Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by साहना on गुरुवार, 11/10/2016 - 03:06
मी स्वतः मिल्टन फ्रीडमन किंवा हायेक ह्यांच्या पठडीतील लिबरटेरिअन असल्याने ट्रम्प किंवा हिलरी दोघां पैकी कुणीही मला आवडत नाही. पण वास्तवांत दोघां पैकी एक कुणीतरी प्रेसिडेंट होणार असल्याने ट्रम्प निवडून यावा हीच अपेक्षा होती. निवडणुकी आधी : प्रचाराच्या रणधुमाळीत ट्रम्प म्हणजे साक्षात राक्षस आहे अश्या प्रकारची इमेज हिलरींच्या कंपूने केली होती. त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी सुद्धा ठरले होते. ट्रम्प समर्थकांचे बऱ्यापैकी सोशल बुलिन्ग सुद्धा केले जात होत होते. अनेक विद्यार्थी ज्यांना ट्रम्प आवडत होता ते स्पष्ट पाने बोलायला सुद्धा भीत होते. ट्रम्प च्या कंपूने हिलरी ह्यांना खोटारडी, भ्रष्टाचारी, वृद्ध, थकलेली आणि नालायक अश्या पद्धतीने चित्रित करण्याचे ठरवले होते. ह्यांतील सर्व विशेषणे बहुतेक करून सर्वच लोकांना ठाऊक होती. ट्रम्प ह्यांनी हिलरी विरुद्ध नवीन असे काही आणले नाही तरी विकिलिक्स आणि FBI चे कोमी ह्यांनी वेळोवेळी केलेले खुलासे ह्यामुळे हिलरी ह्यांची प्रतिमा अनेक अनिश्चित वोटर्स मध्ये डागाळली गेली. मीडिया: अमेरिकन मीडिया मध्ये दोन गट आहेत. एक आहे फॉक्स चॅनल जो एकमेव उजवा चॅनेल आहे. दुसऱ्या बाजूने आहेत CNN, ABC, NBC इत्यादी हे सर्व डावे आहेत. पण मार्केट शेयर जर पहिला तर फॉक्स इतर सर्व चॅनल पेक्षा जास्त दर्शक खेचतो (combined). पण डाव्या चॅनल्स ची लोकप्रियता तरुण मुलां मध्ये जास्त असल्याने इंटरनेटवर इत्यादी डावा प्रचारच जास्त दिसून येतो. म्हणून कुठल्याही विषयवार मीडियाचे मत मी थोडे मिनिट लावूनच घेते. फॉक्स वर वैचारिक विविधता फार जास्त आहे. स्टोसेल, जज नेपोलितांनो, केनेडी इत्यादी मंडळी libertarian असून republican लोकांवर टीका करताना आढळून येतात. बिल ओरिएली (अमेरिकेतील सर्वाधिक पहिला जाणारा शो) हा फारच उजव्या बाजूचा पत्रकार आहे. फॉक्स वरील सर्वच अँकर मंडळी पत्रकार नाहीत. बिल ओरिएली पत्रकार आहे पण द्वितीय नंबरची अँकर केली पेशाने वकील होती. जज नेपोलितांनो जज होते. केनेडी रेडिओ आणि रॉक शो ची होस्ट होती. हेनिटी, ब्रेट, इत्यादी मंडळी मात्र आधी पासून पत्रकार होती. ब्रेट हे अमेरिकेतील सर्वाधिक विश्वासू न्यूज अँकर मानले जातात. ओबामा हे जाणूनबुजून फॉक्स न्यूस बद्दल भेदभाव ठेवून आहेत असा एक खुलासा मध्ये झाला. त्यातील इमेल जे लीक झाले होते तिथे ओबामांच्या सहाय्यकांनी ब्रेट ह्यांना "lunatic" अश्या शब्दांत संबोधिले होते. अमेरिकेतील ९६% पत्रकार लिबरल्स आहेत. जॉन स्टीवर्ट हे १ क्रमांकाचे डावे अँकर (daily शो) आहेत (पण trp मध्ये बिल ओरेली च्या जवळपास सुद्धा येत नाहीत). स्टीवर्ट हे बहुतेक वेळा डावी बाजू घेत असले तरी कुठल्याही राजकारण्यांच्या ते खिशांत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल. ओबामा ह्यांची खिल्ली सुद्धा त्यांनी उडवली आहे . अमेरिकेतील द्वितीय क्रमांकाचे पत्रकार म्हणजे स्तंभ लेखक, अर्थशात्राचे नोबेल विजेते, आपल्या भगवती ह्यांचे विद्यार्थी श्री पॉल क्रुगमन. मी डाव्या विचारसरणीची नसले तरी डाव्या विचारवंतांशी सहानभूती ठेवते. पण क्रुगमन म्हणजे अमेरिकन मणी शंकर एयर ! ह्यांचे नोबेल विजेते काम होते ते prodigy ह्या दर्जाचे होते. जवळ जवळ सर्वच लोकांनी ह्यांची तोंड भरून स्तुती केली होती. पण लगान करणाऱ्या गोवारीकरानी "व्हाट्स युअर राशी" सारखा भिकार दर्जाचा चित्रपट काढावा तसे काही तरी ह्या माणसाचे झाले आहे. खूप वर्षा आधी "इंटरनेट म्हणजे श्रीमंतांचे थेर आहे, ते काही वर्षांत बंद पडेल" असे भाकीत वर्तवले होते. ह्या शिवाय २००२ मॉर्टगेज बबल येणार असे भाकीत जे वर्तवत होते त्यांची जाहीर खिल्ली ह्यांनी उडवली होती. थोडक्यांत मागील १० वर्षांत सर्वच विषयावरील ह्यांची भाकिते १००% चुकीची ठरली आहेत. डाव्या मीडिया कडे एक शस्त्र आहे जे उजव्या फॉक्स कडे नाही. ते म्हणजे विनोदी लोक. अमेरिकी अनेक कॉमेडी शो आहेत. हे जवळ जवळ १००% डावे आहेत. जॉन ऑलिव्हर, एमी अॅडम्स पासून ट्रेव्हर पर्यंत जवळ जवळ १००% लोक सतत उजव्या लोकांची खिल्ली उडवत असतात. ह्यांचे व्हिडीओ कितीही चुकीचे असले तर सतत वायरल होत असतात. लिबेरटेरिअन लोक कमी असले तरी (४% मते) फॉक्स त्यांना भरपूर वेळ देतो. स्टसेल शो अतिशय प्रसिद्ध असून जॉन स्टोस्सेल उसाचं दर्जाचे लिबरटेरिअन मानले जातात. स्टोसेल आधी पूर्ण डावे होते आणि ABC मध्ये कामाला होते. हळू हळू त्यांचे मत बदलले आणि ABC नि त्यांना हाकलले. संपूर्ण अमेरिकन मीडियात बॅलन्सड