मंगळ आणि शनी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
५ मिनिट गटार गंगेजवळ उभे राहिले कि डोक्यावर डास वारली नृत्य करू लागतात तद्वतच माणूस जन्माला आला कि नवग्रह त्याच्या डोक्यावर फेर धरून नाचू लागतात . डोक्यावरचे डास दोन चार टाळया वाजवून पळवता येतात पण हे नव ग्रह एकदा का मानगुटीवर बसले कि मरेपर्यंत काही पिच्छा सोडावयाचे नाहीत . त्यातले मंगळ आणि शनि तर खास टेरर , म्हणजे जर कोणा हतभागी मुलीच्या कपाळी मंगळ आला की मग ती कितीही सुस्वरूप, सुस्वभावी सद्गुणी असो, ती पांढऱ्या पायाची बनुन स्वतः च्या नवऱ्याला खाणारी कैदाशीण होऊन जाते .( by the way माझ्या बायकोला कडक मंगळ आहे आणि लग्न केलेस तर दोन महिन्यात देव्बाप्पाशी appointment fix असे मला निक्षून सांगितले गेले होते, पण मरण सोडा दोन महिन्यात साधे जुलाब सुद्धा झाले नाहीत-सासरच्या नातेवाईकाकडे हादड हादड हादडून वजन मात्र वाढले- तर ते एक असो) बऱ हा मंगळ बराच स्त्री लंपट दिसतो. म्हणजे बायकांची छेड काढतो पण पुरुषांच्या फारसा वाटेला जाताना दिसत नाहि. म्हणजे मी तरी कडक मंगळाच्या जावयामुळे बायको किंवा सासरा मेल्याचे ऐकले नाही कधी . दुसरा टेरर ग्रह म्हणजे शनि. हा मात्र स्त्री पुरुष समानता मानतो असे दिसते म्हणजे आता पर्यंत तसे मला वाटत होते पण एवढ्यात शनि शिंगणापूरचा वाद झाला आणि मला कळले कि हा विशेष स्त्री द्वेष्टा आणि स्त्रियांना घाबरणारा आहे. अहो नाहीतर ज्याच्या नावाने नुसते लोक चळ चळा कापतात त्याला बायकांची कसली भीती?. आलीच एखादी शहाणी चौथर्यावर चढून तर मिनिटात डोळे काढून(तिचे) तिच्या हातावर ठेवायचे. नाहीतरी त्याची तशी खासियत आहेच म्हणे त्या गावात. पण काय आहे, बाई पाहून त्याची तारांबळ उडाली असणार, अहो डोळे काढणं सोडा आमची तर बायको कडे (स्वतःच्या सुद्धा) डोळे मोठे करून बघायची टाप नाहि.ह्या बाया पण भारी, स्वतःच्या नवऱ्याला हिंग लावून विचारत नाहीत पण शनीला तेल लावयाला मात्र जाणार...आहे कि नाही गम्मत!
-आदित्य कोरडे
प्रतिक्रिया
खूप मागे जय हनुमान नावाचे एक
(No subject)
मठ्ठाही पाठवा. भावनगरी
मूळ पा. क्रुतीत मठ्ठा आहेच की
मिपाच्या गेटातून आत येणा-यांना "चघळण्यासाठी उरलेले विषय"
;) +11111
होय
+१...
पण मरण सोडा दोन महिन्यात साधे
मिपाची कुंडली तपासा, एवढ्यात
ग्रहांवर माझाही विश्वास नाही
बरोबर
जरा अधिक स्पष्ट करून सांगाल
उद्या माणूस मंगळावर राहायला गेल्यावर
;-)
मंगळ असलेल्या व्यक्तीची
लाखो करोडो किलोमीटर दूर
नमस्कार( ढोपारापासून असला तरी
आपला अहंकार आपल्यापाशी, गावभर
डांगेसर! स्वतःच्या वडिलांच्या
मी आधीच म्हंटले की माझा
रोज रोज
कोरडे साहेब, तुमच्या पिंटू
ऐकावे ते नवलच!