✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हम सब चोर हैं (आपण सर्व चोर)- एक जाणीव

व
विवेकपटाईत यांनी
Sun, 11/13/2016 - 16:52  ·  लेख
लेख
आपल्या देशात ९४ टक्के आर्थिक व्यवहार रोख होतो. देशात फक्त १ टक्के लोक आयकर भारतात. त्यात हि ९० टक्के आयकर देणारे संगठीत क्षेत्रातले कर्मचारी आणि मजबूरी में इमानदार सरकारी बाबू आहेत. काय करणार सरकार न विचारता पगारातून आयकर कापून घेते. बाकी अधिकांश थोक आणि फुटकर व्यापारी आपला धंधा रोख करतात. मला आठवते, २०१३ मध्ये मुलीचे लग्न ठरले, चांदणी चौक येथे एका मित्राच्या ओळखीच्या दुकानात कपडे विकत घ्यायला गेलो. ज्या दुकानात रोज २५-३० लाखांचा व्यवहार होत होता, त्या दुकानदाराने डेबिट कार्ड नाकारले. ATM मधून पैशे काढून नगदी द्यावी लागली. निश्चितच हा दुकानदार आयकर भरत नसणार. लाखोंची रोज उलाढाल करणारे चांदनी चौक सदर बाजारातले अधिकांश व्यापारी आयकर इत्यादी भरत नाहित. (चांदनी चौक आणि सदर बाजार देशातील सर्वात मोठे थोक व्यापारचे केंद्र आहेत). बाकी देशात हि हीच परिस्थिती आहे, ९९ टक्के थोक आणि फुटकर व्यापारी आयकर भरत नाही किंवा अत्यंत कमी भरतात (मोठे मोठे शोरूम जिथे ई-मनी स्वीकारल्या जाते, मजबूरी में काही प्रमाणात कदाचित आयकर भरत असतील). आजच्या digital युगात इमानदार व्यापारीला रोख मध्ये आर्थिक व्यवहार करण्याची गरज नाही. हजार रुपयांच्या वरची खरीदारी ई-मनी द्वारा सहज होऊ शकते. यात चोरी आणि डकैतीची भीती हि नाही. तरीही आयकर इत्यादी सरकारी कर चुकविण्यासाठीच देशात ९४ टक्के आर्थिक व्यवहार रोखमध्ये होतात. याचा अर्थ एकच निघतो, आपल्या देशात अधिकांश लोक कर चोरी करतात. देशात १४.६ लक्ष कोटी १००० आणि ५००च्या नोटा आहेत. त्यातले किमान ७-८ लक्ष कोटी रूपये आयकर इत्यादी सरकारी कर चुकवून जमा केलेला आहे. गेल्या ८ नोव्हेंबरला प्रधानमंत्री मोदीनी १०० अणि ५००च्या नोट चलनातून बंद करण्याची घोषणा केली. त्या क्षणापासून बातम्या ऐकतो, आहे, जुन्या नोटांचा वापर लोक संपती कर, विजेचे आणि इतर पाणीपट्टी, संपती कर इत्यादी थकित बिले भरण्यासाठी करत आहेत. सूरत असो वा ठाणे सर्व नगरपालिकांची तिजोरी भरत आहे. मनात एक प्रश्न आला, आधी या लोकांनी बिले का नाही भरली. कारण स्पष्ट आहे, सरकारी बिले भरायची नसतात. सरकारी कर कधी द्यायचा नसतो. कधी न कधी राजनेता बिल माफी देतातच (दिल्लीत आमच्या इमानदार सरकारने ४-५ हजार कोटींची वीज आणि पाणीपट्टी माफ केली). आमच्या सारखे नियमित बिले भरणारे इमानदार मूर्ख बनले. आता नोटा रद्द झाल्या, रद्दी कागज सरकारच्या माथी मारून बिले भरणे म्हणजे एक प्रकारची कर माफीच. काल पर्यंत ३ लक्ष कोटी रुपयांचे चलन बँकांनी बदलून दिले तरीही हि मोठ्या मोठ्या रांगा संपत नाही आहे, कारण स्पष्ट आहे. बहुतेक गरीब जनतेचे निष्क्रिय जनधन खाते मोठ्या प्रमाणात जागे झाले आहेत. कमिशन घेऊन पैसा जमा करण्याचा खेळ सुरु झाला आहे. आधार कार्डचा उपयोग गरीब जनता, करबुडव्यांचे दररोज ४००० काळे रुपये (५०० रुपये कमिशन घेऊन) स्वच्छ करून देत आहेत. काही हि म्हणा गरिबांची काही कमाई तरी होत आहे. हि गोष्ट वेगळी ते अश्याप्रकारे या कर बुडव्यांना मदत करीत आहेत. छोटे- मध्यम व्यापारी आपला काळा पैसा कमिशन देऊन किंवा परिचितांना लाईनीत उभे करून पांढरा करून घेतील. बाकी ज्यांचा तिजोरीत भरगच्च काळा पैसा आहे. त्यांना सर्व पैसा काळ्याचा पांढरा करणे संभव नाही अशेच लोक अणि कंगाल झालेले नेता आरडाओरडा करीत आहे आणि नित नव्या अफवा पसरवितआहेत. (सध्या गादीवर नाहीत, पुन्हा भरगच्च पैसा मोठ्या प्रमाणात नवीन नोटांत गोळा करणे शक्य नाही). किमान २-३ लक्ष कोटी रुपय्या अग्नीत जाळणार किंवा गंगेत बुडणार हे निश्चितच. आज सकाळीच एक ओळखीचा एक मित्र भेटला, तो म्हणाला पटाईतजी कुछ भी कहो मोदीजीने देश के लोगोंको अहसास करा ही दिया की वे सब चोर हैं आणि जोरात हसला. मला ही हसू आले. किती हि कटू असले तरी हेच आजचे सत्य आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थकारण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
10194 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