आणि शांत पणे चालणारा शो म्हणून मी स्टोसेल ला निवडेन. राजकीय विषय : अमेरिकेत राजकारण त्यामाने फार पारदर्शी आहे. आपल्या इकडच्या प्रमाणे आम्ही सर्वासाठी आहोत असा आव आणण्याची कुठलीही गरज अमेरिकेत नाही. मिल्टन फ्रीडमन ह्यांनी एकदा सांगितल्या प्रमाणे. अमेरिकेत ५१% मतांना टारगेट करून जिंकावे लागत नाही. आपण ३% लोकांना टार्गेट करावे ज्यांच्या साठी १ कुठला तरी मुद्धा महत्वाचा आहे आणि इतर मुद्यावर आपण काय भूमिका घेता ह्यांच्याशी त्यांना देणे घेणे नाही. नंतर दुसरा एखादा मुद्दा घेऊन आणखीन ३% लोक मिळवावे अन आणि अश्या पद्धतीने ५१% मते मिळविण्याचा प्रयन्त करावा. ह्यामुळे सर्वच राजकारणी लोकांना टोकाची आणि स्पष्ट भूमिका घ्यावी लागते. (भारतांत चारित्र्य हा एक मुद्दा सोडला तर काँग्रेस आणि भाजपा मध्ये फरक काय आहे हे समाजाने मुश्किल होते). ह्यामुळे गे लोक फक्त ५% असले तरी राजकीय पटलावर ५% हा आकडा फार मोठा एकदा आहे. NRA आणि बंदूक प्रेमी (माझ्या प्रमाणे) सुमारे ८% असले तरी हि एक प्रचंड वोट बॅंक आहे. शेतकरी मंडळी सुमारे २% आहे. कट्टर ख्रिस्ती, ऑइल लॉबी, सिंगल माता, इत्यादी इत्यादी अनेक १-२% वाले वोट बॅंक आहेत जे आकड्यांनी कमी असले तरी राजकीय पटलावर खूप वेळ खातात. ह्यातील काही गट कुणाला मत देणार हे १००% स्पष्ट असते. NRA रिपब्लिकन लोकांना सपोर्ट करते तर सरकारी मदतीवर जगणारे (सिंगल मदर) इत्यादी डेमोक्रेट्स ना सपोर्ट करतात. ह्या निवडणुकीतील काही प्रमुख विषय पाहू. लिबरटेरिअन दृष्टिकोनातून मी माझे वैयक्तिक मत सुद्धा व्यक्त केले आहे. १. ओबामाकेर ओबामांच्या नवीन कायद्याप्रमाणे (जो १० हजार पानाचा होता) प्रत्येक अमेरिकन माणसाला इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे. ज्याला परवडत नसेल तो माणूस सरकारी मान्यताप्राप्त इन्शुरन्स सरकारी पैशाने घेऊ शकेल. ह्याशिवाय इतर अनेक जाचक अटी सामान्य लोक, इन्शुरन्स कंपनी आणि धंद्यावर टाकल्या गेल्या आहेत. ट्रम्प : हा कायदा संपूर्ण पणे रद्दबातल करू. हिलरी : आणखीन वाढवू. कायदा पूर्णपणे फेल ठरला आहे हे जवळ जवळ सर्वच लोक मान्य करतात. उजव्यांच्या मते कायदा मुळातंच चुकीचा आहे. डाव्यांच्या मते आणखीन खर्च करून कायदा आणखीन वाढवायला पाहिजे. लोकांना कुठलीही वस्तू विकत घेण्यास जबरदस्ती करणे हे मला मान्य नाही. अमेरिकेतील आरोग्यव्यवस्था इन्शुरन्स बेस्ड होण्यास सरकारी गोंधळ कारणीभूत आहे. इन्शुरन्स जबरदस्तीने घ्यायला लावणे म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखे आहे. आरोग्य व्यवस्था स्वस्त व्हायला पाहिजे तर सरकारी हस्तक्षेप कमी व्हायला पाहिजे. माझ्या मते खालील तीन गोष्टी अमेरिकेतील आरोग्यव्यवस्था स्वस्त करू शकतात १. अमेरिकेत दर वर्षी किती लोक डॉक्टर होऊ शकतात ह्यावर सरकारी नियंत्रण आहे. हे नियंत्रण काढून टाकले पाहिजे आणि अभियांत्रिकी प्रमाणे विदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेणे सोपे बनवले पाहिजे. २. FDA च्या जाचक अटी एक तर काढून टाकल्या पाहिजेत किंवा शिथिल तरी केल्या पाहिजेत. बिल गेट्स आणि माझ्या आरोग्य विषयक गरजा वेगळ्या आहेत. दोघांनाही एकाच प्रकारची सेवा द्यावी असे बंधन हॉस्पिटल वर टाकले तर मला जास्त पैसे मोजावे लागतात. डॉक्टर मंडीळीना अवास्तव कोर्ट केसेस पासून थोडे तरी संरक्षण मिळणे आवश्यक आहे. सरकारी कायद्याने कुठल्याही सेवेवर जर एक quality floor ठेवला तर त्याच प्रमाणे त्याच्या किमती वर सुद्धा एक "floor" येईल हे बेसिक अर्थशास्त्र आहे. २. फ्री कॉलेज शिक्षण ट्रम्प : फेडरल सरकारने उच्च शिक्षणापासून दूर राहावे. हिलरी : ट्युशन फ्री (सरकार मुलांना ट्युशन फी देईल) ह्या बाबतीत मी ट्रम्प बरोबर १००% सहमत आहे. मुळांतच सध्या कॉलेज फी जी वाढली आहे त्याला फेडरल सरकार कारणीभूत आहे. डाव्या विचारसरणीने विनाकारण उच्च शिक्षणात गोंधळ घातला आहे त्यामुळे फी भरमसाठ वाढली आहेच पण पढत मूर्खांची गर्दी सुद्धा वाढली आहे. सध्या सरकारी नियमा प्रमाणे कुठल्याही बँकेला विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी लोन देणे बंधनकारक आहे. ह्या लोन मधून दिवाळखोरी जाहीर करून सुद्धा आपण मुक्त होऊ शकत नाही. ह्यामुळे फक्त हा पैसा लाटण्यासाठी अनेक कॉलेजस ची स्पर्धा लागली आहे. जी मुले कॉलेज शिक्षणासाठी लायक नाहीत ती सुद्धा भूलथापांना बळी पडून फालतू आणि महागडे शिक्षण घेतात आणि नंतर पुन्हा सरकारच्या नावाने बोंब करतात. (लोन माफ करावे इत्यादी). http://www.learnliberty.org/videos/why-is-higher-education-so-expensive/ सरकारने ह्यांतून माघार घेतल्यास किमान