हा अनुभव आहे त्यामुळे कंपनीचे नाव लिहिले आहे.
मध्यंतरी माझी नॅनो मी ओफिसातुन घराकडे येताना संध्याकाळी रस्त्याच्या मधोमध बंद पडली. कशीबशी ढकलत कडेला लावली व रिक्षा करुन मग घरी आलो. रात्री टाटाच्या कस्टमर केअर ला फोन लावुन पुढे टोईंग बाबत विचारणा केली.पलिकडुन उत्तर आले कि थोड्या वेळात कॉल करु म्हणुन.एकुण तक्रार धसास लावण्याचा प्रकार कौतुकास्पद आहे. त्याबद्दल काही तक्रार नाही. पण नंतर कस्टमर केअरमधुन फोन यायला चालु झाले. सुरवात कन्नड मधुन. फोन नंबर ०२० ने सुरवात होत असल्याने तो पुण्याहुन येत आहे हे समजले व मी बेंगलोरमधुन तक्रार रजिस्टर केली असल्याने त्यानुसार कर्नाटक क्षेत्र सांभाळणारा कोणी कन्नड भाषिक प्रतिनीधी बोलत असणार हे ही ताडले पण बाबांनो मला कन्नड येत नाही कोणी मराठी बोलणारे असल्यास त्याच्याशी संभाषण करु शकतो असे सांगितल्यानंतर मराठी बोलणारे कोणी नाही अशी असमर्थता दर्शवुन हिंदी वा इंग्लिश मध्ये संभाषण सुरु ठेवण्यात आले. हा प्रकार ३-४ वेळेला झाला. सुरवात अस्खलीत कन्नड मधुन. नो मराठी...मग हिंदी व इंग्लिश मधुन. अर्थात तक्रारीची योग्य दखल घेतली गेली व दुसर्या दिवशी टोईंग करु असे आश्वासन दिले गेले. दुसर्या दिवशी जेव्हा फोन केला तेव्हा अर्थात तिथला स्टाफ बदलला असल्याने कोणी स्त्री प्रतिनीधी आता उपलब्ध होती. तेव्हाही तोच प्रकार. अस्खलित कन्नड.नो मराठी.
अर्थात एकुण प्रोब्लेमच्या सोडवणुकीबद्दल कंपनीबद्दल काही तक्रार नाही पण पुण्यात असुनही तिथल्या कस्ट्मर केअर रिप्रेझेंटेटीवला मराठी येत नसावे ह्याबद्दल सखेद आश्चर्य जरूर वाटले.
आशा आहे कि टाटा मोटर्स कस्टमर केअर पुण्यातुन चालविले जात असुन मराठीबाबत उदासीन आहे हा फक्त मला आलेला असावा.
कंपनीमध्ये काम करणारे ह्याबाबत जास्त माहीती देवु शकतील.
ठिगळ : काही वेळापूर्वीच एकुण सर्विस कशी काय वाटली असा फिडबॅक कॉल आला. पुन्हा सुरवात कन्नडमधुन.
मी...मराठी?
संभाषण कन्नड वळणाने जाण्यार्या इंग्लिशमधुन.
याद्या
5221
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही कानडा योगेशु नाव
माथेरान महाबळेश्वरची भाषा
बेंगलोरमधुन तक्रार रजिस्टर
सहमत आहे,
In reply to बेंगलोरमधुन तक्रार रजिस्टर by खटपट्या
..मराठी आलेच पाहीजे अशी सक्ती
In reply to बेंगलोरमधुन तक्रार रजिस्टर by खटपट्या
मध्यंतरी संगीतकार कौशल
In reply to ..मराठी आलेच पाहीजे अशी सक्ती by कानडाऊ योगेशु
आग्रह
In reply to मध्यंतरी संगीतकार कौशल by खटपट्या
आमच्या ह्यांना विचारुन सांगते
सहज आठवलं
. बंगलोर हे शहर शहाजी महाराज
In reply to सहज आठवलं by दासबोध.कॊम
साफ चूक. बेंगळूरू शहर किमान
In reply to सहज आठवलं by दासबोध.कॊम
बॅटमॅन , राधामधवविलासचम्पू ची
In reply to साफ चूक. बेंगळूरू शहर किमान by बॅटमॅन
राजवाडे प्रत बुकगंगावर
In reply to बॅटमॅन , राधामधवविलासचम्पू ची by A.N.Bapat
त्यापासून जवळ असलेल्या बेगूर
In reply to साफ चूक. बेंगळूरू शहर किमान by बॅटमॅन
.फारसी भाषेची लागण झालेला
In reply to सहज आठवलं by दासबोध.कॊम
बेन्गलुरु
In reply to सहज आठवलं by दासबोध.कॊम
पुनवडी ते पुणे
In reply to बेन्गलुरु by दिगोचि
धन्यवाद. विकिपीडिया बद्दल ची
In reply to पुनवडी ते पुणे by दासबोध.कॊम
मराठीचं दुय्यम स्थान
यावर उपाय म्हणजे आपण
In reply to मराठीचं दुय्यम स्थान by गामा पैलवान
पुण्याचा नंबर आहे म्हणून कॉल सेंटर पुण्यातच असेल असे नाही
मी बेंगलोरमधुन तक्रार रजिस्टर