(सध्या गादीवर नाहीत, पुन्हा

संदीप डांगे
Sun, 11/13/2016 - 17:08 नवीन
(सध्या गादीवर नाहीत, पुन्हा भरगच्च पैसा मोठ्या प्रमाणात नवीन नोटांत गोळा करणे शक्य नाही) >> हे एक वाक्य आपल्याला जाम आवडलं बॉ! :)
  • Log in or register to post comments

देशात फक्त १ टक्के लोक आयकर

मोदक
Sun, 11/13/2016 - 18:15 नवीन
देशात फक्त १ टक्के लोक आयकर भारतात बाकी जाऊदे... देशात फक्त दीड कोटी लोक आयकर भरतात..? हा आकडा कसा मिळाला..? या आकड्याविषयी शंका आहे.
  • Log in or register to post comments

यावर्षी जुलैमध्ये बहुतेक ५

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 11/13/2016 - 23:00 नवीन
यावर्षी जुलैमध्ये बहुतेक ५ कोटी रिटर्न्स फाईल झाले होते याचा अर्थ बहुतेक हे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा जास्त असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

सगळेच रिटर्न्स कर भरण्यासाठी

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 11/14/2016 - 03:42 नवीन
सगळेच रिटर्न्स कर भरण्यासाठी नसतात, त्यातले काही टीडीएस केलेला कर परताव्यासाठीही असतात. निव्वळ कर भरणारे रिटर्न्स किती असावेत हा आकडा केवळ करविभागच देऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

१%

पद्माक्षी
Sun, 11/13/2016 - 23:21 नवीन
http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Just-1-of-population-pays-taxes-reveals-government-data/articleshow/52064255.cms या लिंकनुसार १%. पण काल कुठल्यातरी टीव्ही वरील चर्चेत ३% ऐकले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

5.5 कोटी च्या

मारवा
Sun, 11/13/2016 - 18:24 नवीन
आकडा आहे आसपास तरी संदर्भ चेक करतो लेखाची ची थीम मार्मिक आहे
  • Log in or register to post comments

for the time being

मारवा
Sun, 11/13/2016 - 18:33 नवीन
CNBC 2014 15 tax payers in iNdia type करून गुगलुन बघा
  • Log in or register to post comments

छान!

संजय क्षीरसागर
Sun, 11/13/2016 - 18:39 नवीन
किमान २-३ लक्ष कोटी रुपय्या अग्नीत जाळणार किंवा गंगेत बुडणार हे निश्चितच. साधारण १३.६० लक्ष कोटी रुपयांचा टर्न अराउंड आहे, पैकी ५ लाख कोटी पुन्हा चलनात येणार नाहीत असा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments

तोटा की फायदा ?

चित्रगुप्त
Mon, 11/14/2016 - 01:00 नवीन
५ लाख कोटी पुन्हा चलनात येणार नाहीत असा अंदाज आहे.
हे जे नष्ट केले गेलेले चलन असेल, ते नष्ट करण्यातून त्या त्या लोकांखेरीज अन्य लोकांना/देशाच्या अर्थव्यवस्थेला काय तोटा (वा फायदा) होईल यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

काळा पैसा नष्ट झाल्याने

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 11/14/2016 - 03:44 नवीन
काळा पैसा नष्ट झाल्याने अर्थव्यवस्थेला जो सकारात्मक फायदा होतो त्याचा फायदा सर्व नागरिकांना मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

जितक्या नोटा छापल्या जातात

सुबोध खरे
Mon, 11/14/2016 - 10:37 नवीन
जितक्या नोटा छापल्या जातात तितके रिझर्व्ह बँकेचे जनतेला / सरकारला देणे लागते. एक उदाहरण म्हणून सांगतो. आपण जर १०० लोकांना एक लाख रुपये घेऊन प्रोमिसरी नोट दिली तर आपल्याला एक कोटी रुपये देणे असते. समजा यातील सर्वच्या सर्व प्रोमिसरी नोट हरवल्या किंवा आगीत नष्ट आल्या तर आपल्याला एक रुपयाही देणे लागत नाही. म्हणजेच जर १३ लाख कोटी नोटांपैकी ५ लाख कोटी रुपयाच्या नोटा जर काळया पैसे वाल्यानी रद्दीत टाकल्या किंवा जाळल्या तर रिझर्व्ह बँकेचे तेवढ्या पैशाने देणे(कर्ज कमी झाले) म्हणजेच सरकारला ५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ झाल्यासारखे आहे. हा आकडा माझ्या समजुतीप्रमाणे एका वर्षाच्या वित्तीय तुटी(fiscal deficit) इतका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

इडिक कीबोर्ड लय ताप आहे

मारवा
Sun, 11/13/2016 - 18:39 नवीन
http://www.cnbc.com/2016/05/03/guess-how-many-people-pay-taxes-in-india.html
  • Log in or register to post comments

यात फरक काय ..... ?

चौकटराजा
Sun, 11/13/2016 - 20:43 नवीन
जनरल प्रॅक्टेस करणारे डोक्टर , वकील व सी ए या तीन व्यावसायिकामधे काळा पैसा निर्माण करण्याचा कुणाला चान्स अधिक आहे व का.... ? हा प्रश्न हेटाई करण्याचा नसून केवळ शक्यता आजमावण्याचा आहे.
  • Log in or register to post comments

डॉक्टर्स. कारण वकील व सीए ची

श्रीगुरुजी
Sun, 11/13/2016 - 20:53 नवीन
डॉक्टर्स. कारण वकील व सीए ची गरज तुलनेने कमी नागरिकांना असते व त्यांची फी देखील डॉक्टरांच्या तुलनेत कमी असते. डॉक्टरची गरज देशातील १००% नागरिकांना वेळोवेळी लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

बाबौ!!! डायरेक डॉक्टरांवर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 11/14/2016 - 06:55 नवीन
बाबौ!!! डायरेक डॉक्टरांवर आरोप. आमचे चार प्रामाणिक मिपाकर डॉक्टर्स वैतागणार आता. एक नेव्हीमधले लष्करी शिस्तीत समजवतील, दुसरे प्रेमाने सांगतील, तिसरे बंदुक दाखवुन समजावतील आणि चौथ्यांमुळे दंतारिष्ट ओढावणार. आता पळा, लैचं डॉक्टरांच्या स्टेथॉस्कोप ला हात घातला. टु टोर्टुगा!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मिपावर दातवाले डॉक्टर ब्रेच

टवाळ कार्टा
Mon, 11/14/2016 - 09:45 नवीन
मिपावर दातवाले डॉक्टर ब्रेच आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

वर डिसक्लेमर

चौकटराजा
Mon, 11/14/2016 - 09:52 नवीन
बाबौ काय त्यात ! आम्ही वर डिसक्लेमर दिला आहे की हेटाई करण्यासाठी नाही. आमच्या एका मित्राला प्रश्न पडला आहे की मुलाला वकील सी ए करावा का डोक्टर करावा.? आता ९ नोव्हे नंतर ल्येट्येस्ट पोशीशन काय हाय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

त्याला काहीही करू नका. त्याला

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 11/14/2016 - 14:08 नवीन
त्याला काहीही करू नका. त्याला जे काय व्हायचे आहे ते व्हायला मदत करा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

डॉक्टरची दात काढतो,......!!!

निराकार गाढव
Mon, 11/14/2016 - 15:40 नवीन
डॉक्टरची दात काढतो,......!!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कारण वकील व सीए ची गरज

सुबोध खरे
Mon, 11/14/2016 - 12:12 नवीन
कारण वकील व सीए ची गरज तुलनेने कमी नागरिकांना असते व त्यांची फी देखील डॉक्टरांच्या तुलनेत कमी असते.गुरुजी हे वाक्य चूक आहे? १०० रुपयात काम करणारा वकील किंवा सी ए दाखवून द्या? १०० रुपये (किंवा गरीब वस्ती/ झोपडपट्टी मध्ये त्याहून कमी) घेणारे डॉक्टर मी मुंबईत शेकड्याने दाखवू शकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

१०० रुपयात काम करणारा वकील

श्रीगुरुजी
Mon, 11/14/2016 - 14:52 नवीन
१०० रुपयात काम करणारा वकील किंवा सी ए दाखवून द्या? १०० रुपये (किंवा गरीब वस्ती/ झोपडपट्टी मध्ये त्याहून कमी) घेणारे डॉक्टर मी मुंबईत शेकड्याने दाखवू शकेन.
मामलेदार कचेरीत किंवा तत्सम सरकारी कार्यालयात गेल्यावर आवारात काळा डगला घातलेल्या वकीलांची झुंड अंगावर धावून येते. ते १०० रूपयांमध्ये विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मिळवून देणे, प्रतिज्ञापत्र करून देणे इ. किरकोळ कामे करून देतात. मी पूर्वी इन्फोसिस मध्ये असताना प्रत्येकी २०० रूपये घेऊन आयकर रिटर्न्स सबमिट करणारा एक सीए तिथे येऊन कर्मचार्‍यांचे रिटर्न्स आयकर कार्यालयात जाऊन सबमिट करून पोचपावती द्यायचा. अगदी १०० रूपये नसले तरी २०० ही फारच किरकोळ रक्कम होते. अलिकडे १०० रूपये घेणारे डॉक्टर्स पाहण्यात नाहीत. ते किमान २०० रूपये घेतात. डॉक्टर्सची गरज वकील/सीए पेक्षा खूप जास्त आहे. झोपडपट्टीत तर सीए ची अजिबातच गरज नसावी. वकीलाची गरज तिथे सरकारी कामांसाठीच असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

या न्यायाने तुम्ही प्राथमिक

मोदक
Mon, 11/14/2016 - 17:16 नवीन
या न्यायाने तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलात तर डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार फुकट मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ग्राहक पेठेतही मोफत कायदेशीर

श्रीगुरुजी
Mon, 11/14/2016 - 20:57 नवीन
ग्राहक पेठेतही मोफत कायदेशीर सल्ला मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

डॉक्टर्स

निओ१
Sun, 11/13/2016 - 20:57 नवीन
डॉक्टर्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

