Skip to main content

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर भारताचा हल्ला

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 29/09/2016 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
वेगवेगळ्या वाहिन्यांवरील वृत्तानुसार व वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील बातमीनुसार भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी आज पहाटे भारत व पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील काही अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करून काही अतिरेकी व सैनिकांना मारून भारतीय सैनिक सुखरूप भारतीय प्रदेशात परतले. काही वाहिन्यांवरून ५ अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ले केले असे सांगण्यात येत आहे. काही वाहिन्या हीच संख्या ६ व ७ असे सांगत आहेत. आपले २ सैनिक मारले गेले व काही जखमी झाले असे पाकिस्तानने जाहिररित्या मान्य केले आहे. परंतु भारताने सीमारेषा ओलांडलेली नाही असा त्यांचा दावा आहे. या हल्ल्यात भारतीय सैनिकांनी ३०-३५ अतिरेकी मारले असेही आकडे वाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे. एकंदरीत प्रत्येक वृत्तसंस्था वेगवेगळे आकडे सांगत आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, (http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-conducted…) ndia conducted surgical strikes last night along the LoC to safeguard our nation, the Defence Ministry said on Thursday. “Significant casualties have been caused to terrorists and those trying to shield them. We don’t have a plan to further conduct such strikes. India has spoken to Pakistan,” DGMO Lt Gen Ranbir Singh said. “… Now, based on very specific and credible information we received yesterday, that some terrorist teams had positioned themeselves at launch pads along the LoC with an aim to carry out infiltration and terrorist strikes in J&K and various other metros in our country. There were launch pads at the LoC where terrorists were present waiting to infiltrate the nation and attack areas in Kashmir and metros across the country,” the DGMO said. No Indian casualties occurred during the surgical strikes that were carried out last night by the Indian Army. Meanwhile, Pakistan, in a statement issued has said: At least two Army men were killed as Indian and Pakistani troops exchanged fire over the Line of Control in “Azad Jammu and Kashmir”. The exchange of fire began at 2:30am, ISPR said, and continued till 8:00am. “Pakistani troops befittingly responded to Indian unprovoked firing on the LoC in Bhimber, Hotspring Kel and Lipa sectors,” the statement said. दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे मंत्री जॉन केरी यांनी सुषमा स्वराजांची २ वेळा भेट घेऊन "पाकिस्तानबरोबरील वाद चिघळवू नका" असा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर दोनच दिवसात हा हल्ला झाल्यामुळे भारत या हल्ल्याची तयारी करीत आहे असा अमेरिकेला अंदाज आलेला असावा. या हल्ल्याची व्याप्ती वाढली तर त्याचे छोट्या युद्धात रुपांतर होऊ शकते व त्यामुळे अमेरिकेच्या भारतीय उपखंडातील हितसंबंधावर परीणाम होऊ शकतो. म्हणूनच केरी यांनी जाहीररित्या हा सल्ला दिला असावा. http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-pakistan-… _________________________________________________________________________ असे हल्ले करण्याशिवाय भारताकडे पर्यायच शिल्लक नव्हता. आपली वाट लागली तरी चालेल, पण भारताला सुखाने जगू द्यायचे नाही हा विडा उचललेल्या पाकिस्तानला इतर कोणत्याही मार्गाने थोपविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी, संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानवर टीका, ट्रॅक २ डिप्लोमसी, पीपल-टू-पीपल कॉंटॅक्ट, बस-ट्रेन सेवा, मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा, भूतकाळातील सर्व युद्धात झालेले पराभव . . . अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन व शस्त्रे व इतर सर्व तर्‍हेची मदत देऊन भारतात पाठवून दहशतवादी कारवाया घडवून आणणे व अतिरेक्यांना आपल्या देशात आश्रय देण्याचे धोरण पाकिस्तान बदलायला तयार नाही. त्यामुळे जशास तसे उत्तर देणे हा एकमेव पर्याय शिल्लक होता. आधी पठाणकोट हल्ला आणि आता झालेला उरी हल्ला यामुळे मोदींना जोरदार टीकेचा सामना करावा लागला. आपल्यात व आधीच्या सरकारमध्ये काहीच फरक नाही, आपण नुसते बोलघेवडे आहोत इ. स्वरूपाच्या टीकेमुळे मलीन झालेली आपली प्रतिमा बदलण्यासाठी हा हल्ला करणे आवश्यकच होते. परंतु असे हल्ले करून शत्रूला जरब बसविण्यामागे जी प्रगल्भता लागते ती अजूनही भारताकडे आलेली दिसत नाही. मागील वर्षी आणि परत यावर्षी सुद्धा भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये प्रवेश करून फुटीरतावाद्यांना मारले होते. सिंधू पाणीवाटप करार रद्द करावा यासाठी चर्चा सुरू आहे. आणि आता आज पहाटे हा हल्ला झाला. या प्रत्येक घटनेनंतर प्रकर्षाने दिसतोय तो प्रसिद्धीचा उतावीळपणा. असे हल्ले गुपचूप करून हल्ले केल्यावरसुद्धा त्याची जाहिरात किंवा गाजावाजा केला नाही तर ते योग्य ठरेल. गतवर्षी म्यानमारमधील कारवाईनंतर लगेच लष्कराने पत्रकार परीषद घेऊन हल्ल्याची माहिती दिल्यावर लगेच म्यानमारने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अतिरेकी किंवा शत्रूच्या सैनिकांवर ज्या कारवाया केल्या जातात त्याची वाच्यता करण्याची गरज नाही. जुलैमध्ये सुरक्षा दलांनी काश्मिरमध्ये अतिरेकी बुर्‍हान वाणीला मारल्यानंतर लगेच ते जाहीर केले होते. त्यामुळे काश्मिरमध्ये जनतेला भडकावण्यात येऊन आजही तिथली परिस्थिती अशांत आहे. बुर्‍हान वाणी ७-८ महिने फरारी होता. त्याला मारल्यानंतर ते जाहीर न करता त्याचा अंत्यविधी गुपचुप उरकला असता तर तो मेल्याचे बाहेर समजले नसते व त्यामुळे पुढील समस्याही निर्माण झाल्या नसत्या. निदान भविष्यात तरी अशा कारवाया शेवटपर्यंत गुपचूप ठेवल्या तर नवीन समस्या निर्माण होणार नाहीत. आजच्या कारवाईची जाहीर माहिती देऊन मोदी सरकारला आपली प्रतिमा उजळून घेण्यास मदत झाली असेल. परंतु त्यातून जिन्गोइझम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आता पुढील काही दिवसात अत्यंत बेजबाबदार वाहिन्यांवरून वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी व माजी लष्करी अधिकारी एकत्र बोलावून चर्चांचा कीस पाडला जाईल. भाजपचे प्रवक्ते स्वतःची पाठ थोपटून घेतील व काँग्रेसमध्ये असे करायची हिम्मतच नव्हती असे टोमणे मारतील. काँग्रेसवाले बांगलादेश मुक्तीचे उदाहरण देऊन आम्हीचे कसे ग्रेट होता व आमच्या काळातसुद्धा अशा कारवाया होत होत्या, पण आम्ही जाहिरातबाजी करीत नव्हतो असे प्रत्त्युत्तर देतील. यातून युद्ध होऊन दोन्ही देशातील नागरिकांना त्रास होईल व म्हणून अशा हल्ल्यांऐवजी चर्चा करावी असा सल्ला पाकिस्तानप्रेमी निधर्मांध देतील (मराठी वाहिन्यांवर प्रकाश बाळ, जतीन देसाई, हेमंत देसाई इ. मंडळी यात आघाडीवर असतील). भारताने काय करायला हवे याबाबत अनेकांचे सल्ले सुरू होतील. एकंदरीत पुढील काही दिवसात वाहिन्यांवरून प्रचंड धुरळा उडणार आहे. आज झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान वठणीवर येईल व भारतावर हल्ले थांबवेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. भारताने अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात, परंतु त्याचा गाजावाजा करू नये.

वाचने 73322
प्रतिक्रिया 290

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, सुझन अरुंधती रॉयवरून हे प्रचि आठवलं : http://2.bp.blogspot.com/-omRJk8zeC8s/URqLixCWDmI/AAAAAAAACuA/AjqIAEUR4O4/s1600/arundhati-yaseen.jpg अर्थात, तुम्ही उल्लेखलेल्या लेखाची संगती चटकन लागते हेवेसांन. आ.न., -गा.पै.

In reply to by श्रीगुरुजी

पाकिस्तानात जाऊन रहा म्हणावे. भारतात राहून बडबड करायला खूप सोपे. नाहीतर परवा जाळून मारले गेले त्या किंवा डोकी कापून नेली त्या जवानांच्या घरी जाऊन हे पांडित्य सांगू देत. सरळ शत्रू परवडले.

In reply to by पैसा

पाकिस्तानात जाऊन रहा म्हणावे. भारतात राहून बडबड करायला खूप सोपे. नाहीतर परवा जाळून मारले गेले त्या किंवा डोकी कापून नेली त्या जवानांच्या घरी जाऊन हे पांडित्य सांगू देत. सरळ शत्रू परवडले.
छ्या!! पैसाताई तुम्ही पण पाकिस्तानी पर्यटनविभागाच्या ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर विभागात सामील झालात की!! ह.घ्या.हे.वे.सां.न.ला (पाकिस्तानी पर्यटनविभागाच्या प्रमोशन विभागात शाळेपासून कामाला असणारा) ट्रुमन

In reply to by श्रीगुरुजी

पाकीस्तान आणि पाक माध्यमे कमीअधिक प्रमाणात असा सर्जिकल स्ट्राईक झाला हे मान्य करत आहेत. पण अजूनही कोणिही त्यात सामान्य नागरीक अथवा (२ सोडल्यास) सैनिकांनाच मारले आहे असे म्हणलेले नाही... मग ते मारले ते कुणाला आणि ते कुणाच्या भुमिवर काय करत होते?

In reply to by श्रीगुरुजी

What happened in Uri, where 19 Indian soldiers were killed in an alleged militant attack, is condemnable. हे वाक्य पहा खिळे मारलेल्या जोड्याने यांचे थोबाड फोडले पाहिजे. व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा किती घ्यावा? या १९ हुतात्मा सैनिकांना कोणी मारले कि त्यांनी पण आत्महत्या केल्या? "तथाकथित दहशतवादी हल्ल्यात" म्हणे

In reply to by सुबोध खरे

http://timesofindia.indiatimes.com/india/4000-soldiers-killed-since-199… ही बातमी खरी असेल तर २०१२ पर्यंतच १३ वर्षात कारगिलमधले साडेपाचशे आणि त्यानंतर सुमारे ४००० सैनिक आपण गमावले. हजारावर सैनिकानी आत्महत्या केल्या. तर ३ वर्षात २५००० वर सैनिकानी मुदतपूर्व निवृत्ती घेतली. नंतरच्या चार वर्षातली आकडेवारी मला कुठे बघायला मिळाली नाही. म्हणजे प्रत्यक्ष युद्ध न लढता आपले एवढे सैनिक फुकट मरत आहेत. किंवा त्यांना असह्य ताण होतो आहे. या सगळ्याचा हिशेब कोणी कोणाला विचारायचा? तथाकथित मानवतावाद्यांना?? जवळपास दरवर्षी एक कारगिल युद्धाइतकी किंमत आपण युद्ध न करताच मोजतो आहोत. प्रत्येक मरणार्‍या सैनिकाबरोबर देशाचे, सैन्याचे पैशात नुकसान तर होतेच. पण एक एक घर उध्वस्त होत जाते. विचार करणेही असह्य होत आहे. :(

