✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गीतगुंजन - २२: बेबी, व्हेन यो'र गॉन...

प
प्रास यांनी
गुरुवार, 10/06/2016 - 13:51  ·  लेख
लेख
जगात प्रेमाच्या संदर्भात दोन मतप्रवाह आढळतात. पहिला म्हणजे स्वभाव जुळले पाहिजेत आणि दुसरा अपोझिट अट्रॅक्स. असंच काहीसं मैत्रीच्या बाबतीतही होतं आणि म्हणूनच कधी कधी संभ्रम होतो, ही निखळ मैत्री आहे की प्रेम? स्वभाव जुळले म्हणून किंवा स्वभाव विरुद्ध आहेत म्हणून वादविवादाचे प्रसंग टाळता येत नाहीत. किंबहुना ते तसे येतातच. मग सुरू होतो राग आणि अबोला यांचा सिलसिला! एकान्तात राहवत नाही आणि गर्दी भावत नाही. काऊन्टर करण्यासाठी नेमका विषय टाळून कुणाशी गप्पा, नाटक-सिनेमा-रेडीओ-पुस्तक यामध्ये मन गुंतवण्याचे प्रयत्न सुरू होतात. दिवस कशा ना कशा त-हेने पार पडतो पण मग रात्रं खायला उठते. पुन्हा पुन्हा झालेला वाद, वादाचे मुद्दे, बरोबर, चूक आठवत राहतं आणि सोबत आठवत राहते, वाद घालणारी व्यक्ती. तिचे विचार, मांडण्याची पद्धत, कारणमीमांसा आणि हावभाव. हळूहळू शब्द ऐकू येईनासे होतात, आजूबाजूचा भाग धूसर होऊ लागतो आणि एखाद्या निपुण छायाचित्रकाराने टिपल्यासारखी ती व्यक्ती संपूर्ण मनपटलावर दिसत राहते. प्रश्न मन पोखरत राहतो, हे प्रेम तर नव्हे? अगदी हीच भावना ब्रायन अ‍ॅडम्स आपल्या 'बेबी, व्हेन यो'र गॉन...' गाण्यात दर्शवतो. खरं तर हे एक युगल गीत आहे पण युगल गीतामधल्या सामान्य रचनेला इथे ब्रायनने पूर्ण फाटा दिलाय. एक कडवं पुरूषाचं आणि एक स्त्रीचं अशी सरळधोपट रचना न करता ब्रायन या गीताला सहगायनाचं रूप देतो. सहगायनाचं हे रूपच गाण्याला वेगळ्या उंचीवर नेतं. गाण्यात व्यक्त झालेली स्थिती मग कुण्या एका पुरूषाची किंवा एका स्त्रीची न होता ती सहभावना होते. ब्रायनने यात सहगायिका म्हणून स्पाईस गर्ल्समधली स्पोर्टी स्पाईस, मॅलेनी सी निवडली. या निवडीतही ब्रायन बाजी मारून गेलाय. ब्रायनसारखाच हस्की आवाज असणा-या मेल सीचं गायन ब्रायनबरोबर इतकं मिसळून जातं की हे असं झालं नसतं तर गाण्यामागचा सार्वत्रिकत्वाचा भाव इतका परिणामकारकपणे श्रोत्यापर्यंत पोहोचूच शकला नसता. ब्रायन अ‍ॅडम्स आणि मेल सी यांच्या 'बेबी व्हेन यो'र गॉन' गाण्याचा आनंद घ्या - Lyrics - i've been wandering around the house all night wondering what the hell to do i'm trying to concentrate but all i can think of is you well the phone don't ring cuz my friends ain't home i'm tired of being all alone got the tv on cuz the radio's playing songs that remind me of you baby when you're gone - i realize i'm in love the days go on and on - and the nights just seem so long even food don't taste that good - drink ain't doing what it should things just feel so wrong - baby when you're gone i've been driving up and down these streets trying to find somewhere to go ya i'm lookin' for a familiar face but there's no one i know this is torture - this is pain - it feels like i'm gonna go insane i hope you're coming back real soon -cuz i don't know what to do
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
2806 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

अजून लिहायचे होते. आवडले.

यशोधरा
गुरुवार, 10/06/2016 - 14:08 नवीन
अजून लिहायचे होते. आवडले. पहिला परिच्छेद सुरेख जमलाय.
  • Log in or register to post comments

देवा, कुठे लपले होता तुम्ही

महासंग्राम
गुरुवार, 10/06/2016 - 14:24 नवीन
देवा, कुठे लपले होता तुम्ही इतके दिवस.. झकास लेख.
  • Log in or register to post comments

वॉव! अत्यंत आवडतं गाणं. छान

एस
गुरुवार, 10/06/2016 - 16:53 नवीन
वॉव! अत्यंत आवडतं गाणं. छान लिहिलंय. पण अजून लिहायला हवं होतं याच्याशी सहमत.
  • Log in or register to post comments

झकास , बरं झालं परत लिहिते

A.N.Bapat
गुरुवार, 10/06/2016 - 17:38 नवीन
झकास , बरं झालं परत लिहिते झालात ...
  • Log in or register to post comments

प्रासभौ लिहिते झाले हे फार चांगलं झालं.

बोका-ए-आझम
गुरुवार, 10/06/2016 - 17:51 नवीन
मग त्या विषयातलं आपल्याला ओ का ठो कळत नसलं तरी काही हरकत नाही.
  • Log in or register to post comments

नाय तर काय

मी-सौरभ
गुरुवार, 10/06/2016 - 20:27 नवीन
मला तर हे असं गाणं आहे हेच आत्ता कळलं. बघू, ऐकू जमेल आणि कळेल तेव्हा. प्रास भाऊ: तुम्ही लिहीत रहा, नक्की वाचले जाईल आणि पहिला परिच्छेद झक्कास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

बोका ए आझम : कोणाला उद्देशून

A.N.Bapat
गुरुवार, 10/06/2016 - 19:43 नवीन
बोका ए आझम : कोणाला उद्देशून लिहिले आहे हे ?
  • Log in or register to post comments

स्वतःलाच.

बोका-ए-आझम
Fri, 10/07/2016 - 00:30 नवीन
मला पाश्चात्त्य संगीतातलं काहीही समजत नाही, पण प्रासभौंनी लिहिलाय म्हणून मी लेख वाचला. काही गैरसमज झाल्यास साॅरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: A.N.Bapat

जबरदस्त वेगवान गाणं. मूड

गवि
गुरुवार, 10/06/2016 - 21:29 नवीन
जबरदस्त वेगवान गाणं. मूड बनवणारं. प्रासभाऊ.. "हॅव यू एव्हर रियली लव्हड अ वूमन" हेही त्याचं एक अफलातून गाणं आहे रे.
  • Log in or register to post comments

अरे हे तर संदीप खरेंची कविता

बटाटा चिवडा
Fri, 10/07/2016 - 00:22 नवीन
अरे हे तर संदीप खरेंची कविता आहे, 'नसतेस घरी तू जेव्हा' .. क्या बात.. अजय-अतुल हिंदीत फेमस झाले, आता खरे साहेब English मध्ये.. वाह !!
  • Log in or register to post comments

वाह ! हे गाणं तुफान आवडतं.

स्रुजा
Fri, 10/07/2016 - 00:40 नवीन
वाह ! हे गाणं तुफान आवडतं. आणि तुम्ही फार सुंदर लिहीलंय. लेखाची सुरुवात अगदी झोकात. त्याच्या बाकी गाण्यावर ही लिहा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा