Skip to main content

वादळ

लेखक Bhagyashri satish vasane यांनी शुक्रवार, 21/10/2016 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनाच्या वाटेवर बरीच होती स्वप्न ह्रदयाच्याच्या जवळची बरीच होती मानसं आयुष्याच्या सायंकाळी सगळं कसं दाटून आलं मनाच्या ह्या कोपर्यामध्ये स्थान तुझं तेच राहिलं भरुन येत मन कधी, वाटत उधळुनी द्यावा खेळ सारा मनातल्या ह्या वादळाला हवी आता नवी दिशा...!
लेखनविषय:

वाचने 7652
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

काहीच्या काहीच...

मिकाभाऊशी सहमत... =)) =)) काही ओळी गाळल्यात का ओ तै?? Sandy

मिकाभाऊशी सहमत... =)) =)) काही ओळी गाळल्यात का ओ तै?? Sandy

दोन काव्य-महारथींनी दखल घेतल्यावर आम्हाला वेगळे काही प्रतिसादवायचे कामच नाही.. :)

मिकाभाऊशी सहमत... =)) =)) काही ओळी गाळल्यात का ओ तै?? Sandy

सँडी भाऊसाठी गाळलेल्या ओळी सकट जीवनाच्या वाटेवर बरीच होती स्वप्न पण वाटेवर वाट बघायचं एक ढापणं ह्रदयाच्याच्या जवळची बरीच होती मानसं माजलेल्या तणातून उभारतात जशी कणसं आयुष्याच्या सायंकाळी सगळं कसं दाटून आलं श्रीखंडाच्या वाटीला जिभेने स्वच्छ चाटून झालं मनाच्या ह्या कोपर्यामध्ये स्थान तुझं तेच राहिलं रिचार्ज कितीचा मारतोस, मी फक्त तेच पाहिलं भरुन येत मन कधी, वाटत उधळुनी द्यावा खेळ सारा पोटातल्या डोंबऱ्याला, पिझ्झाबर्गर नको, आज भेळ चारा मनातल्या ह्या वादळाला हवी आता नवी दिशा...! त्या वादळात तरी येतील का अत्याबाईला मिशा..!

In reply to by सतिश गावडे

अता अस्तर शिवल्यावर बघा ड्रेस कसा फिट्ट बसला. डांगे अण्णा ह्ये टेलरकाम आवडले,अजून काही आर्डरी घेउ का? सर्वांना दिवाळीच्या (आतिषबाजीच्या) शुभेच्छा हिवाळी हवा दिवाळी दिवा फराळी नाखु (यमके गुरुजींचा शिष्य)

In reply to by संदीप डांगे

=)) =)) डांगेअण्णा कहर आहे! ___/\___ मिपावच्या निवडक काव्यकळ्या-फुले वेचून "झेंडूची फुले भाग २" काढायला हरकत नाही! ;) Sandy

In reply to by संदीप डांगे

रिचार्ज कितीचा मारतोस, मी फक्त तेच पाहिलं
पोटातल्या डोंबऱ्याला, पिझ्झाबर्गर नको, आज भेळ चारा
हे वास्तवाच्या जास्त जवळ जाणारं वाटलं.

मी एक सुचवू का? १. तुम्ही MS Paint हे सॉफ्टवेअर कसे वापरायचे ते शिकून घ्या. २. एखादे छान तरुणाचे/तरुणीचे/प्रेमी युगुलाचे चित्र नेटवरुन डाऊनलोड करा. ३. ते चित्र MS Paint मध्ये ओपन करा ४. आता मिपावर लॉगिन करा ५. कोणताही धागा उघडून प्रतिसादाच्या बॉक्समध्ये तुमच्या अशा सुंदर कविता टाईप करा. मात्र प्रकाशित करु नका. ६. ही कविता कॉपी करा. ७. पुन्हा एकदा MS Paint ची चित्राची विंडो ओपन करा. ८. आता तिथे "टेक्स्ट" हे टुल वापरुन तुमची कॉपी केलेली कविता त्या चित्रावर पेस्ट करा. ९. "ट्रान्स्परंट" हे टुल वापरुन तुमची कविता ट्रान्स्परंत करा. १०. चित्रातील हे बदल सेव्ह करा. ११. तुमच्या फेसबुक अकाऊंटला लॉगिन करा १२. तुमचे हे कवितावाले चित्र फेसबुकवर टाका १३. आणि मग बघा किती छान छान प्रतिसाद आणि लाईक्स येतात ते मी "बाल"कवी असताना हेच करत असे. फक्त त्यावेळी ओरकुट होते. फेसबुकचा जन्म व्हायचा होता.

In reply to by सतिश गावडे

त्या १२ वीत आहेत हो.. महत्त्वाचं वर्ष आहे.. कुठे अभ्यास सोडुन मिपा शिवाय आता चेपुवर पण टिपी करायला सांगताय ;)

In reply to by स्रुजा

१२ वीत?!!!!!!!!! बापरे! जीवनाची वाट, आयुष्याची संध्याकाळ वगैरे सुचत तरी कस राव! मान गए, आपकी कविता के यमक और मिपापे डालनेकी धमक... दोनो को!

चांगलं लिहिलं आहेस फक्त अजून स्पष्ट व्हायला हवंय.
मनाच्या ह्या कोपर्यामध्ये स्थान तुझं तेच राहिलं
माझ्या मते : आयुष्यात अनेक लोक भेटतात, त्यातले काही मनात काही काळ घर करतात कधी दूर जातात. पण एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं मनातलं स्थान मात्र दूर जावूनही तेच रहातं अस काहीसं या ओळीतून तुला म्हणायचयं
भरुन येत मन कधी, वाटत उधळुनी द्यावा खेळ सारा मनातल्या ह्या वादळाला हवी आता नवी दिशा...!
कवियित्री प्रपंचात अडकलेली आहे. पण तरी 'त्याच्या' आठवणीने भरुन येते कधी आणि सगळा प्रपंच उधळून द्यावा आणि त्याच्याकडे जावं असं काहीसं वाटून सैरभैर झालेल्या मनाला नवी दिशा हवी आहे. यमक जुळला नसला तरी अर्थ आणि भावना पोहोचत आहे. फक्त अजून नेमकेपणाने व्यक्त हो.