काळा पैसे निर्माण करणार्यात

सुबोध खरे
Mon, 11/14/2016 - 11:51 नवीन
काळा पैसे निर्माण करणार्यात संख्येने डॉक्टर्स जास्त असावेत. पण रकमेत पाहाल तर डॉक्टरना मिळणारे पैसे फारच कमी आहेत. बहुसंख्य कॉर्पोरेट आणि मोठ्या रुग्णालयात रोखीने व्यवहार जवळ जवळ होतच नाहीत. तेथील डॉक्टरना पगारही चेकनेच मिळतो. (यात अंबानींचे पण रुग्णालय येते) खाजगी रुग्णालयात आरोग्य विमा असलेले लोक आणि नोकरदार वर्ग हा सुद्धा चेकने पैसे देतो किंवा रोख पैसे दिले तर त्याचे बिल परताव्यासाठी नेतो. राहिलेले लोक म्हणजे धंदेवाईक, व्यवसाय करणारे किंवा सरकारी (खाबू) बाबू जे रोखीत व्यवहार करतात आणि बिल नेत नाहीत यांच्या कडून आलेला पैसा कर न भरता डॉक्टरना घरात ठेवता येतो. याहून खाली म्हणजे स्वतंत्र व्यावसायिक यात साधे फॅमिली डॉक्टर जे १००-२०० रुपये घेऊन रुग्णांना औषधे देतात किंवा विशेषज्ञ डॉक्टर जे ५००-१००० रुपये फी घेतात. हे लोक पैसे जमा करून करून किती करणार आणि त्यातील किती दाखवणार आणि किती लपवणार? फार तर काही लाखात कोट्यवधी नाहीच नाही डॉ पांडा ज्यांचे स्वतःचे रुग्णालय आहे (एशियन हार्ट) ते जास्तीत जास्त ५ शल्यक्रिया करतात. एका शल्यक्रियेचे त्यांना १ लाख रुपये मिळत. म्हणजे दिवसाचे ५ लाख. हे म्हणजे शिखरावर असलेल्या डॉक्टरची परिस्थिती आहे.असे डॉक्टर भारत भरात किती असतील? फार तर काही डझन. या तुलनेत वकील पहा. एक प्रथितयश वकील जे आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. ते वकील असताना आपली केस नुसती वाचण्यासाठी ८ लाख रुपये डिमांड ड्रॉफ्टने "अगोदर" घेत असत. केस वाचली आणि त्यात दम असेल तर ते ती स्वीकारत असत आणि आपला "मीटर" चालू होत असे. आपल्या केस मध्ये एकदा हजेरी लावण्याचे ३-४ लाख. अशा ८-१० केस मध्ये ते रोज उपस्थित राहू शकतात.( हि माहिती मला माझ्या एका वकील रुग्णाने दिली आहे) असे काही शेकडा वकील सर्वोच्च न्यायालयात आहेत. यात कितीही पैसे टेबलाखालून घेणे सहज शक्य आहे. सी ए बद्दल अशीच वस्तुस्थिती आहे. डॉक्टरशी रोज रोज संबंध येत असल्याने डॉक्टरची किंमत राहिलेली नाही हि वस्तुस्थिती. "तुझे आहे तुजपाशी मधील संवादाची आठवण येत आहे. काकाजी आचार्यांना म्हणतात. आपण जंगलात जाउ तुम्ही तप करा मी शिकार करतो म्हणजे सारखा समाजाशी संबंध येणार नाही. समाजाशी जास्त जवळीक ठेवली तर पोरे सोरे दाढी ओढतात."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

