✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

`तारे' जमीं पर नव्हे, जमीनदोस्त!

आ
आपला अभिजित यांनी
गुरुवार, 02/05/2009 - 23:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5094 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

वा! खूप गोड

विसोबा खेचर
गुरुवार, 02/05/2009 - 23:22 नवीन
वा! खूप गोड पोरगी आहे! तिला माझ्याकडून एक भला थोरला मिठाईचा बॉक्स लागू! :) तात्यामामा. :)
  • Log in or register to post comments

बॉक्स

आपला अभिजित
गुरुवार, 02/05/2009 - 23:25 नवीन
रिकामा असेल, तर तिला खेळायला देईन. भरलेला असेल, तर मीच घेईन म्हणतो!!
  • Log in or register to post comments

सह्ही!

चतुरंग
गुरुवार, 02/05/2009 - 23:28 नवीन
मुलं त्यांची ती मुखत्यार असतात आणि त्यांना जे पाहिजे तेच करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं! ;) परफॉर्मन्स हा बाकीच्यांसाठी असतो त्यांच्यासाठी ती फक्त एंजॉयमेंट असते. मनात आलं केलं, नाही तर राहिलं. तुमची कन्यका एकदम चुणचुणित दिसते आहे. अतिशय बोलके डोळे आहेत धिटुकलीचे. भर स्नेहसंमेलनात तुमच्या डोळ्यांसमोर तारे चमकवणार्‍या तिचे आणि अशा मुलीचे पालक म्हणून आपलेही अभिनंदन! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

खरंतर तुझी पोरगी

प्राजु
गुरुवार, 02/05/2009 - 23:33 नवीन
दिसतेच त्या मुग्धासारखी. फुगाच तो..... फुटायचाच!! त्यात इतकं काय वाईट वाटून घ्यायचं? लेकीने सांगितलं का फुगे फुगवून बसा म्हणून?? गोड आहे पोरगी. मस्त अनुभव. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्तच.

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 02/05/2009 - 23:34 नवीन
मस्तच. लहान मुलं कधी कोणाचा पो करतील काही सांगता येत नाही. पण तुम्ही पण हे सगळं इतकं छान समजून घेतलं त्याचं पण कौतुक वाटतंय. :) पोट्टी गोडच. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

मस्त अनुभव

धनंजय
गुरुवार, 02/05/2009 - 23:37 नवीन
छान रंगवलाय. तुमच्याबरोबर आमच्याही अपेक्षा आपटल्या. काही झाले तरी पण मुलगी मात्र भारी गोड दिसते तुमची!
  • Log in or register to post comments

छान

भडकमकर मास्तर
गुरुवार, 02/05/2009 - 23:39 नवीन
छान लिहिलंय... लहान मुलं अशीच गंमत करत असतात... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

रागावला नाहीत ते महत्वाच!

संदीप चित्रे
गुरुवार, 02/05/2009 - 23:45 नवीन
तुम्हा दोघांचा फुगा फुटला म्हणून तिला रागवला नाहीत (असं गृहित धरतोय) ते महत्वाचं :)
  • Log in or register to post comments

डोंबल!

आपला अभिजित
गुरुवार, 02/05/2009 - 23:49 नवीन
रागावतोय कुठला? उलट तीच आमच्याकडून (म्हणजे बर्‍याच वेळा माझ्याकडून) तिच्या न्रुत्याच्या स्टेप्स बसवून घेते आणि मी चुकलो, कंटाळलो, तर बरीच बोलणी खावी लागतात! X( शाळेत ती जाते की मी, हा प्रश्नच पडतो अशा वेळी!!
  • Log in or register to post comments

जमाडी जम्मत ! गमाडी गम्मत !

वाहीदा
गुरुवार, 02/05/2009 - 23:49 नवीन
जमाडी जम्मत ! गमाडी गम्मत ... पण मूड असेल तेव्हाच ! just an observation --- तुमच्या मुलीचे डोळे खुपच छान टपोरे आहेत Fascinating ,Captivating eyes with eyebrows been archived (sorry याला मराठीत काय म्हणतात माहीत नाही ) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

>>एकमेकींना

प्राची
Fri, 02/06/2009 - 00:05 नवीन
>>एकमेकींना टाळी देतानाचा गोंधळ =)) =)) =)) लहान मुलांकडून झालेल्या या चुकासुद्धा(गमतीजमती) त्यांच्या निरागसपणामुळे बघणार्‍याला आनंद देऊन जातात.
  • Log in or register to post comments

मस्तच.

शितल
Fri, 02/06/2009 - 00:10 नवीन
छान लिहिले आहे..:) माझ्या लेकाला नाच करायला सांगितले की नुसत्या माकड उड्या मारतो. :(
  • Log in or register to post comments

तुमच्या

स्वातीदेव
Fri, 02/06/2009 - 02:00 नवीन
तुमच्या मुलीच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाचा व्हिडीओ पाहीला. खूप गोड आहे ती. चुणचुणीत आहे. :)
  • Log in or register to post comments

काय मस्त

रेवती
Fri, 02/06/2009 - 02:31 नवीन
काय मस्त प्रकार आहे हा! नाच मस्तच आहे. टाळ्या देतानाची मजा बघून जाम हसले. तुमची मुलगी मुग्धासारखीच गोड आहे. दोघींच्या चेहेर्‍यात साम्य नक्कीच आहे. रेवती
  • Log in or register to post comments

नाच फारच छान!

