!! सैनिक मरतो देश राहतो !!
दोन राष्ट्रांच्या वादामध्ये,
निष्पाप बिचारा अपराधी ठरतो,
आणि उगाच कारण नसतानाही,
सैनिक का सीमेवर मारतो ? !!१!!
त्यास न ठाऊक कारण युद्धाचे,
पालन करी तो आदेशांचे,
तरी बुद्धिबळाच्या खेळा मधला,
सहज मरणारा तो प्यादा ठरतो !!२!!
डॊकावूनी पहा त्या गणवेशातून,
आपल्या सम तो ही माणूस असतो,
सौख्य-सोयरे मागे टाकून,
कुणास ठाऊक तो कसे राहतो !!३!!
लढत मरावे, मरत लढावे,
ध्यास घेउनी जीवनभर जगतो,
अन तारुण्याच्या उंबरटयावर,
अकारण मृत्युच्या शैयेवर चढतो !!४!!
युद्ध खरेतर राज्यकर्त्यांचे,
तो तर केवळ साधन ठरतो,
वाढे यादी हुतात्म्यांची कदाचीत,
एक घर मात्र - मुलगा, नवरा वा बाप गमवतो !!५!!
लेखनविषय:
याद्या
1630
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
मानवतावादी जाग दिसते.
शहिदांची करुण कहाणी
In reply to मानवतावादी जाग दिसते. by Dipankar
ओके
फार फार दुःख दिसते हो.
देश भक्तीच्या पलीकडे तो सैनिक
सैनिक?
In reply to देश भक्तीच्या पलीकडे तो सैनिक by कवि मानव
तो मर्जीने जात असेल - पण हा
लांबून बसून अशा कविता करणे
In reply to तो मर्जीने जात असेल - पण हा by कवि मानव
माफ करा मला तुमची ही
एक काय ते फायनल करा साहेब,
In reply to माफ करा मला तुमची ही by कवि मानव
जाऊंद्या बाळासाहेब (सोडा