साहित्य
७५० ते ८०० ग्राम चिकन लेग्स, स्किन काढून, चिरा मारून
शाकाहारी लोकांसाठी
पनीर
छोटे कांदे
रंगीत शिमला मिरच्या
अर्धवट उकडलेले छोटे बटाटे
मशरूम
मसाला क्र. १
१ चमचा हळद
१ मोठा चमचा लसूण पेस्ट
१ मोठा चमचा आल्याची पेस्ट
१ मोठा चमचा धणे पावडर
१/४ कप तेल
१ कप घट्ट दही
मीठ , चवीनुसार
मसाला क्र. २
६ ते ८ हिरव्या मिरच्या
१ हिरवी शिमला मिरची, चिरून
१ मोठी मूठ कोथिंबीर
६ ते ८ पालकाची पानं
२ माध्यम आकाराचे कांदे, उभे चिरून आणि कुरकुरीत तळून ( बिरीस्ता
२ चमचे व्हिनेगर
१ मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर
मीठ , चवीनुसार
तूप (लागेल तसं, ऐच्छिक)
रणजित राय, ह्यांचं "
तंदूर:- दि ग्रेट इंडियन बार्बेक्यू" हे एक अतिशय सुंदर संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक. मला भेट मिळालेले (बायको कडून) हे पहिले पाककृतींचे पुस्तक. पुस्तक मिळाल्यावर पहिली पाककृती जी करून बघितली तीच आज इथे देतोय.
नेहेमीचे तंदुरी चिकन खाऊन कंटाळला आला असेल तर हे एकदा करून बघाच. मूळ पाककृतीत तुपाचा सढळ हस्ते वापर आहे (कांदे तुपात तळून वगैरे), मी मात्र तेलात केलाय, शेवटी भाजताना मात्र वरून ब्रशने थोडं तूप वापरल्याने चव खुलून येते.
चिकन ब्रायनिंग करून घ्या.
इथे ब्रायनिंग बद्दल धागा वाचा.
कृती
चिकन कोरडे करून घ्या. चिकन वर सुरीने चिरा मारून, मसाला क्र. १ लावून घ्या. चिकन १ ते २ तास झाकून मुरत ठेवा. भाज्या आणि पनीर वापरत असल्यास त्याचे तुकडे करून त्याला मसाला क्र. १ लावून घ्या आणि १ तास मुरत ठेवा.

पालकाची पानं मिठाच्या उकळत्या पाण्यात १ ते २ मिनिटे ब्लाँच करून मग गार पाण्याखाली धरा. पानं निथळून, मसाला क्र. २ मध्ये लिहिलेल्या इतर वस्तूं बरोबर मिक्सर मधून बारीक करून घ्या. पाणी अजिबात वापरू नका.
ह्या तयार मसाल्याचे ४ ते ५ मोठे चमचे चिकनला/भाज्यांना नीट लावून घ्या. चिकन किमान ६ तास फ्रीज मध्ये मुरत ठेवा. हिरवा मसाला थोडा उरला तर तो हवाबंद डब्यात ठेऊन फ्रीझर मध्ये ठेवा. साधारण १५ दिवस आरामात टिकेल.


हे चिकन ओव्हन मध्ये १८० डिग्री ला २० ते २५ मिनिटे ग्रिल मोड वर भाजून घ्या. बार्बेक्यू असेल तर त्यावर खमंग भाजून घ्या. एयर फ्रायर मध्ये २०० डिग्री ला २० ते २५ मिनिटे भाजून घ्या.
चिकन भाजताना, अधून मधून ब्रशने तूप लावा. तूप वापरणार नसाल तर कांदे ज्यात तळून घेतलेत ते तेल वापरा.
व्हेज लोकांसाठी, चिकन ऐवजी वर दिलेल्या भाज्या किंवा पनीर वापरून कृती करा. भाज्यांना शिजायला १० ते १५ मिनिटे पुरतील. बटाटे कच्चे किंवा कमी शिजलेले असतील तर ते वेगळे भाजून घ्या कारण त्यांना थोडा जास्ती वेळ लागेल.

प्रतिक्रिया
काय किलिंग रेसिपी आन् फोटू
मस्त रेसीपी
शाकाहारींची पण सोय मस्त केली
हो ....
In reply to शाकाहारींची पण सोय मस्त केली by पिंगू
तोंडाला पाणी सुटलं ना राव
.
.
हायला
बेस्ट!
केडी_/\_
ओ किती जळवताय...कट्त्याला
कहर रेसेपि कहर फोटु :)
अप्रतिम
धन्यवाद.....
व्वा, कधीपासून व्हेज तंदुरी
तंदुरी बार्बेक्यू
In reply to व्वा, कधीपासून व्हेज तंदुरी by उदय के'सागर
1. मसाला क्रमांक 2 मध्ये
धन्यवाद केदार शंकानिरसन
In reply to 1. मसाला क्रमांक 2 मध्ये by केडी
नेहमीप्रमाणेच झकास!
:-(
धन्यवाद, तुमच्या
In reply to :-( by बाबा योगिराज
ए ओव्हन म्हणजे मायक्रोव्हेव
माओ
In reply to ए ओव्हन म्हणजे मायक्रोव्हेव by llपुण्याचे पेशवेll
मस्त पाककृती!