चित्रा
Fri, 02/06/2009 - 05:33 नवीन
तुमच्या गोड लेकीला नटण्याची खूप आवड दिसते आहे. :) अजूनही ते आमच्यासाठी एक गूढच आहे! मुलांच्या छोट्या डोक्यात काही तरी चालू असते बहुदा अशा वेळी. कधीकधी समोरच्या गर्दीकडे पाहून गप्प बसतात, कधी कॅमेर्‍याच्या फ्लॅशची सवय नसल्याने त्याने लक्ष विचलित होते. पण तुम्ही मुलीला उगीच खोदून प्रश्न विचारले नाहीत हे चांगले झाले.
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
Fri, 02/06/2009 - 07:22 नवीन
अभिजित लेख छान. व्हिडीओ धमालं. मजा आली.
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Fri, 02/06/2009 - 07:37 नवीन
खरच मजा आली !!! :-D बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

अभिजित, मजा

महेंद्र
Fri, 02/06/2009 - 08:11 नवीन
अभिजित, मजा वाटली. आता माझ्या मुली टिन एजर्स झाल्या पासुन ह्या आनंदाला मुकलो आहे. खुप छान व्हिडीऑ आहे ..
  • Log in or register to post comments

अरे ही तर

दशानन
Fri, 02/06/2009 - 08:14 नवीन
अरे ही तर सेम माझ्या भाची सारखी दिसते आहे.. सेम तु सेम उभ्या वेण्या.... ;) सुंदर !! तुनळीचा दुवा पाहीला... :) अपेक्षा.... ! अपेक्षेच्या वजन एवढं वाढवू नका की तुम्हालाच जानवेल की फुगा फुटला ते ;) ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलंय!

राघव
Fri, 02/06/2009 - 10:32 नवीन
पोरगी अगदी गोडोबा आहे. :) चुणचुणीत!! बाकी परफॉर्मन्स बद्दल आपण "काय बी बोलनार नाय!". अवो त्याबाबतीत आडातच नाय आपल्या तर पोहर्‍यात कुठुन येईल? :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments

हा

आपला अभिजित
Fri, 02/06/2009 - 10:52 नवीन
अवो त्याबाबतीत आडातच नाय आपल्या तर पोहर्‍यात कुठुन येईल? हा उपटसुंभपणा करायला कुणी सांगितलं होतं? माझा नाच बघायला तुम्ही कधी आला होतात?? 8> बाकी तुम्ही हे माझ्या बाबतीतच म्हणालात ते ठीक आहे. तिच्या आईच्या बाबतीतली ही कॉमेंट असेल, तर मात्र तुम्ही आडात असे जाऊन पडाल, की पोहर्‍याने सुद्धा वर काढता येणार नाही!!
  • Log in or register to post comments

ह्म्म्म्म

परिकथेतील राजकुमार
Fri, 02/06/2009 - 11:33 नवीन
मुलगी दिसण्यात आईच्या आणी परफॉर्मन्स मध्ये बाबांच्या वळणावर गेली आहे ;) हि प्रतिक्रिया चालेल काय ? बाकी टाळ्या देतानाचा व्हिडीओ बघुन मज्जा आली, त्या वेळी शिक्षकांच्या चेहर्‍यावर उमटलेले भाव बघण्यात अजुन आनंद मिळाला असता ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित

अवो, थ्ये

राघव
Fri, 02/06/2009 - 12:51 नवीन
अवो, थ्ये आमी सोताबद्दल म्हनत हुतो! मपल्याला सोताला परफॉर्मन्स चा प बी येत नाय तर त्याबद्दल काय बोलनार असं म्हनायचं हुतं आमास्नी! आपुन तर थुमचे फ्यॅन हाउत. थुमच्याबद्दल आमी असं कसं बोलनार?? :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित

अभिजीत,

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/06/2009 - 11:38 नवीन
अभिजीत, पोरगी एकदम बाहुली आहेच. तुम्ही तिचं बालपण हिरावून घेत नाही आहात हे पाहून खरंच खूप आनंद झाला. तिला उदंड शुभेच्छा. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments

अभिजितभाऊ,

आचरट कार्टा
Fri, 02/06/2009 - 12:31 नवीन
अभिजितभाऊ, ह्या पोरांचा असाच असता. खंय चार लोकांत आयशी-बापसान सांगल्यान, "अगदी छान कविता म्हणून दाखवते... म्हण म्हण, चांदोबाची म्हण..." काय पोरान निस्ता "अँ" येवडाच बोलूचा असता, असो नियम हा! पोरांच ती. टेपरेकॉर्डर थोडोच हा? मनात इला काय वाजलो? तुमी ह्या समजून घेतंस, ता बरा हा. नायतर "माज्या चेडवान ह्या करूकच व्हया" म्हणान बापूस हटान बसाक लागलो, काय पोरांचे हाल सुरू... नि एक सांगूचा हा, राग मना नुको. चेडवाची चाक (दृष्ट) काडा आज :) माका काय? वाटला काय चल!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा