फिटनेस अॅप आणि गॅजेट्स
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
नमस्कार मंडळी.
व्यायामाच्या धाग्यावर उदंड प्रतिसाद झाल्याने "फिटनेस अॅप आणि गॅजेट्स" च्या वापराबद्दल नवीन धागा काढत आहे. गोड मानून घ्या. ;) (एस रावांनाही बरेचदा लिहितो लिहितो म्हणून सांगितले होते.)
सर्वप्रथम, आपण आपल्या आनंदासाठी व्यायाम / सायकलिंग करतो मग त्याचे असे रेकॉर्ड ठेवणे किंवा ट्रॅक ठेवणे अनेक जणांना पटत नाही. मात्र महिन्याच्या शेवटी किंवा एखाद्या मोठ्या राईड नंतर "आपले आत्तापर्यंत इतके इतके किमी झाले..!!" ही भावना जबरदस्त असते. अवर्णनीय..!!
GPS Tracker Free - विंडोज फोन -
हे सध्या वापरत असलेले अॅप, एकदम भारी आहे आणि झकास ग्राफ निघतात. आपल्या वेगाचाही ग्राफ निघतो. मला सापडलेले सर्वात भारी अॅप समजायला हरकत नाही. ;)
पुढील प्रकारची माहिती या अॅप वर रेकॉर्ड होते.
Sports Tracker - अॅन्ड्रॉईड -
हे दुसर्या फोनवरील अॅप, हे पण चांगले आहे, विंडोजवरील GPS Tracker Free इतके चांगले नसले तरी चांगले अॅप आहे.
पायी चालण्यासाठी पेसर नामक एकच अॅप वापरायला सुरूवात केली आहे. तुम्ही इतर कोणते अॅप वापरत असाल तर जरूर माहिती द्या.
फिटबिट किंवा फिटनेस बँड बद्दल व्यायामाच्या धाग्यात चर्चा झाली आहेच, येथेही ती चर्चा सुरू ठेवता येईल.
अॅपसाठी आवश्यक गोष्टी -
या अॅपसाठी सर्वप्रथम आवश्यक गोष्ट म्हणजे भरपूर बॅटरी बॅकअप देणारा मोबाईल. काही कारणाने बॅटरीने मान टाकली तर अॅपवर रेकॉर्ड झालेले राईडचे आकडे शिल्लक राहिलच याची कोणतीही खात्री देता येत नाही. बहुतांश वेळा बॅटरी संपपर्यंत ट्रॅक झालेले आकडे बॅटरी चार्ज केल्यानंतर दिसतात पण अनेक अॅप असेही असतात की ते आपली राईड सेव्ह करेपर्यंत राईडची माहिती त्यांच्याकडे कुठेही सेव्ह करत नाहीत, त्यामुळे बॅटरी गेली की अॅपही जाते आणि आकडेही जातात. दुसरी आवश्यक गोष्ट म्हणजे इंटरनेट डेटा शिवाय GPS चालू आणि कनेक्टेड राहण्याचे फिचर असलेला फोन. कारण इंटरनेट डेटा खूप बॅटरी खातो आणि अॅपला बॅटरी पुरत नाही. बाकी आवश्यक गोष्टी म्हणजे GPS, लोकेशन, अनेक वेगवेगळे सेन्सर्स वगैरे वगैरे.. हल्लीच्या सर्वच स्मार्टफोन मध्ये हे फीचर असतातच.अॅप निवडताना..
सायकलिंग आणि रनिंगसाठी अॅप निवडताना "ऑटो पॉझ" वाले अॅपच शक्यतो वापरावे. अन्यथा ते अॅप दर थांब्याला चालू / बंद करावे लागते. तर मी आत्तापर्यंत वापरलेली कांही अॅप येथे देत आहे, बाकी माहिती प्रतिसादांमध्ये मिळत जाईलच. सायकल लॉग - विंडोज फोन - हे अॅप अगदी सुरूवातीला वापरले, पण यात ऑटो पॉझ नाहीये त्यामुळे मोठय राईडमध्ये पॉझ करणे आणि आठवणीने परत चालू करणे हे त्रासाचे काम होते. यात एलेव्हेशन ग्राफ मस्त निघतो. पण नंतर हे अॅप वापरणे बंद केले.
GPS Tracker Free - विंडोज फोन -
हे सध्या वापरत असलेले अॅप, एकदम भारी आहे आणि झकास ग्राफ निघतात. आपल्या वेगाचाही ग्राफ निघतो. मला सापडलेले सर्वात भारी अॅप समजायला हरकत नाही. ;)
पुढील प्रकारची माहिती या अॅप वर रेकॉर्ड होते.
Sports Tracker - अॅन्ड्रॉईड -
हे दुसर्या फोनवरील अॅप, हे पण चांगले आहे, विंडोजवरील GPS Tracker Free इतके चांगले नसले तरी चांगले अॅप आहे.
पायी चालण्यासाठी पेसर नामक एकच अॅप वापरायला सुरूवात केली आहे. तुम्ही इतर कोणते अॅप वापरत असाल तर जरूर माहिती द्या.
फिटबिट किंवा फिटनेस बँड बद्दल व्यायामाच्या धाग्यात चर्चा झाली आहेच, येथेही ती चर्चा सुरू ठेवता येईल.
प्रतिक्रिया
ऑफलाईन जीपीएस चालू ठेवणारा
अजुन थ्री नॉट थ्री वापरताय
आता काय ब्रे बोलावे, भाऊंनी
अॅपल वॉच
अॅपल ६, रनकीपर आणि फिट्बीट
या धाग्यासाठी आभार. कृपया
एस हेल्थ वापरतो. एप चालू बन्द
मी स्ट्रावा वापरतो.
स्ट्रावा वापरायला सुरूवात
स्राव्हा बंद कसे करायचे हो
रेकॉर्ड राईडच्या बटणा शेजारी
मोदकाचं फिटनेसवेड असंच सुरू
ठ्ठो महालोल हहपुवा
वजन काय कमी होत नाय राव :(
जिभेवर नियंत्रण आवश्यक आहे.
जिभेवर नियंत्रण आवश्यक आहे.
मॉर्निंग वॉकला चांगले अॅप
मी पेसर नामक एक अॅप वापरतो
माझ्याकडे फिटबीट चा फिटनेस ट्रॅकर बेल्ट आहे .
GPS Tracker Free
दोन "GPS Tracker Free" आहेत..
मी हे अॅप वापरते.पण आॅटो पाॅज
हे रनकिपर आहे असे वाटते.
गॅझेट्स आणि ऍप बद्दल
अॅप किंवा फीटनेस बेल्ट
वजन कशाने कमी होईल हे
अच्छा
गूगल फिट
walkmate चांगले अँप्लिकेशन आहे
खेळणे
छातीला व्यायाम करताना सतत HR
सरसकटीकरण
@माशॅ, तुमचा प्रतीसादातील
HR मॉनिटर व फिटनेस बँड
मी फक्त माझा स्वतःचा अनुभव
तुमचं म्हणणं १००% मान्य आहे