औरंगाबाद सायकल कट्टा
पुण्यातला पहिला सायकल कट्टा संपन्न होतानाच या औरंगाबाद सायकल कट्ट्याची बीजे रोवली गेली होती. मोदकरावांचा पुण्यातल्या सायकल कट्ट्याचा हा लेख तुम्ही वाचला असेलच !अर्थातच या दोन्ही कट्ट्याचे प्रणेते मोदकरावाच आहेत हे येथे नमूद करणे अत्यंत महत्वाचे आहे.
तर, औरंगाबाद सायकल कट्टा २४ व २५ सप्टेम्बर ला करायचा असे ठरले. व त्याप्रमाणे कायप्पा ग्रुप स्थापन करण्यात आला. त्यात पुण्यातले औरंगाबाद सायकल कट्ट्याला येऊ इच्छिणारे आणि यजमान औरंगाबादकर ( संख्या ३) असे सामील झाले. २४ तारीख येत येत पुण्यातले ८ पैकी ३ गाळपाटले आणि ५ फायनल झाले. लातूरहून एकमेव मानसरावजी चंद्रात्रेसाहेब येणार होते ते पण ऐनवेळेला गाळपाटले . यथावकाश २१ तारखेला सगळ्यांचे कान्फरमेशन घेण्यात आले. आणि पूर्वतयारी पण झाली. ( फार काही नाही, गाडी कोणाची कोण चालवणार वगैरे).
ज्या २४ तारखेची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो ती तारीख उजाडली. प्रशांतराव सगळ्यांना गोळा करत करत शेवटी मला घेऊन आम्ही ठरलेल्या वेळेच्या दीड तास उशीरा म्हणजे ८.३० वाजता प्रस्थान केले. लगेचच मोदकरावानी जाहीर केले की नगर मध्ये नितीन पाठक साहेब आपल्यासाठी नाश्त्याला थांबले आहेत. पण मग त्यांनाच भूक अनावर झालेली असल्यामुळे त्यांनीच आपण शिरूर ला नाश्ता करू आणि पाठक साहेबाना सदिच्छा भेट देऊ असे जाहीर केले.
शिरूर बाजूला जाणेयेणे असल्यामुळे शिरूर च्या आधी सरदवाडी ला " दिग्विजय " ला मिसळ खाऊ असा मी प्रस्ताव मांडला आणि सार्वमताने तो पास होईपर्यंत आम्ही दिग्विजय ला पोहोचलो पण.
मिसळ खाल्ली . नंतर मोदकरावानी पान खाण्याचा ( सकाळी ११ वाजता ?) आग्रह केला. पण मला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसल्यामुळे मी त्यांना नम्रपणे नकार दिला. आणि थोडी घाई करावी असे सुचवले.
नगर मध्ये आल्यावर नितीन पाठक साहेब आमची बी एस एन एल ऑफिस बाहेर आमची वाट बघत उभे आहेत असे समजले.
पाठक साहेबांनी लगेच आम्हाला जवळच्या उपाहारगृहात नेले आणि मग गप्पांची मैफिल जमायला वेळ लागला नाही. त्यात पाठकसाहेब गेली ३५ वर्ष सायकल चालवत आहेत आणि आतापर्यंत त्यांनी दीड लाख किलोमीटर पेक्षा जास्त सायकल चालवली आहे( सडपातळ बांधा असण्याचे कारण समजले) हे ऐकून आम्ही गपगार झालो. आणि सायकल चालवण्याच्या बाबतीत किती मागे आहोत ( विशेषतः मी ) हे जाणवले .
दीड दोन तास मनमुराद गप्पा झाल्या आणि टॅंक म्युझियम बघायला येण्याचे नक्की करून आम्ही नगर सोडले. प्रवासादरम्यान गप्पा चालू होत्याच. निवांत गप्पा मारत औरंगाबाद ला पोहोचलो. टुरीस्ट होम नामक हॉटेलात आम्ही राहण्याची उत्तम व्यवस्था यजमानांनी केली होती.
मग फोनाफोनी करून योगेश साळुंखे आणि केदार गोगटे आले आणि सर्वात शेवटी आपला दवाखाना बंद करून डॉ. श्रीहस बर्दापूरकर पण आले. ते सुद्धा सायकल चालवत! ( फार रेगुलर सायकल चालवतात)
ओळखी पाळखी झाल्यावर गप्पाना सुरुवात झाली. विषय अर्थातच सायकल हाच होता.
रात्रीचा बेत चिकन दम बिर्याणी , मटण सुखा , सलाड असा होता. आमच्यातले दोघे व्हेज अंड खाणारे असल्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल अंडा बिर्याणी मागवली होती त्यामुळे आम्हाला चिकन बिर्याणी वर यथेच्छ ताव मारता आला.
त्यानंतर अर्थातच पान! तारा पान!
इतक्या वेळेला औरंगाबाद ला येऊनही आपण या पानाच्या दुकानातले पान का खाल्ले नाही या विचाराने मला विलक्षण दुःख झाले. त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी मी दोन वेगवेगळी पाने खाल्ली. मोदकरावांना जरा जास्तच दुःख झाले असावे कारण त्यांनी पानांवर यथेच्छ ताव मारला ( च्यायला , बिर्याणी खाऊन पण यांच्या पोटात एवढी जागा कशी?)
तिथून १२च्या सुमारास हॉटेलवर परत आल्यावर मोदकरावांचा लेह लडाख ट्रिप चा दृकश्राव्य कार्यक्रम झाला. जोडीला मोदकभाऊ प्रत्येक फोटोमागे दडलेली कहाणी सांगत होते.आणि आम्ही आश्चर्यचकित होऊन ते बघत होतो. ( मोदकरावांची त्याबद्दलची लेखमाला चालू आहेच). कुतूहलमिश्रित प्रश्नांना मोदकभाऊ न कंटाळता उत्तरे देत होते.(पान इफेक्ट यु सी ). शेवटी एकेकाची विकेट पडायला लागली आणि कार्यक्रम २.३० ला आवरता घ्यावा लागला.
दुसऱ्या दिवशी लवकर निघायचे ठरले होते कारण वाटेत प्रा. डॉ. दिलीप बिरुटे सर भेटणार होते. त्यांनी नाश्त्याचे आमंत्रण दिले होते. औरंगाबाद हुन निघताना सकाळचा चहा विथ गप्पा झाल्या. तिथे डॉ.श्रीहास यांनी पुण्याला सायकलवर येण्याचा मानस बोलून दाखवला आणि त्यांचे पुण्यात ढोलताशाच्या गजरात जंगी स्वागत होईल असा विश्वास आम्ही त्यांना दिला. आणि आम्ही निघालो.
वाटेत सर भेटले . त्यांच्याबरोबर भरपूर गप्पा झाल्या . आम्लेट पाव, कटलेट, भुर्जी , तंदुरी चिकन असा भरपेट नाश्ता करून सरांचा निरोप घेतला.
वाघोली ला डिकॅथलॉन ला आमची ही सहल संपन्न झाली.
अत्यंत महत्वाची टीप : हा लेख मोदकभाऊंच्या नाकावर टिच्चून लिहिला आहे. कारण आपल्या ट्रिप चा एक फर्मास लेख तुम्ही लिहा अशी सगळ्यांनी विनंती / विनंत्या करूनही लेख लिहिण्याच्या दृष्टीने फोटो काढले नाहीत असे फुटकळ कारण देऊन त्यांनी नकार दिला .
अत्यंत दुर्लक्ष करण्याची टीप : खरे तर मी हा लेख/ वृत्तांत लिहिण्या मागची प्रेरणा मोदकभाऊ आणि बिरुटे सर आहेत. मोदकभाऊ त्यांच्या सायकलिंग ने , लेख लिहिण्याने आम्हाला प्रोत्साहित करत असतात हे नाकारून चालणार नाही.
फोटो मुद्दामून दिले नाही आहेत . फोटो कट्टेकऱ्यानी इथे टाकावेत अशी नम्र विनंती.
लेख लिहिण्याचा हा तिसराच प्रयत्न आहे. आपल्या सगळ्यांच्या पसंतीला उतरेल अशी आशा आहे. धन्यवाद.
वाचने
10504
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
रिटर्न कसे आले शिवनेरी ने का
"मानसरावजी चंद्रात्रेसाहेब"
In reply to "मानसरावजी चंद्रात्रेसाहेब" by अरिंजय
त्ये "मानसचंद्ररावजी
ज्जे बात
In reply to ज्जे बात by बाबा योगिराज
येस्स, उपवृत्तांत जरूर टाकणेत
वाह
भारी आहे सायकल ग्रुप आणि
सायकल चालवण्याचे वर्णन नाहीये
In reply to सायकल चालवण्याचे वर्णन नाहीये by एस
+१
In reply to +१ by खेडूत
हा ना
In reply to +१ by खेडूत
वृत्तांत आणि फोटो मस्तं.
पानाचे फोटो न टाकल्याबद्दल
वाह, मस्त, शॉर्ट अँड स्वीट!
खूप मस्त कट्टा झाला आणि
किती कौतुक ?????????
In reply to किती कौतुक ????????? by नितीन पाठक
साहेब...
In reply to साहेब... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कधी भेटताय ?
लै भारी रे!! वृत्तांत पण
.
सद्या एक फोटो बघीतलाय. बाकी
तारा पान शॉप बाहेर एक क्षण
In reply to तारा पान शॉप बाहेर एक क्षण by स्थितप्रज्ञ
फोटु दिसंना
In reply to फोटु दिसंना by अरिंजय
रीप्रयत्न करतो
परतीच्या वाटेवर नाश्त्याच्या ठिकाणी
आनंदरावांनी लैच कौतुक
In reply to आनंदरावांनी लैच कौतुक by मोदक
उपवृत्तांत हि भारी झालाय. पण
In reply to आनंदरावांनी लैच कौतुक by मोदक
"मानसचंद्ररावजी चंद्रात्रेसाहेब"
उप वृतांत ...........