इंजिनीयरींगची चार वर्षे...
तसे सगळेच इंजिनीयर स्वत:ला आम्ही चार वर्षे घासून इंजिनीयरींग पुर्ण केली असं म्हणतात. अगदीच खरंय हे. मि व माझ्या साथीदारांसाठी ती घासाघासीच होती. सुरुवात होते ती अगदी कॉलेजच्या लोकेशनपासून.
कॉलेज तसं अडगळीत, ग्रामिण भागात. आजूबाजूला लोकवस्ती विरळ. ७-८ किलोमिटर वर बाजारपेठ. बाजारपेठेपासून कॉलेजपर्यंत दिवसाला दोनच बसेस. रिक्षासाठी २ किलोमिटर पर्यंत पायपीट करावी लागायची. बाईक्स मोजक्याच. त्याही दिवसभर कुणी ना कुणी ठरवलेल्या असायच्या. कॉलेजला करमणूक म्हणून लेडीज हॉस्टेल, कँटीन, ग्राऊंड नाहीतर वेज प्लॉट.
पहिल्या वर्षी येणाऱ्या मुलांसाठी प्रचंड सहनशक्ती घेऊन लागत असे. सहनशक्ती यासाठी, वरील नमुद केल्याप्रमाणे आपला संबंध जगाशी येत नाही हे लक्षात येते. रॅगिंगचा संबंध नाही पण थोडं फार सिनीअर्सना रिस्पेक्ट द्यावा लागतो. तो ही नंतर विरळ होऊन जातो. नंतर भाऊ लोक्स बनतात सगळे.
मेसला चालणारा धिंगाणा. कैद्यांसारखी ताटे वाजावायची. टिव्ही वर मॅच लागली की ताटांची आदळाआपट ठरलेलीच असायची. पहिल्या दिवशी घरातून एक ताट, वाटी, बादली, ग्लास, मग, टूथपेस्ट, तेल इ. आवश्यक गोष्टी सोबत आणायचो. पण काहीच दिवसांत या सर्व गोष्टी एका रुम साठी झाल्या तर डिग्री संपता संपता एका हॉस्टेलसाठी या वस्तू झाल्या. एका ताटात ७-८ जण जेवायचो. ही अतिशयोक्ती नाहीय. विश्वास नसेल तर अजूनही जाऊन बघू शकता. शेवटी शेवटी एकही ताट, बादली, टूथपेस्ट, तेल उरलं नव्हतं. मग ज्युनिअर कडून बादली, ताट घ्यावी लागायची. टूथपेस्ट साठी हॉस्टेलभर भिक मागायची.
आमच्या वेळी कॉलेजची बिल्डींग म्हणावी तशी अवाढव्य नव्हती पण आम्ही जाता कधी भव्य मोठी झाली ते कळालंच नाही. १५-२० कोटीची बिल्डींग, अॅडवान्स लॅबरोटरीज, वेगवेगळे छोटे प्लांटस्. प्रचंड मोठे ग्राऊंड. सुसज्ज जिम आधी पासूनच होती. आधी काही दिवस जायचो पण नंतर अंग दुखायला लागले. सोडून दिली.
अभ्यासाचा खूप ताण घ्यावा असं सांगणारे नंतर अफवा पसरवणारे वाटतात. पहिल्या सेमिस्टरला केटी लागणारे दु:खात डुबून जातात तर क्लियर झालेले हवेत असतात. माझ्या सारखा माणूस एक केटी काय लागते आणि हे सगळं सोडून जायचा विचार करीत होता. आता हसायला येतं. परिक्षेच्या आधी एक दिवस नोटस् मिळायच्या. रात्रीत अभ्यास. दुसऱ्या दिवशी एकमेकांवर ढकलून पेपरला बसायचो. सरांनी एक सांगितले होते, काही झाले तरी पेपर कोरा ठेवायचा नाही. त्याचीच पुर्तता म्हणून अगदी काही येत नसले तरी पेपर काळा करून येत होतो. पास व्हायचो. आमचे सर सांगायचे, जो इथे राहायला शिकला तो जगातील कुठल्याही कोपऱ्यात राहील. खरंच होतं ते. लायब्रेरीत नावाला जात होतो, खरं तर पोरींना बघण्यासाठी जायचे. ज्यांची त्यांची तो/ती आला की फोन करून सांगायचो.
