Skip to main content

IT BPO बद्दल एवढा राग का ?

लेखक वाल्मिक यांनी मंगळवार, 20/09/2016 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावर मिपावरच बरेच धागे आहेत .पण म्हटले नव्याने चर्चा करू या नॉन IT लोकांचे आक्षेप 1) IT वाल्याना बाकींपेक्षा जास्त पैसे मिळतात ,कामापेक्षा 2) संस्कार वगैरे नसतात ,अमेरिकन संस्कृती फोफावतेय 3) स्वतःला राजे समजतात 4) निवडणुकीत मतदान देत नाही व चुकीचे लोक निवडून येतात ( हे मी खरंच ऐकलेय एकाकडून ) 5) जागांचे भाव आणि बाकी महागाई ह्यांमुळे वाढलीये 6) सामाजिक जणींना कमी पण हे खरंच आहे का ? तुमचे काय मत आहे ?

वाचने 5615
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

IT आणि BPO ही खूप वेगळी क्षेत्र आहेत. त्यांना एकाच पारड्यात तोलणार्‍यांबद्दल इतकेच म्हणू शकतो की त्यांना दोन्ही क्षेत्रांबद्दल काहीच माहीती नाही. माझ्या एका नातेवाईकाच्या मते IT professionals हे data entry करत असतात :)

In reply to by मराठी कथालेखक

जेव्हा प्रोजेक्ट मिळत नाही डेव्हलपर लोकांना मेन्टेनेचे आणि डेटा एन्ट्री पण करताना बघतलीये ,मुद्दा दोन्ही सारखे आहेत असा नाहीये

कारभारी जरा दमान घ्या तुम्ही एकामागोमाग इतक्या ताकदीने विषय घेत आहात आमची दमछाक होतेय. थोड आमच्या सारख्या जनरल पब्लीकच्या कलाने घ्या ही विनंती.

In reply to by मारवा

ताकदीनं कुठलं, भुरटं पातेलं आहे. एकदा काडी टाकल्यावर नुसते प्रतिसाद वाढवायला येतंय. ना चर्चा ना मुद्दे. काय लिहिलेलं त्यांचं त्यांना तरी समजतंय का देव जाणे. पब्लिक बी आपलं टाकला चारा की तोंडं हलवायची कामे करतय म्हणून याचे फावतेय. बाकी कै नै.

मी काय म्हणतो, आमच्यासमोर जरा कमी स्पीडनं चचपात्या फेका हो, आधी तो मराठा मोर्चाचा धागा आहे तो नीट चावून खाऊ द्या, त्याला तोंड लावले नाही का तुम्ही नवी चपाती तूप लावून टाकली पुढे आमच्या, आम्ही पडलो कुत्री, मिळाले की वखवख खातो मग तडस लागते पोटाला, मग निसर्गनियमाविरुद्ध जाऊन गवत खाऊन उलट्या काढायला लागतात पोट बिघडले की. जरा सावकाश येऊ द्या, आमचे पोट भारत राहिले तर आम्ही तुमच्या आयडीची इमानेइतबारे रखवाली करू बघा. (इमानदार राखणदार) ढेल्या.

In reply to by मारवा

तुमच्यासाठी खास स्वतःचे शेपूट स्वतः पकडणे, अन वाळूच्या ढिगाऱ्यावर मजेत उड्या मारणे हे दोन खेळ मी करून दाखवणार आहे =)) फार कमी लोकं मिळतात हो आमच्यासारख्या कलुंग्या कुत्र्यांना जीव लावणारी. (कृतज्ञ) ढेल्या

In reply to by फेदरवेट साहेब

एका कुतुहल तुम्ही असा आयडी का म्हणिण घेतलाय बर ;)

दोन्ही क्षेत्रे नवीन आहेत. जुन्या पिढीला जास्त माहिती नाही म्हणून हि निष्फळ बडबड. सरकारी हापिसात किंवा बॅंकेत काम करणाऱ्यांची सामाजिक जाणीव आणि अमेरिका विषयी असलेली घृणा, देशप्रेम इत्यादी पाहून वेळावेळी कंठ दाटून वगैरे यावा अशी परिस्तिथी आहे काय ? ब्रिटिश सरकार जेंव्हा पोस्टांत कारकून घेत होते तेंव्हा सुद्धा म्हाताऱ्या लोकांनी अशीच "वेदशास्त्र पारंगत चतुरंग शास्त्र्यांचा मुलगा हापिसात बसून इस्माईल खानच्या `ह्या ईदचा बकर्याला मास नाही दुसरा पाठवा` असल्या तारा पाठवतो हो. धर्म आणि लाज म्हणून काही राहिली नाही आजच्या पिढीला" असल्या बाता केल्या असतील.

बेंचवर काय सध्या? फार मिपा मिपा करु नका हापिसात. सिस्टीमवाल्यांना कळलं तर ब्लॉक करतील मिपा. आम्हाला तुमच्याकडून होणारी करमणूक कायमची हवी आहे. तुम्ही घाई केलीत तर आम्हाला त्या करमणुकीला कायमचे मुकावे लागेल.

मला तं भौ येगळंच डौट युन ऱ्हायला ! सध्या निघणारया मूक मोर्चाच्या अनेक कारणांमध्ये ह्ये एक कारणं नसावं ना ?

In reply to by एकुलता एक डॉन

इथे प्रतिसाद देतानासुद्धा आयडी बदलायचा विसरलास रे, उग्गीच नाही पातेलं म्हणतात तुला =))

In reply to by टवाळ कार्टा

च्यायला. कसलं भुरटं हाय राव हे. टक्या तू घे धुवून.