दिवसाला एका हिअरिंगला ३-४ लाख

श्रीगुरुजी
Mon, 11/14/2016 - 15:05 नवीन
दिवसाला एका हिअरिंगला ३-४ लाख रूपये घेणारे सिब्बल, जेठमलानी यांच्यासारखे कुशल वकील संख्येने खूपच कमी आहेत. बहुसंख्य वकील त्यांच्या तुलनेत खूपच कमी पैसे घेतात. मुळात सर्वसामान्यांना वकीलाची गरज डॉक्टरांच्या तुलनेत खूपच कमी असते. इथल्या मिपा सदस्यांना विचारले की तुम्ही गेल्या १० वर्षात किती वेळा वकीलाच्या कार्यालयाची पायरी चढलात व किती वेळा डॉक्टरच्या दवाखान्यात गेलात तर काय उत्तर असेल? डॉक्टर्सची गरज समाजात खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या तुलनेत वकीलांची गरज खूपच कमी आहे. जेव्हा आरोग्य समस्या असतात तेव्हा रूग्ण पैशाचा फारसा विचार करीत नाही. सिर सलामत तो पगडी पचास हा विचार डोक्यात ठेवून महागडे उपचार घेतले जातात. एखाद्या वकीलाने गलेलठ्ठ फी सांगितली तर अशील लगेच ती मान्य करेल असे नाही. माझ्या घराजवळील एका गायनिक नर्सिंग होममध्ये रोज किमान १-२ शस्त्रक्रिया होतात. दोघेही नवराबायको डॉक्टर आहेत. त्यांची ओपीडी सकाळ संध्याकाळ तुडुंब गर्दीने भरलेली असते. ते चेक घेत नाहीत व कार्डही घेत नाहीत. फक्त रोख पैसे घेतात. पुण्यातील एक दुसरे अत्यंत प्रसिद्ध डॉक्टर प्रत्येक रूग्णाची तपासणी फी किमान ७०० रूपये घेतात. ते रोज किमान ४०-५० रूग्ण तपासतात. ते सुद्धा सर्व व्यवहार रोखीने करतात. अजून एक कॉस्मेटिक डेंटिस्ट आहेत. त्यांची प्रत्येक रूग्णाची फी ४०००० च्या आसपास आहे (संपूर्ण ट्रीटमेंट). सध्या कोणत्याही दवाखान्यात गेल्यावर किमान ८-१० रूग्ण आपल्याआधी असतातच. असे किती वकील असतील ज्यांच्याकडे ८-१० अशील वेटींग मध्ये बसलेले आहेत? डॉक्टरांची गरज खूप जास्त व त्याप्रमाणात त्यांचे उत्पन्नही आहे. बहुसंख्य डॉक्टर्स रोखीने व्यवहार करतात. त्यामुळे त्यांनी ठरविले तर वकीलांच्या तुलनेत ते कितीतरी जास्त प्रमाणात बेहिशेबी पैसा निर्माण करू शकतील. ते असे करतातच असे मी म्हणत नाही. परंतु त्यांना वकीलांच्या तुलनेत जास्त संधी आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

असे किती वकील असतील

मार्मिक गोडसे
Mon, 11/14/2016 - 16:23 नवीन
असे किती वकील असतील ज्यांच्याकडे ८-१० अशील वेटींग मध्ये बसलेले आहेत?
नसतीलही वेटिंगमध्ये बसलेले अशील किंवा केबीनमध्ये वकील, परंतू बरेचसे वकील जमीन , प्लॉट खरेदीविक्रीचे व्यवहार करतात अशा व्यवहारातून मिळणारे उत्पन्नही रग्गड रोखीत असतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कारण वकील व सीए ची गरज

मार्मिक गोडसे
Sun, 11/13/2016 - 21:02 नवीन
कारण वकील व सीए ची गरज तुलनेने कमी नागरिकांना असते व त्यांची फी देखील डॉक्टरांच्या तुलनेत कमी असते.
पाझरणार्‍या माठासारखी वकीलाची फी असते. माठातील पाणी संपल्यावर फीचा आणि त्या वकीलाचा फोलपणा ल़क्षात येतो.
  • Log in or register to post comments

असेल. परंतु वकीलाची गरज

श्रीगुरुजी
Sun, 11/13/2016 - 21:05 नवीन
असेल. परंतु वकीलाची गरज सर्वांना आणि कायमच लागते असे नाही. डॉक्टरची गरज मात्र सर्वांना आयुष्यभर लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

