मी कोणालाच काही सांगणार नाही...
लेखनविषय:
तुज्या प्रेमाच्या ओलाव्यात चिंब भिजेन एवढं प्रेम करू नकोस..
प्रीतीच्या सागरात वाहून किनाऱ्याला येऊ शकणार नाही एवढं प्रेम करू नकोस...
तुझ्या सौदर्यांने घायाळ फक्त स्वप्नातच असतो मी आजकाल..
म्हणून तुझ्या मनात काय आहे ते सांग मला, मी कोणालाच सांगणार नाही..
खरं खरं सांग मला, मी कोणाला सांगणार नाही..
डोळ्यावर झोप अशी नसतेच कधी
स्वप्नात तुझी सोबत हवी हवीशी वाटते..
गजबजलेल्या गर्दीतून वाट काढताना तुझ्या
हळुवार स्पर्शाचा आधार घ्यावासा वाटतो..
तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय आणखी मला काही सुचतच नाही..
म्हणून तुझ्या मनात काय आहे ते सांग मला, मी कोणालाच सांगणार नाही..
खरं खरं सांग मला, मी कोणाला सांगणार नाही..
धोधो कोसळणाऱ्या पावसात एकटं भिजताना
तुला माझी आठवण नक्कीच येईल..
अशी काही अपूर्ण स्वप्न जाता जाता
तुझ्या ओजंळीत मी देऊन जाईल..
माझ्या प्रेमाची भव्यता कदाचित तेव्हाच तुला समझेल..
म्हणून तुझ्या मनात काय आहे ते सांग मला, मी कोणालाच सांगणार नाही..
खरं खरं सांग मला, मी कोणाला सांगणार नाही..
वाचने
2366
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
छान.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरंच...जितका पाऊस पडतोय त्याच
In reply to खरंच...जितका पाऊस पडतोय त्याच by bhavana kale
लिहा. शुभेच्छा.
मस्त
बोल दो ना जरा,????????
In reply to बोल दो ना जरा,???????? by किरण
बरोबर ओळखलंत..पण ह्या
अशी काही अपूर्ण स्वप्न जाता
अब हिचकियाँ आती हैं तो पानी