नमस्कार मंडळी,
मिपागणेशचित्रमालेतील पहिले पुष्प गणेशचरणी अर्पण करताना अत्यंत आनंद होत आहे. मिपाकरांमध्ये असलेल्या विविध कला, कलेच्या सादरीकरणात असलेला त्यांचा उत्साह पाहता अशा कित्येक चित्रमाला मिपावर येऊ शकतील, हा विश्वास आहे.
विविध कलांचा स्वामी गणाधिदेव गणेशाचे हे प्रथमरूप आहे ओरिगामीतील. कागदाला केवळ घड्या घालून साकारलेली ही त्रिमित शिल्पे बनवण्यात आपले मिपाकर सुधांशुनूलकर ह्यांचा हातखंडा आहे. त्यांनी ओरिगामीत साकारलेला हा गणेश व मोदक समुच्चय. आपल्या मिपाच्या विशेषांकांच्या मुद्रितशोधनात सुधांशूदादांचा सिंहाचा वाटा आहे. कीटक/पक्षी/निसर्गनिरीक्षण ह्या त्यांच्या निस्सीम छंदांबद्दल मिपाकरांना माहीत आहेच.
-------
०६/०९/२०१६
.
.
पारदर्शक काचेवर मेहंदीसारख्या दाट रंगाने बाह्यरेषा रेखाटून त्यात पारदर्शक रंग भरणे म्हण्जे ग्लास पेंटिंग. हा छंद जोपासलाय आपल्या मिपाकर सूड ने. प्रभावी व अनवट शब्दकळा लाभलेल्या ह्या मिपाकराची गती स्वयंपाकघरातही चालते. अनेक लेख, कविता, विडंबने आणि पाककृती मिपावर सादर करतानाच ग्लास पेंटिंग मध्ये सूडने साकारलेला हा गणेश तितकाच अप्रतिम आहे यात शंका नाही.
--------
०७/०९/२०१६
रंगीत कागदाच्या पट्ट्यांना गुंडाळ्यांचा आकार देऊन त्यांनाच विविध आकारात बसवायचे. पेपर क्विलिंग असे नाव असलेल्या या तंत्राने विविध आकारातून,रंगातून साकारलेल्या गणेशचित्रकृतीला सादर केलेय आपल्या मिपाकर कलावंत नूतन यांनी. लहानपणापासूनच निसर्गरंगांशी गोडी लागली की प्रत्येक कृती कशी कलाकृती बनत जाते हे जाणवून देणारा अनोखा बाप्पा. पेपरक्विलिंग बाप्पा.
--------
०८/०९/२०१६
मिपा बाप्पा मोरयाच्या ह्या उपक्रमात अगदी नवीन/अपरिचित आयडींनी पण उत्साहाने आपल्या कलाकॄती पाठवल्यात. भिंतीवर लावण्यासाठी केलेले हे बाप्पाचे सुंदर म्युरल बनवले आहे आपले मिपाकर झुमकुला यांनी. एकदम साध्या भौमितिक आकारांचा, आकर्षक रंगाचा व पोताचा (टेक्ष्चर) वापर केलेले हे म्युरल नजर वेधून घेतेय एवढे मात्र नक्की.
---------
०९/०९/२०१६
कुलाबा (अलीबाग) किल्ल्यातील उजव्या सोंडेचे गणेश पंचायतन. आपण सहसा विष्णूपंचायतन बघीतलेले असते पण गणेश पंचायतन कमी आहेत. हे किल्ल्यातील गणेश मंदीराच्या गाभार्यात आहे आणि हे मंदीर रघुजी आंग्रे (कान्होजी आंग्र्यांचा नातु) यांनी १८व्या शतकात बांधले आहे. हा फोटो टिपलाय आपला भटकंतीचा ज्ञानकोष असलेल्या स्वच्छंदी_मनोज ने. डोळस भटकंती आणि अफाट माहितीचा खजिना हा मिपावरच्या अनेक लेख व प्रतिसादातून कायम दिसतो.
त्याचे ह्या फोटोसोबतच मांडलेले विचार वाचायला हरकत नाही.
..................................
"गणेश चित्रमालेची मिपावर घोषणा झाली आणि आपल्या जवळील गणपतीची चित्रे, फोटो पाठवण्याची विनंती झाल्यावर माझ्या मनात विचार आला की आपण काय पाठवू शकतो. मग असे सुचले की आपण एवढे ट्रेक करतो आणि इतक्या वर्षात अनेक वेळा अनेक ठिकाणी गणपतीच्या मुर्ती बघीतल्या आहेत, मग त्या किल्ल्यावर असोत, कि कुठल्या घाटवाटेत असोत, की कुठल्या लेण्यात असोत की कुठल्या गावातल्या मंदीरात, मग त्याच पाठवायला काय हरकत आहे.