मेडिकल गोरखधंदा

चित्रगुप्त
Sun, 11/13/2016 - 21:43 नवीन
डॉक्टरे ही एकेकटी नसून त्यांच्यासोबत पॅथॅलॉजीवाले, जड्व्याळ औषध कंपन्या, मोठमोठे दवाखाने, औषध विक्रेते, मेडिकल इन्शुरन्सवाल्या कंपन्या वगैरे असतात, त्या महाजालात--- योग्य आहार आणि व्यायाम यांनी बर्‍या होऊ शकणार्‍या व्याधिंसाठीसुद्धा --- अनेक लोक जन्मभरासाठी अडकलेले रहात असतात. खरेतर या सर्व गोरखधंद्याबद्दल एक स्वतंत्र धागा असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

यात सिटीस्कॅन करणारे सेंटरची

मदनबाण
Mon, 11/14/2016 - 12:02 नवीन
यात सिटीस्कॅन करणारे सेंटरची भर घाला... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Daily currency exchange, ATM withdrawal limits increased as banks start releasing new Rs 500 notes
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

डॉक्टरांच्या तुलनेत वकिलाला

मार्मिक गोडसे
Sun, 11/13/2016 - 21:20 नवीन
डॉक्टरांच्या तुलनेत वकिलाला त्याच्या केससाठी किती गुंतवणूक करावी लागते ? तो किती जणांना त्याच्या फीची पावती देतो?
  • Log in or register to post comments

वकील अशिल मिळविण्यासाठी

श्रीगुरुजी
Sun, 11/13/2016 - 23:05 नवीन
वकील अशिल मिळविण्यासाठी धावाधाव करत असतात. डॉक्टर असे करताना दिसतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

लेख आवडला!

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 11/13/2016 - 23:06 नवीन
लेख आवडला!
  • Log in or register to post comments

किती टक्के ?

चित्रगुप्त
Mon, 11/14/2016 - 01:19 नवीन
एकूण लोकसंख्येच्या फक्त १ वा ३ टक्के लोक आयकर भरत असले, तरी देशातील एकूण जनसंख्येपैकी लहान मुले, वृद्ध, अपंग, गृहिणी इ. वगळता ज्यांनी आयकर भरायला हवा, असे लोक किती टक्के आहेत हेही ध्यानात घेतले पाहिजे (असे लोक किती आहेत?). युरोप-अमेरिकेत एकूण एक लोक आयकर भरतात का ? माझ्या अंदाजाप्रमाणे अरब, आफ्रिकन, भारतीय, बांगलादेशी, चिनी, पाकिस्तानी, मेक्सिकन वगैरे मोठ्या प्रमाणावर असलेले (अवैध रीत्या येऊन विविध कामे रोखीवर करणारे) कर भरत नाहीत, परंतु सरकारी योजनांचा बरोब्बर लाभ उचलतात.
  • Log in or register to post comments

एकूण लोकसंख्येच्या सुमारे 40

संदीप डांगे
Mon, 11/14/2016 - 01:27 नवीन
एकूण लोकसंख्येच्या सुमारे 40 टक्के कमावती लोकं आहेत, ह्यातल्या अर्ध्यांचे आयटी रिटर्न नुसते फाईल जरी झाले तरी धुमाकूळ होईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

२०११ च्या जनगणनेप्रमाणे २५ ते

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 11/14/2016 - 03:52 नवीन
२०११ च्या जनगणनेप्रमाणे २५ ते ६० च्या गटातच ४०% लोक होते. त्यापेक्षा कमी वयाचेही बरेच लोक काम करतात व जास्त वयाच्या सधन लोकांचे उत्पन्न करपात्र असू शकते. त्यामुळे हा आकडा अजून वाढेल. ह्यातल्या अर्ध्यांचे आयटी रिटर्न नुसते फाईल जरी झाले तरी धुमाकूळ होईल! +१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

