Skip to main content

तं(टं)ग्ग्ग्गडी कबाब .. .

लेखक स्मिता चौगुले यांनी बुधवार, 16/11/2016 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
7 साहित्यः ४ चिकन लेग्ज पहिले मॅरीनेशन १ लिंबाचा रस १ चमचा लाल मिरची पावडर मीठ चवीनुसार दुसरे मॅरीनेशन १/२ लहान वाटी दही १ चमचा आले-लसूण पेस्ट २ चमचा तंदुरी मसाला/चिकन मसाला पा़कृ - 1 चिकन लेग्ज धूवून, स्किन असेल तर साफ करून त्यावर सुरीने प्रचीमध्ये दाखवल्याप्रमाणे कट द्या 2 चिकनला पहिले मॅरीनेशन लिंबूरस+लाल मिरची पावडर+मीठ लावून मॅरीनेट करावे, अर्धातास फ्रिजमध्ये ठेवावे. यामुळे या मॅरीनेशनची चव व्यवस्थित मुरते. 3 अर्धातासानंतर यात दुसरे मॅरीनेशन दही+तंदुरी मसाला+आले-लसूण पेस्ट घालून व्यवस्थित मॅरीनेट करावे आणि रात्रभर/४-५ तास कमीतकमी फ्रिजमध्ये ठेवावे. 4 5 कन्वेक्शन ओव्हन २०० डिग्रीवर प्री-हीट करावा, त्यात मॅरीनेट केलेले चिकन लेग्ज ठेवून ५मि. भाजावेत. आता तापमान थोडे कमी ठेवून (१७०-१८० डिग्री) २०-२५ मिनिटे भाजावे. दरम्यान एकदा उलटून सर्व बाजूने व्यवस्थित भाजले जातेय याची खात्री करावी. कांदा+चाट मसाला+लाल मिरची पावडर+मीठ सलाड बनवून कबाबसोबत सर्व्ह करावे 6 अधीक टीपा - १) लाल मिरची पावडर - मी एवरेस्टचा तिखालाल वापरला आहे, तिखट + लाल रंगसाठी उत्तम नसेल तर तुम्ही साधी लाल मिरची पावडर + चिमुट्भर लाल रंग घेवू शकता २) दुसर्‍या मॅरीनेशनमध्ये चमचाभर बेसन/ पंढरपुरी डाळीचे पिठ घालतात, यामूळे मॅरीनेशन थोडे घट्ट होते आणि त्याचा एक थर चिकन लेग्जवर चि़कटतो.मला तसे आवडत नाही त्यांमूळे साहित्यात बेसन/ पंढरपुरी डाळीचे पिठ नाहीए. ३)दही शक्यतो घट्ट, पाणी नसलेले घ्यावे . नसेल तर तलम कापडात बांधून पाणी निथळून घ्यावे ४) कबाबसोबत पुदिन्याची चटणीपण सर्व्ह करु शकता. कबाबच्या मॅरीनेशनमध्ये पुदिन्याची चटणी घातली तर अजुन वेगळी चव येते. तुमच्या आवडीप्रमाणे याच्या मॅरीनेशनमध्ये तुम्ही फेरफार करु शकता

वाचने 10056
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

तोंपासु... बायदवे.. एअर फ्रायर मधे करता येइल का हे?

In reply to by संजय पाटिल

ए फ्रा मध्ये करता येते. खूप छान होते. फक्त नंतर चिकन फॅटने खालचे पॅन खराब होते ते साफ करायला साबणाच्या पाण्यात बुडवून ठेवावे लागते. स्मिता, कबाब मस्त दिसत आहेत. स्वाती

कन्व्हेक्शन ऐवजी सिंपल मायक्रोवेव्ह मधे करता येईल का ? स्किन लेस तंगड्या मिळतात का बाजारात ?

In reply to by अप्पा जोगळेकर

मायक्रोवेव्ह मधे चिकन फक्त शिजेल. त्याला तंदूर चा कूरकूरीतपणा नाहि येणार. स्किन लेस तंगड्या मिळतात..

Chhan !!!

धन्यवाद सर्व प्रतिसादकर्त्यांचे.. :)