डिस्क्लेमरः-
इथे तुम्ही नेहमीच एकाहुन एक सरस पाकृ पहाता. पण ते म्हणजे कसं की सेलेब्रेटींचं आयुष्य रुपेरी पडद्यावर पाहिल्या सारखं आहे. सामान्यांच्या व्यथा तुम्हाला कशा कळाव्यात? तर समाजातलया तळागाळातल्या लोकांच्या स्वयंपाकघरात काय घडतं ह्याच विदारक चित्रण ह्या पाकृ मध्ये आहे. हृदय हेलावणारे काही फोटो आहेत. कोमल मनाच्या लोकांनी पाहु नका!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तर काय झालं की गणपती आले.. मग सगळीकडे मोदकांचे फोटोच फोटो.. साधेसुधे नाही, उकडीचे! आम्ही इथे अमेरिकेत, जिथे आई नाही की चितळे नाहीत की मोदक करुन आयते खाऊ घालतील. (आय ब्लेम अमेरिका!). त्यात पुन्हा वॉट्सअॅपवर मेसेज की कसं कोकणातल्या समुद्र किनार्यावरच्या वातावरणामुळे तिकडे उकडीचे आणि घाटावर तळणीचे मोदक असतात. मग मी म्हणलं की आपण आता घाटावरुन काठावर आलो ना (अॅझ इन इस्ट कोस्ट!) मग करावे का उकडीचे? (आय ब्लेम वॉटसॅप). मग काय झालं की मोदकांचे फोटो पाहुन पाहुन शेवटी एकाक्षणी माझ्या रिकाम्या (अॅझ इन प्रचंड रिकामटेकड्या!) मनाने निर्णय घेतला की आपण सुद्धा यंदा उकडीचेच मोदक करायचे.
एक भारतात फोन, एक स्रुजाला, एक माबोच्या लिंकला भेट आणि एक युट्युब रेसेपी ह्यावरुन माझं मत असं झालं की उकडीच्या मोदकांची उगाच हाईप आहे, हे काय कुणालाही जमतील. स्रुजाला जमले हे कळल्यावर तर माझा आत्मविश्वास दुप्पट झाला! ;) त्यात वर कुणीतरी म्हणे की इडीअप्पमच्या पीठाचे म्हणे फार छान मोदक होतात. आणि काय योगायोग बघा, घरात इडीअप्पमचं पीठ! त्यावर घटक पदार्थ - तांदुळ पीठ असं लिहीलेलं. म्हणलं असेल अजुन काहीतरी बारिक वगैरे दळलेलं पीठ.
तर तमाम जनतेने सांगितल्या प्रमाणे जाड बुडाच्या भांड्यात दोन कप पाणी उकळायला ठेवलं, त्यात तुप आणि मीठ टाकलं. उकळलं की त्यात बरोब्बर दोन कप इडीअप्पम पीठ टाकलं. टाकता क्षणी हलवलं आणि तत्क्षणी ते उपम्यासारखं दिसु लागलं!
म्हणलं वाफ काढलं की होत असेल बुवा नीट. म्हणुन त्यावर झाकण ठेवलं. हां आता इंडक्शन कमी करायला विसरले मी जराशी पण म्हणुन काय ३० सेकंदात त्या पिठाने करपावं?? (आय ब्लेम इंडक्शन!) अर्धं पीठ जीवाच्या आकांताने तळाला चिकटलं होतं. मी जरासं हलवुन काय पाहिलं, सगळ पीठ काळं काळं दिसायला लागलं. मन घट्ट करुन ह्याचे काही मोदक होत नाहीत हे सत्य मी स्वीकारलं आणि नवर्याला फोन लावला. उकड चुकेल किंवा मोदक फुटतील अशा अपेक्षा त्याला होत्याच, पण उकड जळाली?? त्याचं खदाखदा हसुन झालं की म्हणलं बाबा तू घरी ये लवकर. आपण परत नुसतं तांदुळाचं पीठ घेऊन करुन पाहु.
ह्यावेळेस कुकरच घेतला डायरेक्ट. मागच्या वेळेस जे भांड घेतलं त्याचं बुड पुरेसं जाड नव्हतं वाटतं (आय ब्लेम भांडं!). पुन्हा दोन वाट्या पाणी उकळायला ठेवलं. ह्या वेळेस मात्र एक वाटी पिठ (अपना बझार तांदुळ पीठ - आणि अर्थातच आय ब्लेम अपना बझार) घातल्या घातल्याच ते चांगलंच मिळुन आलं. मी जात्याच चाणाक्ष असल्याने रेसेपीने काहीही सांगितलं तरी अजुन पिठ टाकलं नाही. मला चांगलं आठवत होतं की स्रुजाने सांगितलं होतं "चांगली दणदणीत वाफ काढ!". मग खाली लागत नाही ना हे सतत बघत दणदणीत वाफ काढली. (ऑफकोर्स, आय ब्लेम स्रुजा!). मनासारखी वाफ काढली की त्याला ताटात घेतलं आणि शक्य तेवढं मळलं. एवढी गरम उकड, पण मी हुं की चुं केलं नाही. फार सोशिक आहे हो मी. फायनली घेतला एक लहानसा गोळा आणि अक्षरशः तुपात बुडवुन बुडवन, चारदा मळुन, गोल गोल गरगरीत करुन मोदक करायला घेतला. पण हाय रे माझ्या कर्मा.. त्याला बारिक बारिक तडे जायला लागले. पहिला मोदक भुताचा म्हणुन दुसरा घेतला तर त्याचाही तोच अवतार..! वाफच कमी पडली बै म्हणुन परत ते सगळं प्रकरण पुन्हा कुकर मध्ये टाकुन परत दणदणीत वाफ काढली (स्रुजाच.. टु बी ब्लेमड )परत ते सगळं ताटात घेतलं आणि परत मोदक करण्याचा प्रयत्न चालवला.
