(लहानपणी कधीतरी वाचली होती, आज आठवली काही निमित्ताने)
तीन स्त्रिया पाणवठ्यावरून पाणी भरून डोईवर मडकी घेऊन घराकडे निघतात, मान डूगडुगते तिघींची, वय झालंय. त्यांची एक मैत्रीण बऱ्याच वर्षांनी गावात आलेली असते, तीही त्यांना सामील होते, गप्पा सुरु होतात, बायकाच त्या!
साहजिक गोष्ट मुलांवर येते, तिघींपैकी दोघींचे चेहरे अभिमानाने उजळतात. पहिली सांगते माझा मुलगा पंचक्रोशीतला सर्वात बुद्धिमान मनुष्य आहे, संस्कृत, वेद, शास्त्रे यावर त्याच्याशी कोणी जिंकू शकत नाही, त्याने भल्याभल्याना पाणी पाजलं आहे! एवढ्यात तो मुलगा समोरून येतो, मोठमोठ्याने वेदमंत्र अस्खलित संस्कृतात उच्चरत, यांना अभिवादन करून पुढे जातो. त्याची आई म्हणते हाच कि माझा मुलगा!
दुसरी म्हणते, माझ्या मुलाच्या पहिलवानी डावपेचाला तोड देणारा पंचक्रोशीत कोण नाही, त्याच्या सुंदर आणि धष्टपुष्ट शरीरावर तरुणी भुलतात आणि त्याचे मजबूत स्नायू बघून प्रतिस्पर्धी घाबरून असतात, तेवढ्यात आपल्या पिळदार स्नायूंना अभिमानाने मिरवत एक तरुण पुढून येतो, चौघीना प्रणाम करतो, नजर खिळवून बसलेल्या तरुणींकडे बघत मिशिवर पीळ देत मिश्किल हसतो व पुढे जातो,
आता तिसऱ्या स्त्रीची गोष्ट, इतर दोघी तिच्याकडे कुत्सितपणे बघत असतात, ती म्हणते माझ्या मुलात असे काहीही गुण नाहीत, चारचौघांसारखा आहे तो. अरे, हा काय समोरून येतोय. तो मुलगा येताच आईच्या डोईवरचे जड मडके उचलून आपल्या खांद्यावर घेतो, आईला लाडिक रागावतो की का गेलीस पाण्याला मी आणले असते स्वतः जाऊन!
तो मडके घेऊन घरी जातो.
इतका वेळ चौथी स्त्री गप्प आहे हे पाहून पहिली स्त्री म्हणते, काय गं, मग आमच्या तिघीपैकी कोणाचा मुलगा तुला सर्वोत्तम वाटला, दुसरीच्या डोळ्यातही आपल्याच मुलाचे कौतुक ऐकण्याची उत्सुकता दिसून आली. तिसरी साहजिक नाराज होती.
ती चौथी स्त्री म्हणाली, "तिघींपैकी? मला तर फक्त एकीचाच 'मुलगा' दिसला, जो आता आईच्या डोक्यावरचे मडके घेऊन गेला"
(सांप्रत घटनांशी संबंध आपल्या जबाबदारीवर लावावा व बोधही घ्यावा)
मिसळपाव
बरोबरै...
कथा छान आहे.. बाकी संबंध
गेलीस पाण्याला मी आणले असते
In reply to गेलीस पाण्याला मी आणले असते by विवेकपटाईत
ओह्. आता कळले.
In reply to ओह्. आता कळले. by प्राची अश्विनी
किंवा
In reply to किंवा by मोदक
सध्या राजाच सेम त्या
In reply to सध्या राजाच सेम त्या by संदीप डांगे
ज्या प्रजेला काळाच रंग दिसत
In reply to ज्या प्रजेला काळाच रंग दिसत by मोदक
=)) जनरायलेझेशन
In reply to =)) जनरायलेझेशन by संदीप डांगे
हा हा.. चष्मा काढा हो. नीट
In reply to हा हा.. चष्मा काढा हो. नीट by मोदक
इथे माकड आणि टोपीवाला यांची
गेलीस पाण्याला मी आणले असते स्वतः जाऊन!
केजरीवालचे हस्तक मिसळपाव.कॉम
In reply to केजरीवालचे हस्तक मिसळपाव.कॉम by अप्पा जोगळेकर
अहो, ते नोटा बदलायला गेलेल्या
बाकी काहीही म्हणा पण ....
In reply to बाकी काहीही म्हणा पण .... by गामा पैलवान
=))
कथा पुढे चालु ....
In reply to कथा पुढे चालु .... by प्रसाद गोडबोले
=))
कथा पुढे सुरु.
In reply to कथा पुढे सुरु. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
कथा पुढे चालू
In reply to कथा पुढे चालू by बोका-ए-आझम
खिक्क
In reply to कथा पुढे चालू by बोका-ए-आझम
लाजवाब बोकाशेठ ...!!
In reply to कथा पुढे चालू by बोका-ए-आझम
' गमन ' या बटणावर
In reply to कथा पुढे चालू by बोका-ए-आझम
लैच भारी.
In reply to लैच भारी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अकरा वाजून गेले की हो दिलीप
In reply to अकरा वाजून गेले की हो दिलीप by सतिश गावडे
:)
मी आईला भेटायला जाताना सोबत
In reply to मी आईला भेटायला जाताना सोबत by याॅर्कर
<<<<मी आईला भेटायला जाताना
In reply to <<<<मी आईला भेटायला जाताना by विशुमित
क्रिटीसाईज नाही करत
In reply to क्रिटीसाईज नाही करत by इरसाल
ताई ऐवजी वहिनी वाचावे ...
ज्यावर घटनेवर सगळी बोधकथा
In reply to ज्यावर घटनेवर सगळी बोधकथा by jp_pankaj
कथेचे सार ते हेच की काय?