In reply to by सुबोध खरे

What happened in Uri, where 19 Indian soldiers were killed in an alleged militant attack, is condemnable. हे वाक्य पहा खिळे मारलेल्या जोड्याने यांचे थोबाड फोडले पाहिजे. व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा किती घ्यावा? या १९ हुतात्मा सैनिकांना कोणी मारले कि त्यांनी पण आत्महत्या केल्या? "तथाकथित दहशतवादी हल्ल्यात" म्हणे
मी पूर्वीच लिहिलेले पुन्हा एकदा सांगतो. पाकिस्तान भारताविरूद्ध ४ वेगवेगळ्या मार्गाने लढत आहे. १) पाकिस्तानी नेतृत्व - आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने भारतविरोधी प्रचार, चीनशी जवळीक साधून भारताला शह देणे, सातत्याने काश्मिरींना भडकावणे, काश्मिरमध्ये सार्वमताची मागणी करणे, अतिरेक्यांना पाकिस्तानात आश्रय देऊन त्यांना सर्व तर्‍हेचा पाठिंबा देण इ. मार्गाने पाकिस्तानी नेतृत्वाच्या भारतविरोधी कारवाया सुरू असतात. २) पाकिस्तानी लष्कर - भारतावर छुपे हल्ले चढविणे, अतिरेक्यांना सर्व तर्‍हेची प्रत्यक्ष मदत (प्रशिक्षण, शस्त्रे इ.), सीमेवर कायम अशांतता ठेवणे इ. मार्गाने पाकिस्तानी लष्कर भारताविरूद्ध कारवाया करीत असते. ३) अतिरेकी संघटना - भारतावर दहशतवादी हल्ल्यांची योजना आखणे व आपल्या संघटनेच्या अतिरक्यांकडून दहशतवादी हल्ले करणे या मार्गाने या संघटना भारतात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत असतात. ४) भारतातील निधर्मांध (तथाकथित निधर्मी, तथाकथित पुरोगामी आणि तथाकथित विचारवंत) - ही मंडळी सातत्याने पाकिस्तानला भेट देऊन पाकिस्तानचे गोडवे गाण्यात मग्न असतात. भारत-पाकिस्तान संबंधांवर चर्चासत्र आयोजित करणे, भारत-पाकिस्तानमधील संबंधांसाठी दोन्ही देशातील राजकारणीच जबाबदार आहेत व दोन्ही देशातील जनतेला मात्र एकमेकांविषयी खूप प्रेम आहे असा सातत्याने प्रचार करणे, पाकिस्तानातील अतिरेकी संघटना व भारतातील संघ परिवार यांना एकाच मापाने मोजून यांच्यामुळेच दोन्ही देशात अशांतता आहे असा खोटा प्रचार करणे, पीपल-टू-पीपल काँटॅक्ट/कलाकारांची देवाणघेवाण इ. मुळेच दोन्ही देशातील प्रश्न सुटतील असे ठासून सांगणे, काश्मिरींना अधिक स्वायत्तता द्या/तेथील लष्कर काढून दोन्ही देशांच्या सीमा मोकळ्या करा अशा अव्यवहार्य मागण्या करणे, काश्मिरींवरील कथित मानवी हक्क उल्लंघनाबद्दल बोंब मारत फिरणे, भारतीय सैनिक काश्मिरींवर अत्याचार करीत आहेत असा आरडाओरडा करणे, पाकिस्तानी व भारतीय वृत्तपत्रात मोठमोठे लेख लिहून सर्व दोष भारताच्याच माथ्यावर मारणे, अतिरेक्यांबद्दल सहानुभूती व सैनिकांबद्दल तिरस्कार दाखविणे . . . . अशा अनेक मार्गांनी पाकिस्तानला जे आवडेल ते करण्यात मग्न असतात. या मंडळींना पाकिस्तानकडून मोबदला मिळत असावा असा माझा अंदाज आहे. त्याचबरोबरीने अशी भूमिका घेतली तर लगेच विचारवंत, निधर्मी, पुरोगामी असल्याचे प्रमाणपत्र मिंंळून उच्चभ्रूंच्या वर्तुळात प्रवेश मिळतो हा अजून एक जबरदस्त फायदा. चुकुन भारताच्या बाजूने किंवा हिंदूंच्या बाजूने बोलले तर संकुचित विचारांचे, प्रतिगामी, जातीयवादी इ. शिक्के बसण्याची भीति. यातील सर्वात धोकादायक आहेत ते हे भारतातील निधर्मांध. खाल्ल्या घरचे वासे मोजणारी ही जमात सर्वात आधी नष्ट व्हायला हवी. या यादीतील पहिले ३ जण हे भारताचे उघडउघड शत्रू आहेत आणि ते सीमेपार आहेत. मात्र निधर्मांध ही जमात भारतातच राहून कृतघ्नपणे भारताशी दगाबाजी करीत आहे.

हे चित्र पण आठवलं. Nawaz Sharif with his three daughters. The middle one is eldest and most patriotic.... - Gini Khan

In reply to by श्रीगुरुजी

आज देशात सामान्य लोकांमध्ये आणि लष्करात { विशेषतः रिटायर्ड आर्मी प्रोफेशनल्स मध्ये } प्रचंड आक्रोष आहे, कारण आपल्या देशात एक निर्बुद्ध घर भेदी जमात तयार झाली आहे,अशा लोकांना आता धडा शिकवायची वेळ आली आहे कारण ते मो़काट सुटले आहेत ! यात जेएनयु पासुन चु केजु येतात, ज्यांना बरळण्या शिवाय काही येत नाही ! काश्मिरात पॅलेट गन वापरल्या बद्धल बराच गारादोळ करण्यात आला, का ? लष्करातील जवानांना तुम्ही दगड मारणार / हिंदुस्थान कि बरबादी तक लढेंगे चे नारे देणार / पाकिस्तान आणि आयएस चे झेंडे लावणार त्या बदल्यात यांना गुलाबाची फुले ध्यायची काय ? मला शक्य झाले असते तर आर्मीवर दगड फेक करणार्‍या प्रत्येकाला पकडुन बोफोर्स तोफेला लावुन उडवुन दिले असते ! पॅलेट गन वापरल्या हे लष्कराने / पोलिसांनी आणि सरकारनी त्यांना मोठी मुभाच दिली आहे असे म्हणीन मी. आंधळे झाले/ लुळे पांगळे झाले ते यांना सहन होत नाही ? कॅप्टन कालिया आणि त्याच्या सहकार्‍यांना अत्यंत यातनामय मॄत्यु देण्यात आला / सौनिकांची मुंडकी कापुन ती भेट म्हणुन नेउन त्यावर इनाम जाहिर केले गेले आणि घेतले गेले तेव्हा या सो कॉल्ड लेफ्टिट्स आणि बुद्धीजीवी मंडळींची वाचा बसली होती काय ? अतिरेक्यांन बरोबरच या मंडळीचे सुद्धा चांगले सर्जिकल ऑपरेशन झाले पाहिजे... इतकी मजबुत मारली पाहिजे कि देश विरोधी घोषणाच काय पण पुढच्या जन्मी या देशात पैदा व्हायचीच भिती यांच्या मनात बसली पाहिजे ! जाता जाता :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Top Jewish body writes to PM Narendra Modi on Uri attack

In reply to by श्रीगुरुजी

सद्या कायप्पावर शरीफ कन्येचा एक फोटो फीरतोय. ती कैच्या कै सुंदर आहे या दोघींपेक्षा. पाकीस्तानातल्या सुंदर्‍यांना बघून "पाकीस्तानात वुमन एम्पॉवरमेंट लवकर होउ देरे महाराजा" असे बोलावेसे वाटतेय.

व्हॉट्स अ‍ॅप ढकल साभार. ***ब्रेकिंग न्यूज*** (दै. वर्हाडी वार्ता) वार्तांकन- xxxxx "पाकिस्तानी पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी केलेले संभाषण लीक"... टुर्रुक टुर्रुक...टुर्रुक टुर्रुक... ओबामा- (सकाय सकाय कोन व्हय त का चीन, मी मिशेल हाव म्हनुन ईतले वर्ष संसार टिकून हाय, थे भांडे राहू द्या आधी फोन घ्या कोन मसन्या व्हय त...) गुपचाप बस न व माय, अअअ ह्यालो!! कोन बोलत हाय?? बराक ओबामा बोलून रायलो... शरीफ- ह्यालो ह्यालो ह्यालो भाऊ भाऊ भाऊ मी नवाज शरीफ नवाज शरीफ बोलून रायलो इस्लामाबादवरून...भाऊ ह्यालो आवाज येते काय?? (माय बहीन निरे बॉम्ब फोडू फोडू निकाल टावर उडवून देल्ले आता Xट रेंज भेटत नाई) ओबामा- कोनचा शरीफ?? कोन बोलते?? शरीफ- भाऊ मी नवाज शरीफ बोलतो ना बावा, इतल्या लवकर भुलले काय मले, नीरा मोदी मोदीच करता तुमी... ओबामा- हं बोल नव्या का म्हनत... का काम हाय?? शरीफ- भाऊ थो मोदी पायना बावा, आमच्या घरात घुसून त्यायच्या लोकायने आमाले बम कुनारल ना...मले अथी सब्बन श्या द्यून रायले...आता शिंदुच पानी बी देत नाई म्हन्ते मंग आता आमी काय GNGT करावं...?? ओबामा- GNGT म्हंजे?? शरीफ- xx गोटा हो...पानीच नाही राहीन त धुवाची कायन आता?? ओबामा- मंग कायले त्याच्या वाटी जाता तुमी?? बहीन मा खाजवाले नखं नाई तुमाले अन त्यायले लपून छपून लिचुंडे घेता...मंग थो मोदी व्हय...त्यानं देल्ली रयपटीत त आता काऊन टेम्बलत?? शरीफ- पन आज परेंत अस झालं नाई न बा, "हम इस हमले की कठोर शब्दो में निंदा करते है" यवढच म्हनत जाय म्याडमचा मानुस... ह्या मोदी त सायचा नीरा अंगावरच यून रायला...चिबीन!! ओबामा- अबे म्याटा थो जमाना गेला आता पार्टी हायकमांडवाला...तवा सब जमून जाय...आता ह्या पुरा रंगबाज हाय, मलेच त आयकत नाही मंग तू कोन टिप्पूनजी लागून गेला... शरीफ- पन तुमी काईच बोलले नाई भाऊ त्यायन अंदर घुसून ४० मानस मारले आमचे... ओबामा- अबे मी काय बोलू?? थ्या सुषमान UNO च्या मीटिंगमध तुम्हाले नंग करू करू झोडपल न...आता निक्काल देश मोदीच्या बाजून हाये...अन का बे सायच्या तुले का गरज होती उरीत तूर पेराची, आता तनकट निंगाल त मी काय करू?? घेन्न खायन अजून चायनिस शेवड्या, मंचुरी अन मोमो...घे अजून चायनाले उरावर... शरीफ- पन भाऊ आपला दोस्ताना लय जुना हाय...मी हात जोडतो बावा, ह्या मोदी आयकतच नाही ना... ओबामा- चाsssल नखरे नक्करु जास्त, शिक्कुन रायला का?? मी आता काहीस करू शकत नाही...आमच्या इथय सगडे म्याट झाले मोदीपाई, त्यानं सिनेटमध झुईझप भाषन देलल्यापासून माह्या आचार्यान बीफ, पोर्क सार सोडून देल्ल... निरे दाल तडके खाऊ घालते न माही मुयव्याध उमयली... बायकोय दुपारची कुरड्या-पापड लाटाले लावते... (हो आलोच हा जान, एक मिनिट) शरीफ- भाऊ अस नका बोलू न बा, तुमीच अशे बोलले त आमचं कस हुईन, थो मोदी नीरा घुररावून पायते, माह इकडं बीपी वाहाडल... ओबामा- अबे जाऊन पाय पकड त्याचे, आता युपीये सरकार नाई मोदी सरकार हाय, आता जास्तीचे लाडाकपन ज्यमत नाई भाऊ, टाईम हाय सुधरुन जाय... (डार्लिंग आलो ना बस कनिक भिजवली हाय, रपरप पोया टाकतो, झुनका भाजतो न लेकरायले ज्यू घालतो, डोन्ट वरी स्वीटहार्ट, लव्ह यु ममम्मुऊऊ) अबे ठेव फोन सायच्या इकडं माई सर्जिकल स्ट्राईक हुन रायली अन डबल मले फोन कराचा नाई... शरीफ- पन भाऊ...भाऊ...बराकभाऊ...मी का म्हंतो... टुsssक...टुsssक...टुsssक... इस रूट की सभी लाईने व्यस्त है...कृपया थोडी देर बाद ट्राय करे... (दिलचस्प न्यूज एवं ताजी खबरो के जानकारी के लिये पढते रहीये दै. वर्हाडी वार्ता)

In reply to by यशोधरा

सच्चु भारी रे

लोकमान्य लोकशक्ती असलेल्या दैनिकातील खालील लेख वाचनात आला. सध्या लोकसत्ता वाचणे खूप कमी केले आहे पण भारताच्या कारवाईमुळे अतिशय आनंद झाला आणि मन प्रसन्न झाले होते, म्हणून वृत्तपत्रे चाळत होतो, तेव्हा हे विचारपुष्प हाती लागले. http://www.loksatta.com/desh-videsh-news/amit-shah-congratulates-pm-mod… ‘रॅम्बो‘ कारवाईचे अर्थ आणि परिणाम
‘ब्रँड मोदी’ची पडझड रोखण्यात सफल.
स्वतःची इमेज राखण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला असा तर अर्थ ह्यातून काढला जाईल. ह्या वृत्तपत्राचा मोदी विरोध इतका टोकाला पोचला आहे की भारताच्या ह्या कारवाईचा फायदा मोदींनी स्वतःची प्रतिमा उजळवण्याकरता केला असा बेधडक बुद्धिभेद इथे करून टाकला आहे.मोदी भारताचे पंतप्रधान आहेत, त्यांच्या परवानगीशिवाय असा हल्ला होऊ शकत नाही ह्या गोष्टीचा इथे खुबीने वापर करून घेतला आहे. पाकिस्तान ने आपल्याला इतका त्रास दिला आहे की कोणताही पंतप्रधान असता तरी भारतीय जनतेने हीच प्रतिक्रिया व्यक्त केली असती.इंदिरा गांधींची प्रतिमा बांगलादेश युद्धानंतर कायमची बदलली हे वास्तव आहे. त्यांनी त्या वेळी दाखवलेली धडाडी आणि शौर्य कौतुकास्पदच होते आणि आहे.
देशांतर्गंत अनेक प्रश्नांवरून लक्ष वळविण्यात आणि विरोधकांच्या हातातून अनेक मुद्दे हिसकाविण्यात यश. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत फायदा करून घेण्याचे मनसुबे. त्यामुळे ५६ इंचाचे गोडवे उत्तर प्रदेशात पुन्हा गायले गेले नाही तर नवलच.
म्हणजे देशांमधले अंतर्गत प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठी भारताने हल्ला केले तर! किंवा उत्तर प्रदेश निवडणूक जवळ येत आहेत म्हणून मोदी आणि अमित शहा यांनी हा बनाव रचला ? काय नक्की म्हणायचे तरी काय आहे या लेखकाला? देशात काय अंतर्गत प्रश्न आहेत की ज्यामुळे मोदी सरकार उलटवले जाऊ शकते ? किती ही काही झाले तरी जोपर्यंत 2019 साठी एक सशक्त पर्याय पंतप्रधानपदासाठी उभा राहत नाही तो पर्यंत मला नाही वाटत मोदी सरकार जाऊन दुसरे सरकार येईल. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. माझ्या मते तरी हा लेख नेहमीसारखा नथीतून तीर मारण्यासाठी आहे. लाडके संपादक अमेरिकेत निवडणूक कव्हर करायला गेले आहेत, ते तिकडून मोदी विरोधाची परंपरा चालू ठेवणार ही अपेक्षा होतीच, ह्या लेखामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले.

.

(अ) "हायेस्ट स्टेट ऑफ अ‍ॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात (आ) काही किलोमीटर आतवर घुसून (इ) त्याला पत्ता न लागू देता (ई) त्याचा पत्ता काटून (उ) भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतते... आणि (ऊ) दुसर्‍या दिवशी आपला DGMO फोन करून पाकिस्तानच्या DGMO ला त्या ऑपरेशनची माहिती ठणकावून देतो.

अश्या कृतीचा अर्थ समजावून द्यायला लागतो अश्या व्यक्तीला तो अर्थ समजावून देणे निरर्थक असते... कारण... (अ) त्या व्यक्तीच्या तर्कशक्तीत मूल कमतरता असते आणि/किंवा (आ) तर्क समजाऊन घेणे त्या व्यक्तीला सोईचे नसल्याने ती "झोपेचे सोंग" घेऊन आहे ! :) ******************************************* "आम्ही आणि इतर कोणी दट्ट्या दिला म्हणून केवळ पाच-सात दिवसांच्या कालावधीत ही कृती भारतिय सैन्याने केली" असा दावा करणार्‍यांचे मी अभिनंदन करतो ! कारण... अ) ते एका अर्थाने भारतिय सैन्याच्या कर्तबगारीचे कौतूक व समर्थनच करत आहेत. "हायेस्ट स्टेट ऑफ अ‍ॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात काही किलोमीटर आतवर घुसून त्याला पत्ता न लागू देता त्याचा पत्ता काटून भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतले. इतक्या कमी वेळात, इतक्या कमी संख्येने असलेले, भारतिय सैनिक इतकी प्रभावी कृती करू शकतात तर मग पुरेसा वेळ दिल्यावर पुरेश्या संख्येने असलेले भारतिय सैनिक शत्रूची काय अवस्था करू शकतील, याची कल्पना करायला फार जास्त कल्पनाशक्तीची जरूर नाही ! :) ;) त्याबरोबरच... आ) असा दावा करणारे लोक "पूर्वीच्या सर्व छटांच्या सर्व भारतिय सरकारांमध्ये धमक व राजकिय इच्छाशक्ती यांचा अभाव होता आणि आताच्या सरकारमध्ये नाही" हे कळत-नकळत कबूल करत आहेत. कारण...

भूतकालात आणि आजही भारतिय सैन्य तेच होते/आहे, फक्त यावेळेस सरकार वेगळे आहे... हाच एक फरक आहे, नाही का ? :)


लोकहो, बघा मी म्हणंत होतो ना की आता लक्ष्य वराहनगर हेच असायला पाहिजे. नेमका असाच विचार मजदक दिलशाद बलुच नामक एका बलुची बांधवांच्या नेत्याने व्यक्त केला आहे. आ.न., -गा.पै. टीप : ज्यांना सनातन प्रभात या वृत्तपत्राचं वावडं आहे त्यांच्यासाठी :- http://www.pudhari.com/news/desh/86207.html

In reply to by धनावडे

चळवळीच्या नेत्यावरून चळवळीतील अनुयायी, समर्थक आणि कार्यकर्ते यांची पारख करता येते. असल्या चळवळीतील/आंदोलनातील जवळपास सगळेच लोक माझ्यासारख्या अनेकांच्या डोक्याला शॉट कित्येक वर्षांपासून लावत आलेले आहेत.ज्यांना ही गोष्ट अनुभवायला लागली नव्हती त्यांनाही हे आता लक्षात येईल. पाटकरबाईंनी हे वक्तव्य उघडपणे केले हे एक चांगले झाले. असल्या फडतूस माणसांची जी काही विश्वासार्हता शिल्लक होती ती पण धुळीस मिळाली आहे आणि भविष्यात असल्यांच्या बडबडीला फारसे कोणी गांभीर्याने घेणार नाही.

आता पलिकडे जाऊन दहशतवाद्यांना अन पाकी फौजेला दे माय धरणी ठाय करुन सोडणा-या भारतीय स्पेशल फोर्सेस बद्दल एक अतिशय जबरदस्त विडीयो, ही माणसे काय कोटीचं प्रशिक्षण घेतात हे पाहुन छाती दडपुन जाते १४ तासात १०० किमी रनिंग वगैरे भयानक प्रकार असतात ह्या प्रशिक्षणात. जरुर आनंद घ्या (?) ह्या विडीयोचा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

धन्यवाद! सगळा बघितला नाही, पण जबरा आहे हे जे काही पाहीले त्यावरून समजले!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सोन्याबापु, काय भयंकर प्रशिक्षण आहे ह्यांचं. हे शेवटी जिवंत कसे राहतात! असं वाटतं की कुठल्याश्या फालतू दहशतवाद्यांना पाणी पाजणं काहीच नाही, पण या प्रशिक्षणात यशस्वी होणं म्हणजे अनेकअग्निदिव्ये पार करणं आहे. शेवटची १०० किमीची म्यारेथॉन म्हणजे भेजा कवटीतनं गळून तोंडात उतरण्याची खात्री. आ.न., -गा.पै.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

कारतुस सर, अरुणिमा मॅम आणि आता हा विडियो कधीच हार मानु देणार नाही मला. धन्यवाद बापुसाहेब

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बघावा लागेल. सध्या बूकमार्क करुन ठेवतोय. धन्यवाद देवा!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बाबौ, काय लोक हैत. एक माणूस १०० च्या बरोबरीचा झालाय. या लोकांचे ट्रेनींग फुकट नाही गेले पाहीजे. जबरदस्त लोक हैत.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

भोवळ आली हे सगळं बघुन :) हे ट्रेनींग तर काहि महिने चालेल. पण हि कमावलेली शारीरीक क्षमता त्यानंतर किती महिने टिकेल? कि वरचेवर परत ट्रेनींग घ्यायला लागतं?