कॉलेजचे अतिउत्साहाचे दिवस म्हणजे स्पोर्टस् डेज, गॅदरींग, शिवजयंती. अतिधमाल असते या दिवसांत. प्रचंड उत्साह असतो सगळ्यांच्या चेहऱ्यावर.
रात्री बेरात्री कानात हेडफोन टाकून पुर्ण केलेले मॅन्युअल्स्. एकाची झालेली एखादी चुक तिच कॅरी फॉरवर्ड व्हायची. कपडे धुणे खूपदा कंटाळवाणे असायचे. रात्री रस्त्यावर बसून गप्पा. सगळं सगळं विचित्र होतं.
लेडीज हॉस्टेल ला एकच कॉईन बॉक्स होता आधी. नंतर मोबाईल अलाऊड झाले. त्याआधी प्रेमवीरांची रांग लागलेली असायची. सगळेच वेटींगवर असायचे फोन लावायला. अगदीच एक दीड तासाने कुणाचा तरी नंबर लागायचा. फोन अलाऊड झाल्यावर मात्र प्रेमवीर रात्र रात्र जागून प्रेमाचा अविष्कार साजरा करीत.
शेवटच्या वर्षातला प्रोजेक्ट. किती धावपळ. इंटरनेटसाठी बाईक्सने रात्री रात्री बाजारपेठेत जावे लागायचे. शेवटची व्हायवा. शेवटचा निरोप समारंभ. शेवटचे हॉस्टेल सोडताना एकमेकांना मिठी मारून रडणारे झाले होते सगळेच. कुणीच यातून सुटला नाही. एकमेकांच्या संपर्कात राहू असं वचनबद्ध होऊन निघालेलो आम्ही नंतर आप आपल्या व्यापून गेलो. आता नाही ती दोस्ती, नाही तो दंगा, नाही लेडीज हॉस्टेल, नाही ग्राऊंड, नाही कँटीन, नाही लायब्रेरी... काहीच नाही... राडा, मॅटर, साप हे आमच्या कॉलेजच्या डिक्शनरीतले शब्द. तसेच जगतात सगळे. आता सगळे पोटाच्या मागे लागलोत. लागलंच पाहीजे ना? अस्तित्वाची लढाई जी सुरु झाली आहे, तुमची माझी सगळ्यांचीच...!
मिस यू गायज्....
असे घडणाऱ्या सर्व इंजिनीयर्सना" इंजिनीअर्स डे" च्या हार्दिक शुभेच्छा.
-- *सर्व इंजिनियर्स ना समर्पित* *अजेश पवार*
आभार- विजय तारा नामदेव
याद्या
6374
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
इंजीनियर लोकांची एक गंमतच
+ १
In reply to इंजीनियर लोकांची एक गंमतच by प्रचेतस
अचूक! ;)
In reply to इंजीनियर लोकांची एक गंमतच by प्रचेतस
जावे त्याच्या वंशा
In reply to इंजीनियर लोकांची एक गंमतच by प्रचेतस
आणि हे इंजीनियर मुलगे लिहितात.
In reply to इंजीनियर लोकांची एक गंमतच by प्रचेतस
अगदी अगदी.
In reply to आणि हे इंजीनियर मुलगे लिहितात. by बोका-ए-आझम
=)) बोकेशा, क ह र!!!
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
नाही येत. का ते माहीती करुन
In reply to आणि हे इंजीनियर मुलगे लिहितात. by बोका-ए-आझम
त्या ते भयंकर कॉम्प्लेक्स
In reply to आणि हे इंजीनियर मुलगे लिहितात. by बोका-ए-आझम
बाप्ये इंजिनियर
In reply to आणि हे इंजीनियर मुलगे लिहितात. by बोका-ए-आझम
ते जीटी मारली राहिलं का ?
अजेश पवार कोण? त्यांचे लेखन
अजेश पवार यांचे विचार
In reply to अजेश पवार कोण? त्यांचे लेखन by यशोधरा
डिप्लोमा
छान लिहिलय. अगदी अचूक !
हा हा !
BATU?
धन्यवाद
अभियंता दिवसाच्या निमित्ताने।।।
सेम टू सेम
छानच..
अभियंता दिनानिमित्ताने
विदाऊट कष्ट करून अभियंता बनता
In reply to अभियंता दिनानिमित्ताने by संत घोडेकर
दोन मुद्दे आहेत ....
In reply to अभियंता दिनानिमित्ताने by संत घोडेकर