मुले फायदा नसलेले शिक्षण घेणार नाहीत. ३. बंदुका ट्रम्प : १००% इन फेवर हिलरी : १००% विरुद्ध मी स्वतः सर्व नागरीकानी नेहमी सशस्त्र असावे आणि गरज पडेल तेंव्हा आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी शस्त्रे बिनधास्त वापरावी ह्या विचाराची आहे. समाज निशस्त्र झाला कि सरकारी पोलीस आणि दंडेली दाखवणार्या गुंडांचा गुलाम बनतो असे माझे मत आहे. सरकारी गुप्त "संशयास्पद अतिरेकी" लिस्ट वर असलेल्या लोकांना शस्त्रे विकत घ्यायला मिळू नयेत असे ट्रम्प ह्याचे म्हणणे आहे. मला ते मान्य नाही. ४. LGBTQ ट्रम्प : कदाचित ह्या विषयावरील सर्वांत मवाळ धोरण असलेला रिपब्लिकन हिलरी : स्वतःला ह्या लोकांची तारणहार मानते माझ्या मताने येत्या २० वर्षांत LGBTQ हि वोटबँक नाहीशी होणार. बहुतेक लोक आणि अगदी कट्टर ख्रिस्ती लोकांचा सुद्धा ह्या लोका बद्दलचा दृष्टिकोन बदलत आहे. सुप्रीम कोर्टचा गे लग्नाबद्दलचा निकाल हास्यास्पद असला तरी तो बदलावा अशी भूमिका ट्रम्प ह्यांनी सुदैवाने घेतलेली नाही. निर्णय हास्यास्पद आहे कारण त्याचा निकाल आणि तर्क ह्याचा काहीही संबंध नाही. लग्न ह्या प्रकारापासून सरकारने दूर राहून सर्व प्रकारच्या लग्नांना मान्यता द्यावी असे माझे मत आहे. (बहुपत्नी, बहूपती इत्यादी सर्व काही). ५. पर्यावरण ट्रम्प : लोकहित जास्त महत्वाचे हिलरी : पर्यावरण जास्त महत्वाचे पर्यावरण हा अमेरिकन जनतेतील एक महत्वाचा राजकीय विषय आहे. वर पाहता सर्वानाच पर्यावरण हित पाहिजे असले तरी राजकीय वर्तुळांत पर्यावरण हिताचा अर्थ फार वेगळा आहे. पर्यावरणाचे रक्षण फक्त सरकार करू शकते असे एकदा सर्वानी मान्य केले कि वाट्टेल ते नियम काढून सरकार खाजगी मालमत्तेवर ताबा मिळवू शकते किंवा मोनोपॉली निर्माण करू शकते. ह्याचे परिणाम अतिशय दूरगामी आहेत. दोन्ही पार्टीना पर्यावरणा पेक्षा हपापाचा माल गपापा करण्यात जास्त रस आहे. उदा नॉर्थ कॅरोलिना मध्ये जगांतील सर्वांत मोठा डुक्कर उद्योग आहे. तिथे माणसा पेक्षा डुक्करे जास्त आहेत. सर्व डुक्कर एकाच कंपनीच्या मालकीचे आहेत. एकदा मोठा पूर आला आणि ह्या डुक्करांची सर्व विष्ठा राज्यभर पसरली. प्रदूषण हे कारण सांगून राज्याने ह्यापुढे डुक्कर फार्मिंग वर राज्यांत बंदी घोषित केली. अर्थांत जी कंपनी आधीपासून तिथे होती तिने ह्याचे प्रचंड समर्थन केले. थोडक्यांत काय तर पर्यावरणाच्या नावाखाली एका कंपनीने स्वतःचा प्रचंड फायदा करून घेतला. ह्याच प्रमाणे टेस्ला कंपनीच्या प्रत्येक गाडीवर सरकार सुमारे $८००० खर्च करते. एलोन मस्क आपल्या गाड्या खपाव्या ह्या साठी ऑइल कंपन्यांवरील कर वाढवण्यासाठी सतत लॉबिंग करत असतो. ऑइल कंपन्या बहुतांशी टेक्सस आणि अलास्का ह्या रिपब्लिकन राज्यांत असल्याने त्यांना देण्याची कुठलीही संधी democrats सोडत नाहीत. थोडक्यांत काय तर ह्या धुळवडींत सत्य काय हे समजणे माझ्यासाठी तरी अशक्य गोष्ट आहे. वैज्ञानिकांवर सुद्धा इथे विश्वास ठेवणे अशक्य आहे कारण बहुतेकांना फंडिंग सरकार कडून मिळत असल्याने सरकी बाजू उचलून धरली नाही तर त्यांच्या पेकाटात लाथ बसेल. ह्या शिवाय विरुद्ध पुरावे देणाऱ्याचे शिरकाण करण्याचे काम सुद्धा सरकारी अधिकारी इमान इतबारे करतात. कॅलिफोर्निया मधील हा कायदा पहा : http://www.washingtontimes.com/news/2016/jun/2/calif-bill-prosecutes-climate-change-skeptics/ अगदी चर्च ने ज्या प्रमाणे नियम केले आहे त्या पद्धतीचा आहे. Climate change विरुद्ध बोलणे हा कायद्याने गुन्हा ठरविण्याचा हा प्रयत्न आहे. ६. सिटिझन्स युनाइटेड ट्रम्प: इन फेवर हिलरी : विरुद्ध अमेरिकेतील काही ठळक प्रमुख सुप्रीम कोर्ट निवाड्यातील हा एक निवड. "हिलरी: द फिल्म" नावाचा एक चित्रपट २०१० मध्ये सिटिझन्स युनायटेड ह्या विनानफा संस्थेने जाहिरात म्हणून प्रदर्शित केला. त्यानंतर जी धुळवड उडाली त्यातून सुप्रीम कोर्टने एक फार महत्वाचा निकाल दिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या खाली (हक्क १) सरकारला कुठल्याही नागरिकाला किंवा संस्थेला राजकीय विषयावर मत प्रदर्शित करण्यापासून रोखले जाऊ शकत नाही. हा त्यांचा हक्क आहे. ह्याचे परिणाम दूरगामी आहेत. ह्याचा अर्थ विकिलिक्स सारखी संघटना स्वतःच्या पोटचा पैसे खर्च करून कुणाच्याही विरोधांत जाहिराती काढू शकते. हिलरी च्या मते हयामुळे पैसा असलेल्या संघटना प्रचंड पैसे खर्च करून जनमत आपल्या बाजूने वळवू शकतात. माझ्या मते लोकांना आपल्या आवडीच्या मुद्यासाठी कितीही पैसा खर्च करून प्रचार करण्याची १००% मुभा असली पाहिजे. ७. Equal Work Equal Pay ट्रम्प : विरुद्ध हिलरी : बाजूने हा एक मूर्खपणाचा राजकीय मुद्दा आहे. विविध अभ्यासातून म्हणे असे दिसून येते कि महिलांना पुरुष पेक्षा कमी पगार मिळतो. म्हणजे एक प्रकारच्या व्यवसायांत पुरुषाला $१ मिळत असेल तर महिलांना साधारणतः $०.