आवश्यक पाऊल

चित्रगुप्त
Mon, 11/14/2016 - 01:30 नवीन
लेखाच्या एकंदरित आशयाविषयी सहमत. चोरी ही मानवाची आदिम सवय असावी, असे वाटते. मोझेसच्या टेन कमांडमेंटीत (आठवी आज्ञा), कौटिल्याच्या अर्थशास्त्रात, रामायणादि पुराणात, पतंजली योगसूत्रात, जैन ग्रंथात वगैरे चोरी करू नये या अर्थाचा उपदेश यामुळेच असणार. अर्थात या उपदेशाचा परिणाम फक्त मुळातच सज्जन असणारांवरच काय तो होतो (म्हणजे ते तसे आपल्या मुलांना उपदेशितात), इतरांना कठोर शासनातूनच ते शिकवावे लागते. या दृष्टीतून मोदींनी उचललेले पाऊल आवश्यकच आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख. आशय खरा असल्याने

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 11/14/2016 - 03:53 नवीन
सुंदर लेख. आशय खरा असल्याने सहमत.
  • Log in or register to post comments

काल भाषणात मोदीजीनी स्पष्ट

विवेकपटाईत
Mon, 11/14/2016 - 08:33 नवीन
काल भाषणात मोदीजीनी स्पष्ट केले, जनधन खाते का उघडले. आज ज्यांनी सरकारला कर दिला नाही ते आता गरिबांना कर(लाईनीत उभी राहण्याची दिहाडी किंवा खाते वापरण्याचे कमिशन)देत आहे. विचार करा २ लक्ष कोटी जरी बदलले तरी गरिबांच्या खात्यात / कमाई किमान ५०,००० हजार कोटी तरी होईलच. आई वडिलांच्या खात्यात पैशे जमा करीत आहे. सरकारी थकबाकी देत आहे. आपण सरकारला काही मात्रेत कर दिला पाहिजे हा धडा निश्चित लोकांना मिळेल. शिवाय digital भारताच्या दिशेने पाउले टाकण्याची सुरुवात हि. शिवाय लक्ष्मी चंचल असते, एका जागी बंद केल्याचे परिणाम असेच होतात. पहिले लुटारू लुटून घेऊन जायचे आज सरकारने लुटले. म्हणून गरजेपेक्षा जास्त पैसा समाज कल्याणासाठी वापरला पाहिजे.
  • Log in or register to post comments

कैच्या काय

कपिलमुनी
Mon, 11/14/2016 - 10:14 नवीन
काहीही लिहीला आहे ! पण चष्मा घालुन लिहीला आहे सो प्रतिवाद करुन उपयोग नाही
  • Log in or register to post comments

बरं

इरसाल
Mon, 11/14/2016 - 13:58 नवीन
तुम्ही खालुन १३ वी १४ वी ओळ सोडुन वाचा म्हणजे चष्मा घालुन लिहीलेला नाही याची जाणीव होईल. हाकानाका !!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

लेखकाच्या आशयाशी सहमत, जे लोक

साधा मुलगा
Mon, 11/14/2016 - 12:17 नवीन
लेखकाच्या आशयाशी सहमत, जे लोक पूर्वी कर चुकवायचे, ते आता ५००, १००० च्या नोटा( मग white असोत कि black ) खपवायला म्हणून कर भरत आहेत, हेच कर पूर्वी नियमितपणे का भरत नव्हते? नोटा बंद करण्यामागे हा उद्देश नसेल पण त्यातून जर कर भरला जात असेल, तर चांगली गोष्ट आहे. आता एवढा जमा झालेला पैसा स्थानिक स्वराज्य संस्थांनी लोकांच्या भल्याकरता वापरावा आणि त्यात पुन्हा भ्रष्टाचार होऊ नये एवढीच अपेक्षा.
  • Log in or register to post comments

छान लेख

पाटीलभाऊ
Mon, 11/14/2016 - 12:59 नवीन
छान लेख
  • Log in or register to post comments

१ टक्का जनता...

होकाका
Mon, 11/14/2016 - 15:24 नवीन
१ टक्का जनता... माहिती: http://indianexpress.com/article/india/india-news-india/data-shows-only-1-of-population-pays-income-tax-over-5000-pay-more-than-1-crore-2779065/
  • Log in or register to post comments

या कलियुगात डॉक्टर व वकीलाकडे

Ram ram
Mon, 11/14/2016 - 21:29 नवीन
या कलियुगात डॉक्टर व वकीलाकडे जायची वेळ कोणावरही येउ नये,
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा