लंडनवारी - भाग १ - पूर्वतयारी
लंडनवारी: पूर्वतयारी
ब्लॉग दुवे: पूर्वतयारी
चला! तयारी होत आलेली आहे. अनेक वर्षांपासूनचा लांबणीवर पडलेला बेत आता प्रत्यक्षात येतोय. लंडनवारी उद्यावर येऊन ठेपलेली आहे...
झालं असं, की एप्रिल २०१६ मधे मुलाचा पहिला वाढदिवस होता. टिपिकल गोष्टींशी नेहमीच माझं वावडं असतं त्यामुळे मुलाचा वाढदिवस त्याला अपवाद नव्हताच. मग एक कल्पना मनात आली की वाढदिवसाची भेट म्हणून मुलाला एखादी गोष्ट देण्यापेक्षा एखादा स्प्लेंडिड 'एक्स्पिरियन्स' द्यावा. त्याला कुठेतरी घेऊन जावं असं वाटलं. तसे इथेतिथे बरेच भटकत असतो आम्ही त्याला घेऊन, आणि तोही पक्का भटक्या असल्यासारखा बाहेर जायचं म्हटलं रे म्हटलं की टुण्णकन हातातलं खेळणं टाकून उभा राहतो. तर मग कुठे जावं? हा प्रश्न होता. अभयारण्य, किल्ला, समुद्र, इत्यादींचा विचार करता करता 'लंडन!' असा ग्रँड विचार मनात आला आणि त्याने व्यापलंच मला जवळजवळ. इथवर मी एकटाच या विचाराचा मानकरी होतो.
पुढे मग अपेक्षेनुसार अनेक जर-तर-असंकसं-कसंकाय चे अडथळे पार करत हा विचार प्रत्यक्षात येणार असं ठरलं. अर्थात, अगदी वाढदिवशी नाही तरी थोडं नंतर ते होणार होतं. फिरायला जायचं म्हटलं की भानच उरत नाही मला. त्यामुळे मग दररोज ट्रॅव्हल साइट्स वर शोधाशोध व्हायला लागली. मुंबई लंडन. तीन वर्षापूर्वीपेक्षा नक्कीच वाढलेले असले तरी तिकिटांचे दर आकर्षक होते, त्यामुळे हुरूप वाढला. तसा वाढदिवसाच्या निमित्ताने हा विचार आला असला तरी या दौर्यामुळे अनेक गोष्टी जुळून येत होत्या. अनेक वर्षापासूनचा लांबणीवर पडलेला हा लंडन दौरा, तीन-एक वर्षापूर्वी अगदी ठरल्यात जमा झाला होता, परंतु मग बारगळला तेंव्हा फार हळहळ वाटली होती. आता ती वाटेनाशी होत होती.
मुलाचा पासपोर्ट काढण्याचा अनुभव अतिशय उत्तम होता. एक उन्हात रांगेत उभं राहणं सोडलं तर बाकी प्रक्रिया इतकी पटापट व पद्धतशीर झाली की काय सांगावं! टीसीएस ला हे काम दिल्यापासून नक्कीच ही यंत्रणा खूप सुधारली आहे असं आता स्वानुभवातून सांगता येईल. पुढची पायरी व्हीजा ची होती. तिथेही अतिशय छान व निर्विघ्न काम झालं. युएस व्हीजा ला मिळालेली भिकार्यासारखी वागणूक आठवणीत होती परंतु इथे फारच सौजन्य अनुभवायला मिळालं. अर्थात युके व्हीजा चं कार्यालय असलं तरी भारतीय कर्मचार्यांच्या वागण्यात मात्र काही बाबतीत भारतीयांचा कॉपीराइट असलेला अव्यवस्थितपणा दिसतोच. तरीही तो दुर्लक्षिण्याइतका कमी होता हे मात्र खरं.
