मोदी, ट्रंप आणि लोकसत्ता

जानु's picture
जानु in काथ्याकूट
9 Nov 2016 - 9:04 pm
गाभा: 

http://www.loksatta.com/videos/vishesh-vartankan/1335662/us-election-201...
गेल्या काही दिवसात अमेरिकन निवडणुकांवरील लोकसत्ता मधील सदर वाचत होतो. त्यातच मागील काही दिवसापासुन भारतातील एन डी टी व्ही चे बंदीपुराण चर्चेत होतेच. मुळात एक्सप्रेस समुह हा सत्ताधार्‍यांच्या विरोधात लिहणारा आणि थोडा बातमी मागे किंवा पडद्यामागे पाहणारा असल्याने दररोज वाचतो. तसा दुसरा काही योग्य पर्याय नाही हे महत्वाचे कारण. हे माझे मत. गिरीश कुबेर संपादक झाल्यापासुन जरा 'सुमार' झाल्यासारखा वाटत होता. त्यात या अमेरिकन निवडणुकीच्या एककल्ली वार्तांकनाने जास्तच सुमार भासत होता. त्यावर आज ट्रंप निवडीने शिक्कामोर्तब झाले.
सर्वात आश्चर्य म्हणजे आजचे लोकसत्ताच्या वरील लिंक वरील गिरीश कुबेरांचे ट्रंप यांच्या निवडीवरील भाष्य पाहिले. त्यात त्यांनी आपले मत आणि वार्तांकन चुकले असे न म्हणता सरळ सरळ अमेरिकन जनता आणि लोकमत असमजुतदार आणि संकुचित झाल्याचा आरोप लावला. त्यांच्या निवडीने जगातील शांतता आणि सहयोग, बंधुता या सारख्या सदगुणांचा र्‍हास होतांना दिसत आहे. त्यांचे हे मत म्हणजे कळस आहे. खरच जनता इतकी मुर्ख असते का? मुळीच नाही. उलट हे फुरोगामी आपल्या प्रेमात ईतके बुडालेत की त्यांना सारासार विचार आणि जनमत यावर निरपेक्ष विचार शक्य होत नाही का?
मोदींच्या वेळीही असेच झाले होते. यांनी आपली मते लोकांवर लादण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. आजही ते लोकांचे कसे चुकले तेच थोडी भाषा बदलुन सांगत असतात. या फुरोगाम्यांच्या हे लक्षात कसे येत नाही की आपण दुसर्‍या बाजुचा विचार केला पाहिजे? या फुरोगाम्यांचे मोदी आणि ट्रंप या निवडणुकीत नुसतेच अंदाज चुकले नाहीत तर त्यांची आजपर्यंची खोट्या प्रचाराची मेहनत वाया गेल्याचे शल्य दिसते आहे. भारतात आणि अमेरिकेत उजव्या विचारांच्या विरोधात या डाव्यांची आणि धर्मनिरपेक्ष विचारांमागे दहशतवाद लपविणार्‍या वैचारिक फळीची विफलता आता समोर आलेली आहे. पण ते एका जुगार्‍यासारखे हरत चालले आहेत. प्रत्येक वेळी ते आपल्या चुकांमधुन, वैचारिक दारिद्र्याचे प्रदर्शन करुन मोदींना आणखी वेगाने जनतेत लोकप्रिय करीत आहेत. जे एन यु, उरी, सर्जीकल स्ट्राईक, नोटांचा बदल या प्रसंगी हे दिसुन आले. यात राजकीय आणि लोकप्रियतेत मोदी बाजी मारतांना दिसत आहेत. हेच आता ट्रंप निवडुन आल्यावर तेथील काही अमेरिका सोडुन जाण्याची भाषा करतांना ऐकले आहे. फक्त जागा बदलली की काय? हिलरी समर्थक जाळपोळ करीत आहेत. (ही एखादीच घटना असु शकते.)
खरच भारतात आणि जगात उजव्या शक्तींचा उदय झाला आहे का? भविष्यात यांची शक्ती अशीच वाढणार का?