७ मिळतात. उजव्या लोकांना ह्यातील अर्थशास्त्र जास्त चांगले कळते. बहुतेक वेळा महिला आणि पुरुषाचे चॉईस वेगळे असतात. महिलांना जॉब security हवी असते तर पुरुषांना जास्त रिस्क घेऊन जास्त पैसा. जवळ जवळ सर्व अभ्यासांत कधीही ना लग्न केलेले पुरुष आणि कधीही लग्न न केलेल्या समवयस्क महिला ह्यांत पगार सारखा असतो असे दिसून आले आहे. पण लग्न झाल्या नंतर महिला करियर पेक्षा घराकडे थोडे जास्त लक्ष देतात आणि घराच्या जबाबदाऱ्या कमी असल्याने पुरुष जास्त ओव्हरटाईम इत्यादी करून जास्त पैसे कमावतात. मुद्दाम महिला म्हणून कोणी त्यांना कमी पैसे देत नाही. वैद्यकीय पेशांत बहुतेक महिला स्त्री रोगतज्ञ् किंवा शिशुतज्ञ् होतात पण पुरुष बहुतेक वेळा हृदयविकार तज्ञ् होतात. दोनी व्यवसाय सारखे वाटले तरी पगारांत प्रचंड फरक असतो. ह्या उलट सरकाने महिलांना पुरुषा इतकाच पगार देण्याची सक्ती केली तर धंधे बहुतेक वेळा पुरुषांना जास्त प्राधान्य देतील आणि महिलांना नोकर मिळवणे जास्त कठीण होईल. https://www.youtube.com/watch?v=hsIpQ7YguGE 8. Criminal Justice Reforms ट्रम्प : आणखीन लोकांना जेल मध्ये डांबले पाहिजे हिलरी : बदल पाहिजे इथे मात्र मी १००% हिलरींच्या बाजूने आहे. बर्नी ह्यांचा प्लॅन जास्त चांगला होता. अमेरिकेत war on drugs नावाचे जे थोतांड चालवले आहे त्यातून शेकडो कोटी डॉलर्स खर्च होतातातच पण निष्पन्न मात्र काहीही होत नाही. शेकडो परिवार ह्याने उध्वस्त केले आहेत. civil forfeitures नावाचा जो भयानक कायदा आहे तो तर सरकारी लूट आहे. खरे तर इथे अमेरिकेन जनतेला सशस्त्र उठाव करण्याची गरज आहे. सर्वाधिक महत्वाचे मुद्धे १. सुप्रीम कोर्ट च्या जज ची नेमणूक माझ्या मते अमेरिकन सभ्यतेचा हा सगळ्यांत कच्चा दुवा आहे. सुप्रीम कोर्टचा जज हे आजीवन पद आहे. एकदा इथे नेमणूक झाली कि माणूस मारे पर्यंत राहू शकतो. ह्या शिवाय कोर्टाने wade, केलो इत्यादी केस मध्ये "हम कहे सो कायदा" अशी भूमिका घेतल्याने त्यांना प्रचंड ताकद आली आहे. ट्रम्प ने एक गोष्ट चांगली केली ती म्हणजे "originalist interpretation" चा जज आपण नेमू असे त्याने आधीच घोषित केले आहे. हिलरीने ह्याउलट सिटिझन्स युनाइटेड आणि गन rights कॅन्सल करेल अश्या जज ची नेमणूक करण्याचे संकेत दिले होते. माझ्या सारख्या libertarian माणसा साठी सुप्रीम कोर्ट फार महत्वाचे आहे कारण libertarian लोक इथे बहुतेक वेळा जिंकतात. ओबामाच्या अनेक निर्णयांना बेकायदेशीर ठरवण्यात Libertarian Cato इन्स्टिटयूट ने फार महत्वाची भूमिका बजावली. ह्या शिवाय ACLU, FEE, EFF, Koch Institute इत्यादींनी सर्वच सरकारच्या नाकांत वेळोवेळी दम आणला होता. Libertarian लोक फक्त ५% असले तरी बहुतेक सरकारी पॉलिसीवर त्यांचा फार मोठा प्रभाव असतो. मारिजुआना सध्या बहुतेक राज्यांत कायदेशीर झाली आहे पण हि भूमिका Libertarian संघटनांनी ५० वर्षे आधीच घेतली होती. स्कूल voucher, चार्टर स्कुल्स, इत्यादी अनेक विषयावर त्यांची भूमिका जिंकत आली असे असे वाटते. २. ट्रेड दोन्ही उमेदवारांची भूमिका ह्या विषयावर मतिमंदत्वाची होती. अर्थानं दोन्ही व्यक्ती हे जाणून आहेत आणि कदाचित मुद्दामहून फक्त वोट मिळविण्यासाठी हि भूमिका घेत आहेत. चीन विरुद्ध ट्रम्प ह्यांची जी बडबड चालली आहे त्याच प्रकारची बडबड ८० मध्ये जपान विरुद्ध चालली होती. जपानी TV, VCR, Cars अमेरिकेत स्वस्तांत उपलब्ध होत असल्याने जपानी लोक अमेरिकन नोकर्या चोरत आहेत असा आरोप होत होता. त्याचा खरपूस समाचार मिल्टन फ्रिडमन ह्यांनी खाली घेतला आहे. हेच मुद्दे चीन आणि ट्रम्प ला सुद्धा लागू होतात. (हेच मुद्दे भारत आणि चीन ह्याच्या व्यापाराला सुद्धा लागू होतांत). https://www.youtube.com/watch?v=c9STBcacDIM पुढे काय : ट्रम्प प्रेसिडेंट झाले असले तरी प्रेसिडेंट म्हणजे काही सम्राट नसतो. ओबामा ह्यांनी सम्राटा प्रमाणे वागायचा खूप प्रयत्न केला पण त्याला यश आला नाही. हि फार छान गोष्ट आहे. सध्या तरी रिपब्लिकन काँग्रेस आणि ट्रम्प ह्यांच्यात फक्त ओबामाकेर, guns आणि जज नेमणूक ह्यांत सहमती होण्याची शक्यता आहे. Immigration, deficit, wall इत्यादी विषयावर ट्रम्प आणि काँग्रेस ह्यांचे एकमत होणार नाही आणि त्यावर ट्रम्प विशेष काही करू शकतील असे वाटत नाही. हा लेख लिहिण्यासाठी अनेक लोकांची मदत झाली.
  • Log in or register to post comments
  • 16845 views

