प्रेरणा
पुरुष बायकांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे. गेली काही वर्षं मी आजुबाजुला बघतो की बायका ज्या गोष्टी करतात त्या केल्या की पुरुषांना आपलं मर्दानी सौंदर्य सिद्ध केल्याचा फील येतो.
१. बायका दाढी करत नाही, मग करा त्यांचे अनुकरण. हल्ली बेफिकिरीत दाढी वाढवून पुरुष स्वतःला बायकांच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा 'लूक' देत असतात. आता राहुल गांधी बरा दिसतो हाच एक त्याचा प्लस पॉइंट होता. पण नाही, बायकांची नक्कल करता करता त्याने तेवढंही गमावलं.
२. बायका भरजरी कपडे वापरतात. मग पुरुषही त्यांचं अनुकरण करतात. शोभत नसेल तरीही लग्नसमारंभात भरजरी शेरवानी घालताना सर्रास दिसतात. बायकांना अशा जरीदार कपड्यानी शोभा येते. पुरुषांची ती 'शेर'वानी अगदी बकरीवानी दिसते. पण नाही, बायका करतात, तर आम्हीही करणार, हा अट्टाहास कशासाठी?
३. बायका अंगप्रदर्शन करतात, ते त्यांना जमतंही. पण बाजारत सगळं अंग झाकणारे कपड्यांचे ढीग असतानाही पुरुषांना आपली छाती, त्यांवरचे केस, आणि सहा नाही तरी दोनतीन पॅक आहेत असा समज करून सुटलेली पोटं दाखवायची असतात. या पुढेही जाऊन काही मर्दुटले पीकेसारखे फोटोही टाकतात,आमच्यासारखे पामर त्यांच्यापासून जीव वाचवायला ताबडतोब अनफॉलो करून टाकतात.
४. स्वयंपाक करणं हा खास बायकी प्रांत. पण घुसघोरी करणार नाही ते पुरुष कसले? आई, बहीण,आणि बायको यांना बकरी बनवून स्वयंपाकघरात शेजारी उभं केलं जातं. इतर वेळी इतर वेळी तांत्रिक बाबतीत पुढे असणारे पुरुष मात्र इथे गडबडतात. हळद टाकायला सांगितलं की मोहरी टाकतात आणि मोहरी टाकायला सांगितलं की हिंग टाकतात. आणि वर यांना तयार मसाला नको असतो, घरच्याघरीच वाटणघाटण करायची असते. मग दूध उकळायला लागल्यावर गॅस बंद करायचा सुचत नाही. आणि उतू जायला लागलं की नुसते बघत बसतात. अरे काय वेडेपणा आहे हा? मिपावर आणि फेसबुकवर फोटो टाकण्याची मात्र हौस.
५.गॉसिप ही खास बायकांसाठी बनवलेली गोष्ट आहे,पण आजकाल पुरुषांनीही त्यात प्राविण्य मिळवलं आहे. इतकं की एखाद्या बाईशी फेसबुकवर ओळख झाल्यावर 'J1 झालं का?' असले लेम मेसेज टाकून बघतात.
जरुर बायकांची कॉपी करा, त्यात गैर काही नाही. पण ज्या गोष्टी मुदलातच आपल्यासाठी नाहीत त्याचा अट्टाहास धरु नका. कॉपी अशी करा की बघणारी बघत राहिली पाहिजे. आणि खूप जणी बघताहेत म्हणून फसू नका. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांत 'हा काय चक्रमपणा चालू आहे?' असे भाव दिसत नाहीत ना, याची खात्री करून घ्या.
तर पुरुषांनो, बायकांची कॉपी करणं म्हणजे आपण मेट्रोसेक्श्युअल झालो हा कन्सेप्ट मनातून काढून टाका.तुमची स्वतःची अशी exclusive क्षेत्रं तयार करा. बायकांना बेंचमार्क ठरवून भलतंच काहीतरी करण्याचा प्रकार सोडून द्या, after all, women are women.
(दुर्दैवाने विडंबन करताना भाषेचं सुडंबन करावं लागलेलं आहे. कारण मुळातल्या तीनचारशे शब्दांच्या लेखात पन्नाससाठ चुका ठेवून देणं हे फारच हिणवल्यासारखं वाटेल असा संशय आला.)
वर्गीकरण
वाचने
4576
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
या पुढेही जाऊन काही मर्दुटले
In reply to =)) by टवाळ कार्टा
संपादक मंडळि, इकडे लक्ष द्या,
In reply to या पुढेही जाऊन काही मर्दुटले by पीके
अन्यथा प्रस्तूत लेखकावर
In reply to संपादक मंडळि, इकडे लक्ष द्या, by पीके
अरे पीके हो का ? रेफरेन्स तो
In reply to अन्यथा प्रस्तूत लेखकावर by पीके
ज्योक (पीजे) तो समझो भाइ.,
In reply to अरे पीके हो का ? रेफरेन्स तो by सच्चिदानंद
अरे वा (मि पयला) !
हा हा हा! जमलय! शेरवानी
:)
=)) =))
=))
वेस्ट युटीलायझेशन चे आदर्श उदाहरण !!!
हा हा.. मस्त!
लेख ( विडंबन )गंडलाय हे मान्य
+१११
In reply to लेख ( विडंबन )गंडलाय हे मान्य by कंजूस
घासूगुर्जींच्या खास शैलीतले
हाहाहा
घासू गुर्जींनी फिलॉसॉफरशी
आई, बायको, बहीण यांची 'बकरी'
मूळ धागा आणि विडंबन दोन्ही