सध्या आजूबाजूला वर्षागणीक वाढत जाणारा गणपती उत्सवाचा आनंद बघितला की वाटून जाते की एखाद्या मुर्तीलापण मिरवून घ्यायला तिचे स्वतःचे नशीब लागत असावे. कोणे एके काळी (फार नाही हो फक्त काहीशे वर्षेच झाली असतील) ह्या किल्ल्यांवरच्या, आडवाटेवरच्या, कुठल्यातरी गुहेतल्या, दुर्गम आणि कोपर्यातल्या गावातल्या मंदीरातल्या ह्या गणेशमुर्ती पुजल्या जात होत्या, नवस बोलल्या जात होत्या. पण जशी जशी माणसांची गळती गावातून शहराकडे होऊ लागली तशी ही गणेश मंदीरे ओस पडू लागली. एके काळी ज्यांच्या समोर दिपमाळा लागल्या, नैवैद्य ठेवले गेले, आरत्या म्हटल्या गेल्या, नवस बोलले/फेडले गेले, गावातल्या पोरापासून थोरापर्यंत ज्यांनी त्याला तुच आमचा रक्षणकर्ता, तुच आमचा कर्ता-धर्ता, भाग्यविधाता असे म्हटले त्या गणाधीशाला असे वर्षभर भक्तांच्या दर्शनापासून वंचीत बघीतले की वाईट वाटते. ज्या मंदीरांनी विजयगाथा ऐकल्या, ज्या गणेशाने विघ्नहर्ता आणि सुखकर्ता अशी भुमीका बजावली, ज्याच्यात तिथे मंत्रानी प्राणप्रतिष्ठा करून देवत्व फुंकले त्याच गणपतीला तिथेच त्याच जागी असे भक्तवंचीत बघून वाईट वाटते.
शहरातल्या डिजेंच्या कोलाहालात, खिशातल्या पैश्यांच्या वजनावर भक्त जोखणारा, आमचाच राजा कसा श्रेष्ठ असे हिरीरीने ओरडणार्या कार्यकर्त्यांमधे हरवलेला गणपती उत्सव त्याला तरी आवडेल काय याची शंका वाटते. गणेशोत्सव हा सण न गणेश केंद्रीत न राहाता सत्ता आणि पैसा केंद्रीत झालाय किंवा होतोय की काय अशी शंका शहरातले उत्सव बघून वाटते.
शेवटी देव हा देखील भक्तांचा भुकेला असतो हे खरे, पण न जाणे का पण माझे हात ह्या शहरातल्या मंदीरांपेक्षा त्या दुर्लक्षीत मंदीरातल्या एकदंताला जास्तच भक्तीभावाने जोडले जातात."
-----------
१०/०९/२०१६
हरिश्चंद्रगडावरचा हा बाप्पा राकट, कणखर, दगडाच्या देशाचा बाप्पा वाटतो कि नाही? अगदी त्याच्या ह्या शेंदूरमाखल्या रुपाला कॅमेर्यात उतरवलेय आपला मिपाकर मंदार भालेराव याने. सोबत कुणा अनामिक भक्ताने लावलेल्या अगरबत्तीचा दरवळ दिसतोय ह्या प्रकाशचित्रात. मंदारचे अनेक सुंदर अनुवाद मिपावर वाचायला मिळतात. प्रतिसादातून अन लेखनातून नवीन मिपाकराच्या पिढीचे प्रतिनिधित्व तो करतोय असे म्हणायला हरकत नाही.
------------
११/०९/२०१६
मिपाकरांच्या वाढत्या अन उत्साही प्रतिसादाने आज मात्र मिपाचित्रमालेचे रूपांतर एका चित्रगॅलरीत झाले आहे. आज या गॅलरीत तीन सुंदर चित्रे विराजमान झाली आहेत. डावीकडून पहिले जे गणेशचित्र आहे, ते पाठवले आहे amol gawali यांनी. राजकारणावर आणि सामाजिक कार्टून्स काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. मध्यभागीचे जे चित्र आहे ते रेखाटले आहे ज्येष्ठ मिपाकर राजेश घासकडवी यांनी. उत्क्रांतीविषयक अभ्यासपूर्ण लेखमाला लिहिणार्या घासकडवी गुरुजीकडून ही सरप्राईज गिफ्ट म्हणायला हरकत नाही. उजव्या बाजूचा झेंटँगल या चित्रकला शैलीतला गणेश आहे मिपाकर मोक्षदा यांचा. रासायनिक प्रदूषण टाळून नैसर्गिक गोष्टींचा पुरस्कार करणार्या चित्रकर्तीकडूनच गणेशाचे हे रूप आलेले आहे.