उद्या तुम्हाला कुणी भाताची मुद देऊन ह्याचा मोदक करुन दाखव आणि कळ्या नाजुक काढ हं असं सांगितलं तर तुम्ही त्याच्या डोक्यात काय घालाल? मी कुकर घालेन..! भाताला आकार दिल्यासारखा आम्ही आपला प्रयत्न करतोय करतोय, त्या मोदकाचे तुकडेच व्हायला लागले. तरी मी बळं बळं सारण भरुन एक मोदक सदृश आकार बनवला. पण पुढच्याला मात्र सारण सुद्धा बाहेर येउन "काय चेष्टा लावलीये राव?" म्हणु लागलं.. मग त्याला "गप रे..गप" म्हणुन लाडु कसे वळतो आपण, तसं वळुन गप्पं करुन टाकलं. ह्या नादात त्याचा लाडुच झाला. तिकडे नवरा गेले साडे अकरा मिनिटं एक मोदक करायचा प्रयत्न करत होता.. मी जोरजोरात कुणा कुणाला ब्लेम करता येईल त्याची लिस्ट काढत होते..
"एक म्हण आहे ना ग!! आठवत नाही मला नीटशी.. काही तरी वाकडं.. कुणाचा तरी नाच.."
आय डेफिनाईटली ब्लेम नवरा..!
अखेर बर्याच झटापटीनंतर "उकडीचे लाडु" झाले. ते आधीच इतके शिजले होते की नाममात्र रेसेपी सेक ३० सेकंद वाफ काढुन आम्ही ते खायलाही घेतले. खाताना बाजुला सारणाचं भांडं घेतलं. एक घास मोदकाचा घेतला की एक बकाणा वर सारणाचा भरायचा.
सुंदरच लागत होते लाडु.. आपलं.. उकडीचे मोदक!
------------------------------------------------------------------------------------
ताजा कलमः-
मी मोदक लाडुंची पाककृती टाकल्यावर ४-५ तासातच मला इतके सल्ले मिळाले की का कोण जाणे परत एकदा मला "उकडीचे मोदक काही अवघड नाहीत" असं वाटायला लागलं. (स्रुजाला जमतात म्हणजे काय!!) ताडकन उठुन मी वाटीभर पाणी मीठ आणि तुप घालुन उकळलं. त्यात बरोब्बर एक वाटी पीठ टाकलं आणि लगेच इंडक्शन बंद करुन पटापट हलवलं. इंडक्शन बराच वेळ चांगलंच तापलेलं रहातं म्हणुन भांडं बाजुला सरकवलं आणि झाकुन ठेवलं. साधारण ५-६ मिनिटांनी ताटात घेऊन मळलं. सुमारे ५ मिनिटं पाणी आणि तुपाचा हात लावत लावत पुष्कळ मळल्यावर छोटा गोळा घेतला आणि मोदक करायला सुरवात केली. अगदी सुगरणीसारख्या मोदकाच्या कळ्या आल्या नसल्या तरी किमान कळ्या करता तर आल्या! सारण भरुन हलक्या हाताने मोदक बंद केला. असे ६-७ मोदक झाले. आणि मग ५ च मिनिटं वाफ काढली कारण मुळ उकडीत फार कच्चटपणा नसल्याने फार उकडायची गरज वाटली नाही.
आता बाप्पा करो आणि मला अमेरिकेतल्या भिकार सोना मसुरी नामक फडफडीत तांदुळाच्या ऐवजी भारतातल्या सुरेख तांदुळाची पिठी मिळो आणि बारिक बारिक कळ्या असणारा टप्पोरा मोदक माझ्या हातुन घडो!!
बघा तीन पैकी दोन मोदक किती चांगले जमलेत! आता एक भुताचा म्हणुन सोडुन द्यायचा!!

वाचने
80714
प्रतिक्रिया
232
मिसळपाव
प्रतिक्रिया
मोदकांचा असा 'पिराब्लेम' झाला
..
:)
हसून हसून वेड व्हायला झालय....
अतिशय सुरे़ख... मज्जा आली मला
शब्दफुलोरा!! =))
In reply to अतिशय सुरे़ख... मज्जा आली मला by केया
अतिप्रचंड सहमत. किस्से
In reply to शब्दफुलोरा!! =)) by पिलीयन रायडर
का ? का? का मला गरीब बिचारीला
In reply to अतिप्रचंड सहमत. किस्से by प्रीत-मोहर
मी घेईन ना, मग माझाही
In reply to का ? का? का मला गरीब बिचारीला by स्रुजा
हो मग काय.. म्हणलं ना..
In reply to मी घेईन ना, मग माझाही by प्रीत-मोहर
ताक .... महालोल .. तो
In reply to अतिशय सुरे़ख... मज्जा आली मला by केया
आपण अस म्हणुया की अनेक
In reply to ताक .... महालोल .. तो by स्रुजा
जब्राट जब्राट जब्राट !
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर
दरवर्षी मोदक चुकतील कसे?
प्रगती आहे
In reply to दरवर्षी मोदक चुकतील कसे? by पिलीयन रायडर
अय्या !
लोल =))
In reply to अय्या ! by इरसाल
=)) उत्साह महत्वाचा!!
In reply to अय्या ! by इरसाल
मोदक ? ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राँझा राँझा करदी वे मैं आपे राँझा होई, राँझा राँझा सद्दो नी मेनू हीर नु आखो कोई... :- Raavanकीप इट अप!
जबरदस्त पाककृती ...