !
कधी ऐकलाच नाही गट्टे प्रकार.
गट्टेका साग असा काही पदार्थ वाचल्याचे आठवतेय
आज पनीर बिर्याणी केली (स्वतःच)
केले हो सोन्याबापू गट्टे के
In reply to केले हो सोन्याबापू गट्टे के by मितान
ताई नई हो ती अजून ! बारकी आहे
In reply to ताई नई हो ती अजून ! बारकी आहे by कैलासवासी सोन्याबापु
बघा बघाताई नई हो ती अजून
In reply to बघा बघाताई नई हो ती अजून by महासंग्राम
अकोल्याचे पोट्टेपाट्टे कुटी
पहिले गट्टे का पुलाव, मग आता