प्रतिक्रिया

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 11/10/2016 - 03:40

Permalink

वाचनखुण साठवावी इतका छान लेख

मुख्य म्हणजे सुस्पष्ट आणि नेटके मुद्दे. आवडलं.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on गुरुवार, 11/10/2016 - 05:08

In reply to वाचनखुण साठवावी इतका छान लेख by अर्धवटराव

Permalink

हेच म्हणतो

हेच म्हणतो
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on गुरुवार, 11/10/2016 - 12:10

In reply to हेच म्हणतो by शाम भागवत

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियान on Fri, 11/11/2016 - 07:23

In reply to वाचनखुण साठवावी इतका छान लेख by अर्धवटराव

Permalink

अगदी अगदी !!

+11111
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on गुरुवार, 11/10/2016 - 06:25

Permalink

ट्रम्प ह्यांनी नागरिका सोबतचा

ट्रम्प ह्यांनी नागरिका सोबतचा करार प्रसिद्ध केला आहे. वरील प्रमाणेच ट्रेड हा विषय सोडल्यास इतर सर्व विषयावर त्यांची भूमिका चांगली आहे https://assets.donaldjtrump.com/_landings/contract/O-TRU-102316-Contractv02.pdf
  • Log in or register to post comments

Submitted by बाजीप्रभू on गुरुवार, 11/10/2016 - 07:24

Permalink

आवडली माहिती!

मुद्देसूद, बरीच माहिती मिळाली आज.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on गुरुवार, 11/10/2016 - 09:04

Permalink

सर्व नागरिकांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रं बाळगण्याची परवानगी

कायदेशीररीत्या असली पाहिजे यावर माझाही ठाम विश्वास आहे. अमेरिकेत दुस-या घटना दुरूस्तीने हा अधिकार सर्व अमेरिकन नागरिकांना मिळालेला आहे. भारतात मात्र कोणत्याही पक्षाची अशी घटनादुरुस्ती करण्याची हिंमत होईल असं वाटत नाही. त्यामुळे देशी कट्ट्यांवरच भागवावं लागेल. असो. लेख आवडला!
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on गुरुवार, 11/10/2016 - 10:08

In reply to सर्व नागरिकांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रं बाळगण्याची परवानगी by बोका-ए-आझम

Permalink

भारतांत दसऱ्याच्या दिवशी

भारतांत दसऱ्याच्या दिवशी सरकारी हत्यारापुढे नतमस्तक होऊन फोटो शेर करण्यात आपले राजकारणी बीसी आहेत. भारत सरकारने सध्या नकली बंदूक वर सुद्धा बंदी घातली आहे. चित्रपट मध्ये वापरण्यात येणाऱ्या बंदूक सदृश्य गोष्टीसाठी सुद्धा परवाना हवा असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on गुरुवार, 11/10/2016 - 11:09

In reply to भारतांत दसऱ्याच्या दिवशी by साहना

Permalink

भारतात बंदुकांवर बंदी आहे ते

भारतात बंदुकांवर बंदी आहे ते बरेच आहे. आणि तुमच्यासारखे बंदुक प्रेमी जर हामेरिकेत असतील तर ते हामेरिकेतच असावेत, इथे नसावेत हेदेखील आमच्या भारतासाठी बरेच आहे. एका सुरक्षित देशात सामान्य नागरिकांना बंदूक घेऊन 'ढिशक्यांव ढिशक्याव' खेळावेसे वाटते हाच मुळात बालिशपणा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on गुरुवार, 11/10/2016 - 11:52

In reply to भारतात बंदुकांवर बंदी आहे ते by अप्पा जोगळेकर

Permalink

माझ्याकडे भारतांत सुद्धा

माझ्याकडे भारतांत सुद्धा बंदूक आहे ! गरजेच्या वेळी गुढग्यावर बसून रडण्याची प्रॅक्टिस केली असेल तर बंदुकीची गरज सहसा भासत नसावी. आपणाला जास्त ठाऊक असावे.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on गुरुवार, 11/10/2016 - 12:49