-------------
१२/०९/२०१६
उत्तराखंड राज्यामध्ये, रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये, मंदाकिनी आणि अलकनंदा नद्यांच्या खोऱ्यामध्य १२,०७३ फूट उंचीवर तुंगनाथाचे शिखर उभे आहे. शिखराच्या माथ्यावर पंच- केदारांपैकी तिसरेे म्हणून गणले जाणारे १००० वर्षांचे जुने शिवमंदिर आहे. त्या शिवमंदिराच्या गाभाऱ्याबाहेरील हा द्वारपाल गणराया.
ह्या अप्रतिम गणेशाला आपल्या भेटीसाठी आणलेय मनाने हिमालयातच मुक्काम ठोकून असलेल्या मिपाकर यशोधरा यांनी.
-------------
१३/०९/२०१६
आजचे प्रकाशचित्र कुणी पाठवले असावे ते सांगायची गरज नसावी. अर्थातच प्रचेतस. लेण्या, मंदीरे आणि इतिहासावर अत्यंत अभ्यासू लेखांचा धनी असणार्या प्रचेतसला भुलेश्वराने पाडलेली भूल मिपाकरांना परिचयाची आहे. पुणे-सोलापूर रोडवरील यवतनजिक असलेल्या भुलेश्वर मंदिरातील हे अप्रतिम वैनायकी/गणेशिनी शिल्प. जशा मातृका ह्या त्यांच्या पुरुष रुपाच्या शक्ती असतात तशी ही गणेशाची शक्ती शाक्त वा तंत्र पंथीयाकडून मानली जाते.
--------------
१४/०९/२०२१६
ह्या रॉकस्टार गणेशाला फोटोशॉप वापरुन सजवलेय मिपाकर कलावंत नीलमोहर यांनी. नेहमीच्या रंगीत माळांच्या उजेडात असणारा बाप्पा आज निऑनग्लो मध्ये स्टार बनलाय.
--------------
१५/०९/२०१६
आज समारोपाचे हे बॅनर देताना मला अतिशय समाधान वाटतेय. आपल्या मिपाचा हरहुन्नरी कलाकार स्पा याने खास मिपासाठी वेळात वेळ काढून ही गणेशाची प्रतिमा पाठवली आहे. प्रोफेशनल फोटोग्राफर, थ्रीडी मॉडेलर आणि भयकथा लेखक म्हणून स्पा यांची मिपाला ओळख आहेच. सोबतच ह्या चित्रात ज्या काव्यमाला दिसताहेत त्या आहेत आपल्या मिपाकर साहित्यिक माधुरी विनायक यांच्या. जडणघडण सारख्या प्रांजळ लेखमालेतून आपला एक ठसा उमटवणार्या माधुरी विनायक यांनी ह्या भक्तीपूर्ण ओळी खास मिपाचित्रमालेसाठी लिहिल्यात हे विशेष.
मिसळपाव
In reply to _/\_ अभिजीतसाठी, by नीलमोहर
निमो हे अभिजीत कोण ओ
In reply to निमो हे अभिजीत कोण ओ by महासंग्राम
तेच ते दोन . . वाले,
In reply to तेच ते दोन . . वाले, by नीलमोहर
हैला अभ्याशेठ आणि मंडळी यांच
In reply to _/\_ अभिजीतसाठी, by नीलमोहर
हो हो, अगदी असेच म्हणतो.
In reply to हो हो, अगदी असेच म्हणतो. by किसन शिंदे
कंपूबाजीला प्रेरणा देणारा
आजचं बॅनर प्रचेतस ह्यांचंच
वाह...
वाह, रॉकस्टार बाप्पा सुरेख..
आजचा बाप्पा रॉक्स!
In reply to आजचा बाप्पा रॉक्स! by यशोधरा
लगेच समारोप करु नकात. उद्याचा
In reply to लगेच समारोप करु नकात. उद्याचा by अभ्या..
अरे वा, वाट बघते!
In reply to लगेच समारोप करु नकात. उद्याचा by अभ्या..
क्या यह स्टार वही हय जो हम
नीलमोहर
In reply to नीलमोहर by पैसा
सगळीकडचा गाण्यांचा उच्छाद
In reply to सगळीकडचा गाण्यांचा उच्छाद by यशोधरा
हा
अॅनिमेशनसाठी तुम्ही
_/\_
In reply to _/\_ by नीलमोहर
मला आवडलं! रंग तर फारच..
In reply to _/\_ by नीलमोहर
नीमोताई,
प्रचेतस अप्रतिम बॅनर!
अरे वा! मस्तच!
In reply to अरे वा! मस्तच! by बोका-ए-आझम
पावित्र्याचा काय संबंध?
बॅनर आवडलं निमो.. एक कलाकारी
आजचं बॅनर आवडलं. माधुरी
In reply to आजचं बॅनर आवडलं. माधुरी by यशोधरा
+१
In reply to +१ by चांदणे संदीप
सॅन्डीबाबा हा समारोप नाहीये,
त्यंत सुरेख आणी देखणी
वा..
स्पावड्या लै भारी!
अतीशय सुंदर
स्पाचा फोटो आहे
Pagination