In reply to by अर्धवटराव

ट्रेनिंग संपले कि लगेच काउंटर इंसर्जन्सी ऑप्स मध्ये काम सुरु होते काश्मीरात नाही तर नॉर्थ ईस्ट मध्ये, तिकडे ट्रेनिंग कायमच फ्रेश राहते, नाहीतर काही काही वर्षांनी आठवड्याचा किंवा महिन्याचा रिफ्रेशर कोर्स वगैरे असतातच कायम सुरु.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

त्रैमासिक बी पी इ टी(Battle Physical Efficiency Test) पास झाल्या शिवाय सुट्टीला जात येत नाही सैनिकांना...!! त्यामुळे "Sharpen the Saw " हे सतत चालतच असतं.

In reply to by अर्धवटराव

माझ्या मर्यादित माहितीप्रमाणे पॅराट्रूपरला ६०००/- रुपये महिना (पगाराच्या व्यतिरिक्त) भत्ता मिळतो आणि स्पेशल फोर्स चा भत्ता ९०००/- रुपये महिना मिळतो. त्यातुन हे लोक बहुतांश वेळा फिल्ड म्हणजे सीमावर्ती किंवा कठीण ठिकाणी कार्यरत असतात तेथे मिळणारा फिल्ड अलाउन्स ५०००/- महिना असे जास्तीत जास्त रुपये २०,०००/- महिना पगारा व्यतिरिक्त मिळतात. त्यांच्या खतरनाक कामासाठी मिळणारी ही आर्थिक भरपाई अत्यंत तुटपुंजी असते. माझा एक वर्गमित्र आर्मीत सर्जन असून त्याने एम एस नंतर टाटा मेमोरियल मधून कर्करोगाच्या शल्यक्रियेचे प्रगत असे प्रशिक्षण घेतलेले आहे. त्याच्या शल्यक्रियेच्या एवढ्या प्रगत प्रशिक्षणामुळे त्याने जरबाहेर व्यवसाय केला तर त्याला एक शल्यक्रियेचे जितके पैसे मिळतात तेवढे पैसे त्याला एक महिन्याला (स्वतःच्या) जीवावर उदार होऊन लढण्यासाठी सरकारकडून मानधन म्हणून मिळतात. हा लष्कराचा पॅराट्रूपर असून त्याने स्पेशल फोर्सचे प्रशिक्षण घेतलेले आहे. यानंतर त्याने नौदलाच्या IMSF कमांडोबरोबर नाविक कमांडोचेही प्रशिक्षण घेतलेले आहे. त्याला हे ( भावनेच्या भरात न जाता कोरड्या वस्तुस्थितीबद्दल) स्पष्ट विचारले असताना तो म्हणाला कमांडो कधीच पैशाकडे पाहून येथे येत नाहीत. एक तर आयुष्यात देशासाठी काहीतरी वेगळे करण्याची आग "आतून" असल्याशिवाय माणूस कमांडो बनू शकत नाही. अर्ध आयुष्य जंगलात आणि बर्फाळलेल्या प्रदेशात घालवायची नाही तर कुणाला हौस असते? मुंबईच्या चित्रपटसृष्टीच्या लोकांना माणसे पैसे सोडून इतर कुठल्यातरी प्रेरणेने काम करतात हे समजतच नाही. अरिहंत किंवा अरिदमन या अणुपाणबुड्यांवर लार्सन अँड टुब्रोचे अभियंते नौदलाकडून एक पैसा जास्त मिळत नसताना रात्र रात्र का काम करतात किंवा इसरो तील शास्त्रज्ञ सरकार कोणताही अधिक पैसे देणार नसताना तहान भूक बाजूला ठेवून काम का करतात? हे या लोकांना समजणारच नाही कारण एवढ्या पातळीवर विचार करण्याची त्यांची कुवतच नाही.

In reply to by सुबोध खरे

हे या लोकांना समजणारच नाही कारण एवढ्या पातळीवर विचार करण्याची त्यांची कुवतच नाही. +१,००,००० स्वयंकेंद्रित लोकांचे जग "मी, माझा पैसा, माझे हितसंबंध व माझी सोय" या पलिकडे जात नाही. लोकशाहीत अश्या लोकांना यापेक्षा जास्त विचार करण्याची सक्ती अथवा गरज असू शकत नाही... किंबहुना लोकशाहीच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन व्यक्ती/विचार/उच्चार-स्वातंत्र्याच्या नावाखाली कांगावा करून लोकशाहीवर बेमुर्वत टीका करायचीही परवानगी त्यांना लोकशाहीत असते. लोकशाही ही "सद्यस्थतीत सर्वोत्तम व्यवस्था" असली तरी ती "आदर्श व्यवस्था" नाही असे म्हटले जाते, याचे हे एक महत्वाचे कारण आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

लोकशाही ही "सद्यस्थतीत सर्वोत्तम व्यवस्था" असली तरी ती "आदर्श व्यवस्था" नाही असे म्हटले जाते, याचे हे एक महत्वाचे कारण आहे. यामुळेच काही लोकांना वाटेल ते बरळण्याचे धाडस करता येते आणि स्वातंत्र्य देखील मिळते ! वरती मी एका प्रतिसादात एका कंमांडो ट्रेनरचा व्हिडियो दिला आहे, त्यांची माहिती त्यांच्याच संकेत स्थळावर वाचली होती त्याचा दुवा इथे देतो :- http://www.shifuji.in/about-grandmaster-shifuji.php बाकी देशात मोकाट सुटलेल्या निर्बुद्ध वाचाळ मंडळींचा सगळ्यात जास्त राग या कंमांडो ट्रेनरला सुद्धा येतो. यांचा तू-नळीवर प्रचंड शिवराळ आणि खुन्नसने भरलेला व्हिडियो ऑलरेडी व्हायरल आहे. मला सुद्धा पहिल्यांदा ती क्लिप झेपली नव्हती,पण आर्मीच्या कारवाईवर अविश्वास दाखवणारी आणि पर्यायाने जवानांचे मानसिक खच्चीकरण करणारी वक्तव्ये पाहिल्यावर कंमाडो ट्रेनरच्या शिवराळपणाचे खरे कारण परत एकदा नव्याने समजुन आले आणि वाचाळ मंडळींसाठी अशीच भाषा योग्य आहे हे देखील पटले. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Petition to White House seeking to declare Pakistan 'a state sponsor of terrorism' makes new record