In reply to माझ्याकडे भारतांत सुद्धा by साहना

Permalink

भारतात बंदुकीची गरज तीनच

भारतात बंदुकीची गरज तीनच प्रकारच्या लोकांना पडते. १) सुरक्षा दले (पोलिस,सैनिक इत्यादी) २) गँगस्टर, काळे धंदे करणारे इत्यादी ३) शेळपट, भित्र्या वॄत्तीचे लोक पैकी नं १) मधे तुम्ही नाही असे वाटते. २) किंवा ३) पैकी तुम्ही असाल तर माझे काहीच म्हणणे नाही. आणि जर तुम्ही डू आयडी पैकी असाल तर बोलणेच खुंटले. आंतरजालावर सुद्धा ज्यांना भिती वाटते त्यांचे काय करणार. असो. - बंदुकीसाठी शेळपट शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Fri, 11/11/2016 - 00:03

In reply to भारतात बंदुकीची गरज तीनच by अप्पा जोगळेकर

Permalink

भारतांत कुणाला काय गरज आहे

भारतांत कुणाला काय गरज आहे ह्याचा ठेका तुम्हाला दिलाय का ?
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 11/11/2016 - 09:18

In reply to भारतात बंदुकीची गरज तीनच by अप्पा जोगळेकर

Permalink

+१

भारतीय लोक्स एकमेकांची आय-बहीण काढतील, हातापाई करतील, प्रसंगी लाठ्या-चाकु वगैरे माफक हत्यारं काढतील तेव्हढच पुरे. उगाच त्यांच्या हाती फायर-आर्म्स देऊन अवलक्षण करु नये. एव्हढी गरज पडेपर्यंत परिस्थिती हालाखीची होणे म्हणजे दुर्दैवाचा कडेलोट होईल भारतीयांसाठी.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 11/10/2016 - 10:16

Permalink

हे सर्व newyorker मध्ये

हे सर्व newyorker मध्ये अगोदरच चर्चेत होते. पत्रकारांच्याही पेकाटात लाथ बसली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on गुरुवार, 11/10/2016 - 10:59

In reply to हे सर्व newyorker मध्ये by कंजूस

Permalink

निस्सम तालेब ह्यांचे

निस्सम तालेब ह्यांचे newyroker बद्दलचे टोमणे ऐकून मी अजून हसत आहे https://medium.com/@nntaleb/the-intellectual-yet-idiot-13211e2d0577#.honghdfkj
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 11/10/2016 - 14:18

Permalink

बंदूक

भारतात न्यायव्यवस्थेवर फार ताण आहे , लाखो खटले प्रलंबित आहेत. वर्षानुवर्षे निकाल लागत नाही . गन कल्चर आले तर 'निकाल' लौकर लागतील पण त्याचे लाखो खटले दाखल होतील ज्यामुळे पोलीस, न्यायालय यांचे काम वाढेल आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात येइल.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 11/10/2016 - 14:45

Permalink

अप्पा जोगळेकर,

अप्पा जोगळेकर,
१) सुरक्षा दले (पोलिस,सैनिक इत्यादी) २) गँगस्टर, काळे धंदे करणारे इत्यादी ३) शेळपट, भित्र्या वॄत्तीचे लोक
माझ्या एका बिल्डर मित्राने काही वर्षांपूर्वी अधिकृत पिस्तूल घेतलं होतं. अगदी रीतसर सरावही केला होता. त्याचा सगळा व्यवसाय धनादेशाने चालतो. तो वरीलपैकी कोणत्याही गटांत बसंत नाही. धमक्यांना भीक घालणारा शेळपट नव्हता. तरीही बंदुकीची गरज भासलीच. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on गुरुवार, 11/10/2016 - 15:20

In reply to अप्पा जोगळेकर, by गामा पैलवान

Permalink

माझ्या एका बिल्डर मित्राने

माझ्या एका बिल्डर मित्राने बास. एवढेच पुरेसे आहे बंदुकीचे कारण स्पष्ट करायला. तळेगाव-दाभाडे इथे झालेला 'सचिन शेळके' या नगरसेवकाचा गेल्या महिन्यात झालेला खून खूपच गाजला. त्याच्या खिशात २ पिस्तुले होती. आणि तो पहिलवान सुद्धा होता. तरी त्याला सगळे कपडे काढायला लावून ठार केले गेले. मुद्दा इतकाच की 'ऑर्गनाइज्ड क्राईम' चा सामना केवळ प्रशिक्षित पोलिस दलेच करु शकतात. खिशात बंदूक आहे म्हणून स्वतःला रजनीकांत समजणे बालिश पणा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 11/10/2016 - 16:23

In reply to माझ्या एका बिल्डर मित्राने by अप्पा जोगळेकर

Permalink

डॉकेटर

१) सुरक्षा दले (पोलिस,सैनिक इत्यादी) २) गँगस्टर, काळे धंदे करणारे इत्यादी ३) शेळपट, भित्र्या वॄत्तीचे लोक
रानात वस्तीला राहाणार्‍या लोकांना बंदूकीची गरज पडते. १. दरोडेखोरांना जरब बसावी २. रानडुकरे , लांडगे इ. जनावरांना हुसकून लावण्यासाठी यात कोणी फार श्रीमंत नसता किंवा काळे धंदे करणारा सुद्धा नसता. जुन्नर खोर्‍ञात तर बिबट्ञाचा सर्रास वावर असतो अशा ठिकाणी स्वसंरक्षणाला उपयोगी पडते. बादवे एका मिपाकर डॉक्टर बंदूकधारी आहेत त्त्यांची आठवण झाली
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Fri, 11/11/2016 - 08:38

In reply to डॉकेटर by कपिलमुनी

Permalink

बाबा पाटील कुठंशी आहेत हो

बाबा पाटील कुठंशी आहेत हो आजकाल ??
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 11/10/2016 - 21:31

In reply to माझ्या एका बिल्डर मित्राने by अप्पा जोगळेकर

Permalink

चौथा गट

अप्पा जोगळेकर, बास. एवढेच पुरेसे आहे बंदुकीचे कारण स्पष्ट करायला. कर्रेक्ट. मग त्या तिघांसोबत बिल्डर नामे चौथी क्याट्यागिरी खोलायला पाहिजे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by वरुण मोहिते on गुरुवार, 11/10/2016 - 15:10

Permalink

छान विवेचन

बाकी बंदूक घेणं हा स्टेटस सिम्बॉल आहे . आमच्याही काही ओळखीच्यांकडे आहेत कारण नसताना . काही झालं तर लॉक पण पटकन उघडता येणार नाही अश्यांकडे .असो अवांतर आहे. लेख आवडला
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on गुरुवार, 11/10/2016 - 17:43

Permalink

अभ्यासपूर्ण लेख.

