Skip to main content

माझे आवडते प्रेरणावाक्य

लेखक त्रास यांनी सोमवार, 16/02/2009 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
“You see things and you say, ‘Why?’ But I dream things that never were and say, ‘Why not?’” – George Bernard Shaw तुमचे कोणते आहे आवडते प्रेरणावाक्य?

वाचने 32819
प्रतिक्रिया 170

प्रतिक्रिया

Sell your brain and brawn to the highest bidder but never put the price tag on your heart and soul.. अब्राहम लिंकनच्या पत्रातून(हे पत्र अभाहम लिंकनचे नाही असा एक प्रवाद आहे)..

"गरूडासारखे उडायची इच्छा असेल तर बदकांबरोबर पोहत बसण्यात वेळ घालवू नका." "If you want to fly like eagle, don't waste your time swimming with ducks." या वाक्याने माझ्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव टाकला आहे. जगाने मला काय दिलं यापेक्षा मी जगाला काय देऊ शकलो याचा हल्ली मी जास्त विचार करतो. वरील वाक्य सतत मनन करत राहिल्यामुळं एक म्हणजे आपण गरुड आहोत (असामान्य आहोत) हा आत्मविश्वास नेहमी जागृत राहतो. आणि दुसरं म्हणजे अल्पसंतुष्टता येण्याचा धोका राहत नाही.

In reply to by एस

एक तुच्छताभाव आहे यात तुम्हाला का नाही जाणवला याच नवल वाटलं.

In reply to by मारवा

ते तुम्ही बदकांना तुच्छ समजण्या - न समजण्यावर अवलंबून आहे. गरुड आणि बदक, दोन्ही आपापल्या जागी निसर्गात योग्यच आहेत. बदक पोहण्यासाठी जास्त अनुकूल आहे, तर गरुड उंच भरारी घेण्यासाठी. पण नुसतेच तळ्यात डुंबत राहिले तर भरारी घेण्याचे स्वप्न हे फक्त दिवास्वप्न बनून राहू शकते. उंच उडता यावे यासाठी सम्यक परिश्रम घेतले नाहीत तर उडणार कसे? हे व्हाइसं व्हर्सा सुद्धा लागू आहे. एखाद्या गरुडाला उडत राहण्याचा कंटाळा आला आणि बदकासारखे पोहावेसे वाटले तर त्याला इतर गरुडांसारखे उडत राहून काय फायदा आहे? नाही का? बाकी या कोटचा उत्तम उपयोग मिपावरच करता येतो. आपला 'हुच्चभ्रूपणा' छानपैकी मिरवतापण येतो. कसा, ते मी तुम्हांला काय सांगू! ;-) असो.

In reply to by एस

माझे आकलन चुकीचे होते. तुम्ही आशय अचुक पकडला. तसा बघितल्यावर आवडला. धन्यवाद.

हे माझं आवडतं प्रश्नार्थक विधान आहे. हे प्रेरणावाक्य नव्हे. If you do not crap, you will die. Does it mean life is shit? सौजन्य : गामा पैलवान (दुसरं कोण!) -गा.पै.

एकच ओ. आमच्या हिरोईनने सांगितलेले. "तुला आवडते तेच कर. शून्यातून सुरुवात कर पण तेच कर" आताशी कुठे पॉइंट झीरो पर्यंत आलीय लेव्हल.

झोपलास काय? चल काम कर ! माझ्या ऑफिस कॉम्प्युटरवर मी ठेवलेले स्क्रीन सेव्हर. नजर जाताच लगेच प्रेरणा मिळते आणि मी कामाला लागतो.

On a lighter note, आमचे जगातले सर्वात जास्त आवडते प्रेरणावाक्य म्हणजे "

चला आता बसू

" हे होय ;)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

जीव खुश झाला . नवी मुंबईत येण्याचा काही विचार आहे का ? बसू या कोठेतरी !

अनेक आहेत. एक निवडणं कठीण. तरीही एनिग्माच्या अनेक आवडत्या काव्यांपैकी एका काव्याची ही ओळ नेहमीच शांतता देते. 'If you understand, or if you don't If you believe, or if you doubt There is a universal justice and The Eyes of Truth, are always watching you.' - Enigma