In reply to by सुबोध खरे

मुंबईच्या चित्रपटसृष्टीच्या लोकांना माणसे पैसे सोडून इतर कुठल्यातरी प्रेरणेने काम करतात हे समजतच नाही. अरिहंत किंवा अरिदमन या अणुपाणबुड्यांवर लार्सन अँड टुब्रोचे अभियंते नौदलाकडून एक पैसा जास्त मिळत नसताना रात्र रात्र का काम करतात किंवा इसरो तील शास्त्रज्ञ सरकार कोणताही अधिक पैसे देणार नसताना तहान भूक बाजूला ठेवून काम का करतात? हे या लोकांना समजणारच नाही कारण एवढ्या पातळीवर विचार करण्याची त्यांची कुवतच नाही. १००% सहमत! (डोळ्यांवरचे झापड बाजूला करणार्‍या) माहीतीबद्दल धन्यवाद!

In reply to by सुबोध खरे

अवांतर आहे या धाग्यावर पण :
लार्सन अँड टुब्रोचे अभियंते नौदलाकडून एक पैसा जास्त मिळत नसताना रात्र रात्र का काम करतात
माझ्यामते हे देशप्रेम संसर्गजन्य आहे (चांगल्या अर्थाने). तुमचा प्रतिसाद वाचून मला माझ्या करीयरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली. आमच्या कंपनीचा एक हार्डवेअर इंजिनिअर लग्नानिमित्त सुट्टीवर जाणार असल्याने मला विशाखापट्टणच्या नौदलाच्या डॉकयार्डवर एक महिना काम करण्याची संधी मिळाली होती. नौदलाची साईट असल्यामुळे मला अगोदरच कंपनीतल्या लोकांनी घाबरवून सोडले होते. तिथली शिस्त, कडक अधिकारी आणि चुकीला माफी नाही या ब्रीदामुळे मी तेथे काम करु शकेल की नाही याबद्द्ल मला शंकाच होती. मात्र मी नुकताच कंपनीत रुजु झाल्यामुळे नाही म्हणण्याचा पर्याय माझ्याकडे नव्हता. पहिल्या दिवशीच साईटवर पोहोचताच मला बघून तिथला साहेब अगोदरच्या इंजिनिअर वर ओरडला. माझ्याकडे बघून मी इथे काम करु शकणार नाही अशी शंका त्याला आली. मात्र दोन तीन दिवसातच मी त्यांच्या अविश्वासाचे रुपांतर माझ्यावरील विश्वासात करुन घेतले. नंतर ऑफीसमधील अधिकार्‍यांची इतकी मर्जी बसली की एक महिन्यानंतर जुना इंजिनिअर आला तरी मला दोन-तीन दिवस जास्त थांबवून घेतले. काम करत असताना कधी कधी संगणकाची रॅम, सिपीयु, कॅबीनेटचे स्क्रु इ. कधी कधी खिशात राहत ते संध्याकाळी घरी जाताना व्यवस्थित काढून ठेवावे लागत. कधी चुकून विसरलो तर चोरीचा कलंक लागायची शक्यता. सरकारी ठिकाणी चोरीचा आळ आला की मग लंबी छुट्टी. त्यामुळे फारच काळजी घ्यावी लागायची. ऑफीसात वेळेनंतर थांबायला बंदी होती. क्लासीफाईड एरीयाकडे फिरकायची बंदी होती. तर त्या वातावरणात मला देखील शिस्तपालनाची सवय लागली. नौदलाचे शुभ्र गणवेशातील अधिकार्‍यांकडे पाहून एकदम ग्रेट वाटायचे. आपण असे बनू शकलो नाही याची खंत देखील कधी कधी वाटायची. दिवसभर काम आणि सुट्टीच्या दिवशी विशाखापट्टणमच्या समुद्रकिनारी जुन्या पाणबुडीचे संग्रहाल्य बनविले आहे तिला भेट देणे हा माझा महिनाभराचा कार्यक्रम होता. त्या एक महिन्याने मला आयुष्यभर पुरणार्‍या चांगल्या आठवणी दिल्या. देशाची सेवा करणार्‍यांची पैसे घेऊन का होईना पण सेवा करायचा मला संधी मिळाली याबद्द्ल मी एल अँड टी चा कायम आभारी आहे.

In reply to by धर्मराजमुटके

देशाची सेवा करणार्‍यांची पैसे घेऊन का होईना पण सेवा करायचा मला संधी मिळाली. मुटके साहेब आपला देश इतका गरीब नाही. कोणीही विनावेतन काम करावे अशीही गरज नाही. नागरिकांनी आपल्या श्रमाचा उत्तम मोबदला घेऊन आपले काम व्यवस्थित केले "तरच" ती एक उत्तम देशसेवा होईल. केवळ लष्करात गेले म्हणजेच देशसेवा असे मुळीसुद्धा नाही.

In reply to by सुबोध खरे

और कुछ कहनेकि जरुरत नहि अब.
हे या लोकांना समजणारच नाही कारण एवढ्या पातळीवर विचार करण्याची त्यांची कुवतच नाही.
मला स्वतःला देखील हे कधि कळेल असं वाटत नाहि :( म्हणुनच फक्त _/\_

In reply to by सुबोध खरे

बाकी मुंबईच्या चित्रपटसृष्टीच्या लोकांना माणसे पैसे सोडून इतर कुठल्यातरी प्रेरणेने काम करतात हे समजतच नाही. ही जमात खुप वाढायला लागलीय आज काल. आमच्या हापिसातपण असलं काही बरळणारी डोकी दिसलीत.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापू, ह्या व्हिडीओबद्दल शतशः आभार! सैनिकांच्या शारिरीक क्षमतेला सलाम!

बाई, भारताने अहिंसक मार्गानेच उत्तर दिलेय. उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकीस्तान प्रायोजित अतिरेक्यांचे बौद्धीक घ्यावे ह्या उदात्त हेतुने एका ध्यान शिबिराचे आयोजन केले होते. वेळ मुद्दाम रात्र ते पहाटेच्या दरम्यानची निवडली होती. कारण ह्या वेळेत जगातील सर्व कोलाहल थांबलेला असतो. ध्यानधारणा, वैचारिक मंथनास हाच कालावधी योग्य असतो. भारतीय अधिकार्‍यांनी पाकीस्तानात जाऊन हे शिबिर घ्यायचे ठरविले होते कारण शांततेला कोणताही धर्म नसतो. तसेच हे विश्वची आपुले घर अशी धारणा असणार्‍यांनी मानवनिर्मित सीमा लक्षात घ्यायचे काय कारण ? ठरलेल्या कार्यक्रमाअंतर्गत भारतीय ध्यानविद्येच्या शिल्पकारांनी पवित्र देशात जाऊन मार्ग भटकलेल्या जीवांना धर्मोपदेश केला. तुमचा मार्ग कसा चुकीचा आहे हे समजावून सांगताच पतीत झालेल्या देवाच्या लेकरांच्या लक्षात त्यांच्या चुका आल्या आणि त्यानी आपण केलेल्या पापांचे प्रायशित्त म्हणून देहत्याग करायचे ठरविले. आत्मा हा अजर अमर आहे, त्याला शस्त्र मारु शकत नाही, अग्नी जाळु शकत नाही, वारा सुकवू शकत नाही. ह्या वचनास जागून त्यांनी फक्त आपली नश्वर शरीरे त्यागली आणि 'अखेरचा हा तुला दंडवत", "आता कैसे येणे जाणे", "आम्ही जातो आपल्या गावा, अमुचा रामराम घ्यावा" असे अभंग म्हणत ते पददलित निजधामास निघून गेले. तेव्हा पाटकर मॅडम, विथ ड्यु रिस्पेक्ट फॉर ऑल युवर वर्क, आम्ही आपणांस विनंती करतो की माध्यमांतून आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. आज गांधी जयंतीच्या निमित्ताने अहिंसेचे पालन करुया. अहिंसो परमो धर्म.

In reply to by धर्मराजमुटके

"आता कैसे येणे जाणे"

महाप्रचंड लोल वारल्या गेलो आहे =))

In reply to by धर्मराजमुटके

आपला एकही सैनिक न मारता निष्पापाना मारणार्या धर्मांधाना उधवस्त करणे ही अहिंसाच आहे. जय गांधी जयंति !

In reply to by धर्मराजमुटके

नेहमी पाकिस्तानी बाजू समजावून घेणार्‍या पीसनिक्सनी आताही "सर्जिकल स्ट्राईक्स झालेच नाहीत" हे पाकिस्तानचे म्हणणे खरे मानून भारतिय सरकारला उगाचच दोष देऊ नये... ...नाहीतर "पाकिस्तान खोटे बोलत आहे" असे म्हटल्याचे पाप त्यांच्या माथी लागेल. बघा बुवा ! ;) =))

In reply to by धर्मराजमुटके

आजच्या गांधीजयंतीचा मिपा वरील "प्रतिसाद ऑफ द डे" असा पुरस्कार या प्रतिसादाला देण्यात यावा.

In reply to by धर्मराजमुटके

मिपा इतिहासातला एक अजरामर प्रतिसाद आहे हा, जियो

In reply to by मदनबाण

आपण जरी सिंधु करार मोडला नाही तरी ब्रह्मपुत्रेच पाणी चीन वळवणारच. ड्रॅगनची भुक जबरदस्त आहे अन ब्रह्मपुत्रा नदीचं खोर जलविद्युतनिर्मीतीसाठी प्रचंड अनुकुल आहे. पाकिस्तानचा अँगलतर असणारच. पुर्व पश्चीम आपण मस्त अडकलोय.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

तिसरे महायुद्ध चीन विरूद्ध इतर सर्व असे होईल असे वाटते व ते भारताच्या भूमीवर व भारतीय उपखंडात होईल. चीनची भूक जबरदस्त आहे. चीन अत्यंत विस्तारवादी व साम्राज्यवादी आहे. तैवान हा आपलाच भाग आहे हा चीनचा दावा आहे. भारतातील अरूणाचल प्रदेशावरही चीन हक्क सांगत आहे. चीनचे तिबेट यापूर्वीच गिळंकृत केलेला आहे. चीन इतर देशांच्या तुलनेत अत्यंत बलाढ्य आहे. अमेरिका सुद्धा चीनला दडपून वागत असावी. पाकिस्तानने मूर्खपणा करून काश्मिरचा आपल्या ताब्यात घेतलेला काही भूभाग परस्पर चीनला देऊन टाकलेला आहे. भविष्यात चीन संपुर्ण पाकिस्तान गिळंकृत करू शकेल. दक्षिण चीन समुद्रावर चीनने आधीच हक्क सांगितला असून तिथे एक कृत्रिम बेट बांधले आहे. त्यामुळे जपान, तैवान, फिलिपिन्स इ. देश अस्वस्थ आहेत. चीनच्या तुलनेत हे देश अत्यंत दुर्बळ असल्याने ते निषेध नोंदविण्यापलिकडे फार काही करू शकत नाहीत. व्हिएटनाम व चीनचे संबंध बरे नाहीत. १९७८ मध्ये दोन्ही देशात युद्ध झाले होते व त्यावेळी शूर व्हिएटनामी सैनिकांनी प्राणपणाने चीनला प्रतिकार केला होता. भारताला अधूनमधून थपडा मारून चीन भारताला कायम नर्व्हस ठेवत असतो. भविष्यात चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला चीनबरोबर युद्धात उतरावेच लागेल. त्यासाठी अमेरिकेला भारत, जपान, फिलिपिन्स, तैवान, व्हिएटनाम इ. देशांची मदत घ्यावी लागेल. चीन अत्यंत तुल्यबळ असल्याने या युद्धात सर्वांचेच जबर नुकसान होईल.

In reply to by श्रीगुरुजी

पाकिस्तान चीनचे पुढचे भक्ष्य आहे हे सुर्यप्रकाशाइतके सत्य आहे. भारत आणि चीन संबंधांची यापुढील काळात कसोटी लागणार आहे असे दिसते.

सांगीतल्या जाणारा आकडा ३८ ते ४० . वास्तवात तीथे आपल्या Para SF ने जे मारलय ना घरात घुसुन...कल्पने पलीकडचा आकडा आहे बॉस..ब्रेव्हो ब्रेव्हो.