पण यातील काही संज्ञा माहित नाहीत. जमल्यास त्याबद्दल अधिक लिहावे. १) लिबरटेरिअन २) war on drugs ३) civil forfeitures बाकी थोर संपादक कुबेर साहेबांनी याच्या १% तरी अभ्यास केला असेल का ? :)
  • Log in or register to post comments

Submitted by mayu4u on गुरुवार, 11/10/2016 - 21:50

In reply to अभ्यासपूर्ण लेख. by मराठी कथालेखक

Permalink

संज्ञां विषयी

अधिक स्पष्टीकरण आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Fri, 11/11/2016 - 00:14

In reply to अभ्यासपूर्ण लेख. by मराठी कथालेखक

Permalink

ह्या तिन्ही विषयावर कमेंट

ह्या तिन्ही विषयावर कमेंट मध्ये लिहिणे शक्य होणार नाही म्हणून किमान १) विषयावर वेगळे लिहीन. २) आणि ३) हे अमेरिका स्पेसिफिक विषय आहेत आणि सर्वच मिपा कारण कदाचित त्यांत रस असणार नाही त्यामुळे सध्या तरी ह्या विषयावर जास्त लिहू शकणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 11/10/2016 - 19:48

Permalink

Immigration

>>Immigration, deficit, wall इत्यादी विषयावर ट्रम्प आणि काँग्रेस ह्यांचे एकमत होणार नाही आणि त्यावर ट्रम्प विशेष काही करू शकतील असे वाटत नाही. हाऊस आणि सिनेट मध्ये रिपब्लिकनांचे बहुमत आहे, तरीही इमिग्रेशन रिफॉर्म किंवा तत्सम बिले ट्रम्प पास करून घेऊ शकणार नाहीत असे वाटते?
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Fri, 11/11/2016 - 00:11

In reply to Immigration by आनंदयात्री

Permalink

भारताप्रमाणे पार्टी हाय कमांड

भारताप्रमाणे पार्टी हाय कमांड असा प्रकार अमेरिकेतील काँग्रेस मध्ये नसतो. पार्टी अफिलिएशन असले तरी कुठल्याही मुद्यावर सदस्यांची मते वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे बहुतेक कायद्यावर कुणाचेही एकमत होत आणि आणि bi-partisan ग्रुप करूनच प्रश्न सोडवावे लागतात. मार्को रुबिओ ह्यांना फेसबुक प्रचंड पैसे देते आणि बदल्यांत इम्मीग्रेशन रिफॉर्म वर ते काम करतात. ट्रम्प च्या कुठल्याही आततायी निर्णयावर खो घालण्यास रुबिओ नेहमीच तयार असेल. त्यामुळे ट्रम्प ह्यांना काँग्रेस बरोबर बसून वाटाघाटी करून निर्णय पास करून घ्यावे लागतील. ट्रम्प च्या प्रत्येक म्हणण्यात काँग्रेस हो म्हणेल असे होण्याची शक्यता फार कमी आहे. अर्थांत बंदुका, सुप्रीम कोर्ट जज हे टोकाचे विषय असल्याने इथे एकमत नाही झाले तरच नवल. इम्मीग्रेशन, ट्रेड, टॅक्स इत्यादी विषय थोडे जास्त गढूळ आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on गुरुवार, 11/10/2016 - 20:09

Permalink

उत्तम माहितीपुर्ण लेख!

उत्तम माहितीपुर्ण लेख!
  • Log in or register to post comments

Submitted by रामपुरी on गुरुवार, 11/10/2016 - 20:53

Permalink

ह ह पु वा

ओबामा केअर हि गंडलेली व्यवस्था आहे एवढा एक मुद्दा सोडला तर बाकी सगळा अतिशय हास्यास्पद लेख :)
  • Log in or register to post comments

Submitted by mayu4u on गुरुवार, 11/10/2016 - 21:47

Permalink

मुद्देसूद लेखन

लेख अत्यंत आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Fri, 11/11/2016 - 00:28

Permalink

चांगला लेख आहे

अभ्यासपूर्ण व माहितीप्रद लेखासाठी आभार्स
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 11/11/2016 - 01:59

Permalink

गन कंट्रोलसारखे काही मुद्दे

गन कंट्रोलसारखे काही मुद्दे अडाण** आणि हास्यास्पद आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by निशदे on Fri, 11/11/2016 - 06:53

Permalink

पहिल्या ४ परिच्छेदांतच इतक्या

पहिल्या ४ परिच्छेदांतच इतक्या गंडलेल्या गोष्टी आहेत की पुढे वाचणे शक्य नाही. चालू द्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियान on Fri, 11/11/2016 - 07:31

Permalink

छान !

थोडी नवीन माहिती मिळाली, थोडे ह्या इलेक्शन मेनिया मुळे आधीच माहिती होते. पण तुमचे संकलन खूप छान जमले आहे. काही मतभेद आहेत, पण त्या पलीकडे जाऊन तुमचे लिखाण आवडले !
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Fri, 11/11/2016 - 09:29

Permalink

मुद्देसूद आढावा आवडला.