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

9 Nov 2016 - 9:20 pm | चित्रगुप्त

ट्रंप यांच्या विजयामुळे अमेरिकेतील गोर्‍या आणि भारतीय लोकांच्या जीवनावर, जागतिक राजकारणात, अतिरेकी शक्तींवर वगैरे काय काय परिणाम घडून येण्याची शक्यता आहे, यावर तज्ञ मंडळींचे तर्क वाचायला मिळावेत, ही अपेक्षा.

खटपट्या's picture

9 Nov 2016 - 9:22 pm | खटपट्या

माझी खरडफळ्यावरची खरड इथे डकवतो.

ट्रम्प जींकलाय यावर बर्‍याच अमेरीकनांचा विश्वास बसत नाहीये. मोदी निवडून आल्यावर काही लोकांची चीडचीड झाली होती तशीच काहींची झालीय. काही अमेरीकन्स टोकाच्या प्रतीक्रीया देतायत.
मला तर मोदी आणि ट्रम्प या दोघांचा विजय समान वाटतोय. दोघेही टोकाचा विरोध आणि टीका पत्करुन निवडून आलेत. दोघांची यथेच्च हुर्यो उडवली गेली. दोघे विरोधकांना पुरुन उरले.
मोदी गेली दोन वर्ष स्वत:ला सीध्द करुन दाखवतायत. ट्रम्पराव काय करतात पाहूया. अमेरीकन वीसा मिळणे मुष्कील होउ शकते असे वाटतेय...नोकर्‍या देशाबाहेर घेउन जाणार्‍या उद्योगांना ३५% कर आकारणार म्हणतोय. बघूया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 Nov 2016 - 10:15 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

लोकशाही म्हटली की हे आलेच.निवडून देणारे अपरिपक्व वगैरे म्हणण्याला अर्थ नसतो असे ह्याण्चे मत.तेथील स्थानिक लोकांना नोकर्या हव्या आहेत..ईतर देशातील लोक जास्त नको आहेत.एका विशिष्ट धर्मातील लोकांची नागरिकांना चीड आहे..ही वस्तुस्थिती नाकारून कसे चालेल?
ट्रंपाने हे नेमके मुद्दे उचलले.. उगीच आदरभाव्,बंधुता करीत बसला नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Nov 2016 - 7:15 am | llपुण्याचे पेशवेll

तो विशिष्ठ धर्म म्हणजे हिंदू धर्म दिसतोय. नाही का हो माई? माईंचे 'हे' नाव घ्यायला पण घाबरतायत म्हणजे तोच असहिष्णू हिंदू धर्म असणार.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Nov 2016 - 10:33 pm | कैलासवासी सोन्याबापु

बोलण्यासारखे बरेच आहे पण सद्ध्या काथ्याकुटातून सन्यास घेतल्यामुळे बोलत नाही, असो. हे मस्तंय स्वतःचाच निग्रह तपासता येतो, त्याबद्दल (हक्काने आमच्यायाच) नाखु काकांचे आभार

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Nov 2016 - 10:44 pm | कैलासवासी सोन्याबापु

सॉरी नाखु काका, मी धागा लेखक नाव चुकून नाखु वाचलेन =))

नाखु's picture

10 Nov 2016 - 8:30 am | नाखु

त्या निमित्ताने याद केली हे काही कमी नाही.

यच्चयावत जगातलं सगळ आपल्यालाच कळतं आणि तेच बरोबर असतं याकरिता सामना संपादकीय आणि लोकसत्ता संपादकीय यांच्यात फारसा फरक नाही.(आणि एनवेळी शेपुट घालण्यातही)

