साधारण जुलै ऑगस्ट २०१२ मध्ये दादर येथे शंकर अभ्यंकर यांचे व्याख्यान होते. मी गेलो होतो. अतिशय सुंदर झाले. विवेकांनद वर होतं. तिथे त्यांनी सांगितले. ते संत विद्यापीठ स्थापन करत आहेत. जिथे संत साहित्याचा अभ्यास होईल. आणि बारावी नंतर BA , बी . कॉम सारखेच संत साहित्य वर पण मुले शिकतील . आणि हे शिकून नोकऱ्या पण त्यांना मिळतीलच असा विश्वास त्यांनी दाखवला.
याच्या बांधणी करता त्यांना लोकांकडून मोठ्या प्रमाणात मदत अपेक्षित होती. आणि काही लोकांनी दिलीही. एका जोडप्याने एक लाख रु दिले. छोट्या मोठ्या रकमा तर बऱ्याच लोकांनी दिल्या. मी पण यथाशक्ती मदत दिलीच. काही पुस्तके आणि CD विकत पण घेतले.
पण आज ४ वर्ष उलटली तरी याचे पुढे काय झाले ते नक्की कळत नाही. हे लोणावळा जवळ होणार होते / आहे. पण आत्ता हे काम कुठं पर्यंत पोचले आहे ?
कारण हे खूप चांगले काम असून याची प्रसिद्धी व्हावी आणि मोठ्या प्रमाणात मदत मिळून हे काम लवकर पूर्ण व्हावे. हीच इच्छा.
http://www.loksatta.com/pune-news/first-saint-university-will-take-shape-near-lonavala-by-aditya-pratishthan-93171/
अभ्यंकर म्हणाले, ‘‘लोणावळ्याजवळील तेहतीस एकर जागेत या विद्यापीठाचे बांधकाम करण्याचा प्रतिष्ठानचा मनोदय असून त्यासाठीची मान्यता संस्थेला नुकतीच मिळाली आहे. या ठिकाणी देशातील प्रत्येक प्रांताच्या संतवाङ्मयातील सुमारे दोन लाख ग्रंथांचे जतन करण्यात येणार आहे. तसेच संतवाङ्म्मयाविषयीची आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थाही उभारण्यात येणार आहे. बारावी इयत्तेनंतर संतवाङ्मयाचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरू करण्याचाही संस्थेचा मानस आहे. या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत केले जाणार असून तो पूर्ण होण्यास सुमारे पाच वर्षे लागतील.’’
प्रतिक्रिया
आदित्य प्रतिष्ठान
तिथे काहीच माहिती नाही.
शंकर अभ्यंकर म्हणजे कोण?
youtube वर बघा ...
विद्यावाचस्पती आहेत ते
१० वर्षे झाली
या कार्याची काहि माहिती नाहि बुवा
अत्यंत उत्तम वक्तृत्व कला
फार लिहीलं का मी ?
प्र कटन सुरू... .
सहमत :इथे नवीन असल्याने फार
आत्मबंध व बापट दादांचे आभार,
लोल
वरून शेठ , पुणे विद्यापीठातून
आता बोला वरून भाऊ
तेच बोलो ना बापट भाऊ
वक्तृत्व चांगले असणं वेगळं (
बाकी गोष्टींबद्दल कल्पना नाही