दिवाळी अंकः तुमची शिफारस
‘दिवाळी अंक’ हे आपल्या दिवाळीचं आणि मराठी संस्कृतीचं अविभाज्य अंग. १९०९ मध्ये पहिला दिवाळी अंक ‘मनोरंजन’ प्रसिद्ध झाला. शंभराहून अधिक वर्षांची परंपरा काळाच्या ओघात नामशेष झाली नाही हे विशेष. २०१२ मध्ये ८०० पेक्षा जास्त दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्याची बातमी वाचल्याचं आठवतं. याच्या सोबत आता ‘ई दिवाळी अंक’ पण मोठ्या संख्येने निघत आहेत.
बाकी महागाई वाढली तशा दिवाळी अंकांच्या किमतीही वाढल्या आहेत. मर्यादित बजेटमध्ये काही ठराविक दिवाळी अंक घेता येतात. ज्यांना वाचनालयात दिवाळी अंक मिळतात ते कदाचित अधिक दिवाळी अंक वाचत असतील. पण मी कधी त्या वाटेने गेले नाही कारण वाचनालयाची अंक परत करायची मुदत पाळणं मला जमणार नाही हे मला माहिती आहे.
मी गेली अनेक वर्ष – दरवर्षी - पाच दिवाळी अंक विकत घेतेय. ‘अंतर्नाद’, ‘मिळून सा-याजणी’ आणि ‘अक्षर’ हे अंक इतक्या वर्षांत कायम राहिले आहेत माझ्या यादीत. यंदा ‘अनुभव’ आणि ‘मुशाफिरी’ हे दोन अंक प्रथमच घेतले आहेत.
या पाचच अंकाच्या खरेदीमुळे माझं दिवाळी अंकांचं वाचन फार मर्यादित राहतं. इतर अनेक चांगले अंक निघत असतील; पण ते कळणार कसं? एखादा अंक अगदी पूर्ण चांगला नसला तरी त्यातला एखादा लेख, एखादी कथा आपल्याला प्रचंड आवडून जाते. सदस्यांनी त्यांना आवडलेले लेख, कथा, व्यंगचित्रे, कविता ... याबद्दल इथं माहिती दिल्यास तो अंक, तो लेख, ती कथा मिळवून वाचता येईल.
काय आहे, भारंभार अंक प्रसिद्ध होतात तेव्हा सगळं तपासून पहायला वेळ नसतो आणि तितका वकूबही नाही माझा. अनेकदा अशा प्रयत्नांत नको ते अंक निवडले जाऊन अपेक्षाभंग होतो. इतरांनी शिफारस केली तर दर्जेदार साहित्य शोधण्याचे कष्ट कमी होतील. या लेखांचा दुवा उपलब्ध असेल तर तोही जरूर द्यावा.
मी सुरुवात करते मला आवडलेला एक लेख सांगून. ‘अक्षर’ दिवाळी अंकात (किंमत १२०/- रुपये) ‘रिपोर्टिंग करताना’ अशी पाच लेखांची ‘विशेष लेखमाला’ आहे. त्यातला युवराज मोहिते यांचा ‘दुर्बीण’ लेख मला आवडला. ‘पत्रकारांनी रिपोर्टिंग करताना भूमिका घ्यावी का, धोके पत्करावेत का’ या प्रश्नाभोवती अनुभव मांडलेले आहेत त्यांनी. सामाजिक जाण असलेले पत्रकार ‘बातमी’ लोकापर्यंत पोचावी म्हणून काय करतात, त्यांना कोणत्या प्रलोभनांना, दबावांना तोंड द्यावं लागतं याचं अनुभवाधारित चित्रण या लेखात आहे. हा लेख मला आवडला कारण समाजातल्या शोषित वर्गाला आणि त्यांच्या बाजूने संघर्षाला उभ्या राहणा-या लोकांना कशातून जावं लागतं याची थोडी कल्पना या लेखातून येते. तसंच प्रश्नांची व्याप्ती किती आहे याचाही पुन्हा एकदा अंदाज येतो. लेखाची भाषा जड नाही हे आणखी एक वैशिष्ट्य.
सांगा तर तुम्हाला आवडलेल्या अंकाबद्दल, लेखाबद्दल. मोघम ‘मस्त आहे’ किंवा ‘बेक्कार आहे’ (हो, काय टाळावे हेही जरूर सांगा) हे न सांगता विस्ताराने सांगितल्यास अधिक मजा येईल. आणि हो, छापील दिवाळी अंकांसोबत ई-दिवाळी अंकही असू द्या ध्यानात – ते तर वाचायला जास्त सोपे आणि बिनखर्चिक :-)
आणि हो, एखादा लेख/कथा/ कविता मला आवडला/आवडली, पण दुस-या कुणाला ती मुळीच आवडली नाही असंही होऊ शकतं! त्यातून साहित्याचे, समाजाचे, वाचकांच्या अपेक्षांचे काही नवे पैलू समोर आल्यास अधिक उत्तम!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सुरेख धागा.
उत्तम......धागा....
एक नम्र विनंती...
"नाव नक्कल" उत्पादन बाजारात
एक नाव सोडलं.
युक्ती
वाचते आहे.
बहुतेक सगळेच दिवाळी अंक छान
तुम्हाला आवडलेला एखादा लेख
या ठिकाणी (आत्ता) उल्लेख
घरपोच
'मायबोली' संकेतस्थळावर* या
बुकगंगा
ही आणखी एक सोय दिसतेय - पण
बुकगंगा.कॉम या साईटहून तुम्ही
दिवाळी अंक.
आता काही अंक (छापील अंक)
धन्यवाद.
साधनाच्या लिंकबद्दल धन्यवाद!
प्रभाकर देवधर यांची ओळख
मोहिनि अंकात
'पालकनीती' : बालसहित्य विशेषांक
'पालकनीती' नेहमीच वाचनीय असतो
अंक अद्याप ऑनलाईन प्रकाशित
कथाश्री
कथाश्री
धन्यवाद मनिष. अंकाची आणि
'फ फोटोचा' यांचा दिवाळी अंक
धन्यवाद अदिती. बहुधा मागच्या
धन्यवाद!
'मौज'मधल्या तुम्हाला
सध्या..
हे वाचायला आवडतील खरच! ऑनलाईन
ऑनलाईन नाहीत
या निमित्ताने एक गोष्ट
दोन दिवाळी अंकांविषयी...
सविस्तर प्रतिसादाबद्दल
नुकताच "किस्त्रीम" वाचत आहे..
धन्यवाद
एक विजय लेलेंचा
किस्त्रीम मधील सोनवणींचा
हं! अपेक्षित!!
आयला, हा प्राणी आता दिवाळी
किस्त्रीम मधील
२०१३ चे दिवाळी अंक: माझी शिफारस
मी आत्तापर्यंत तीस एक अंक
मी आत्तापर्यंत तीस एक अंक वाचले.तुम्हाला एक नमस्कार घ्या माझ्याकडून. इतके अंक तुम्ही वाचलेत याबद्दल मला थोडा हेवाही वाटतो आहे तुमचा. :-) तुम्ही उल्लेखलेले दोन्ही लेख मि़ळताहेत का ते पाहते आता. डॉ. धरमपाल यांचाही अधिक शोध घेते.२०१५ दिवाळी अंक
क्याटेगरी
पारोमिता गोस्वामी
दिवाळी अंक २०१६