मुद्देसूद आढावा आवडला. ज्यांना ईंटरेस्ट आहे त्यांना ट्रंप्च्या पॉलीसीज/प्लॅन वगैरे माहिती खालील लिंकवर वाचता येतील. https://www.donaldjtrump.com/policies/
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Fri, 11/11/2016 - 10:30

Permalink

छान

छान आढावा हो साहने. डोनाल्ड निवडून आला म्हणून ईकडे भारतात म्हणून साखर वाटण्याचे,मिरवणूका काढण्याचेही कार्यक्रम झाले. असो. तुमच्या त्या एच.वन.बी. व्हिसाचे काय होणार आहे? अमेरिकेला भारतीय तंत्रज्ञांची नेहमी गरज लागते हे गेले २० वर्षे ऐकत आलोय आम्ही. न्युयॉर्क्,न्यु जर्सी,कॅलिफोर्नियातले भारतीय, डोनाल्ड निवडून आला म्हणून,खिन्न झाले आहेत असे हे म्हणत होते.
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Fri, 11/11/2016 - 11:45

In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

भारतीय लोक बहुतेक (~६०%) डावे

भारतीय लोक बहुतेक (~६०%) डावे असतात आणि माय-बाप सरकार छाप पॉलिसींना त्यांचा खूपदा पाठिंबा असतो त्यामुळे ट्रम्प च्या विजयाने त्यांना दुःख होणे स्वाभाविक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Fri, 11/11/2016 - 11:52

In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

ट्रम्प च्या इमिग्रेशन

ट्रम्प च्या इमिग्रेशन पॉलिसीचा भारतीय लोकां वर काय परिणाम होणार आहे हे इथे आमच्या मित्रांनी लिहिलेले आहे : http://www.indianlibertarian.org/2016/11/10/trumps-immigration-plan-summary/ थोडक्यांत सांगायचे तर कायदेशीर रित्या असलेल्या भारतीयां वर विशेष परिणाम होईल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Fri, 11/11/2016 - 10:59

Permalink

गन कंट्रोल विषयी जास्त बोलत नाही फक्त

खालील ट्रेलर मध्ये दाखवलेला सिनेमा पहावा ही सर्व संबंधितांस विनंती, मी बंदुका हाताळतो, रोज, त्यामुळे त्याचे कौतुक तरी कृपया कोणी मला सांगू नये ही नम्र विनंती
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Fri, 11/11/2016 - 11:48

In reply to गन कंट्रोल विषयी जास्त बोलत नाही फक्त by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

मूळ पोस्ट माझा असल्याने इथे

मूळ पोस्ट माझा असल्याने इथे काय टाकावे नाही टाकावे हे मला सांगू नये. पर्ज हा मूर्खपणाचा फ्लॉप मूवी आहे. त्यापेक्षा गुंडा पाहणे चांगले ठरेल.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 11/11/2016 - 12:28

In reply to मूळ पोस्ट माझा असल्याने इथे by साहना

Permalink

मूळ पोस्ट

पोस्ट तुमची असली तरी सध्या सार्वजनिक आहे त्यामुळे प्रतिसादात कोणी काय टाकायचे याच्या उचापत्या क्रू नैत
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Fri, 11/11/2016 - 13:07

In reply to मूळ पोस्ट माझा असल्याने इथे by साहना

Permalink

कपिलमुनी प्लस वन,

कपिलमुनी प्लस वन, सार्वजनिक संस्थळावर लेखन टाकले आहे तेव्हा कॉमेंट्स काय कराव्या हे कोणी कोणाला शिकवू नये, तुमचा नसता तुसडेपणा, उर्मटपणा अन विक्षिप्तपणा सहन करायला आम्ही तुमचे कर्जदार नाही, तोंड सांभाळून बोलायचं. गनकंट्रोल हा विषय शिक्षणाचा अधिकार कायदा नाही, ज्याच्यातली किमान अक्कल आहे तितकेच बोलावे. कवटी फुटून बाहेर आलेले पिवळसर फ्लुइड रियल टाईम मध्ये बघा मग सार्वजनिक स्थळी असला उर्मटपणा करून अकला शिकवायला या. परत, वरील विवेचन हे 'नम्र विनंती' आहे हे वेगळे सांगणे नलगे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Fri, 11/11/2016 - 14:04

In reply to कपिलमुनी प्लस वन, by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

सहमत

+१ उर्मट उत्तरं देण्यास कुठलंही लायसन्स लागत नाही. पण तरी आपण किमान नम्रता बाळगावी ह्याची जाण ज्यांना नाही ते लोक बंदूका हातात आल्यावर काय करणार ?
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Sat, 11/12/2016 - 01:23

In reply to कपिलमुनी प्लस वन, by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

> सार्वजनिक संस्थळावर लेखन

> सार्वजनिक संस्थळावर लेखन टाकले आहे तेव्हा कॉमेंट्स काय कराव्या हे कोणी कोणाला शिकवू नये अगदी हेच मी तुम्हाला माझ्या कमेंट मध्ये सांगितले आहे. माझा विक्षिप्तपणा सहन करायला तुम्हाला कोणीही सांगितले नाही. माझे लेख ना वाचून आणि कमेंट न टाकून आपण मला पूर्णपणे दुर्लक्ष करू शकता.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 11/12/2016 - 19:07

In reply to > सार्वजनिक संस्थळावर लेखन by साहना

Permalink

मला पूर्णपणे दुर्लक्ष करू

मला पूर्णपणे दुर्लक्ष करू शकता. >> मला नाही, माझ्याकडे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Sat, 11/12/2016 - 20:11

In reply to मला पूर्णपणे दुर्लक्ष करू by यशोधरा

Permalink

ते You can completely ignore

ते You can completely ignore me चे भाषांतर असावं.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 11/12/2016 - 20:16

In reply to ते You can completely ignore by सतिश गावडे

Permalink

मला काळजी नाही! :D

मला काळजी नाही! :D
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Fri, 11/11/2016 - 13:53

In reply to मूळ पोस्ट माझा असल्याने इथे by साहना

Permalink

कृपया गुंडा या आमच्यासाठी

कृपया गुंडा या आमच्यासाठी पूज्य असलेल्या कलाकृतीला इथे आणू नका!! तो ओबामा गेला तेल लावत अन ट्रंप गेला उडत! बाकी चालुद्या!! -- कमांडो जी ९,शंकर,देवा,शिवा आणि अश्या अनेक मिथुन लीलांचा भक्त!!
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Fri, 11/11/2016 - 23:17

In reply to कृपया गुंडा या आमच्यासाठी by चिनार

Permalink

भावना दुखावल्या बद्दल क्षमा !

भावना दुखावल्या बद्दल क्षमा !
  • Log in or register to post comments

Submitted by आरोह on Sat, 11/12/2016 - 23:06

In reply to गन कंट्रोल विषयी जास्त बोलत नाही फक्त by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

रोज बंदुका हाताळता

कुठल्या हुद्यावर आहेत तुम्ही आर्मीत? रोज बांधूया हाताळता म्हणून विचारतो?
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com