यंदा काही तरी बर्यापैकी जमलंय म्हणुन आवर्जुन पाकृ टाकत आहे. मला जवळपास जमलंच आहे, तुमची थोडीशी मदत लागेल शेवटी शेवटी..
माझ्या एका कानडी मैत्रिणीने मला शिकवलेले हे पेसरेट्टु! म्हणजेच मुगाचे डोसे.
काही म्हणजे काहीच अवघड नाही.
साहित्य :- (माझा कारभार अंदाजपंचे दाहोदरसे असतो. घ्या आपापल्या हिशोबाने..)
चटणीसाठी:-
फोडणीचे साहित्य, कांदा, टोमॅटो, चिंच, गुळ, शेंगदाणे/काजु
पेसरेट्टुसाठी:-
दोन वाट्या हिरवे मुग
एक वाटी तांदुळ
आलं, मिरची, लसुण, कोथिंबीर
मीठ
कृती:-
चटणी:- जिरे, मोहरी, हिंग, कडिपत्ता ह्यांची फोडणी करुन त्यात चिरलेला कांदा घालुन थोडा परतुन घ्या. मग त्यावर चिरलेला टोमॅटो घाला. वरुन चिंच-गुळ टाकुन एक वाफ काढा. ह्या मिश्रणाला थंड करुन मिक्सर मधुन वाटुन घ्या. घट्टपणासाठी थोडे शेंगदाणे किंवा काजु घाला.
डोसे:- रात्री स्वच्छ धुतलेले एक वाटी तांदुळ आणि दोन वाटी मुग भिजत घाला. सकाळी आलं, मिरची, लसुण, कोथिंबीर, मीठ घालुन मिक्सर मधुन सरबरीत वाटुन घ्या.
आता ह्या पीठाचे आपापल्या वकुबा प्रमाणे डोसे काढा. मला कुरकुरीत डोसे अ जि बा त येत नाहीत. मी लहान भांड्यात पीठ घेऊन, पाणी टाकुन थोडं पातळ करते. आणि मग ते सरळ तव्यावर ओतते. तसं ते आपोआप पसरतं किंवा आपण टाकतानाच गोल टाकायच. पण तरीही आकारात गडबड वाटलीच तर तवा हॅण्डलला धरुन गोल गोल फिरवायचा. होतंच मग ते गोल! कानडी लोक वरुन कांदा टाकतात चिरलेला. मी नाही टाकला.
आता इथवर मला जमलंय. तुम्हाला फक्त खालच्या फोटोत धिरड्या ऐवजी पातळ कुरकुरित डोसा इमॅजिन करायचा आहे. झालं पेसरेट्टु! हाकानाका!
तळटिपा:-
मी कमला सोहोनींच्या पुस्तकात असं वाचल्याचं आठवतंय की कडधान्यांना नेहमी मोड येऊ द्यावेत आणि मगच ते खावेत. मोड न आलेल्या कडधान्यात काही हानिकारक घटक असतात म्हणे. हेच डॉसे जर मोड आलेल्या मुगाचे केले तर कसे होतील कल्पना नाही. पण हे न मोड आलेले मुग वापरावेत का?
तळटिपा:-
मी कमला सोहोनींच्या पुस्तकात असं वाचल्याचं आठवतंय की कडधान्यांना नेहमी मोड येऊ द्यावेत आणि मगच ते खावेत. मोड न आलेल्या कडधान्यात काही हानिकारक घटक असतात म्हणे. हेच डॉसे जर मोड आलेल्या मुगाचे केले तर कसे होतील कल्पना नाही. पण हे न मोड आलेले मुग वापरावेत का?
वाचने
26367
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान जमलाय.
एमेलए डोसा
In reply to छान जमलाय. by राघवेंद्र
MLA कॅन्टीन म्हणजे आमदार
In reply to एमेलए डोसा by रमेश आठवले
चटणीज्
In reply to एमेलए डोसा by रमेश आठवले
कुठे?
In reply to चटणीज् by कपिलमुनी
पत्ता सांगा...
In reply to कुठे? by बोका-ए-आझम
मामू
In reply to पत्ता सांगा... by मोदक
चटनीजबद्दल फार्फार चविष्ट
In reply to चटणीज् by कपिलमुनी
वा!
हा डोसा करण्याऐवजी
पण कॅफे मद्रास ज्यांच्या जवळ
In reply to हा डोसा करण्याऐवजी by बोका-ए-आझम
हो. ते आहेच.
In reply to पण कॅफे मद्रास ज्यांच्या जवळ by प्रियान
सरळ मूगाचा चिल्ला कर ना.
