ऑक्टोबर हीट सरुन आता हळूहळू पारा खाली सरकतोय. बाकी ठिकाणीही कुठे बोचरी थंडी, कुठे हिमवर्षाव सुरु झालाय. अश्या वेळी काहीतरी नवीन चमचमीत, गरमागरम करुन बघावे म्हणून आणि घरात आणलेल्या झुक्किनीचा काही उपयोग करता येईल म्हणून हा पदार्थ बनवून पाहिला. आप्पेपात्राचाही सदुपयोग आणि तेलाचाही नाममात्र वापर, शिवाय पाकृ फार वेळखाऊ नाही, आणि चवीला.. अहाहा! त्यात गरम बाइट्समधले वितळलेले चीज .... दुपारच्या चहाबरोबर, जेवताना स्टार्टर्स म्हणून सर्वांनाच हे बाइट्स फारच आवडले. तुम्हीही नक्की करुन पाहा :)
साहित्यः
१ झुक्किनी
१ उकडलेला बटाटा
१०-१२ पालकाची पाने
२ मोठे चमचे तांदळाचे पीठ
अर्धा चहाचा चमचा चाट मसाला
१ चमचा तिखट किंवा २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
अर्धा इंच आले
३-४ लसूण पाकळ्या
मीठ चवीप्रमाणे
२ चमचे तेल
चीज क्युब्स - १ से.मी. चे तुकडे करुन
कृती:
१. झुक्किनी किसून घ्या, पालक अगदी बारीक चिरुन घ्या. मी दोन्ही चॉपरमध्ये बारीक करुन घेतले.
२. एका भांड्यात दोन्ही घ्या आणि यात उकडलेला बटाटा, तांदळाचे पीठ, चाट मसाला, तिखट, मीठ, आले-लसूण किसून सगळे नीट एकत्र करुन घ्या.
३. लिंबाएवढा गोळा घेऊन हाताने वाटीसारखा आकार द्या.
४. मध्यभागी एक चीजचा क्यूब ठेवून गोळा बंद करा.
५. असे सर्व मिश्रणाचे गोळे करुन घ्या.
६. आप्पेपात्र गरम करण्यास ठेवा. थोडे थोडे तेल घाला. तेल गरम झाले की हे गोळे त्यात ठेवा.
७. २-३ मिनिटांनी गोळे उलटवा.
८. सगळीकडून छान भाजले गेले की आप्पेपात्रातून काढा आणि केचपबरोबर खायला द्या.
जास्त बाइट्स लागणार असतील तर आधी आप्पेपात्रात थोडे कमी वेळ ठेवून सर्व बाइट्स बनवून घ्या, आणि खाताना ऐन वेळी पुन्हा १-२ मिनिटे आप्पेपात्रात गरम करुन घ्या.
झुक्किनीऐवजी कदाचित घोसाळी वापरुन बघू शकता. मी पाहिली नाहीत, पण चव तशीच लागत असावी :)
वाचने
18969
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहाहा... सकाळी सकाळी असं काही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- haye mera dil - alfaaz ft honey singh - official full videoपदार्थ छान दिसतोय. आज
मस्त दिसताआहेत आणि सोपी
स्लर्प!"
छान दिसतो आहे पदार्थ!
अरे वाह
हो.. चव, भारी लागते एकदम.
In reply to अरे वाह by श्रीरंग_जोशी
दिसतय भारी एकदम :) झुक्किनी
हेच म्हणतो..
In reply to दिसतय भारी एकदम :) झुक्किनी by पियुशा
मस्त चटपटीत दिसताहेत.करुन
भारी !
हे...
In reply to भारी ! by सस्नेह
काय माहिती ? जालावरचा फोटो.
In reply to हे... by संजय पाटिल
भारतात मिळते बहुतेक झुक्किनी,
In reply to काय माहिती ? जालावरचा फोटो. by सस्नेह
मिळते.
In reply to भारतात मिळते बहुतेक झुक्किनी, by रुपी
आहा! सहीच.
टेस्टी प्रकार दिसतोय.
"तुरई" का कायसं म्हणायचे
In reply to टेस्टी प्रकार दिसतोय. by बाजीप्रभू
तुरई म्हणजे दोडके बहुतेक.
In reply to "तुरई" का कायसं म्हणायचे by सूड
हो, तुरई म्हणजे दोडका. पण
In reply to तुरई म्हणजे दोडके बहुतेक. by त्रिवेणी
मस्त दिसताहेत.नक्की करून
मस्त मस्त
एकदम टेस्टी वाटतायत!
खूप वेगवेगळे प्रकार करता येतात याचे
वा! मस्त. नवा पदार्थ मिळाला!
जबराट
झुकिन्या आणल्यात गं, करून
आज हा पदार्थ केला. सगळ्यांना
अरे वा.. लगेच करुन पाहिला आणि
In reply to आज हा पदार्थ केला. सगळ्यांना by रेवती
पटकन उचलून
मस्त दिसत आहे
झुकिनीला मराठीत काय म्हणतात
मराठी नाव नाही बहुतेक
In reply to झुकिनीला मराठीत काय म्हणतात by कैलासवासी सोन्याबापु
(No subject)
वेगळी पाकृ. आवडली.
सोन्याबापू, तुरई वेगळी,
मस्त...
छान दिसतेय पाककृती.
काकडी नव्हे?