लेख मुद्देसुद बनलाय

बाप्पुचा मित्र नाखु

तेजस आठवले's picture

9 Nov 2016 - 10:35 pm | तेजस आठवले

दुसरा चांगला पर्याय नसल्याने लोकसत्ता आणला जातो. मात्र लोकसत्ता आता वाचनीय राहिला नाही. मधूनच एखादा लेख गिरीश कुबेर टच जाणवून देतो, जो त्यांच्या पुस्तकांमधून दिसायचा. अग्रलेख मात्र मोदी निवडून आल्यापासून तेचतेच वाटतात. म्हणजे मी एक ग्रेव्ही बनवून ठेवली की मी रोज वेगवेगळ्या भाज्या घालून नवीन डिशेस बनवू शकतो तसे. मोदीविरोधाचे अग्रलेख लिहून तयार आहेत, रोज त्यात काहीतरी नवीन आणि नसले तर जुन्या भाज्या घालून रोजची डिश बनवावी तसे काहीसे झाले आहे. बऱ्याचदा काहीतरी लिहायचे म्हणूनच लिहितात की काय असे वाटते.लोकांचा बुद्धिभेद करणे हे एकच काम इतकी वर्षे होत आहे. आधी सुमार केतकर असताना व्हायचे, आता कुबेर तो वारसा चालवत आहेत. याकूब मेनन ची फाशी म्हणजे न्यायव्यवस्थेने केलेली चूक आहे असा आशय त्यांच्या अग्रलेखात होता. आपण सोडून बाकी सगळे हे मूर्ख आहेत आणि मलाच कसे सगळ्यातले सगळे कळते असा सूर रोज असतो.

बाकी सर्जिकल स्ट्राईक मोदींनी आपले घसरणारे स्थान सावरण्यासाठी केले असे लिहिणार्यांना नोटा रद्द करण्याचा निर्णय म्हणजे वेडगळपणाचा वाटणे साहजिकच आहे म्हणा.काहीतरी करून दाखवण्यासाठी हे त्यांनी केले बरे.

बाकी ह्या निर्णयाने मोदींनी बऱ्याच लक्ष्यांवर अचूक निशाणा साधला आहे हे मात्र खरे.

ज्योत्स्ना's picture

9 Nov 2016 - 10:53 pm | ज्योत्स्ना

लोकसत्तामधिल अग्रलेखांबद्दल अगदि सहमत.काहीही आत्मप्रौढी असते स्वतःच्या बौद्धीक क्षमते विषयी.

वरुण मोहिते's picture

9 Nov 2016 - 10:58 pm | वरुण मोहिते

परत ते लिहतात पण चांगलं .. पण होतं काय ह्यांना धोरण असेल काम करावं लागत .

जयन्त बा शिम्पि's picture

10 Nov 2016 - 2:34 am | जयन्त बा शिम्पि

श्री. नरेन्द्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय सारखाच कसा म्हणता येईल ? ट्रम्प ने प्रचारादरम्यान स्वत:च बेताल वक्तव्ये करुन, स्वतःची क्रुत्ये उघड झाल्याने ,विरोधकांना टीका करण्याची संधी दिली, तर मोदी यांनी, लोकांच्या मनात असलेली खांग्रेसबद्दलची मळमळ व्यक्त केली.विरोध तर दोघांनाही झाला, पण लोकांच्या मनातील आशा, आकांक्षा यांना
खतपाणी घालण्याचे काम श्रीयुत मोदींनी केले तर डेमॉक्रटवाल्यांचे धोरण, विशेषतः हिलरी क्लिंटनच्या चुका देशाला कशा घातक ठरल्या आहेत हे पटवून देण्याचे काम ट्रम्पला जमले. त्यातही एफबीआय चे प्रमु़ख श्री. कोमे यांनी, ऐनवेळी, ज्या गोष्टीतुन काहीही निष्कर्ष निघत नव्हता, तीच गोष्ट पुन्हा जाहीर करुन, जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला, अन्यथा निकाल वेगळाच लागला असता असे भासत होते.

क्लिंटन स्वतः किती ते माहीत नाही (असणार नक्कीच) पण त्यांचे एकंदरीत सहकारी जास्तच माजात चालले होते ज्याचा परीणाम म्हणून बर्नी सँडर्सचे डेमोक्रॅट्स आणि इतर अनेकांनी एकतर ट्रंपला मते दिली अथवा थर्ड पार्टी उमेदवारास मते दिली...

Wikileaks: Gabbard Received Spiteful Email From Fundraisers Over Sanders Support
http://dailycaller.com/2016/10/14/wikileaks-gabbard-received-spiteful-em...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Nov 2016 - 9:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> सरळ सरळ अमेरिकन जनता आणि लोकमत असमजुतदार आणि संकुचित झाल्याचा आरोप लावला. त्यांच्या निवडीने जगातील शांतता आणि सहयोग, बंधुता या सारख्या सदगुणांचा र्‍हास होतांना दिसत आहे. त्यांचे हे मत म्हणजे कळस आहे.

यात चूक काय आहे ?

आज दै.लोकमतमधे प्रकाश बाळ यांचा चांगला लेख आहे. डोनाल्ड ट्रम्प जिंकले, पण अमेरिका हरली. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, 'ट्रम्प ज्या धोरण चौकटीच्या आधारे जनमत वळवू शकले, ती अमेरिकेनं गेल्या २५० वर्ष जपलेल्या सर्व मुल्यांना बाजूला सारणारी आहे. पराकोटीचा वर्णद्वेष, स्त्रीकडं एक उपभोगाचं साधन म्हणून बघणारा, टोकाचा तोंडाळ व कोठलाही विधिनिषेध नसणारा असा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा पूर्णवेळ उठवळ व बाहेरुन पक्षात आलेला नेता उमेदवारी पदरात पाडून घेतो हेच मुळात आश्चर्यकारक होतं.

अशा माणसाला निवडून देण्याची अजून काही ठोस कारणं असतीलही जशी बेरोजगारी, आपण आपलं बघावं ही भावना, वगैरे, पण सर्वात मोठी पिछेहाट झाली ती उदारमतवाद्यांची असे वाटते.

बाकी, जाणकारांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे

हतोळकरांचा प्रसाद's picture

10 Nov 2016 - 10:36 am | हतोळकरांचा प्रसाद

तोंडाळ , वाचाळ इथंपर्यंत ठीक आहे पण वर्णद्वेष (आणि तोही पराकोटीचा) किंवा स्त्रीकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहणारा वगैरे जरा जास्त वाटते. दहशतवादाबद्दलचं ट्रम्प यांचं मत आणि भारतातील बहुतांशी लोकांचा दहशतवाद आणि गुन्हेगारीबद्दलचं मत हे फारसं वेगळं नसावं. म्हणून सगळे लगेच वर्णद्वेषी कसे मानायचे. ट्रम्प यांचे अकरा वर्षापूर्वीचे भिंतींआडचे संभाषण हाताशी धरून त्यांची प्रतिमा अगदीच ढासळवण्याचा (अगदी त्यांच्या समर्थकांनी ट्रम्प यांचे नग्न पुतळे लावणे हा सुद्धा) प्रयत्न क्लिंटन यांच्या अंगाशी आला नसेल कशावरून? मला वाटते क्लिंटन यांचा प्रचार मुख्यत्वे ट्रम्प वैयक्तिक कसे वाईट आहेत यावरच दिसत होता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Nov 2016 - 12:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ट्रम्प यांच्या रॅलीत निग्रोंना होणारी मारहाण तसंच गोर्‍यांच्या हत्या निग्रोनींच केल्या असं ट्वीट वगैरे केले होते ना त्यांनी. ओबामांची जन्मदाखल्याची मागणी करणे, मुस्लीमांना या देशातून हाकलून लावणे, वगैरे.

ट्रम्प काय आणि हिलरी काय दोघंही भांडवलदारांचे प्रतिनिधी. एखादा बर्नी सँडर्ससारखा समाजवादी जर अध्यक्षपदाच्या शर्यतीत पुढे आला असता तर काही वेगळं घडलं असतं असं म्हणता आलं असतं. सध्या दगडापेक्षा वीट बरी असे म्हणन्याशिवाय अमेरिका जनतेकडे पर्याय नसावा असे वाटते.

-दिलीप बिरुटे

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Nov 2016 - 2:57 pm | llपुण्याचे पेशवेll

का समाजवाद म्हणजे लई भारी असं काही आहे का? मग नेहरूंच्या समाजवादी भारताने नेत्रदीपक वगैरे प्रगती कशी बरी केली नाही?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Nov 2016 - 3:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>का समाजवाद म्हणजे लई भारी असं काही आहे का ?

थोडं बरं असतं, आर्थिक असमानता वगैरे मुद्दे असतात. गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होण्याची शक्यता कमी असते

>>>> नेहरूंच्या समाजवादी भारताने नेत्रदीपक वगैरे प्रगती कशी बरी केली नाही?

पं नेहरुंची लोकशाही आणि त्यांचा समाजवाद मला नेहमीच भावला. तो सर्वांनाच भावला पाहिजे असे काही नाही.

-दिलीप बिरुटे

इष्टुर फाकडा's picture

11 Nov 2016 - 3:06 am | इष्टुर फाकडा

प्रा., नेग्रो वगैरे शब्द वर्णद्वेश सुचवतात. अर्थात, तुम्हाला तसे म्हणायचे नसेलच.
बाकी, मोदी आणि ट्रम्प यांची तुलना करणाऱ्यांची काळजी वाटते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Nov 2016 - 7:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

वी हेट मुस्लिम्स, वी हेट ब्लॅक
वी वॉन्ट अवर ग्रेट कंट्री बॅक

शिवाय ते

"ग्रॅब देम बाय द पु*" वगैरे नवसर्जनात्मक बीजमंत्र आपणाला माहिती आहेत अन रुचले आहेत का??

हे तुम्हाला पटते का? पटत असल्यास आमचे काहीच म्हणणे नाही, धन्यवाद.

हतोळकरांचा प्रसाद's picture

11 Nov 2016 - 11:32 am | हतोळकरांचा प्रसाद

गल्लत होतेय बाप्पु! त्याने मला किंवा त्याच्या तथाकथित अनुयायांना अनुसरण करण्यासाठी ती गोष्ट सांगितली होती असं म्हणायचं आहे का आपल्याला? मला पटण्या न पटण्याचा प्रश्नच कुठे येतोय? एखाद्याने भिंतीआड त्याची फँटसी त्याच्या मित्राला बोलून दाखवली याचा अर्थ तो सार्वजनिक आयुष्यात तसाच वागेल असं म्हणणं आत्यंतिक आहे असं मी वर म्हणालो. अवांतर : कोणीही सार्वजनिकरित्या लैंगिक रम्यतेवर अथवा अश्लीलरित्या बोलण्याला माझा वैयक्तिक विरोध आहे.

राहता राहिला प्रश्न तुम्ही वर उल्लेख केलेल्या घोषणांचा तर त्या ट्रम्प यांनी दिल्या आहेत का हे मला माहित नाही आणि दिल्या असतील तर त्या स्पष्टपणे निषेधार्ह आहेत. आणि जर त्या त्यांच्या अनुयायांच्या कल्पनाकोषातील असतील तर मग इथे भारतातातही मोदींना अडचणीत आणणारेही भरपूर आहेतच की (आता हि तुलना नसून उदाहरण आहे समजून घ्यावे).

प्रसाद_१९८२'s picture

10 Nov 2016 - 11:48 am | प्रसाद_१९८२

आज दै.लोकमतमधे प्रकाश बाळ यांचा चांगला लेख आहे.

हम्म.

मी ट्रम्प अथवा हिलरी समर्थक नाही पण इकडे मोदी साहेब निवडून आल्यावर इकडच्या काही कलाकारांनी जश्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या उदा. देश सोडून जावे वाटतय, तश्याच प्रतिक्रिया तिकडे काही हॉलीवूड च्या कलाकारांनी दिल्याची बातमी वाचली.

ट्रम्प साहेब राष्ट्राध्यक्ष झाल्याने आपल्यावर काय फरक पडणार आहे एवढंच सध्या भारताच्या दृष्टीने महत्वाच!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Nov 2016 - 9:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> देश सोडून जावे वाटतय, तश्याच प्रतिक्रिया तिकडे काही हॉलीवूड च्या कलाकारांनी दिल्याची बातमी वाचली.

मलाही तेच आठवलं. आज जवळ जवळ सर्वच मराठी दैनिकांनी चलनी नोटांकडून आणि त्याचा होणार्‍या त्रासाबरोबर, हिलरी आणि ट्रम्प यांच्या तुलनात्मक अभ्यासाकडे लक्ष वळवलं आहे. बाकी, कलाकारांच्या बाबतीत वाचनात आलं ते असं - कोणी म्हणालं, भयभीत झालो. आता स्वतःची काळजी वाटायला लागली आहे. प्रसिद्ध गायिका चेर इलियड, म्हणाली, युवा पिढीची काळजी वाटते, अभिनेत्री जेसिका कॅस्टेन म्हणते ' आमच्याकडे वंशवाद आणि लिंगभेद नाही, असा दावा आता यापुढे आम्हाला करता येणार नाही, आता आम्ही काय करायचे हा प्रश्न आहे. 'हे भितीदायक असून माझ्या डोळ्यात अश्रू आहे, पॉपस्टार अरियाना.

हे सर्व वाचून भारी वाटलं. देशभर आता कट्टरवाद्यांचा बोलबोला सुरु झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. (प्रा.डॉ. नका टाकू काडी)

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Nov 2016 - 12:34 am | डॉ सुहास म्हात्रे

थोडक्यात, भारत-अमेरिकेच्या लंगोटीयार दोस्तीचे पडघम वाजू लागलेत की काय ? =)) =))

विकास's picture

12 Nov 2016 - 1:41 am | विकास

अमेरीकेत सरकारी पारीतोषिक हा प्रकार नसतो. त्यामुळे अ‍ॅवॉर्डवापसी काही करता येणार नाही! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2016 - 9:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ट्रम्प यांच्या विरोधात निषेध मोर्चे निघाल्याचं आम्ही टीव्हीवर पाहिलं. आता दुसरा टप्पा अ‍ॅवॉर्डवापसी आहेच. देखते रहो, आगे आगे होता है क्या ? ;)

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

12 Nov 2016 - 9:49 am | नाखु

प्रा.डॉ. बिरुटे सर,

अच्छा बारामतीकर त्या साठी अमेरिकेला गेले होते तर !! मोर्च्याची आय्डीया द्यायला !

लोक उगा आपले तर्कट लढवित बसले होते.

amit१२३'s picture

10 Nov 2016 - 10:51 am | amit१२३

हिलरी समर्थक श्रीकृष्ण सामंत यांचा लेख आला नाही ते

संदीप डांगे's picture

10 Nov 2016 - 11:22 am | संदीप डांगे

ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर काही हिंदुस्थानी लोकांना आसुरी आनंद झालेला दिसतोय तो का? ;)

आता लोकशाहीची द्वाही देणाऱ्या उजव्या लोकांच्या पोस्टीं वाचून लय हसायला येतंय,

मोदी व ट्रम्प ची बरोबरी करू पाहणाऱ्याचं डोकं ठिकाणावर आहे का हाही प्रश्न आहेच!

मोदी व ट्रम्प ची बरोबरी करू पाहणाऱ्याचं डोकं ठिकाणावर आहे का हाही प्रश्न आहेच!

+११११११११११
तिकडे कोण आला गेला आपल्याला जास्त फरक नाही पडत.
रच्याकने माझा US मॅनेजर विचारत होता की भारतात कुठे शिफ्ट व्हायला बरं पडेल नॉर्थ की साऊथ ला. मी म्हणालो मुंबई ला ये. :)

अग्रलेखात ब्रेग्झिट बद्दल पण उल्लेख होता... त्याबद्दल आपले काही मौलिक विचार?

वेल्लाभट's picture

10 Nov 2016 - 11:32 am | वेल्लाभट

कुबेरांविषयीचं मत कधीच रसातळाला गेलंय. आणि ते वेळोवेळी त्या खालावलेल्या मताला योग्य सिद्ध करतायत.
रिडिक्युलस एडिटोरियल्स.

आजचे संपादकीय कालच्याच वळणावर आहे . माझे एक स्पष्ट मत आहे की उदारामत वाद हा वैयक्तिक सोई सुखसुविधा, सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य, भौतिक सुखसुविधा प्राप्त झाल्या की त्यानंतर सुचणारा प्रकार आहे. आज युरोपियन स्थलांतर, अमेरिकेतील आणि जगातील इस्लामी दहशतवाद यावर उपाय कोणाकडेही दिसत नाही. हा प्रकार सामोपचाराने संपेल असा कोणताही उपाय नजरेत नाही. वहाबी बोलून किंवा काही देवघेव करून हा प्रश्न सोडून देतील ही आशा कोणाला वाटते आहे का? उजव्या बाजूची भूमिका लोकांना का योग्य वाटते याचा कोणीच विचार करणार नाही का? या निकालांचा अर्थ सरळ आहे की आम्हाला स्थैर्य आणि शांतता हवी आहे आणि त्यासाठी आता सरळ टक्कर घेणारच योग्य असे जनतेचे मत झालेले दिसते. गुळमुळीत आणि झाकती एककल्ली भुमिका, धोरण कामाचे नाही. थोडे नुकसान झाले चालेल पण एकदाचा निर्णय लागेल. भारतात कालपासून विरोधी नेते मंडळी वगळता या निर्णयाला जनतेने स्विकारले आहे. मागील दोन वर्षात लोक मोदींच्या विरोधात नाहीत हे लक्षात घ्या. पुढील युरोपियन देशात निवडणुकीत झाल्या तर त्यातही असेच निकाल दिसले तर मग जनमत काय तर समजुन घ्या. आणि भविष्यही.

हे विचार चुकीचे ठरावेत आणि सगळे सुरळीत चालावे अशी इच्छा बाळगणारा .... जानु

वैभव पवार's picture

10 Nov 2016 - 1:37 pm | वैभव पवार

मोदीच्या आक्रमतेला नितिमत्तेचा आणि अध्यात्माचा अंकुश आहे. पण ट्राम्प बेलगाम आहे। त्या मुळे तो मोदी पेक्षा जास्त आहे.

वैभव पवार's picture

10 Nov 2016 - 1:44 pm | वैभव पवार

त्या दिवसी फे.बु वर ऑनलाईन कुबेर सरांना विचारलं होतं!
ट्राम्प येण्याची किती शक्यता आहे म्हणुन.
त्यांनी 10% सांगितली होती.
त्या दिवशी पैंज हरणार म्हणुन नाराज होतो.
पण शेवटी मी पण जिंकलो।
त्याच झालं अस की माझ्या आईनेसुद्धा लोकसत्तच्या हा मध्ये हा मिळवली होती!! :D :D ;P

मराठी कथालेखक's picture

10 Nov 2016 - 3:44 pm | मराठी कथालेखक

बाकी लोकसत्ता (अजूनही) गांभिर्याने वाचला जातोय ?

एस's picture

10 Nov 2016 - 3:51 pm | एस

सगळे मिपाकर लोकसत्ता वाचतात की काय? सतत याच पेप्राबद्दल धागे येतात.

संदीप डांगे's picture

10 Nov 2016 - 4:01 pm | संदीप डांगे

हा ना राव! त्याचे कारण एक उघड गुपित आहे :)

असंका's picture

10 Nov 2016 - 4:10 pm | असंका

कुणाला उघड आहे ते गुपित? आपल्याला व्यनि करून सांगायची विनंती केली तर व्यनीने सांगताल काय की काय गुपित आहे?

मराठी कथालेखक's picture

10 Nov 2016 - 4:50 pm | मराठी कथालेखक

काय बुवा.. उघडच आहे तर इथेही सांगा. ज्यांना माहित नाही त्यांना कळेल.

निरंजन._.'s picture

10 Nov 2016 - 7:49 pm | निरंजन._.

मी रोज (आवडीने) लोकसत्ता वाचतो, तुम्ही म्हणताय ते गुपित जाणुन घ्यायला आवडेल.