आता चिल्ला म्हणजेही साधारण
In reply to सरळ मूगाचा चिल्ला कर ना. by पिंगू
मूग चिल्ला
In reply to आता चिल्ला म्हणजेही साधारण by पिलीयन रायडर
सुंदर पाककृती ! अजून खल्लेली
कडधान्यांना नेहमी मोड येऊ द्यावेत आणि मगच ते खावेत. मोड न आलेल्या कडधान्यात काही हानिकारक घटक असतात म्हणे.मोड न आलेल्या कडधान्यांमध्ये काही हानीकारक घटक असतात हे शास्त्रियरित्या खरे नाही. तसे असते तर, भिजत न ठेवता रोजच्या भारतिय जेवणात मुख्य पदार्थाच्या रुपाने शेकडो वर्षे वापरल्या जाण्यार्या डाळींमुळे (ज्या मूळात कडधान्येच असतात) आतापर्यंत फार मोठा धोका झालेला दिसायला हवा होता, नाही का ?! (नेहमीच्या वापरात नसलेल्या एखाद्या विशिष्ट कडधान्याबद्दल तसे मत असल्यास माहीत नाही.) कडधान्यांना मोड येताना तेव्हा नवीन झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे अनेक उपयोगी घटक त्यांच्यात निर्माण होतात. शिवाय मोड आलेल्या कडधान्यांची चव जास्त चांगली लागते. मोड आलेली कच्ची कडधान्ये खाल्ली तर ते घटक आपल्याला मिळू शकतात. जास्त शिजवल्यावर त्यातले असे बरेचसे घटक नष्ट होतात. त्यामुळे, कच्च्या व अर्धकच्च्या कडधान्यांत (उदा. चीनी पदार्थांतली कुरकुरीत कडधान्ये) अधिक पोषणमुल्ये असतात असे म्हणणे योग्य होईल. मात्र, कोणत्याही प्रकारचे (शाकाहारी / मांसाहारी) अर्धकच्चे अन्न स्वच्छतेची पुरेशी काळजी न घेता बनवले तर त्यांत नैसर्गिक अथवा अनैसर्गिकरित्या असणार्या जंतूचा प्रादुर्भाव कायम राहून धोका होऊ शकतो. त्यामुळे, कच्चे अन्न खाताना याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.अहो मी कमला सोहोनींच्या
In reply to सुंदर पाककृती ! अजून खल्लेली by डॉ सुहास म्हात्रे
ते इतर कोणाच्या तरी
In reply to अहो मी कमला सोहोनींच्या by पिलीयन रायडर
Sprouting, like cooking, reduces anti-nutritional compounds in raw legumes. Raw lentils, for example, contain lectins, antinutrional proteins which can be reduced by sprouting or cooking.antinutrional म्हणजे अन्नाचे अन्नमार्गात शोषण होण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक अथवा कृत्रिम पदार्थ. (या वाक्यात दिल्याप्रमाणेच) नैसर्गिकरित्या कडधान्यांत असलेले हे पदार्थ मोड येताना आणि शिजविताना कमी/नष्ट होतात. इथे raw legumes हा शब्द मोड न आलेली किंवा न शिजवलेली सुकी कडधान्ये या अर्थाने वापरला आहे असे दिसते.मोड आणण्याबद्दल विविध प्रवाद
In reply to सुंदर पाककृती ! अजून खल्लेली by डॉ सुहास म्हात्रे
कडधान्यांना मोड आले तर
In reply to मोड आणण्याबद्दल विविध प्रवाद by अप्पा जोगळेकर
+१
In reply to कडधान्यांना मोड आले तर by एस
=))
In reply to मोड आणण्याबद्दल विविध प्रवाद by अप्पा जोगळेकर
काही जण मोड आणून खाणे म्हणजे कुजवलेले अन्न खाणे असे सांगतात. काही जण मोड आणलेले अन्न खाऊन गॅस होतो असे सांगतात. आज हे मोड न आणता खाऊ नये हे ऐकले.या सगळ्या अशास्त्रिय अंधश्रद्धा आहेत :)मी जेव्हाही करते तेव्हा मोड
म्हणजे होतात तर मोड आलेल्या
In reply to मी जेव्हाही करते तेव्हा मोड by त्रिवेणी
खरतर हे नुसत्या डाळीचेच करतात
In reply to म्हणजे होतात तर मोड आलेल्या by पिलीयन रायडर
मी नुसते मूग किव्वा साल
मुगाची डाळ वापरुन?
In reply to मी नुसते मूग किव्वा साल by प्रियान
अख्खे मूग किव्वा साल असलेली
In reply to मुगाची डाळ वापरुन? by पिलीयन रायडर
अक्खे मूग
In reply to अख्खे मूग किव्वा साल असलेली by प्रियान
मस्त !
पिरा डॉन चे पसरट्टू
मस्तं दिसताहेत पेसरटट्टू.
वा वा!
+१
In reply to वा वा! by पैसा
चांगलं दिसतंय की!!
चांगलं दिसतय. मला आवडतं व
छान
छान पदार्थ. यात थोडा रवा
पाकृ आवडली
सा वा आणि पैसाक्का ना
अरे वा सुगरणबई.. छानच की
70 MM पेसरट्टु
वा छान !!! मी ही असाच करते.
जमलेत कि! कुरकुरीत व्हायला
डोसच्या पिठा मध्य मोड़ आलेले
चटनी मध्ये मिठ मिर्ची टाकली
मस्त दिसतायत
छान दिसतोय डोसा
एकदम जोश मे हैं पिरा ;)
चांगला दिसतोय की पेसरट्टू!
मस्त जमलेत की पेसारट्टू.फक्त
पेसरटटू
हो, हे सांगायचं राहुनच गेलें
In reply to पेसरटटू by मैत्र
विशाखापटणमची आठवण झाली.(१९९९)
भारी जमलाय बर का पिरा - ( द
मस्त झालेत. मला आधी डोसे पातळ
हे बघ
अरे वा! अगदी क्लास जमलाय की!
In reply to हे बघ by सविता००१
नाही मोड आणून नाही