एव्हाना तिकिटांचे भाव मात्र आकाशाकडे झेपावत होते. मग त्याबाबतीतही बरंच संशोधन केलं. काही मतं अशी होती की विमान कंपन्यांच्या संकेतस्थळांवर तिकिटं ट्रॅव्हल कंपन्यांच्या संकेतस्थळांहून स्वस्त मिळतात. शिवाय विमान कंपन्यांच्या संकेतस्थळांवर दिसणार्या विमानसेवा इतर संकेतस्थळांवर दिसत नाहीत, थोडक्यात तिथे एक्सक्लूजिव्ह फ्लाइट्स असतात. कुठल्या दिवशी, कुठल्या वेळी तिकिटं बुक करता त्यावरही उपलब्धता, व दर अवलंबून असतात असंही ऐकलं. तसेही प्रयत्न केले. रात्री तीन वाजता उठून किमती बघणं इत्यादी. या आगोदरच्या परदेश प्रवासात इतकी मेहनत घेतली नसल्याने हे माझ्यासाठीही नवीन होतं. थोडाफार फरक नक्कीच असतो तिकिट दरात व त्या किमतीत मिळणार्या सेवांच्या यादीत; पण काही विशेष नाही अशा निष्कर्षावर पोचलो. अपेक्षित नव्हतं, पण एक कार्यालयीन अडथळा यायचा होता. तेच ते; रजा न मिळणं. भरपूर आगोदर दिलेली सूचना, आजवरचा कामाच्या नियोजनाचा आलेख हे सगळं जमेस असूनही खुसपटं काढली जातात तेंव्हा डोकं फिरतं. पण असो. तर त्यामुळे बेत काही दिवस पुढे ढकलण्यात आला.
मग खरा रोचक भाग सुरू झाला. माहितीचं संकलन. काय बघावं, काय टाळावं, काय खावं, कुठे काय विकत घ्यावं हे सगळं वाचणं अनेकदा प्रत्यक्ष प्रवासापेक्षाही आनंददायी असतं. ते चालू होतंच, आणि त्यासोबत एक महत्वाची गोष्ट चालू होती; खरेदी! प्रवासाला जायच्या उत्साहाच्या भरात अनेकदा 'होऊदे खर्च!' तत्व अवलंबलं जातं. त्यामुळे होणारा 'वॉलेट लॅग' प्रवासानंतरही अनेक दिवस त्रास देतो. पण प्रवास म्हणजेच मुळी वीक पॉइंट असल्यामुळे तोही सह्य असतो. त्यामुळे उष्ण कपडे, 'कूल' कपडे, इत्यादी सर्व खरेदी झाली. बॅगा भरल्या. आता उड्डाण तेवढं बाकी आहे. 'मिमा.....' (म्हणजे बोबड्या बोलात 'विमान') असं आत्ता म्हणताना होणारा मुलाचा चेहरा आम्ही बघतोय आणि आता प्रत्यक्ष प्रवासात, आणि तिथे गेल्यावर त्याच्या चेहर्याची खुलणारी कळी कशी दिसेल ते बघायची उत्सुकता आहे.
सो, लंडन; हिअर वी कम...


वाचने
14840
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
अरे वा, प्रवासाला शुभेच्छा
मस्त. पुभाप्र
हायला! ये बात!
प्रवासाला शुभेच्छा
In reply to प्रवासाला शुभेच्छा by नाखु
मला नाही सापडली, ५ मुख्य
पोराच्या पहिल्या बड्डेला
स्वागत !! काही पण मदत लागली
सुंदर सुरुवात ! पुभाप्र.
क्या बात वेल्लाभट. पंचेस
In reply to क्या बात वेल्लाभट. पंचेस by स्रुजा
मी काय क्येलं?
In reply to मी काय क्येलं? by टवाळ कार्टा
तू काही केलं नाहीस म्हणून तर
In reply to तू काही केलं नाहीस म्हणून तर by संदीप डांगे
एक म्हणते काहीतरी केलं...
In reply to मी काय क्येलं? by टवाळ कार्टा
तू फक्त झायिरात केलीस जायची,
In reply to तू फक्त झायिरात केलीस जायची, by स्रुजा
खिक्क...वर्क इन प्रोग्रेस्स
सुरुवात आवडली.
सुंदर सुरुवात.
भारी आयडीया! मी पण नवर्याला
शुभेच्छा
शुभेच्छा, वेल्लाभट! आता रियल टाईम ....
शुभेच्छा
बाळापेक्षा बाळाचे आई बाबाच
In reply to बाळापेक्षा बाळाचे आई बाबाच by यशोधरा
खिक्क
जोरदार सुरवात :) वेलकम
मस्त सुरूवात
छान सुरुवात!