(कार्यक्रम) 'आनंदाचे डोही'
स. न. वि. वि.
महाराष्ट्रातील वंचित जनतेच्या प्रश्नांबाबत गेली अनेक वर्षे प्रयत्नशील असलेल्या 'वंचित विकास' या संस्थेचे नाव कदाचित आपणास परिचित असेल. १९८५ मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या या संस्थेचे महाराष्ट्रात सध्या १३ ठिकाणी काम चालु आहे. १९९३ पासुन महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेशात छिंदवाडा इथेही संस्थेचा आदिवासी विकास प्रकल्प कार्यरत आहे. महिला सबलीकरण, एडसविषयक जनजागृती, वेश्यावस्तीतील मुलांचा व्यक्तिमत्व विकास, परित्यक्ता व विधवांचे पुनर्वसन , वंचितांच्या प्रश्नांचा अभ्यास व त्या विषयक प्रकाशन अशा अनेक क्षेत्रात वंचित विकासाचे काम वेगाने चालु आहे. या सर्व कार्यात, संस्थेसाठी, लोकाश्रय अत्यंत मोलाचा आहे.
वंचित विकासच्या या विविध प्रकल्पासाठी निधीसंकलनाकरिता
'स्व. मोहन शिराळकर प्रतिष्ठान' तर्फे व 'स्वरालय' निर्मित
ख्यातनाम संगीतकार श्री. श्रीनिवास खळे यांच्या संगीत रचनांवर हा कार्यक्रम आधारित आहे. या कार्यक्रमात ख्यातनाम गायक कलाकार हृषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे, विभावरी जोशी, पं. उपेंद्र भट, राहुल देशपांडे यांचा तसेच काही बालकलाकारांचा समावेश असेल.
सदर कार्यक्रमातुन 'वंचित विकास' साठी लक्षणीय निधी संकलन व्हावे असा मानस आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित वा प्रायोजक राहुन 'वंचित विकास' च्या निधी संकलनासाठी द्यावे असे आम्ही प्रतिष्ठानतर्फे आवाहन करीत आहोत.
तिकिटांचे दरः
३००/२००/१५०/१०० रु. प्रती आसन.
'वंचित विकास' च्या देणगीदारास प्रत्येकी २ अश्या पुढील रांगेतील देणगी प्रवेशिका स्नेहभेट म्हणुन दिल्या जातील.
*सर्व देणग्या ८०ग या कलमाखाली करसवलतीस पात्र
वंचित विकास'च्या कामाबद्दल अधीक वाचण्यासाठी ही १ व २ पुस्तके उतरवून घ्या.
संपर्कः
सौ. रुपाली अनिल काळे
roopalikale@hotmail.com
९८९०७०८४५३
-
कळावे लोभ असावा.'आनंदाचे डोही ...'
या कार्यक्रमाचे रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २००९ सायंकाळी ५ वाजता 'यशंवतराव चव्हाण सभागृह', शिवाजी पुतळ्याजवळ, कोथरुड, पुणे येथे आयोजन केले आहे.
वाचने
2879
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
वंचित विकासचे कार्य खरोखरच गौरवास्पद आहे, ह्याबद्दल शंका नाहीच.
आणि असा कार्यक्रम आयोजित होत आहे ह्याची माहिती इथे दिल्याबद्दल आनंदयात्री ह्यांचे आभार.
आपल्या मिपावर असे बरेच लोक आहेत ज्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजसेवा करणार्या संस्थांना मदत करणे/स्वतः सहभागी होणे ह्यामध्ये एक सामाजिक जाणीवेपोटी अतीव ओढ आहे.
नक्कीच बरेच मिपाकर (निदान पुण्यातील) ह्या कार्यक्रमाला भेटतील अशी मला आशा वाटते.
-ध मा ल.
In reply to चांगला उपक्रम. by धमाल मुलगा
वंचित विकासचे कार्य खरोखरच गौरवास्पद आहे याबद्दल शंकाच नाही.
आणि महत्वाचे म्हणजे, अशा संस्थेची ओळख करुन दिल्याबद्दल आनंदयात्रींचे विशेष आभार मानले पाहिजेत.
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
In reply to चांगला उपक्रम. by धमाल मुलगा
हेच म्हणतो !
* अश्या पध्दतीच्या लेखावर कशी प्रतिक्रीया व्यक्त करतात हे माहीत नव्हते त्यामुळे वाचूनच गप्प बसलो होतो, पण धमुचा प्रतिसाद वाचला व मनात आलं हेच तर विचार आपल्या डोक्यात... पण मनातील विचार असे टंकायला जी बुध्दी हवी ती आमच्या कडे नाही :( त्यामुळे हेच म्हणतो चा आधार.
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
पं. उपेंद्र भट
उपेन्द्र भट पंडित केव्हापासून झाला?
तात्या.
In reply to पं. by विसोबा खेचर
उल्लेख चुकीचा असेल तर कॄपया आपले संपादनाधिकार वापरुन योग्य ती सुधारणा करावी ही विनंती.
थोडेसे गुगलल्यावर हा उल्लेख सापडला !!
In reply to पं. by विसोबा खेचर
तात्या एकाच घराण्यात ना?
;-)
येत्या रविवारी हा कार्यक्रम होईल. कोणी येणार असल्यास कृपया संपर्क साधा.
In reply to येत्या रविवारी by आनंदयात्री
आनंदयात्री, मी येणार आहे. मी (+१) येणार का नाही हे नंतर कळवते.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
In reply to आनंदयात्र by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी आधी मोठ्या तोंडानं म्हणालो खरं, पण नेमका असा अडकलोय की येता येणं शक्य होणार नाही. :(
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
यांचा पुढेमागे कधितरी ठाणे-मुंबईत कार्यक्रम होण्याची शक्यता आहे काय?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
In reply to पुढील कार्यक्रम by सुनील
होणार असल्यास इथे (म्हणजे मिसळपाववर) नक्की निवेदन दिले जाईल.
चांगला उपक्रम.