Skip to main content

दिवाळी मिपाकट्टा - ३१ ऑक्टोबर - ठाणे

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 27/10/2016 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी मिपाकट्टा - ३१ ऑक्टोबर - ठाणे तारीख - ३१ ऑक्टोबर वेळ - सकाळी १० वाजता ठिकाण - हॉटेल मेतकूट (राम मारुती रोड जवळ) अपेक्षीत खर्च - १००-३५० प्रत्येकी सालाबाद प्रमाणे यावर्षीसुद्दा ठाण्यात दिवाळी मिपाकट्टा असणार आहे...मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा, खटपट्या शेठ असे चौघे नक्की भेटत आहोत...भेटल्यावर गप्पा-टप्पा आणि खादाडी हा आणि हाच कार्यक्रम असेल याची इच्छूकांनी नोंद घ्यावी :) ता.क. - कट्टा स्पॉन्सर करणाऱयांना वरील चौघांपैकी कोणाच्याही बाईकवर बसवून खादाडीच्या ठिकाणी नेण्यासाठी प्राधान्य मिळेल :D

वाचने 32001
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

बोबो साहेबांनी कोणालाच फोन का नाही केला? की बोबो साहेब पुण्याचे आहेत आणि मुद्दाम ठाणे कट्टा झालाच नाही असा कांगावा करत आहेत? :)

In reply to by टवाळ कार्टा

ह्या, ह्या, ह्या =)) बघा! काय सांगायचे ह्यातही सुसूत्रता नाही! =))

In reply to by यशोधरा

क्काय फरक पडतो? ठाण्यातल्या कट्ट्यांना मिपाकर उत्साहाने २-२ दिवस येतात, पुण्यात तर ठरलेल्या दिवशी येतो असे सांगून ऐनवेळी टांग मारतात

शेम टू शेम नाव असून वर एकाच एरियात असणारी हॉटेल्स यापुढच्या कट्ट्यांसाठी टाळावीत, असे आग्रहाचे णिवेदण. मला अर्धातास एकाच जागी उभा पाहून रोडच्या समोरच्या बाजूला उभे असलेले पो.मामा माझ्याकडे संशयाने पाहू लागले होते.अखेरीस अर्ध्या तासाने माझ्याबद्दल पूर्ण खात्री होऊन ते मला हटकण्यासाठी (की फटकवण्यासाठी? कोण जाणे)माझ्या दिशेने येऊ लागले तसा मी इकडेतिकडे सहज पाहात असल्याप्रमाणे हळूच तिथून काढता पाय घेतला. तुमच्या मेतकुटापायी जीव पार मेटाकुटीला आला भौ.

In reply to by बोबो

=)) मलापण आजच समजले की ठाण्यात २ मेतकूट आहेत, ती सुद्धा एकमेकांपासून अगदी २ मिनिटे पायी चालत जाण्याइतकी जवळ

In reply to by टवाळ कार्टा

अरे पण एकालाही दोन मिनिटांवरच्या दुसर्‍या मेतकुटात जाऊन अन्य चुकल्या कट्टेकर्‍यांना शोधून आणावं असं वाटलं नाही का?

In reply to by आदूबाळ

दुसऱ्या बंद मेतकूट मध्ये कोण कशाला जाईल? आणि असे कोणी अनवधानाने करेल हा विचार कोणाला का सुचावा?

In reply to by आदूबाळ

बोबो तुम्ही याचा सूड घ्या. नुसते पुण्याच्या अमृततुल्यमध्ये किंवा नवनाथ रसपानगृहात कट्टा आहे असे सांगा आणि जाऊन बसा कुठल्यातरी खोपच्यात. हिंडू दे हुडकत मिपाकरांना. ;)

In reply to by अभ्या..

बोबो तुम्ही याचा सूड घ्या.
सूड सोबत असल्याने आणि पुण्यातच कट्टा असल्याने तो नक्की यशस्वी होईल. चिंचवडहून कोल्हापुरला फक्त कट्ट्यासाठी गेलेल्या पाच मिपाकरांपैकी एक नाखु

In reply to by नाखु

चिंचवडहून कोल्हापुरला फक्त कट्ट्यासाठी गेलेल्या पाच मिपाकरांपैकी एक नाखु
कोल्हापूर कट्टा परत कधी?

दुर्दैवाने बोबो साहेबांनी मला खरड 11.05 वाजता पाठवली.पण सतत मोबाईल तपासण्याची मला सवय नाही मित्रांच्या बरोबर गप्पा मारताना तर नाहीच. बोबो साहेबांना परत जावे लागले याबद्दल मी त्यांची माफी मागतो.

In reply to by सुबोध खरे

हेच ते, कट्टा सुरु असताना मोबल्याकडे लक्षच जात नाही, दिलगीर आहोत

In reply to by टवाळ कार्टा

आँ. काल तर कटटा चालु असताना तु फोन उचललेलास की बे.

फोटो आणि वृत्तांत छान....! -दिलीप बिरुटे

१०० झाले का फायनली टक्कुमक्कुशोनुचे? एक मेतकुटाची पुडी (नं उघडलेली), एक पाकिट चकली वं इच्छुकांचा अल्बम देउन टकाचा सत्कार करणेत येत आहे. सत्कारोत्सुक अखिलमिपाधरधागाकीपाडजिलबी संघटना, चिमण हटेला गँग संचालित.