श्रीगुरुजी's picture

11 Nov 2016 - 1:08 pm | श्रीगुरुजी

लोकसत्ता आणि मटा आता विचित्र पद्धतीने चालविले जात आहेत. सामनाच्या रोजच्या अग्रलेखात जे जे तारे तोडलेले असतात, ते ही दोन्ही वृत्तपत्रे "उद्धव ठाकरेंनी मोदींना सणसणीत टोला हाणला", "मोदींना घरचा आहेर", "मोदी उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर" इ. मथळे देऊन छापत असतात. ज्यांना सामना वाचायचा आहे ते वाचतील की. तुम्ही कशाला इथे सामनाची फुकट प्रसिद्धी करता? का तुमचे अग्रलेख कोणी वाचणार नाही म्हणून सामनाचे अग्रलेख इथे छापता? का तुम्हाला मोदींना शिव्या द्यायची भीति वाटते म्हणून सामनाने दिलेल्या शिव्या इथे छापता? निव्वळ मूर्खपणा सुरू आहे. प्रतिस्पर्धी वृत्तपत्राचे अग्रलेख नियमितपणे छापणे हा प्रकार पहिल्यांदाच सुरू झाला आहे आणि हा मूर्खपणा या दोन वृत्तपत्रांनी सुरू केला आहे. "सकाळ" असे करताना दिसत नाही. काही वाहिन्या देखील सामनाचे अग्रलेख बातम्यात दाखवितात. हा काय प्रकार आहे? उद्धव ठाकर्‍यांचे अग्रलेख म्हणजे काय आचार्य अत्र्यांचे अग्रलेख आहेत का लोकमान्य टिळकांचे अग्रलेख आहेत? सामनात जे जे छापले जाते ते जवळपास सर्व लिखाण कचरा या प्रकारात मोडते. पण मटा आणि लोकसत्तावाल्यांना त्याचे भारी कौतुक.

लोकसत्ताने आज अजून एक कडी केली आहे. "मोदींच्या गुजरातमध्ये सात महिन्यांपूर्वीच नोटा रद्द?" या मथळ्याखाली एप्रिल फूल असलेली १ एप्रिलला एका गुजराती वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली नोटा रद्द करण्याविषयी प्रसिद्ध झालेली फेक न्यूज छापून मोदींवर संशय व्यक्त केला आहे. नोटा रद्द करण्याचा निर्णय ७ महिन्यांपूर्वीच गुजराती जनतेला समजला होता तर तेव्हापासूनच तिथे नोटा बदलण्यासाठी रांगा का लागल्या नव्हत्या? ही बातमी देशात इतरत्र का पसरली नव्हती? दरवर्षी १ एप्रिलला आम्ही एप्रिल फूल असलेल्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करतो असा खुलासा करून सुद्धा "या नोटा ठरावीक तारखेपर्यंत जवळच्या बँकांमध्ये जमा करा, दर दिवशी फक्त दोन हजार रुपयांपर्यंतच पैसे बँकेत जमा करण्यास परवानगी आदी नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, ८ नोव्हेंबर रोजी आपल्या भाषणात जाहीर केलेला सर्व तपशील जसाच्या तसा या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या बातमी नमूद आहे. " असे छापून लोकसत्ताने मूर्खपणाचा कळस केला आहे. म्हणजे मोदींचे ८ नोव्हेंबरचे भाषणही ७ महिन्यांपूर्वीच गुजरातमधील या वृत्तपत्राला समजले होते असा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

http://www.loksatta.com/mumbai-news/narendra-modi-cancel-currency-seven-...

कुमार केतकरांच्या काळात लोकसत्ताची विश्वासार्हता रसातळाला पोहोचून त्याचे काँग्रेसच्या मुखपत्रात रूपांतर झाले होते. गिरीष कुबेर आल्यावर काही काळ परिस्थिती बदलली होती. परंतु आता जे काही सुरू आहे त्यात मूर्खपणाचा भाग जास्त दिसत आहे.

विकास's picture

12 Nov 2016 - 1:55 am | विकास

२००० साली सिंप्सन नामक अमेरीकन कार्टून मालीकेत ट्रंप प्रेसिंडट होणार म्हणून सांगितले होते... आता काही जणांना माहीत नसल्याने त्याचा धक्का बसला इतकेच. ;)